Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाव 'आंबूसघार्या' मनूच्या
नाव 'आंबूसघार्या'
मनूच्या पाऊलखुणा बघ बरं..
सापडल्या तर बघ, नाहीतर मी तिच्या पद्धतीने केल्या होत्या, लिहीन कृती..
होय अल्पना, तेच... करुन
होय अल्पना, तेच... करुन बघते.. नेहमी विकत पिठ मिळतेच अस नाही, आणि डांगर म्हणजे अतिशय आवडता पदार्थ... धन्यवाद.
धन्यवाद पूनम. बघते आता..मला
धन्यवाद पूनम. बघते आता..मला नावच आठवत नव्हतं.
बघितलं ग्.पण नाहीये आता ती कृती.पण शोधल्यावर मला तो लोकसत्तेतला लेख सापडला. त्यावरुनच तिने लिहिली होती ना कृती.
बघते आता त्यावरुन प्रयोग करुन. तुला जर आठवत असेल तर जरा सांग ना. प्रयोग करण्यापेक्षा कॉपी करणं सोप्पय ना..
धन्यवाद नन्दिनी आणि
धन्यवाद नन्दिनी आणि दिनेश.
करुन बघते इडल्या
एक विचारायलाच विसरले. इडल्या
एक विचारायलाच विसरले. इडल्या जेवणाचा option म्हणुन बनवणार आहे. ४ लोकांकरता. मग उडिद आणि इडली रवा चं प्रमाण किती लागेल?
शिजवलेला भात साधारण वाटि भर घालु का? भात का घालायचा?
याचेच दोसे पण करता येतील ना?
अरुंधती. तिनास एक हे प्रमाण
अरुंधती.
तिनास एक हे प्रमाण दोशांसाठी (तिन वाट्या इडली रवा आणि एक वाटी उडिद डाळ. ह्या प्रमाणात साधारण १२ दोसे होतात मोठे), आणि दोनास एक हे प्रमाण इडल्यांसाठी (दोन वाट्या इडली रवा:१ वाटी उडिद डाळ). एक मुठ पोहे, आणि चमचाभर मेथीचे दाणे दोश्याचे पीठ वाटताना टाकल्यास कुरकुरीतपणा येतो
उत्तप्पे दोश्याच्याच पिठाचे करता येतील.
अरुंधती वर रैना ने किंवा
अरुंधती वर रैना ने किंवा नंदिनी ने दिलेल्या इडलीच्या प्रमाणात.. ( एक वाटी उ. डाळ इ इ घेउन) साधारण २०- २२ मोठ्या इडल्या होतात.
भात घातल्यास पिठ चांगलं फुगतं. भाताला दुसरा ऑप्शन मूठ्भर पोहे घालू शकतेस..
दोन्ही विसरलिस आणि समजा हवाही थंड असल्याने पिठ सकाळी किंवा इडली बनवायच्या वेळेपर्यंत फुगले नाही तर ऐन वेळी एक चमचा तेल एक चमचा पाणी आणि चिमुट्भर खायचा सोडा वाटीत मिक्स करून पिठात घातला तरी इडली एक्दम हलकी होते.. मस्त फुगते. मी स्वतः सोडा वापरणे टाळते.. पण ऐन वेळी माहित असलेलं बरं.
Thanks daffodils.बर झालं
Thanks daffodils.बर झालं समजलं. नेहमी बाहेरुन च तयार पीठ आणते त्यामुळे माहिती नव्हतं.
इडल्या जर जेवणाचा ऑप्शन
इडल्या जर जेवणाचा ऑप्शन म्हणून करणार असलीस तर सांभार भरपूर कर.
वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले असल्यने भरपेट होते आणि पोषक पण. 
कुणाला चटणी तिखट लागलीच तर मिक्स करायला म्हणून थोडे दही पण ठेव.
नन्दिनी, daffodils, रैना ,
नन्दिनी, daffodils, रैना , रविवारी इडली साम्बार केला होता. मस्त झाला. इडल्या पण मस्त मउ मउ झाल्या होत्या. Thanks ग.
जुन्या माबो वरील दिनेशदानी
जुन्या माबो वरील दिनेशदानी दिलेली द्राक्श बटाटा भाजी ओवनमधे होइल का? मला १५ - २० जणासठी करायची आहे. कोणी केली असेल तर जरा टीप्स द्या ना.
आवळ्याचे लोणचे कसे करायचे
आवळ्याचे लोणचे कसे करायचे कुणाला माहिते का..
चकोल्या करताना मुगाच्या
चकोल्या करताना मुगाच्या डाळीचे वरण करून गव्हाच्या चकोल्या करतात... खालील प्रकारे केले तर...
१. मुगाचे वरण + तान्दळाच्या चकोल्या
२. पातळ पिठले + तान्दळाच्या चकोल्या...
जामोप्या, तांदुळाचे/ज्वारीचे
जामोप्या, तांदुळाचे/ज्वारीचे पीठ पाणी घातले की विरघळल्यासारखे होते त्यात म्हणजे पिठाचे पाणी तयार होते. त्यामुळे तांदुळाची उकड काढुन त्याच्या पोळ्या लाटुन मग त्या कापुन मुगाच्या वरणात किंवा पिठल्यात घालता येतील पण हे द्राविडी प्राणायाम कशासाठी. चकुल्या वेळ वाचवुन पौष्टीक खाणे याला पर्याय म्हणुन करतात त्यात हे कशाला?
बरे झाले आपण सान्गितलेत...
बरे झाले आपण सान्गितलेत... नाही तर मी हा प्रयोग केला असता.... उकड काढून देखील तान्दळाच्या चकोल्या वेळे अभावी जमणारे नाही..
तान्दळाची धिर्डी कर ना
तान्दळाची धिर्डी कर ना त्यापेक्षा. व बरोबर त्याच डाळीचे सांभार करता येइल. मूड लागला तर.
धिर्डी कशी करायची ?
धिर्डी कशी करायची ?
सोप्पे. तान्दळाची पिठी, पाणी,
सोप्पे. तान्दळाची पिठी, पाणी, मीठ एकत्र करायचे. डोश्याच्या पिठासारखे. हवे तर त्यातच मिरची व कोथिम्बिर आले वाटून. मग तव्यावर टाकायचे.
तांदळाची उकड हा सोपा प्रकार
तांदळाची उकड हा सोपा प्रकार आहे त्यापेक्षा. कृति आहे इथे.
हिच धिरडी जरा जाडसर घालायची.
हिच धिरडी जरा जाडसर घालायची. त्याचे शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करायचे आणि आमटीत/वरणात घालायचे ...झाल्या तांदळाच्या चाकोल्या तय्यार... हा का ना का...
दिनेश, मला उकड फार आवड्ते.
दिनेश, मला उकड फार आवड्ते. तूप घालुन गरम गरम. वर ५ मिनिटात तयार बग.
घरी खुप बदाम आहेत. बहिण
घरी खुप बदाम आहेत. बहिण बाळंतिण होती तेव्हा आणलेले..... (१ महिन्यापुर्वि)..
काय करता येइल???????
रोज रात्री ३-४ भिजत घाला आणि
रोज रात्री ३-४ भिजत घाला आणि सकाळी साले काढुन मग चावुन चावुन खा..
नाहीतर मग काजुकतली करतो तशी बदामकतली करा आणि मला बोलवा खायला...
उकड एकदम मस्त.. माझ्या मुलीने एकदा मला उकड करताना पाहिले आणि दुसरे दिवशीपासुन दुपारची रोज उकड करुन खायला लागली ती....
मी परवा मस्त स्पॅघेटी व
मी परवा मस्त स्पॅघेटी व टोमॅटो सॉस बनविले होते. प्रॉपर इटालियन चवीचे. प्रश्न हा आहे कि, त्यात चीज घातले तर ते आणखी मस्त लागेल. कोणचे चीज घालू? भारतात फकत अमुल प्रोसेस्ड बरे आहे व मोजरेला.
ब्रिटानिया चे आवड्त नाही. तसेच ते फक्त शेवटी वरून किसून घालू का? मी वेगन बनणे अशक्य दिसते आहे.
किट्टु, आवळे वाफवुन घ्यायचे
किट्टु, आवळे वाफवुन घ्यायचे आणि मग त्यात लोणच्याचा मसाला आणि वरतुन गरम करुन गार केलेली फोडणी. कच्चे आवळे पण चालतात.
कोणती पाककृती हवी आहे ते लिहा
कोणती पाककृती हवी आहे ते लिहा सारे प्रतिसाद वाचल्या वर गोन्धळ होत आहे.
दावण गिरि दोसा मधे तान्दुळ अणि पोहे घेउन बारिक वाटतात व डोसा करतात लोणी घालून.
अ
अ
मामी मोजारेला ..अगदीच नो
मामी
मोजारेला ..अगदीच नो नो.
परमिजान चीज मिळते का तिथे? कुठलेही चीज पास्तावर घालतांना सगळ्यात शेवटी किसून घालायचे. इथे किसलेले पण मिळते डब्यात तिथेही कदाचित मिळेल.
धिर्डी कशी करायची ? बेसन
धिर्डी कशी करायची ?
बेसन पाणी, मीठ एकत्र करायचे. डोश्याच्या पिठासारखे. हवे तर त्यातच मिरची व कोथिम्बिर आले वाटून. मग तव्यावर टाकायचे व तेल टाकून भाजायचे. गोड धिर्डी करता गव्हा चा आटा, गूळ व पाणी एकत्र करायचे आणी थोडे पातळ करायचे मग तव्या वर डोस्या सारखे तेल टाकुन परतायचे. गोड धिर्डी दूधा बरोबर चान्गली लागतात.
धिर्डी -- वरुन माझी आजी एक गोश्ट सान्गायची --
एक रागीट नवरा होता, तो एक दिवस कुणा कडे तरी धिर्डी खावून आला. धिर्डी त्याला खूप आवडली. मग काही दिवसा नी त्याला धिर्डी खायची इच्छा झाली पण त्याला नाव आठवेना आणि बायको ला सारखे ते कर, ते कर ... म्हणू लागला. त्याच्या बायको ला काही कळे ना. मग त्याचा राग अनावर झाला व त्यानी बायको ला खूप बदडले.
मग बायको रडत-रडत म्हणाली की तूम्ही मारून-मारून माझ्या पाठी च धिरड् केल आणि त्याला आठवल की त्याच नाव धिरड् होत.
तो तिला म्हनाला की ते धिरड् करायला तर म्हणत होतो.
ह्या वरून "पाठी च धिरड् झाल" हि म्हन पडली.
आवळ्या च्या लोण्च्या मधे लसून
आवळ्या च्या लोण्च्या मधे लसून कळ्या पण घालतात
Pages