चित्रपटांचे न पटलेले शेवट

Submitted by चीकू on 4 August, 2015 - 14:12

बर्‍याचदा आपण चित्रपट बघायला घेतो, त्यात रंगत जातो, कथानक, अभिनय सगळ्याचीच छान गुंफण असते आणि अचानक अनपेक्षित, एकूण आत्तापर्यंतच्या सर्व कथानकाला अजिबात न्याय न देणारा असा शेवट होतो (काहीसा anti-climax म्हणता येईल असा). म्हणजे एकूण चित्रपट ज्याप्रकारे build होत असतो त्यात अशा शेवटाने एकदम तडा जातो. तर असे कुठले चित्रपट तुम्हाला आठवतात? अर्थात उगीचच अचाट आणि अतर्क्य करामतीचे सीन्स असणारे शेवट यात धरत नाही. तर ज्या शेवटामुळे चित्रपटाच्या कथाबीजाला न्याय मिळाला नाही असं वाटून राहातं, असे चित्रपट इथे अपेक्षित आहेत. इन्ग्रजी/हिंदी/मराठी कुठलेही चालतील.

मला ज्यांचा शेवट पटला नाही असे काही चित्रपट. अर्थात चित्रपटांचा शेवट खाली सांगितलेला असल्याने ज्यांना हे चित्रपट बघायचे आहेत त्यांनी वाचू नये Happy

जगाच्या पाठीवरः राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय आणि सुमधुर संगीतासाठी हा प्रसिध्द चित्रपट. सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात, आणि शेवट शोकदायकच करायचा असं ठरवलं असल्याने की काय राजा परांजपेंचे डोळे जातात! तोपर्यंत सुरेख चाललेल्या चित्रपटाला शेवट खरंच मातीत घालतो Sad

एक दुजे के लिये: इथे परत उगीचच शोकात्म शेवट केला आहे ओढूनताणून असं वाटतं. कयामत से कयामत तक सारख्या चित्रपटात तो शेवट कथेत व्यवस्थित बसत होता पण एक दुजे के लिये मधे शोकांत केल्यानेच प्रेमाची महती पटेल असे वाटले की काय कोण जाणे!

हैदराबाद ब्लूजः हलकाफुलका चांगला चित्रपट आहे पण शेवटी लग्नाच्या मंडपात मनपरिवर्तन, अदलाबदल आणि जो काय घोळ घातला आहे त्यामुळे चित्रपटाच्या वास्तवतेला खूपच धक्का पोचतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्यात बघितलेला अचाट शेवट म्हणजे दिल धडकने दो चा....तसा पुर्ण चित्रपट विस्कळितच आहे पन शेवट लिहलाच नव्हता आणि सेट गेल्यावर ठरवता येइल काय करायचे ते...अशा टाइप वाटलेला.

अरे वा छान धागा आहे..

मला हम दिल दे चुके सनमचा शेवट नव्हता पटला ..

ऐश्वर्या सलमानलाच मिळायला हवी होती..
अजय देवगण एक माणूस म्हणून चांगला वागला तर लगेच सलमानला सहज सोडले असे कसे..

तो अनिल कपूरचा वोह सात दिन चित्रपटात पण अशीच बंडलबाजी होती .. पण तेव्हाच्या जमान्याच्या लोकांना ठीक होता.. मी पाहिला तेव्हा मला नव्हता पटला..

त्यापेक्षा करण जोहारने कभी अलविदा ना कहना मध्ये लग्नानंतरही शाहरूख राणी यांना एकत्र आणले..
पण अर्थात तो काळाच्या पुढचा चित्रपट असल्याने तेव्हा तो सुद्धा बरेच लोकांना पटला नव्हता..

रितिक रोशन चा काइट.
तसा हा सिनेमा वाइट नव्हता. चान्गला अभीनय, वेगवान मान्डणी, थ्रील सर्व काही असुन चित्रपट क्लायमेक्स ला फसला. त्याला उगाचच ओढून ताणून टायटेनीक सारखी शोकन्तीका बनवीण्याच्या नादात विचका झाला.

तनू वेड्स मनू रीटर्नस..- आर. माधवन चे लग्न दुसर्या तनू बरोबरच व्हायला हवे होते..ओढून ताणून त्याला पहिल्या बायको बरोबर सेट केलेले अगदीच खटकले...

<सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात> सीमा अंध नसते. तिचा वापर करणारा व्हीलन तिच्या डोळ्यांत अंजन घालून तिला अंध करत असतो. जेव्हा जेव्हा तिला दिसू लागते आहे असे वाटते तेव्हा तेव्हा तो तिच्या डोळ्यांत अंजन घालतो. तोच मेल्याने तिच्या डोळ्यांत अंजन घालणारा कोणी नसल्याने तिची दृष्टी जाणे बंद होते.

(हे सगळं त्या कथेच्या लॉजिकमध्ये बसवायचं, विज्ञानाच्या किंवा वैद्यकाच्या नव्हे)

श्वर्या सलमानलाच मिळायला हवी होती..
अजय देवगण एक माणूस म्हणून चांगला वागला तर लगेच सलमानला सहज सोडले असे कसे.>> अजयबरोबरच रहाय्चं ठरवल्यावर मग सलमानला भेटून् तुमने प्यार करना सिखाया उसने प्यार निभाना सिइखाया वगैरे तद्दन फालतू डायलॉग मारायची गरज नव्हती. अजयलाच "लई झालं इटली दरशन आता गुजरातला पारत जाऊ" असं म्हणता आलं असतं.

ज्य ज्या सिनेमामम्ध्ये लग्नाच्या मांडवाम्ध्ये नवरा किंवा बायकोचे मतबदल होते आणि चालतं लग्न सोडून दुसर्‍याचा हात धरून पळतात त्या सर्व सिनेमांचे शेवट पटत नाहीत. (यात बॉलीवूड आणि हॉलीवूड दोघेही आले) काय करायचंय त्याचा निर्णय आधी घ्या ना, त्या लग्न करत असलेल्या पर्टनरची कशाला वाट लावताय (बर्‍याचदा या रोलसाठी मुद्दाम कॉमिक फनी असला कॅरेक्टर वापरलेलं असतं ते तर बिल्कुल आवडत नाही)

हल्ली पाहिलेलेयासिनेअमामध्ये पीके, रांझणाचे शेवट बिल्कुल पटले नाहीत.

हे सगळं त्या कथेच्या लॉजिकमध्ये बसवायचं, विज्ञानाच्या किंवा वैद्यकाच्या नव्हे

+१

हिंदी चित्रपटात पत्नी ही कायम पतीबरोबर नांदतेय असे दाखवणे मस्ट आहे. त्यामुळे हम दिल..., वो सात दिन, इत्यादी चित्रपटात नायिका शेवटी नव-याबरोबर नांदायचा निर्णय घेते. ऋषी कपुर आणि निलमचाही एक असाच चित्रपट आहे ज्यात ती शेवटी चंकी पांडेला नाही म्हणुन ऋषीबरोबर संसार पुढे चालु ठेवते. हे शेवट असे केले नाहीत तर ते चित्रपट चालणार नाहीत अशी भिती निर्मात्याला वाटत असावी बहुतेक. त्यामुळे ह्या बाबतीत कोणी कधीच रिस्क घेत नाही.

एक दुजे के लिये मध्ये ते दोघे आत्महत्या करत नाहीत तर दोघेही जखमी अवस्थेत कड्यावरुन खाली कोसळतात. पण पडण्या आधीच्या संवादांवरुन प्रेमी मंडळींनी स्फुर्ती घेऊन आत्महत्या केल्या. हा चित्रपट आल्यानंतर अशा आत्महत्या झाल्या होत्या आणि पेपरातल्या आत्महत्यांच्या बातमीमध्ये आवर्जुन या चित्रपटाचा उल्लेख असायचा.

कभी अल्विदा... मध्ये राणी आणि शाहरुख दोघेही महामुर्ख असतात ज्यांना रिलेशनशिप म्हणजे काय हे माहित नसते, ना त्यांच्याकडे स्वतःच्या जोडीदाराला समजुन घ्यायची कुवत असते. आता तुम्ही नाहीतरी आपापले संसार सोडलेत तर निदान एकत्र तरी सुखी राहा असे दाखवत एकत्र आणले. जर चित्रपटाचा पुढचा भाग आलाच तर त्या दोघांचा अतिशय दु़:खी संसार पाहायला मिळेल. आनंद ओळखुन त्याची मजा घ्यायची क्षमता दोघांमध्येही नव्हती.

या दोन चित्रपटांचा शेवट असं नव्हे तर शेवटची दोन दृश्य ज्या क्षणावर थांबतात ती मला पटली नाहीत.
पहिला आंधी : निवडणूक जिंकलेली आरती हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी जेकेच्या पाया पडते.
इजाजत : सुधाने महेंद्रला सोडून जाताना त्याची इजाजत घेतलेली नसते , ती शेवटच्या दृश्यात घेताना त्याच्या पाया पडते.
-------
पीकेचा शेवट त्या प्रेमप्रकरणावर करून खूप सोपा आणि टिपिकल हिंदी शिनुमा करून टाकला. फोकस घालवला सिनेमाचा.

असाच एक अज्जिबात न पटलेला शेवट म्हणजे सिलसिला. प्रेम आहे ना मग एका हेलीकॉप्टरला आग लागल्यावर उडुन गेलं??? प्रेम आहे की कापुर? अभिताभला जयाकडे आणि रेखाला संजीवकुमारकडे जाताना बघून किती दुःख होतं.

तेच तर आहे ना.. विवाहबंधन हे सात जन्माचे आहे, ते एका जन्मातल्या एका फुटकळ प्रेमाने तुटणारे थोडेच??

इजाजतमध्ये रेखाचे पाया पडणे मला अजिबात आवडले नव्हते. पाया पडणे दाखवुन कुठेतरी तिच्या निष्ठा आजही नसिरबरोबर आहेत असे सुचित झाले जे तिच्यावर जिवापाड प्रेम करणा-य शशीसोबत अन्यायकारक ठरले (माझ्या मते).

बाकी कित्येक चित्रपटात पहिला नवरा परतल्यावर दुस-या नव-याचे/प्रियकराची वाट लागणे किंवा नवरा मिळाल्यावर आधिच्या प्रियकराची वाट लागणे दाखवलेय, जे तसे दाखवले नाही तर चित्रपट धाडकन पडणार यावर निर्मात्याचे आणि दिग्दर्शकाचे एकमत असावे.

विद्या सिन्हाच्या त्या लल्ला लल्ला लोरीवाल्या चित्रपटात तिचा नवरा परतल्यावर बिचा-या संजिवकुमारचे अतोनात मानसिक हाल होतात. संजिवने तिला मुलीसोबत स्विकारलेले असते, तिचे आधीचे लग्न झालेले आहे हे त्याला माहित असते. त्यामुळे तिने हा अमुकतमुक माझा आधीचा नवरा, जो मेलाय असे मला वाटलेले पण आता तो आलाय परत असे त्याला सांगितले असते तर फारसे काही बिघडले नसते. आता कोणाबरोबर राहावे हा प्रश्न तिला पडलेला असेल तर तो एकत्र बसुन सोडवता आला असता. पण असे न करता चित्रपट उगीच खेचलाय आणि बिचा-या संजिवला बळीचा बकरा बनवला. मला इतका राग आलेला शेवटी. पण काय करणार?

भारतीय संस्कृती वगैरे वगैरे. Happy

सर्वात बेकार शेवट मै प्रेम की दिवानी हूं!!! त्यचे आम्ही इतके भयंकरच्या भयंकर अर्थ कढले होते. एक प्रेम आपल्या बॉस प्रेमला म्हणतो "चांदनी रात है.. क्या मै अपनी बीवी को ले जा सकता हू" आणि ती बिवी बाजूला लाजत मुरकत उभी.

वीर झारा! काय पीळ आहे. असे ते दोघे म्हतारा-म्हातारी चालत चालत कोर्टाच्या दोन टोकाकडून मध्यभागी येता येता तरूण तरूण होत जातात...मला धडकी की मध्ये पोहोचेपर्यंत थेट एम्ब्रियो अवस्थेत जातात का काय!!

मला धडकी की मध्ये पोहोचेपर्यंत थेट एम्ब्रियो अवस्थेत जातात का काय!! >>>> Lol

काजोल-अरविंद स्वामी-प्रभुदेवाचा 'सपने'. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला कॉलेजची गँग गेलो होतो. काजोल कमाल दिसली आहे सिनेमात. अरविंद स्वामी सोडून प्रभुदेवाची निवड करते शेवटी! अजिबातच पटलं नव्हतं. प्रभुदेवाला शिव्या देत बाहेर पडलो होतो Happy नंतर ऐकण्यात आलं की या सिनेमाचे दोन-तीन वेगवेगळे शेवट केलेली वर्शन्स आली होती. एकात ती प्रभुदेवाची दुसर्‍यात ती अरविंद स्वामीची निवड करते आणि तिसर्‍यात ती स्वतःच नन बनते वगैरे. (खखोदेजा) परत पाहिला नाही तो सिनेमा.

मस्त धागा आहे. आत्ता नेमके आठवत नाहीत पण वरच्या सगळ्याच पोस्ट्स ना अगदी अगदी!
मला साजन चा शेवट काहीतरीच वाटला होता. आकाश (सलमान) शी लग्न करून पूजा (माधुरी)ला सागर(संजय) च्या कवितांवर प्रेम करता आलं नसतं का? त्याकरता एवढी कुर्बानी? Proud पण खोटेपणावर सुरू झालेले नाते नको हा काडीचा आधार आहे एक.
पण खरंच, असं एखाद्या खोटेपणापायी(तो सुध्दा फार जीवावर बेतणारा नव्हे) संपूर्ण नाती तुटतात हे मला झेपत नाही. एक तर त्यातला खोटेपणा तुम्ही ओळखू शकला नाहीत म्हणजे तुम्ही मूर्ख, त्यातून तुम्ही ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलंत त्याला एका चुकीपायी माफ करू शकत नसलात तर पुढे न जाणंच योग्य.

मला सपने पटला. अरविंद स्वामी तिच्यावर प्रेम करत होता तर त्याने स्वत्: जायला हवे होते तिच्यासमोर. प्रभुदेवा तिचे मन अरविंदवर बसावे म्हणुन मुद्दाम तिला आपल्याकडे ओढतो पण स्वतःच्याही नकळत तिच्या प्रेमात पडतो. तिही त्याच्या प्रेमात पडते. तिने प्रभुदेवाला निवडले हे मला जास्त आवडले.

असे वेगवेगळे शेवट असलेला सिनेमा मल्टीप्लेक्सला असेल तर मित्रगँग तिकीट काढायचे कसे - म्हणजे मागायचे कसे? "तीन काजोल सिस्टर देना, दो ए -के काँबो और चार पी- के काँबो का देना !" असं?????????!!

"अरे कल रातको केबले पे मस्त पिचर देखा"
"कौन सा?"
"नाम याद नही पर वो है ना... काजोल वो खुनी रहती है. चाकूसे सबके खून करती है. मस्त पिक्चर थी"

(यापुढे संवाद नाहीत. केवळ हातापाई!!!!!)

सपने चा शेवट पटला. पण कुकुहोहै कधीही पटला नाही. म्हणजे पिक्चरच नाही पटला. तर शेवट काय पटणार! तसं तर मला 'ताल' मधे अनिल कपूरला सोडून जाणारी ऐश पण पटली नाही. पण ते कदाचित मला अनिल कपूर आवडतो म्हणून असू शकतं Proud

अजिबात न आवडलेला शेवट 'पडोसन' (जुना) चा. त्यात शेवटी मला महमूदचं इतकं वाईट वाटलं होतं की पुछो मत! किती वाईट वापर करून घेते ती त्याचा.

बाकी इथल्या सीमंतिनी च्या पोस्टस भारी! Lol

Pages