ब्रेड रोल कस्टर्ड

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 June, 2015 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तयार कस्टर्ड
ब्रेड स्लाईस (कडा काढून)
स्लाईस बुडविण्यासाठी थोडे दूध
सिझन नुसार वेगवेगळ्या फळांचे बारीक तुकडे
(उदा. सफरचंद, द्राक्ष, पेअर, आंबा, चिकू, डाळिंब)
थोडे आपल्याकडे असलेल्या ड्रायफ्रुटचे तुकडे

क्रमवार पाककृती: 

मी कस्टर्ड पावडर आणून त्यावर लिहिलेल्या सुचनांनुसार कस्टर्ड बनवले म्हणून आपणही असेच कराल किंवा आपल्याला येत असलेल्या कृतीने कराल ह्या विचाराने मी कस्टर्डची कृती लिहत नाही.

१) तर तयार कस्टर्ड फ्रिजमध्ये गार करून घ्यायचे.

२) कडा कापलेल्या ब्रेड स्लाईस दूधात भिजवून त्या हलक्या हाताने दाबून निथळवून घ्यायच्या.
३) ह्या स्लाईसवर कापलेल्या फळांचे व ड्रायफ्रुट्सचे तुकडे चमचाभर घालायचे.

४) आता दोन कोनांच्या सहाय्याने गुंडाळत, हलक्या हाताने दाबत ह्या भरल्या फळांचा रोल तयार करायचा.

५) हे रोल सर्व्हिंग डिश मध्ये ठेउन त्यावर थंड झालेले कस्टर्ड पसरवायचे.

६) आता डाळिंबाचे दाणे तसेच रंगित फळे व ड्रायफ्रुट्सचा वापर करून ह्यावर डेकोरेशन करावे.

झाले तय्यार

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन
अधिक टिपा: 

हे ब्रेड रोल थोडा वेळ मुरले की अजून चवदार लागतात.
तुम्हाला आवडत असल्यास फळांमध्ये अजून गोडाचा माल-मसाला म्हणजे वेलची, दुधाच्या मसाल्यासारखे पदार्थ घालू शकता. पण असे प्लेनही छान लागतात.
स्लाइसवर जास्त प्रमाणात फळे टाकल्यास रोल करताना कठीण पडते म्हणून एक ते दिड चमचा हे प्रमाण मला ठिक वाटले.
सजावटीसाठी केशरही वापरू शकता.

माहितीचा स्रोत: 
कुठल्या तरी मराठी चॅनेलवरच्या प्रोग्राम मध्ये पाहिलेले.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु.. मस्त दिस्तंय कलरफुल, अ‍ॅपिटायझिंग..
एक शंकाये, ब्रेड स्लाईसेस फार वेळ कस्टर्ड मधे डुंबल्या कि रोल्स सुटून चुरा नाही का होत??
कच्च्या स्लाईस ची चव कशी लागते? कस्टर्ड मधे??

कच्च्या स्लाईस ची चव कशी लागते? कस्टर्ड मधे??>>>>>>>> हं मलाही हीच शंका होती. पण नंतर विचार केला.....लहानपणी दुधात बुडवून ब्रेड खात असू ...तशीच चव.

हे रोल तळले/मावे केले तर आतल्या फळाची वाट लागेल नाही का?

मानु.. मलाह्ही अगदी बरोब्बर हीच्च आठवण आलेली.. दुधात बुडवून खात असलेलो ब्रेड.. हीही.. मला आवडते अशी खायला.. अजूनही Lol

मस्त आहे रेसिपी. सोपी. लहान मुलंही बनवू शकतील. ताजी वा फ्रोजन फळे नसतील तर मिक्स फ्रूट जाम + सुकामेवा यांचे सारण घालूनही चांगले लागेल बहुतेक. फळांमुळे येणारी मजा नसेल, पण तरी पर्याय म्हणून वापरता येईल.

फायनल प्रॉडक्ट छान दिसत आहे .. Happy

आधी मला वाटलं रोल तळणार की काय ..

(रस मलाई साठी चॅलेज्ड् लोकांनीं अशी स्टफ्ड रसमलाई करावी काय? Wink

फारच मोहक दिसतेय तयार डीश! एखादे नवीन लग्न झालेले जोडपे घरी येणार असेल तर स्वीट म्हणून ठेवावी असे वाटून गेले एकदम.

मलाही वर्षुसारखंच वाटतंय की (कच्चा?) ब्रेड कस्टर्डमध्ये बुडला तर फारच सॉगी होईल. म्हणजे अगदी बदबदीत लागतील ते ब्रेड रोल्स. त्यापेक्षा ते ब्रेडरोल्स तुपात शॅलो फ्राय करून कस्टर्डमधे घातले तर खमंग चविष्ट लागेल असे आपले माझे मत. शाही टुकडा विथ फ्रूट्स अशी डिश होईल ती.

शेवटचा फोटो मस्त आला आहे.

हम्म्म. सॉगी न लागण्यावर एक उपाय. सारणामध्ये फळं न घेता फक्त सुकामेवा (त्यातही नट्स) घ्यायचा. आतमध्ये भरण्याअगोदर थोडा भाजून कुरकुरीत करून घ्यायचा. डायरेक्ट तयार चिक्की तोडून टाकली तर?

स्पॉन्जी केक स्लाइसेस वापरता येतिल, रोल हल़क्या हाताने तुपावर गोल्डन करता येतिल.
मस्त आहे रेसिपी

(जागुने माशाच्या आकाराची प्लेट वापरुन नाव राखलेय)

Pages