Submitted by पुरंदरे शशांक on 21 July, 2015 - 00:15
पाऊस असाही ...
माझ्या मनात पाऊस
येतो अधून मधून
खुणावित जातो वेडा
जरा डोळे मिचकून
घोंघावत रोरावत
येतो वाभरा बनून
आवरावे कसे याला
कसे घालावे बांधून
रेशमाच्या झालरींनी
करी नाजूक शिंपण
याचे विभ्रम पहाता
जातो आश्चर्य पावून
ऊन-पावसाचे नाते
उलगडे असासून
शब्दरुप गर्द पान
येई वर तरारून .....
----------------------------------------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर रचना शशांकजी शेवटच्या
सुंदर रचना शशांकजी
शेवटच्या कडव्याने छान कळसाला नेला आशय
वाह.. आत्ताच भिजुन ऑफिसमधे
वाह.. आत्ताच भिजुन ऑफिसमधे आल्यामुळे जास्तंच जाणवतोय पाऊस
मस्त!!
मस्त!!
अरे वा... छान कविता. ते
अरे वा...
छान कविता.
ते शेवटलं कडवं मी असं वाचलं...
ऊन-पावसाचे नाते
उलगडे असासून
शब्दरुप गर्द पान
येई वर तरारून .....
" ऊन-पावसाचे नाते उलगडे
" ऊन-पावसाचे नाते
उलगडे असासून
शब्दरुप गर्द पान
येई वर थरारून ....." - छानच लिहिलय.
सुंदर!
सुंदर!
सुंदर.. येतोच आहे मी, पाऊस
सुंदर.. येतोच आहे मी, पाऊस अनुभवायला !
सुंदर रचना!
सुंदर रचना!
खुप छान, आवडली
खुप छान, आवडली
खूप सुंदर पाऊस पाडलाय
खूप सुंदर पाऊस पाडलाय तुम्ही..
छान लीहीलयं.
शलाका - केलाय बदल ...
शलाका - केलाय बदल ...
सर्वांचे मनःपूर्वक आभार्स ...
ज्जे ब्बात !
ज्जे ब्बात !
सुंदर
सुंदर
पाऊस आवडला छान आहे.
पाऊस आवडला छान आहे.
खुपच छान, आवडली.
खुपच छान, आवडली.
छान!
छान!
सुंदर!
सुंदर!
खूप छान!
खूप छान!
फारच सुंदर, शशांकजी....
फारच सुंदर, शशांकजी....