मी कस्टर्ड पावडर आणून त्यावर लिहिलेल्या सुचनांनुसार कस्टर्ड बनवले म्हणून आपणही असेच कराल किंवा आपल्याला येत असलेल्या कृतीने कराल ह्या विचाराने मी कस्टर्डची कृती लिहत नाही.
१) तर तयार कस्टर्ड फ्रिजमध्ये गार करून घ्यायचे.
२) कडा कापलेल्या ब्रेड स्लाईस दूधात भिजवून त्या हलक्या हाताने दाबून निथळवून घ्यायच्या.
३) ह्या स्लाईसवर कापलेल्या फळांचे व ड्रायफ्रुट्सचे तुकडे चमचाभर घालायचे.
४) आता दोन कोनांच्या सहाय्याने गुंडाळत, हलक्या हाताने दाबत ह्या भरल्या फळांचा रोल तयार करायचा.
५) हे रोल सर्व्हिंग डिश मध्ये ठेउन त्यावर थंड झालेले कस्टर्ड पसरवायचे.
६) आता डाळिंबाचे दाणे तसेच रंगित फळे व ड्रायफ्रुट्सचा वापर करून ह्यावर डेकोरेशन करावे.
झाले तय्यार
हे ब्रेड रोल थोडा वेळ मुरले की अजून चवदार लागतात.
तुम्हाला आवडत असल्यास फळांमध्ये अजून गोडाचा माल-मसाला म्हणजे वेलची, दुधाच्या मसाल्यासारखे पदार्थ घालू शकता. पण असे प्लेनही छान लागतात.
स्लाइसवर जास्त प्रमाणात फळे टाकल्यास रोल करताना कठीण पडते म्हणून एक ते दिड चमचा हे प्रमाण मला ठिक वाटले.
सजावटीसाठी केशरही वापरू शकता.
जागू, मस्त दिसतेय. करुन बघीन
जागू, मस्त दिसतेय. करुन बघीन नक्की. एरवी नुसती वाचावीच लागते तुझी रेसिपी. ( स्मित)
मस्त आहे ते हिरवे काय आहे -
मस्त आहे
ते हिरवे काय आहे - द्रा़क्ष का किवी फ्रुट?
हेमाताई नक्की आणि खुप सोप्पी
हेमाताई नक्की आणि खुप सोप्पी आहे.
नताशा ती द्राक्ष आहेत.
मस्त आहे नुसते फ्रुट कस्टर्ड
मस्त आहे नुसते फ्रुट कस्टर्ड खाऊन आता कंटाळा आलाय, हे व्हेरिएशन आवडेल असे वाटतेय
मस्त दिसतंय. कस्टर्ड खूप
मस्त दिसतंय. कस्टर्ड खूप आवडतं.
लै भारी दिस्तयं .......
लै भारी दिस्तयं ....... स्लर्प ......
छानच !
छानच !
मस्त दिसतंय. कस्टर्ड खूप
मस्त दिसतंय. कस्टर्ड खूप आवडतं.>>>+१
जागू, मस्त! मी नुसतीच पाहिली
जागू, मस्त! मी नुसतीच पाहिली होती तु पाहिली करुन.... ममो ला मम!
जागु.. मस्त दिस्तंय कलरफुल,
जागु.. मस्त दिस्तंय कलरफुल, अॅपिटायझिंग..
एक शंकाये, ब्रेड स्लाईसेस फार वेळ कस्टर्ड मधे डुंबल्या कि रोल्स सुटून चुरा नाही का होत??
कच्च्या स्लाईस ची चव कशी लागते? कस्टर्ड मधे??
अरे वा, मस्त दिसतेय. करुन
अरे वा, मस्त दिसतेय. करुन बघेन.
कच्च्या स्लाईस ची चव कशी
कच्च्या स्लाईस ची चव कशी लागते? कस्टर्ड मधे??>>>>>>>> हं मलाही हीच शंका होती. पण नंतर विचार केला.....लहानपणी दुधात बुडवून ब्रेड खात असू ...तशीच चव.
हे रोल तळले/मावे केले तर आतल्या फळाची वाट लागेल नाही का?
मानु.. मलाह्ही अगदी बरोब्बर
मानु.. मलाह्ही अगदी बरोब्बर हीच्च आठवण आलेली.. दुधात बुडवून खात असलेलो ब्रेड.. हीही.. मला आवडते अशी खायला.. अजूनही
छान आहे रेसिपी, करता
छान आहे रेसिपी, करता येण्यासारखी
छान आहे रेसिपी... आवडली.
छान आहे रेसिपी... आवडली.
आहा .. मस्त दिसत आहे..
आहा .. मस्त दिसत आहे.. टेम्प्टींग एकदम.. करेल करेल.. प्रचि पन झकासच
मस्तच आहे.
मस्तच आहे.
एकदम सोप्पी वाटली आणि दिसते
एकदम सोप्पी वाटली आणि दिसते पण मस्त!!
मस्त आहे रेसिपी. सोपी. लहान
मस्त आहे रेसिपी. सोपी. लहान मुलंही बनवू शकतील. ताजी वा फ्रोजन फळे नसतील तर मिक्स फ्रूट जाम + सुकामेवा यांचे सारण घालूनही चांगले लागेल बहुतेक. फळांमुळे येणारी मजा नसेल, पण तरी पर्याय म्हणून वापरता येईल.
हायला ब्रेड रोल नावावरून
हायला ब्रेड रोल नावावरून वाटले नव्हते एवढे चिकणे दिसतेय..
फायनल प्रॉडक्ट छान दिसत आहे
फायनल प्रॉडक्ट छान दिसत आहे ..
आधी मला वाटलं रोल तळणार की काय ..
(रस मलाई साठी चॅलेज्ड् लोकांनीं अशी स्टफ्ड रसमलाई करावी काय?
मस्त, करुन बघेन
मस्त, करुन बघेन
मस्तच दिसतय
मस्तच दिसतय
फारच मोहक दिसतेय तयार डीश!
फारच मोहक दिसतेय तयार डीश! एखादे नवीन लग्न झालेले जोडपे घरी येणार असेल तर स्वीट म्हणून ठेवावी असे वाटून गेले एकदम.
मलाही वर्षुसारखंच वाटतंय की
मलाही वर्षुसारखंच वाटतंय की (कच्चा?) ब्रेड कस्टर्डमध्ये बुडला तर फारच सॉगी होईल. म्हणजे अगदी बदबदीत लागतील ते ब्रेड रोल्स. त्यापेक्षा ते ब्रेडरोल्स तुपात शॅलो फ्राय करून कस्टर्डमधे घातले तर खमंग चविष्ट लागेल असे आपले माझे मत. शाही टुकडा विथ फ्रूट्स अशी डिश होईल ती.
शेवटचा फोटो मस्त आला आहे.
मस्तच
मस्तच
हम्म्म. सॉगी न लागण्यावर एक
हम्म्म. सॉगी न लागण्यावर एक उपाय. सारणामध्ये फळं न घेता फक्त सुकामेवा (त्यातही नट्स) घ्यायचा. आतमध्ये भरण्याअगोदर थोडा भाजून कुरकुरीत करून घ्यायचा. डायरेक्ट तयार चिक्की तोडून टाकली तर?
(No subject)
स्पॉन्जी केक स्लाइसेस वापरता
स्पॉन्जी केक स्लाइसेस वापरता येतिल, रोल हल़क्या हाताने तुपावर गोल्डन करता येतिल.
मस्त आहे रेसिपी
(जागुने माशाच्या आकाराची प्लेट वापरुन नाव राखलेय)
एकदम देखणी रेसिपी, जागुतै.
एकदम देखणी रेसिपी, जागुतै. करायला सोपी आणि खायलाही चविष्ट दिसतेय.
Pages