मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रावळ माझी जबरदस्त आवडती कथा. श्रीदांची वाचायलाच हवीय आता. मी पानवलकरांचा एकच कथासंग्रह वाचलाय आत्तापर्यंत.

प्रविण दवणे लिखाण. अगदी करेक्ट. हे असं स्वतःवरचे संस्कार, संवेदनशिलता तेव्हढी आदर्श आणि उच्च टाइप्स लिखाण खास वर्तमानपत्री सदरलेखनातून सुरु होतं आणि त्याला 'सामान्य' आणि मध्यमवर्गिय वाचकांचे 'आम्हाला अस्सच वाटतं अगदी. कित्ती खरं....' प्रतिसाद मिळत गेल्यावर उगीच चढून जाऊन वर्षाला दोन अशा गतीने कथा-कादंबर्‍यांची पाडापाडी सुरु होते. निर्विवादपणे बकवास असतो दर्जा या लिखाणाचा. मॅजेस्टिक वगैरे दुकानांमधे अशी पुस्तकं पहिल्या रॅक्स व्यापून बसलेली पाहिली की प्रचंड इरिटेट व्हायला होतं.

कुणी अ‍ॅगाथा ख्रिस्ती ची मराठीत अनुवाद केलेली पुस्तके वाचली आहेत काय? प्रा. मधुकर तोरडमल यांनी अनुवाद (translate)केली आहेत. सध्या अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच 'Elephants can Remember' हे पुस्तक वाचत आहे, जरा भाषा जड वाटतेय, त्यामुळे संथ वाचन चाललयं.

आगाऊ :d

मला जोख मार म्हणजे काय ते इत्क्या वरषानन्तरही माहित नाही. तशी चन्द्रावळ ( पक्षी ) आम्च्या इथे दिसते रोज नी गोष्ट आठ्वते.

रैना १०००% टक्के अनुमोदन Happy

टण्या कराडमधे आहेस आणि श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरापासुन खुप जवळाच काम करतोस भेटुन ये त्यांना. ते खुप छान आहेत स्वभावाने. त्यांचा मुलगा माझा बालमित्र आहे Happy

माझ्याकडे त्यांचे सोन्याचा पिंपळ आहे इथे. बरेचदा वाचते काढुन.

त्यांचा मुलगा माझा बालमित्र आहे >>> त्यांचा मुलगा तिकडे सीएमध्येच असतो ना? एक आर्किटेक्ट म्हणून तो फारच महान आहे असे एका खूप ज्येष्ठ आर्किटेक्टने सांगितले होते मला.

जोखमार म्हणजे बहुतेक पटकीनं मरशील वगैरे टाइपची शिवी आहे. त्या चंद्रावळमध्ये ती गौरी शिवी देते ना बापूला..

ते चंद्रावळ प्रकरण वाचताना फार अस्वस्थ वाटतं. मी पहिल्यांदा वाचताना सोडुन दिलं होतं. मग २ महिन्यांनी पुन्हा वाचायला घेतलं.

उदयन कराडमधेच होता आणि हो तो खुप चांगला आर्किटेक्ट आहे हे खरेय. हुशार आहे एकदम. पण इथे कदाचित अनुप असेल त्यांचा धाकटा मुलगा. भेटुन ये. मुलाखत घे संवाद मधे टाक.

हुकमी आसवे >> 'प्रविण दवणे' लि़खाण >> Rofl

त्र्यंबक शंकर शेजवलकर - निवडक लेखसंग्रह - संग्राहक ह वि मोटे हे पुस्तक अश्यात वाचले. १९२५ ते १९६० मधिल काही लेख मोट्यांनी दिले आहेत. काही काही प्रकरणे तर फारच उपयुक्त जसे "कोंकणच्या इतिहासाची पार्श्वभूमी" व त्यांनी गो स सरदेसायांच्या नानासाहेब पेशवे ह्या पुस्तकाची शेजवलकरांनी लिहीलेली प्रस्तावना वा "रामदासांचा उपदेश व उद्योग" हा लेख.

आपला इतिहास समजुन घ्यायची इच्छा असणार्‍यांना मस्ट रिड. Happy

काल बहूचर्चित बोकिलांच"शाळा" वाचलं एका रात्रीत. जुन्या माबोवर एक आख्खं पानच आहे "शाळा" वरती. (त्यातलेच मुद्दे पुन्हा लिहीत नाही). लै आवडलं.
वाचल्यावर सुममध्ये बसून आहे. आत्तापर्यंत का वाचलं नव्हतं याचा विचार करतेय.
भाषा, पात्र, प्रसंग निर्वीवाद सुरेखच आहेच,पण .... एक पण कुरतडतोय.

आणीबाणीची पार्श्वभुमी अजून खुलवता आली असती असा एक विचार मनात आला, पण मग कदाचित तो हूळहूळ लावणारा टोन राहिला नसता, मग ते डार्क होत गेलं असतं.
नॉस्टॅलजिया सेल्स हे तर पुन्हा एकदा वाटलं. त्यात काही गैर आहे असं नाही. पण एक वाचक म्हणून त्याचीच भुरळ पडणे काहीसं धोकादायक असू शकतं, असं माझ्यापुरतं मला वाटतं.
असं लिखाण जिथे थांबतं तिथूनच ग्रेटनेसची सुरवात होते असं का वाटतं ? (कोसला बद्दल असं कधी वाटत नाही. ते जिथे थांबतं तिथेच थांबायला हवं असतं.) स्थलकालसापेक्ष,डार्क, ब्रुडिंग, सायकिडेलीक आणि डिप्रेसिंग ते(च) ग्रेट म्हणून की काय (की ही निव्वळ ईंटेलेक्च्युअल स्नॉबरी)? एक देश म्हणून, एक रुढीप्रिय समाज म्हणून, वर्णव्यवस्थेतील पिचलेला माणुस म्हणून आपण दु:ख पाहिली नाहीत असं नाही, पण तरी दोस्तएवस्कीसारखा/ काफ्का सारखा एखादा अलौकिक येडा माणूस, मनुष्यप्राण्याचं अस्तित्वच हल्लक करुन टाकणारं मराठीत का लिहीत नाही ?
की मराठी समाजमनच तसं नाही कोण जाणे. (की मा.बु.दो.स ?)

रैना, 'शाळा' केवळ नॉस्टॅलजिक आहे असे मला तरी वाटले नाही. एका मोठया पातळीवर ते मला बदलत्या समाजाचे रुपकही वाटले.भाताच्या शेतांपासून सुरुवात करुन त्याच शेतांमधे चाळी बांधण्यापर्यंतचा एक पॅरलल प्रवास त्यात आहे.मूळात ही एंड ऑफ इनोसंस ची थीम आहे असे वाटले.
साहित्याची स्थलकालसापेक्षता ही केवळ एखाद्या लेखनातील विशिष्ट काळाचा उल्लेख असल्या-नसल्यामु़ळे येते असे मला वाटत नाही. त्यामुळे नॉस्टॅलजिआ हा एखादे साहित्य ग्रेट ठरण्यामधे अडथळा आहे असे नाही.पुन्हा तो नॉस्टॅलजिआ लेखक कसा वापरतो यावर बरेच काही अवलंबून आहे. उदा. पुलं एका त्रयस्थ वृत्तीने जुन्या काळची 'मजा' सांगतात आणि त्यांचा भर समर्थन करण्याचा नसून 'होते ते असे होते' असा असतो.
तू म्हणतेस तसे लिखाण आपल्या इथे न होण्याला भारतीय मानसिकता कारणीभूत असू शकते. उदा. शंकरराव खरातांचे 'तराळ अंतराळ' मी वाचलेल्या अनेक दलित आत्मचरित्रातले सर्वात संयत,अनाक्रोशी तरिही वाचकाला अंतर्बाह्य हलवून टाकणारे.त्यांनी जगलेले आयुष्य 'डार्क, ब्रुडिंग, सायकिडेलीक आणि डिप्रेसिंग' आहेच पण लिखाणात मात्र ते तसे उमटत नाही.
एक वाचक म्हणून त्याचीच भुरळ पडणे काहीसं धोकादायक असू शकतं, >> हे मात्र नक्कीच मान्य.आणि हे वाक्य 'डार्क' लिखाणाला ही तितकेच लागू आहे!!

काल भारताच्या वैशिष्ट्यांबद्दल एक मेल आली होती त्यात म्हटले होते की भारतात गुलामगिरीची पद्धत कधीच आस्तित्वात नव्हती्. ही बाब तर खरीच आहे. तसाभारताच्या इतिहासात अस्पृश्यतेचा अपवाद वगळला तर मानवी जीवनाची घोर विटम्बना झाली नाही याचे मूळ भारतीय संकृतीत आहे. प्राणिमात्राच्या ठायी परमेश्वराला पाहण्याची आपली परम्परा होती. विटम्बना करण्याचे लोण आक्रमकानी आणले. जगभर ही विटम्बना फार झाली त्यामुळे ती अभिव्यक्त होताना खूपच जोरकस झाली आणि त्यातून अक्षर वाड्.मयही फुलले. आपले बरेचसे साहित्य धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयाशी निगडीत राहिले. त्यामुले परकीय लेखकांच्या वाड्.मयाचे मूल्यमापन करताना हाही मुद्दा विचारात घेतला पाहिजे. उगीच पाश्चिमात्य क्लासिकांचे कौतुक करताना आपल्याकडे तेवढ्या उंचीचे काही नाही या मुद्द्यातही फारसा अर्थ नाही असे माझे मत आहे. (सब्जेक्ट टू चिरफाड :))

आगाऊ- आणि हे वाक्य 'डार्क' लिखाणाला ही तितकेच लागू आहे>>> अगदी अगदी कबूल.
नॉस्टॅलजिआ हा एखादे साहित्य ग्रेट ठरण्यामधे अडथळा आहे >> याबद्दलच मी विचार करते आहे. अभिव्यक्तिवर, त्यातल्या नजाकतीवर सर्वकाही अवलंबून असणारच. पण त्यानी आपल्या जाणिवेत काही भर पडते का? गतस्मृतीत जसे रमता येते तसे इतर कशात येत नाही. त्यातल्या भावनाशीलतेत पाय अडकून पडतो का? शाळा वाचून (ते मला प्रचंड आवडले तरीही) माझ्या राजकीय जाणिवेत, मनुष्यव्यवहारपातळीच्या ज्ञानात काही फार अतुलनीय भर पडली नाही. ते सर्व माहित होतेच, ते ज्या रितीने व्यक्त केलेय ती पद्धत सुंदर आहेच. ही अतिपरिचयात अवज्ञा असावी का?
पण उदा-६० एक वर्षापूर्वीचं लॉर्ड ऑफ द फ्लाईज वाचताना अंगावर सरसरुन काटा येतो की नाही ? तसं मुळापासून हादरवणारं शाळा मध्ये काही आहे का?
४०० वर्षानंतरही ज्या प्रकारे मॅकबेथचा किंवा ओथेल्लोचा -हास होत जातो, ते वाचताना जे वाटतं ते स्थलकालसापेक्ष आहे की नाही ? त्यानी नक्कि कुठली लढाई जिंकली किंवा हरली हे गौण ठरतं.
बदलत्या समाजाचं रुपक>> मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने (ज्यातला शब्द न शब्द आपल्याला समजतो, खरा वाटतो), आणि टिपलेले बदलही मर्यादित आहेत.
पुलं एका त्रयस्थ वृत्तीने जुन्या काळची 'मजा' सांगतात >> अं, जराशी असहमत. पुलं जरा भावूक होत जुन्या काळाची मजा सांगतात. तसंच त्या काळचं सर्वांगीण मुल्यमापन ते करत नाहीत.

अस्पृश्यतेचा अपवाद वगळला तर मानवी जीवनाची घोर विटम्बना झाली नाही याचे मूळ भारतीय संकृतीत आहे>>> फार धाडसी विधान आहे हं. स्त्रियांबद्दल काय म्हणावं ?
आपले बरेचसे साहित्य धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयाशी निगडीत राहिले>> अगदी. पण त्याला साहित्य म्हणावं की तत्वज्ञान ?
उगीच पाश्चिमात्य क्लासिकांचे कौतुक करताना आपल्याकडे तेवढ्या उंचीचे काही नाही या मुद्द्यातही फारसा अर्थ नाही असे माझे मत आहे>> नाही पटत. पण तपासून पाहायला तयार. "उगीच पाश्चिमात्य" म्हणून नाही, पण त्याने जितक्या कक्षा रुंदावतात (यात नुस्त्या नाविन्याचं प्रमाण किती हेही तपासून पाहायला हवय), तेवढ्या देशी साहित्यानी रुंदावत नाही, किंवा योग्य देशी साहित्याचं वाचन नाही.

या बाफचा हा विषय नाही अशी तंबी मिळणार बहूतेक. Happy

अस्पृश्यतेचा अपवाद वगळला तर मानवी जीवनाची घोर विटम्बना झाली नाही >> निषेध! निषेध!!
कुठल्याही देशात गुलामांचा जितका छळ झाला असेल त्याच स्वरूपाचा छळ अस्पृश्य अन तळागाळातल्या लोकांचा झालाय. एकीकडे नैनं छिंदंती शस्त्राणि म्हणायचं अन दुसरीकडे आपल्यासारख्याच हाडामासाच्या माणसाचा विटाळ मानायचा, त्यांना पिढ्यानुपिढ्या पिळायचं/ छळायचं. प्राणीमात्राच्या ठायी परमेश्वर पाहून काय फरक पडतो ?

मीही तेच लिहिणार होते, अन आपल्याइथेही स्त्रियांना विकण्याची पद्धत, वेठबिगारी हे होतंच आत्ता आत्त्तापर्यन्त. गुलामगिरी नव्हती असं कसं म्हणून चालेल! बाकी मानवी जीवनाची विटंबना यावरही खूप आहे लिहिण्यासारखं. पण इथे नको.

आक्रमकांच्या मानसिकतेचा व त्यांचा जीवनपद्धतीचा पराभुतांवर खूप मोठा प्रभाव पडतो. जेतेच जनु देव, "हे देवांनी घडवून आणले आहे" इथपर्यंत त्याची मजल जाते. मग त्यांचा परंपरा आपणही अंगी रुजवनारच. आज जी स्पृश्यास्पृश्यता दिसत आहे ती ७-८०० वर्षांहुन जुनी नाही. ती होती पण सावली पडल्यावर आंघोळ असे नव्हते. इतकेच काही ती निदान महाराष्ट्राच्या सर्व भागात सारखी नव्हती. विटाळ वगैरे कल्पना पेशव्यांपासून रुजल्या आहेत. शिवाजीच्या काळातही सैन्यात अठरापगड जाती असत, सोबत जेवण असे. शाहू छत्रपतींचा देशस्थ ब्राह्मण सेनापती दाभाडे ह्याकडे महार सैनिक होते. पुढे देशस्थ-कोकणस्थ वाद इतका बळावला की दोघात युद्ध झाले.कोकणस्थांची सरशी झाली. नानासाहेबांपासून अनुष्ठान, यज्ञ, देव देव, भ्रामक कल्पना ह्याचीच सरशी झाली, तिथून पुढे महार-मांग सैनिक देखील मराठा पलटनीमध्ये नसत. ते विरुद्ध बाजूने लढत. युद्ध जिंकणार की नाही हे ज्योतिषी सांगू लागले व तलवार मागे पडली व जे घडू नयेच ते घडायला सुरुवात झाली. भारतीय समाज आधीपासून असाच होता हे विधान मात्र चुक आहे असे वाटते. बदलत्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून ही फालतू संस्कृती आपण रुजवून घेतली, तसे प्रयत्न झाले.
स्त्रीला दुय्यम समजने हा या पद्धतीचा एक भाग. ह्या आधी स्त्री दुय्यम होती असे म्हणवत नाही. इतकेच नाही तर खुद्द शिवाजीच्या काळात रायबाघन म्हणून गाजलेली स्त्री ही माहूरची मराठी राणी होती. हुड म्हणतात त्यात तथ्य आहे. फक्त गेल्या ७-८०० वर्षांच्या कालावधीतील काही भागातील घटना मात्र माणुसकीला शरम आणनार्‍या आहेत. त्यातही गोर्‍यांनी ह्यात जास्त भर टाकली आहे.

असो विषय हा नाही. असे काही झाले नाही असे माझे म्हणने नाही तर त्या पाठीमागची कारणमिमांसा वेगळी आहे व मुळ समाजच असा नव्हता हे अधोरेखीत करायचे होते. Happy

निषेधाची फार घाई करताय. केदारने मुद्दा बरोबर अ‍ॅप्रिसिअएट केलाय. असंस्कृत लोकांच्या आक्रमणाने व त्यांच्या सहवासाने आपण अमानुष झालो.या बाबींचे सामान्यीकरण झाले व त्यात गैर काही आहे असे आपल्यालाच वाटेनासे झाले.

मी एक गोष्ट नजरेस आणून देऊ इच्छितो.
आपल्याकडे वेठबिगारी नव्हती, हे खरे नाही. पेशवाईच्या काळात ती सुरू होती. त्याचा एवढा कळस झाला, की माधवराव पेशव्यांनी आपले मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांना आज्ञा करून वेठबिगारीवर बंदी लादणारा कायदेशीर आदेश जारी केला. यामुळे अनेक मातब्बर सरदार, जमीनदार व देशमुख नाराज झाले, पण कर्तबगार आणि तापट असलेल्या माधवरावांपुढे बोलण्याची हिंमत नसल्याने ही मंडळी चरफडत बसली.

हो प्रभूने, ह्या प्रथा पेशवाईत होत्याच, पण त्याचा उगम दुसरीकडून आहे हेच हूड व मी मांडत आहोत. केमाल पाशाने तुर्कस्थानात असणार्‍या अनेक वाईट चालीरिती (अरबांच्या आक्रमणामुळे त्या जनसामान्य झाल्या होत्या) त्या बंद केल्या हे तर ज्ञात असावेच.

टिप : वर मी युद्ध झाले असे लिहीले त्यावरुन दे ब्रा, कोब्रा ह्यात जातीमुळे युद्ध झाले असे वाटण्याचा संभव आहे, पण ते युद्ध राजकारणी होते. महार सैनिकांच्या मुद्द्यामुळे मी तो मांडला.

केमाल पाशाचे जीवीत कार्य हा एक वंडरफुल विषय आहे केदार. हा माणूस साक्षरता प्रसारासाठी राजा असून स्वत्: शिकवीत असे.
थोडेविषयान्तर केदार.
एक पुस्तक हाती आले. पंढरीनाथ सावन्तान्चे. जपानच्या महायुद्धाच्या इतिहासाचे. सावन्त इतिहासकार नव्हेत्.भाषाही रंजक नाही. पण महायुध्धातील जपानच्या सहभागाबद्दल फार कमी लिहिले गेलेय. जे काय आहे ते पर्ल हार्बर ,हिरोशिमा येवढ्यापुरतेच. गम्मत म्हनजे हिटलर मेल्यावरही दुसरे महायुद्ध चालूच होते ते या जपान्यांमुळे. सावन्तानी जपानच्या युद्धखोरीबद्दल सलग माहिती दिली आहे प्राचीन कालापासून. जपान हे राष्ट्र नेहमी क्रूर आणि युद्धखोर राष्त्र राहिले आहे हे फार थोड्यालोकाना माहीत आहे. मलावाटते जपानचा वार मॅप हिटलर्च्याच तोडीचा आहे. पुस्तक उपयुक्त आहे एवढेच मला सांगायचे आहे....

रॉबीन, पंढरीनाथ सावंतांच्या त्या पुस्तकाचे नाव द्याल काय? जपानी युद्धखोर व क्रूर आहेत हे खरेच. त्यांचे दुसर्‍या महायुद्धाच्या आधी ४० वर्षे जे चीनमध्ये थैमान चालू होते व तिथली कृरता अचाट होती.

>>> केमाल पाशाचे जीवीत कार्य हा एक वंडरफुल विषय आहे केदार. हा माणूस साक्षरता प्रसारासाठी राजा असून स्वत्: शिकवीत असे.
>>>
अगदी खरे. हा अचाटच माणुस जन्माला आला. थेरॉने तुर्कस्तानबद्दल एक फार सुंदर विधान केले होते. आजच्या तुर्कस्तानमध्ये (म्हणजे ७० साली) स्त्री-पुरुष ज्या फॅशनचे कपडे घालतात दिसते ती केमाल पाशा मेला त्या दिवसाचे. त्यानंतर तुर्कस्तान होता तिथेच थांबला.
दुसरे असेच एक विधान नुकतेच वाचनात आले ते डॅरिलिम्परचे: 'केमाल पाशाने जीव तोडून तुर्कस्तानला युरोपच्या तोडीचे सुधारणावादी राष्ट्र करण्याचा प्रयत्न केला तर तो देश आज धर्म-रुढी-परंपरा ह्याच्यात गुरफटून दुसर्‍या टोकाला गेला आहे. आणि म.गांधींनी ब्रह्मचर्य, चंगळवादविरोध, भौतिकवाद-विरोधी प्रचार आयुष्यभर केला तर भारत आज बरोबर उलट्या दिशेला चालला आहे.

श्रीयोत कुलु, तुम्ही श्री. चिनूक्स ह्यांचेशी प्रवासवर्णनांकरिता संपर्क साधावा. ते त्या विषयातील जाणकार आहेत. Happy

ह्याच बोर्डवर आहे कि कुठेतरी प्रवासवर्णनांची चर्चा.. कुलु, मागची पाने जरा उलटुन पाहा.. ५-६-७-८ वगैरे.. यादीही दिली होती चिनुक्स्ने बहुतेक..

Pages