लवेंडर अँड स्ट्रॉबेरी पॉपसीकल्स

Submitted by मृणाल साळवी on 12 July, 2015 - 06:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

लवेंडर - १ टेबलस्पुन
स्ट्रॉबेरी - १ कप
दुध - १ कप
दहि (ग्रीक योगर्ट)- १ कप
साखर - १ कप

क्रमवार पाककृती: 

१. एका पातेल्यात दुध गरम करण्यास ठेवावे. त्यात १/२ कप साखर व १ टेबलस्पुन लवेंडर टाकुन ५ मिनिटे उकळुन घ्यावे.

c1

२. गरम झालेले दुध गाळुन घेउन गार होऊ द्यावे.
३. दुसर्‍या भांड्यात १/२ कप साखर व स्ट्रॉबेरी घेउन शिजु द्यावे. हे मिश्रण देखिल गार करुन घ्यावे.

c1

४. आता गार झालेल्या दुधामधे १ कप ग्रीक दहि टाकुन चांगले फेटुन घ्यावे.

c1

५. पॉपसीकल्स बनवायच्या साच्यामधे दहि व दुधाचे २ चमचे मिश्रण टाकुन वरुन १-१ चमचा स्ट्रॉबेरीचा केलेला जॅम टाकावा. सगळ्यात शेवटी परत दुध- दहिचे मिश्रण टाकुन साचा भरुन घ्यावा.

c1c1c1

६. हा साचा फ्रिजर मधे सेट होण्यासाठी ५-६ तास ठेवुन द्यावा.

c1

७. पॉपसीकल्स सेट झाल्यावर साचा बाहेर काढुन गरम पाण्यात १ मिनिट फिरवुन घ्यावा. त्यामुळे पॉपसीकल्स साच्यामधुन काढण्यास मदत होते.
८. पॉपसीकल्स खाण्यासाठी तयार आहेत.

c1c1c1

वाढणी/प्रमाण: 
6 माणसांसाठी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे खुप धन्यवाद.
सिन्ड्रेला.. हो हेवी क्रिमही चालेल, पण ते जास्त व्हिप करायची गरज नाही.

वॅनिला, स्ट्रॉबेरी, सॉल्टेड कॅरमल वाली पॉपसिकल्स नवर्‍याला आणि मला आवडले. मी लो फॅट दूध आणि दही वापरले. लेकाला योगर्टवाली चव नाही आवडली.
मृणाल, लो फॅट रेसीपीसाठी धन्यवाद.

Pages