गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदे जमीनीत लागतात की झाडावर हेही माहित नसलेले सरकार आले की काय होते याचा हा निर्णय हा एक नमुना आहे हे अधोरेखीत करणारी आणखी एक बातमी.

http://www.loksatta.com/maharashtra-news/cow-slaughter-ban-maharashtra-1...

मोठा गाजावाजा करून हा निर्णय झाला. टी आर पी साठी मुख्यमंत्र्यानी आपल्या घरी एक गाय आणलीही. पण कत्तल खान्यात न जाणार्‍या भाकड जनावरासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. आता गोशाळा या वाढलेल्या संख्येने त्रस्त होउन सरकार कडे चारा मागायला गेल्या तर त्यांना बियाणे दिले, तुम्हीच चारा उगवा आणी द्या. ही अयडिया बाकी मस्त आहे, उपाशी लोकांनाही बियाणेच द्या.

सदर गोशाळेने दुसर्‍या एका संस्थेकडे मदत मागितली तर तुमच्या संस्थेत जैन पदाधिकारी किती अशी विचारणा झाली.

जैन धर्मिय आणी उच्च्वर्णीय हिंदु यांच्या व्होट बँकेसाठी हा निर्णय झाला आहे त्याचा शेतकी अर्थशास्त्राशी काहीही सम्बम्ध नाही. दुधाच्या पडत्या दराने आधीच त्रस्त शेतकर्‍याच्या गळ्यात आणखी एक धोंड.

केंद्रीय गृहराज्यमंत्री, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री यांच्या वक्तव्यानुसार गोवंशहत्याबंदी ही महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या हिंदूधर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे. the Hindu faith and sentiment must be respected in Hindu majority states. त्याचा शेतकी अर्थशास्त्राशी संबंध आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं?

गोवंशाकडून मिळणार्‍या शेण व मूत्रामुळे जमीन रासायनिक खतांवरील अवलंबन कमी होईल. भाकड गायीं बैलांकडून मिळालेल्या शेणमुतामुळे जमिनी सुपीक होऊन , रासायनिक खतांवरचा खर्च वाचणार आहे व शेतीउत्पन्नातही भरघोस वाढ होणार आहे. (त्यापुढे त्यांच्या चार्‍याचा व पाण्याचा खर्च काहीच नाही) इतकेच नाही तर स्वतःची शेतजमीन अशाप्रकारे सुपीक झाल्यावर उरलेले शेण-मूत विकून पैसेही कमवता येतील. या शेणमुतापासून बनलेली अनेक उत्पादनेही बाजारात येणार असून शेणमुताला असलेली मागणी प्रचंड वाढणार आहे. आहात कुठे?

<<....सुपीक झाल्यावर उरलेले शेण-मूत विकून पैसेही कमवता येतील. या शेणमुतापासून बनलेली अनेक उत्पादनेही बाजारात येणार असून शेणमुताला असलेली मागणी प्रचंड वाढणार आहे. आहात कुठे?>>
------- निर्यात करुन परकिय चलन साठा वाढेल. Happy

गाय एक उपयुक्त पशू आहे, निर्णयावर पुन्हा सखोल विचार होणे आवश्यक आहे.

सकाळ मधली पिताम्बरीची चरबी कमी करणाऱ्या त्रिफळा आणि गोमूत्र पावडरच्या कॅप्सुल्सची जाहिरात बघितली. शेणावरही संशोधन चालू असल्याचे समजते.
असाच जर खोक्याच्या बाहेर विचार केला तर हुच्चभ्रू लोकांचे आरोग्य संवर्धन, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि गोवंशाचे रक्षण असा त्रिवेणी संगम साधण्यास काहीच अड़चण नसावी.

एकंदरीत काय , तर भाजपा सकार हे घुमजाव सरकार म्हणुन सिद्ध झाले आहे!

हुच्चभ्रु लोकांच्या आरोगसंवर्धनासाठी दक्षिण मुंबईत उभे राहाणार्‍या टॉवर्स मधे राहणार्‍या जैन्/गुजराथी/मारवाडी लोकांवर गोवंश टॅक्स लावावा. किंवा प्रत्र्येक टॉवरमधे १० गाय/बैलांची व्यवस्था करावी.

दुध पिणे मिडलक्लासला परवडेल.

शेणच्या क्याप्सुल खाणे उच्च वर्गाला.

दरिद्री शेतकर्‍यांनी मात्र उपाशी राहुन गाय पोसायची.

हिंदुत्वा , अजब तुझे सरकार !

काउ,

>> दरिद्री शेतकर्‍यांनी मात्र उपाशी राहुन गाय पोसायची.

उपाशी कशाला राहायला पाहिजे? भारतीय शेतकऱ्याला गायीच्या उत्पन्नावर घर कसं चालवायचं ते व्यवस्थित माहितीये. गाय लक्ष्मी आहे. तिला पोसलं की घरचं दारिद्र्य पळून जातं. म्हणूनच तर दरिद्री शेतकऱ्यांनी गाय पोसायला हवी.

आ.न.,
-गा.पै.

काही कारणांसाठी सोलापुरला जाणे झाले होते.रोडवर चौकात नुसता गायींचा धुमाकुळ!.रस्त्यात ठाण मांडुन बसलेल्या गायी.रिक्षावाला सांगायला लागला कायदा झाल्यापासुन भाकड गायी लोक रस्त्यावर सोडत आहेत.पाणी ८ दिवसाला येते माणसांना मिळत नाही या गायींना कुठुन द्या? गायींमुळे अपघाताचे प्रमाण पण आढले आहे.

सरकार कायदे करताना या गोष्टींचा विचार करत नाही का?

काउ,

>> मग देश सोडुन लंडनात नोक्री का करतात म्हणे ?

नीट वाव्हां मी काय लिहिलंय ते. दरिद्री माणसाचं दारिद्र्य घालवायला गाय लक्ष्मीरूपी आहे. मी मुळातून दरिद्री नसल्याने मला गाय पाळायची गरज नाही.

आ.न.,
-गा.पै.

>> दरिद्री माणसाचं दारिद्र्य घालवायला गाय लक्ष्मीरूपी आहे. मी मुळातून दरिद्री नसल्याने मला गाय पाळायची गरज नाही.

हे फारच विनोदी वाटलं. आधी म्हणाले की "गाय लक्ष्मी आहे." मग जेव्हा हे विधान स्वतःच्या अंगाशी आले तेव्हा गाय फक्त "लक्ष्मीरूपी" झाली. ती पण फक्त गरिबांसाठी. म्हणजे श्रीमंतांनी लक्ष्मीची आराधना करू नये का? की गरीब लोकांनी गरिबी घालवायला गाय पाळावी आणि मग गरिबी गेली की गाय पण घालवावी?
असा शब्दच्छल तुमच्याकडून अपेक्षित नव्हता गामा.

श्रीमंत आहे तर या भारतात विकासाला हातभार लावा
बाहेरून का बोंबलत बसलात?
गरीब असाल तर गाय पाळा मग Wink

गाय लक्ष्मी आहे. तिला पोसलं की घरचं दारिद्र्य पळून जातं. >> Lol मुंबईत देवळाबाहेर गाय घेऊन बसणारी बाई बीएमडब्ल्यु मधुन उतरतेय असं चित्र डोळ्यासमोर तरळुन गेलं.

मी मुळातून दरिद्री नसल्याने मला गाय पाळायची गरज नाही.>> ते पिढीजाद गायपोसु आहेत!! Wink

रीझर्व बँकेला गायी पोसायचा सल्ला द्यावा काय? की टणाटणने आधिच दिलांय?

टग्या,

>> की गरीब लोकांनी गरिबी घालवायला गाय पाळावी आणि मग गरिबी गेली की गाय पण घालवावी?
>>असा शब्दच्छल तुमच्याकडून अपेक्षित नव्हता गामा.

गरीब लोकांनी नव्हे. गरीब शेतकऱ्यांनी. अशोक इंगवले यांनी मार्ग दाखवला आहे. ज्याला पाहिजे तो बरोब्बर शिकेल. काउ यांच्याकडून ती अपेक्षा नाही.

काउ तोंडाला येईल ते बडबडत सुटलेत. त्यांना दिलेल्या उत्तरात तुम्ही कसला अर्थ शोधताय! Biggrin आणि शब्दच्छल झाला म्हणून व्यथित होताय! धन्य आहे तुमची!! f_doh[1].gif

आ.न.,
-गा.पै.

महादेव७१,

१.
>> श्रीमंत आहे तर या भारतात विकासाला हातभार लावा

लावतोच आहे. परकीय मुद्रा पाठवतोय भारतात.

२.
>> बाहेरून का बोंबलत बसलात?

कुठूनही बोंबलेन. तुमचं काय जातंय?

३.
>> गरीब असाल तर गाय पाळा मग

तुम्ही गाय नका पाळू. फक्त बैल पाळा. बघा काय मिळतं त्या प्रयोगातून.

आ.न.,
-गा.पै.

टीप : प्रतिसादाचा मायना संपादित. मागदेव७१ हे चुकीचं नाव बदलून महादेव७१ केलं.

टीव्ही,

>> मुंबईत देवळाबाहेर गाय घेऊन बसणारी बाई बीएमडब्ल्यु मधुन उतरतेय असं चित्र डोळ्यासमोर तरळुन गेलं.

आनेमियाच्या विकारात अंगातलं लोह कमी झालं की सरळ तलवार खुपसून घ्यायची. बरोबर किनई? तुमची कल्पनाशक्ती याच पातळीची आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुरेख१,

>> .रस्त्यात ठाण मांडुन बसलेल्या गायी.रिक्षावाला सांगायला लागला कायदा झाल्यापासुन भाकड गायी लोक
>> रस्त्यावर सोडत आहेत.

सोलापुरातल्या लोकांना भाकड गायी रस्त्यात सोडण्यावाचून दुसरा कामधंदा दिसंत नाहीये. त्यामुळे ज्यांची फारच दयनीय परिस्थिती झालीये त्यांनी सरळ गाव सोडून रानात चरायला जावं.

आ.न.,
-गा.पै.

लंडनात बसुन कळणार नाही कोन पावणा हाय का सोलापुरचा त्याना विचारा.

थोडीपण अतिशोयक्ती नाही.जे सत्य पाहिलय तेच लिहलय.आणि शक्यतो तुम्ही मला बोलत जाऊ नका.

धागा या विषयावर आहे म्हणुन ते लिहल आहे.

e-bliss,

>> खरच हास्यास्पद होते आहे. पुरे आता

आहेच मुळी हास्यास्पद. मूळ मुद्दा विचारात न घेता अवांतर प्रतिसादांची लांबण कुणी लावली ते उघड आहे. तरीपण थांबतो आता.

आ.न.,
-गा.पै.

महादेव७१,

>> काण्या बैलवान
>> नाव नीट लिही

चुकीची माफी असावी. चूक दुरुस्त केलीय.

आ.न.,
-गा.पै.

"एखाद्या समूहविशेषातले लोक दुसर्‍यांच्या भावना दुखावण्यासाठी बीफ खातात अथवा वापरतात असे मला वाटत नाही. ते त्यांच्या आहाराचा, खाद्यसंस्कृतीचाच एक भाग आहे आणि हे आम्हालाही मान्य आहे. " गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर.

या वक्तव्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

-----
दरम्यानच्या काळात काहींना गोवंशरक्षण-संवर्धनाची तरतूद भारताच्या घटनेत असल्याचा ताजा शोध लागला आहे. फेसबुकविद्यापीठात शिक्षण घेतलं की असं होतं. सातींनी त्या तरतुदीबद्दल इथे सविस्तर लिहूनही महिने लोटले.
तरीही ज्ञानप्राप्तीसाठी संबंधितांचे अभिनंदन.

Pages