लवेंडर अँड स्ट्रॉबेरी पॉपसीकल्स

Submitted by मृणाल साळवी on 12 July, 2015 - 06:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

लवेंडर - १ टेबलस्पुन
स्ट्रॉबेरी - १ कप
दुध - १ कप
दहि (ग्रीक योगर्ट)- १ कप
साखर - १ कप

क्रमवार पाककृती: 

१. एका पातेल्यात दुध गरम करण्यास ठेवावे. त्यात १/२ कप साखर व १ टेबलस्पुन लवेंडर टाकुन ५ मिनिटे उकळुन घ्यावे.

c1

२. गरम झालेले दुध गाळुन घेउन गार होऊ द्यावे.
३. दुसर्‍या भांड्यात १/२ कप साखर व स्ट्रॉबेरी घेउन शिजु द्यावे. हे मिश्रण देखिल गार करुन घ्यावे.

c1

४. आता गार झालेल्या दुधामधे १ कप ग्रीक दहि टाकुन चांगले फेटुन घ्यावे.

c1

५. पॉपसीकल्स बनवायच्या साच्यामधे दहि व दुधाचे २ चमचे मिश्रण टाकुन वरुन १-१ चमचा स्ट्रॉबेरीचा केलेला जॅम टाकावा. सगळ्यात शेवटी परत दुध- दहिचे मिश्रण टाकुन साचा भरुन घ्यावा.

c1c1c1

६. हा साचा फ्रिजर मधे सेट होण्यासाठी ५-६ तास ठेवुन द्यावा.

c1

७. पॉपसीकल्स सेट झाल्यावर साचा बाहेर काढुन गरम पाण्यात १ मिनिट फिरवुन घ्यावा. त्यामुळे पॉपसीकल्स साच्यामधुन काढण्यास मदत होते.
८. पॉपसीकल्स खाण्यासाठी तयार आहेत.

c1c1c1

वाढणी/प्रमाण: 
6 माणसांसाठी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, दही चक्का करायला बांधून ठेवतो तसे करुन पाणी काढून घे. मी मोठ्या बोलवर चाळणी/कोलँडर, त्यावर पंचा असे वापरते.

तुम्ही ग्रीक दह्या ऐवजी साधे पण जास्त % फॅट असलेले दही वापरु शकता किंवा स्वातीने सांगितल्या प्रमाणे साध्या दह्याचे पाणी काढुन वापरु शकता. चक्का वापरल्यास साखर थोडी जास्त वापरावी लागेल कारण चक्का तसा आंबट असतो.

बेरिज पैकी कुठलीही बेरी चालेल ना? घरात ब्लूबेरिज आहेत.

नंदिनी, लॅव्हेंडर इसेंस मिळतो. तो वापरून जमेल कदाचित. प्रयोगांति परमेश्वर!

मस्त दिसताहेत पॉप्सिकल्स!

लव्हेंडर न घालूनही चालेल. त्याचा फक्त फ्लेवर आहे. तो घटक पाककृतीवर प्रक्रिया करणारा नाही.

मस्त

सगळ्यांचे धन्यवाद. मी ड्राय लवेंडर घेतले होते. तुम्ही लवेंडर इसेन्सही वापरु शकता. लवेंडर आवडत नसेल तर दुसरा कुठलाही फ्लेवर वापरु शकता. Happy

ंलव्हेंडर फ्लेवर घेताना तो फूड ग्रेड आहे ना हे लेबल वर चेक करून मगच घ्या. लव्हेंडर जास्त करून फ्रेग्रन्स मध्ये वापरतात जे फूड ग्रेड असेलच असे सांगता येत नाही. दूध लव्हेंडर बरे लागते काय?

ंलव्हेंडर फ्लेवर घेताना तो फूड ग्रेड आहे ना हे लेबल वर चेक करून मगच घ्या. लव्हेंडर जास्त करून फ्रेग्रन्स मध्ये वापरतात जे फूड ग्रेड असेलच असे सांगता येत नाही. दूध लव्हेंडर बरे लागते काय?

हो अगदी बरोबर अमा.. मी स्पायसेसच्या शॉप मधुनच घेतले होते. स्पेशली कुकिंग साठी. मला तरी लवेंडर फ्लेवर खुप आवडतो. उन्हाळ्यात मस्त refreshing वाटतो.

मी आज १/३ प्रमाण घेवून ३ पॉपसिकल्स सेट करत ठेवले आहेत. लवेंडर ऐवजी थोडासा वॅनिला वापरला आणि जोडीला थोडे सॉल्टेड कॅरमल सॉस.

दह्यामुळे क्रिमीनेस येतो. इथे लो फॅट दुध मिळते, नुसते त्याचे केले असते तर ते पाणचट बर्फासारखे लागते. म्हणुन दही घातले.

Pages