जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

Submitted by गणेश पावले on 24 July, 2015 - 02:38

[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]

*********************
balatkar-pidita1.jpgदुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….
बाभळीच्या काट्यात गुरफटलेली
कावरी – बावरी होवून घुसमटलेली
अनंत यातनांचा महासागर पार करून
नियतीच्या लाटेवर स्वार झालेली ती…..

आज बळी पडली
आपलं सार काही गमावून

निपचित डोळे मिटून, रक्ताच्या थारोळ्यात
तिचा निर्जीव उघडा देह आस्थाव्यस्त पडलेला.

आज सार काही सुन्न होत.

आज तिला कोणी वखवखलेल्या नजरेने पाहत न्हवत
कोणी अश्लील इशारे करत न्हवत,
कोणी हसून खोचक बोलत न्हवत
निष्प्राण देह शांत शांत वाटत होता.

आजूबाजूला गर्दी असली तरी… तिला कशा… कशाचीच भीती न्हवती.

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

© कवी – गणेश पावले (9619943637)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता….
या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला…
आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात…

या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय.
रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात