मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आफळे बुआ ह्यांचा कीर्तनामधील एक प्रसंग इथे देत आहे

(रेल्वे फलाटावर काही लोक रसवंती मध्ये जातात … आता पुढे )

मराठी प्रवासी : ६ ग्लास 'उस' का रस लेकर आओ.

नोकर : 'उस' का रस ??? क्या लाऊ.

मराठी प्रवासी : अबे समझता नै क्या ६ ग्लास 'उस' का रस लेकर आ.

(गोंधलेल्या नोकराकडे पाहून मराठी प्रवासी हाताने 'उसाच्या मोळीकडे' बोट दाखवत)

मराठी प्रवासी : दुकान 'उस' का है ना , उस का रस लेकर आओ

(आता तो जिकडे अंगुलीनिर्देश करत होता तिकडे उसाच्या मोळ्या आणि मालक दोघे पण बसले होते )

नोकर : दुकान उसका है, उसका रस केसे लाऊ Sad

मग त्याला कळाल त्यांना 'गन्ने' का रस पाहिजे होता Happy

लहानपणी एकदा मी आणि माझा भाऊ खेळत असताना काहितरी झाले न माझा भाऊ पटकन बोलला.... जिस का किया जाये भला वो म्हनता है माझाच खरा...

ह्यावरुन मी त्याला अजुन ही चिडवते...

पुपुवरून - आशूडी | 23 June, 2015 - 14:08
अरे, आपल्या रोजच्या फालतू रेसिपी हिंदीतून सांगणं किती अवघड आहे! साधी गाजराची किंवा कोबीची कोशिंबीर सांगतानाही किती वेळा शब्द सुचत नाहीत. कांद्याला प्याज म्हणण्याऐवजी अनियन म्हणणं सोपं वाटतं. (नाहीतर बळंच संजीव कपूर झाल्यासारखं वाटतं) आता ही रेसिपी.
कुछ नहीं रे, हम रोज रायता बनाते है..
दही और बूंदीवाला?
बुृंदीच ऐसे नहीं, कोई भी सब्जी चलती है.
मतलब सलाड?
नही, अभी गाजर (ज जामाताला) या cabbaage ले लो (कोबी, गोभी, गोबी? जाऊंदे मरूदे)
(हां, पत्ताकोबी म्हणतात नाही का)
पत्तकोबी को ग्रेट करने का. (ग्रेट!)
ओके., मतलब?
ऐसे ऐसे बारीक बारीक खिसने का (किसायची क्रिया) और एक अनियन और आधा या पूरा दोमाटो बारीक काट के डालदो.
फिर (बोंबला! उम्म..) तुम लोग ग्राऊंडनट का पावडर बनाते हो क्या? थोडा सेंक के, छिलके निकालके?
बडा वाला या छोटा वाला?
(हे काय आणिक) कोई भी. थोडा जाडा चाहिये (ज जामातला). वो एक टेबलस्पून. फिर सॉल्ट, शुगर (नमक शक्कर ृ= संजीव कपूर) और फिर तडका मारो. निंबू चाहिये तो दो तीन ड्रॉप्स (पिळापिळी नको)
फिर आप उसको खोंसते हो?
आं?(पुन्हा कसं किसणार?)
मतलब फ्राय करते हो?
नहीं, तडका उपर से डालनेका. मस्टर्ड, हिंग और मिरची का. बाकी सारा कच्चा ही खाना है.
वाह,.ये तो मस्त बनेगा.
हां, अगर है घर में तो (डाळींबाचे चार दाणे!) पोमेग्रेनट डाल दो. सुंदर दिखेगा.
हां!!
(हुश्श!)

आशुडी.. Lol

शेजारच्या काकु वॉचमन ला अन्न देत होत्या. तो संवाद-
काकु- सुनो काका. ये जो भाजी है ना वो चांगली है. वो खालेना. पोळी और शीरा भी चांगला है. लेकीन हि आळु की भाजी विटेली (?) है. वो फ़ेक देना.

वॉचमन ला नक्की काय कळले आणि त्याने काय खाल्ले त्याचे त्यालाच माहीत.

आळु की भाजी विटेली >>> Biggrin

या धाग्यावर आलं आणि करमणूक झाली नाही असं होतच नाही. 'आज मेरे अंग पे...' तर कधी पण आठवून फिसकन हसायला येतं.

मी (बाईला): कितनी बार बोला है के कोइ भी पदार्थ फ्रिज मे उघडा नही रखनेका, स्मेल आता है उसको और सुक्का हो जाता है वो अलग Biggrin

पुपुवरून - limbutimbu | 24 June, 2015 - 10:47

>>> आपण दुसर्‍या भाषेची मोडतोड केल्याचे किस्से चघळता तसे दुसर्‍यांनी आपल्या भाषेची मोडतोड केल्याचे किस्सेही चघळा बरं बाळांनो..- नीरजाची आई. <<<<
सहमत.
फक्त मुळात अगदी पुण्यामुम्बैत देखिल "हे दुसरे" त्यांची भाषा सोडून मराठीमधे कधीतरी बोलायचा प्रयत्न तरी करतात का हाच संशोधनाचा विषय आहे. ते तुमची भाषा बोलतातच कधी म्हणून असे किस्से दिसतील?
उलट असे दिसते की मराठी लोकच ("हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे" या थाटात) उतावीळपणे मराठी सोडून "दुसर्‍यांच्या भाषेत अथवा हिंदीत" बोलायला उतरतात. अगदी समोरच्याला मराठी येत आहे हे समजुन/दिसुनही अट्टाहासाने हिंदी/इंग्रजी चालू ठेवतात. इतकेच काय, मराठी माणसाशीही हिंदीतच बोलू लागतात.... (आता असे विचारू नका की, "मी मराठी" असे काय तुमच्या कपाळावर लिहून ठेवलेले असते का! समोरचा मराठी हे ओळखायचे कसे यावर वेगळा धागा काढा)
याबाबत मी मात्र अट्टाहासाने /हट्टीपणे कंपनी/बाजार/गावे येथे समोरच्याशी सातत्याने मराठित बोलतो, अगदीच व्यवहार थांबू नये म्हणुन हिंदी/इंग्रजीचा आधार घेतोही, पण पुन्हा पहिले पाढे पन्च्चावन्न प्रमाणे मराठीतच बोलु लागतो व समोरच्याला जाणिव करुन देतो की तुला इथे महाराष्ट्रात मराठि येत नाही ही तुझी चूक्/कमतरता आहे व ती तूच अभ्यास केलास तर सुधारू शकेल, व नै आली मराठी तर कै बिघडत नाही असे चालणार नाही... अनुभव असा की परभाषिक लोक हळूहळू पण निश्चितपणे मराठी बोलू लागतात. वर त्यांचि भाषा शिकण्याचीही माझी तयारी असतेच! मी टाळी एका हाताने वाजवित नाही.

मराठी पुरोहित - हिंन्दी यजमान .. एक सं"वाद! Wink

य:- पंडितजि
पु:- आं!
य:-शास्त्र के अनुसार ये वास्तुपुरुष की स्थापना किधर करते है?
पु:- घरकी आग्नेय दिशा-में खड्डा खोदके गाडते हैय|

यजमान आग्नेय खड्ड्यात दिवंगत...

य:- गुरूजी, चाय?
पु:-अभी नहीं. पूजा संपने के बाद-लगाव!
य:- (धड काही न कळल्यामुळे..) किधर?
पु:-(चिडून स्वच्छ हिंन्दित प्रकटतो..) मेरे मस्तिष्क के ऊपर!

आजुबाजुचं पब्लिक हसून ग्गार,...यजमान ठ्ठार!
==========
to be continue..... Wink

limbutimbu. >> एकुणएक शब्दास अनुमोदन.. माझी पण वागण्याची हिच तर्‍हा आहे Happy

अत्रुप्त Proud

Pages