ब्रेड रोल कस्टर्ड

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 June, 2015 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तयार कस्टर्ड
ब्रेड स्लाईस (कडा काढून)
स्लाईस बुडविण्यासाठी थोडे दूध
सिझन नुसार वेगवेगळ्या फळांचे बारीक तुकडे
(उदा. सफरचंद, द्राक्ष, पेअर, आंबा, चिकू, डाळिंब)
थोडे आपल्याकडे असलेल्या ड्रायफ्रुटचे तुकडे

क्रमवार पाककृती: 

मी कस्टर्ड पावडर आणून त्यावर लिहिलेल्या सुचनांनुसार कस्टर्ड बनवले म्हणून आपणही असेच कराल किंवा आपल्याला येत असलेल्या कृतीने कराल ह्या विचाराने मी कस्टर्डची कृती लिहत नाही.

१) तर तयार कस्टर्ड फ्रिजमध्ये गार करून घ्यायचे.

२) कडा कापलेल्या ब्रेड स्लाईस दूधात भिजवून त्या हलक्या हाताने दाबून निथळवून घ्यायच्या.
३) ह्या स्लाईसवर कापलेल्या फळांचे व ड्रायफ्रुट्सचे तुकडे चमचाभर घालायचे.

४) आता दोन कोनांच्या सहाय्याने गुंडाळत, हलक्या हाताने दाबत ह्या भरल्या फळांचा रोल तयार करायचा.

५) हे रोल सर्व्हिंग डिश मध्ये ठेउन त्यावर थंड झालेले कस्टर्ड पसरवायचे.

६) आता डाळिंबाचे दाणे तसेच रंगित फळे व ड्रायफ्रुट्सचा वापर करून ह्यावर डेकोरेशन करावे.

झाले तय्यार

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन
अधिक टिपा: 

हे ब्रेड रोल थोडा वेळ मुरले की अजून चवदार लागतात.
तुम्हाला आवडत असल्यास फळांमध्ये अजून गोडाचा माल-मसाला म्हणजे वेलची, दुधाच्या मसाल्यासारखे पदार्थ घालू शकता. पण असे प्लेनही छान लागतात.
स्लाइसवर जास्त प्रमाणात फळे टाकल्यास रोल करताना कठीण पडते म्हणून एक ते दिड चमचा हे प्रमाण मला ठिक वाटले.
सजावटीसाठी केशरही वापरू शकता.

माहितीचा स्रोत: 
कुठल्या तरी मराठी चॅनेलवरच्या प्रोग्राम मध्ये पाहिलेले.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी, विनीता, शशांकदा, दिनेशदा, आशिका, मंजूताई, पूनम, साधना, टीना, सीमान्तीनी, अ.कु. ऋन्मेष, सशल, अनुश्री, इनमिनतीन, आशुडी, योकु, अतृप्त, चंद्रा धन्यवाद.

वर्षूताई, मंजूडी मलाही हेच वाटत होत की जास्त वेळ बुडवून राहीला तर ब्रेडचा चुरा होईल पण नाही झाला.
आणि कच्च्याबाबत म्हणशील तर अगदी लगेच खाल्ले की जरा ब्रेडची ती चव लागते पण एखाद तास मुरवून घेतले ना की ब्रेड आहे हे कळतही नाही. रसमलाई प्रमाणे लागते.
मला वाटत बनवून सरळ एक तास मुरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेउन द्यावी डिश.

आणि आधीच तळून जर ते दुधात बुडवून मग त्याचे रोल केले तरी चव वेगळी लागेल असे मला वाटते. म्हणजे असे करुन बघायला हवे. नेक्स्ट टाईम.

प्राजक्ता Lol

योकू कदाचीत त्याने कुरकुरीतपणाही येईल.

Pages