गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायी कुठल्या प्रकारची/ जातीची होती ज्यात देव वास करतात. कृपया स्पष्ट करावे.
जसे मत्स्य हा देव मानायला सांगितले तर कुठल्या प्रकारचा मत्स्य होता असे विचारणा होते. त्याच प्रमाणे गाय देखील कुठल्या प्रकारची जातीची होती हे स्पष्ट करावे.

सरकारला खरतर कोण काय खातोय ह्याच्याशी काही घेणे देणे नाही... उद्या हे वाढतच जाईल आता खाण्यावर बंदी आली उद्या वेशभूषेवर येईल हे घाला ते घालू नका.

<< सरकारला खरतर कोण काय खातोय ह्याच्याशी काही घेणे देणे नाही... उद्या हे वाढतच जाईल आता खाण्यावर बंदी आली >>

काही खाद्यपदार्थांवर पूर्वीपासूनच बंदी होती / आहे. उदाहरणार्थ - लाखी डाळ

१९६० पासून लाखी डाळीला बंदी घालण्याचे केंद्र व राज्य सरकारांनी प्रयत्‍न केलेले आहेत. १९६१ मध्ये केंद्रीय आरोग्य खात्याने या डाळीच्या विक्रीवर व व्यापारावर तसेच इतर खाद्यपदार्थात मिसळण्यावर बंदी घातली. १९६३ मध्ये मध्य प्रदेशाने लाखेच्या लागवडीवर आणि त्याच वर्षी उत्तर प्रदेशाने वितरणावर व नंतर लागवडीवर बंदी घातली. तथापि या बंदीची फारशी गंभीरपणे अंमलबजावणी झाली नाही. शेतमजूरांना लाखी डाळीच्या स्वरूपात वेतन देण्याची तेथील जमीनदारांची दीर्घ परंपरा आहे. मध्य प्रदेशातील बंदी उठविण्यात आली व तेथे १९८०–८१ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६,३२,८०० हेक्टर जमीन या पिकाच्या लागवडीखाली होती.

https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand15/index.php/2...

Apr 25, 2008, 01.27AM IST

लाखी डाळीच्या विक्रीवरील बंदी उठवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून याचा आदेश दोन दिवसांत निघेल, असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. विदर्भात लाखी डाळ मोठ्या प्रमाणात होते. तिच्या विक्रीवर बंदी ठेवू नका, अशी मागणी सुधीर मुनगुंटीवार यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय झाल्याचे सांगितले.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/...

रॉबिनहूड,

>> डुक्कर उर्फ वराह हा दुसरा अवतार? . पावशेर झोकली की काय ? की धर्म बदलून किरिस्तांव झाले?
>> की आवडीचा यवन धर्म स्वीकारला?

ति च्या जागी चुकून दु टंकलं गेलं. एव्हढं साधं सोपं तुम्हाला निश्चितपणे समजतं. तसे तुम्ही हुशार आहात. काय पावशेर झोकली की काय ? की धर्म बदलून किरिस्तांव झाले? की आवडीचा यवन धर्म स्वीकारला?

चला, त्या निमित्ताने तुमच्या कल्पनेच्या भराऱ्या अनायसे दिसून आल्या.

आ.न.,
-गा.पै.

http://www.ndtv.com/india-news/mukhtar-abbas-naqvis-statement-on-cow-sla...
AIZAWL: Union minister Mukhtar Abbas Naqvi's comment that those who want to eat beef "can go to Pakistan" has not gone down well with his own colleague in the BJP-led government. The statement is "not good," Kiren Rijiju, the Minister of State for Home, said on Tuesday.

"I eat beef, I'm from Arunachal Pradesh, can somebody stop me? So let us not be touchy about somebody's practices," Mr Rijiju was quoted by The Indian Express newspaper as telling reporters in Mizoram capital Aizawl.

घरचा आहेर. Rofl

भाजपशासित राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या गोमांस बंदीच्या मुद्द्यावरून आता केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपली आहे. भाजपचे काही नेते व मंत्र्यांकडून गोमांस बंदीचे समर्थन केले जात असताना मोदी सरकारमधील केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी गोमांस बंदीला कडाडून विरोध केला आहे. 'मी गोमांस खातो, मला रोखून दाखवा,' असं आव्हानच त्यांनी स्वपक्षातील बीफविरोधकांना दिलं आहे.

'ज्यांना बीफ खाल्ल्याशिवाय जगता येत नसेल त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं,' असं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी अलीकडेच केलं होतं. नक्वी यांचं हे वक्तव्य अनाठायी असल्याचं किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. मूळचे ईशान्य भारतातील असलेल्या रिजीजू यांच्याकडं बीफ सर्रास खाल्लं जातं. त्याला अनुसरूनच रिजीजू यांनी नक्वी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मी अरुणाचल प्रदेशातून आलो आहे. मी बीफ खातो. कुणी मला थांबवू शकतो का?, अशी विचारणा करतानाच, ''एखाद्याच्या नित्याच्या व्यवहारांत इतरांनी ढवळाढवळ करण्याची गरज नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'भारत हा लोकशाही देश आहे. मात्र, इथे अनेकदा अनेक लोकांकडून इतरांना खटकणारी वक्तव्यं केली जातात,' अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय.

येशूची भूमी म्हटलं म्हणून काय झालं?

'इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार रिजीजू यांनी ईशान्येतील ख्रिश्चनांची बाजूही उचलून धरली. 'ईशान्य भारत ही येशूची भूमी आहे असं एखाद्या ख्रिश्चनानं म्हटलं तर पंजाब वा हरियाणातील लोकांना हरकत घेण्याचं कारण काय? आपल्याला प्रत्येकाच्या भावनांचा आदर करायला हवा. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये हिंदू बहुसंख्याक आहेत. तिथं हिंदूंचं हित पाहणारा कायदा होत असेल तर तो होऊ द्यायला हवा. मात्र, आमच्याकडं आमच्या प्रथा-परंपरा जपणारा कायदा हवा. आम्हाला त्यांच्या चालीरितींचा त्रास होत नाही, त्यांनाही आमच्या जगण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेण्याची गरज नाही. कोणी दुसऱ्यांवर त्यांच्या श्रद्धा लादत असेल तर ते योग्य नाही,' असं रिजीजू यांनी म्हटलं आहे

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=47438701&section=top-sto...

KRAIJU.jpg

गैरसमज पसरवल्याबद्दल मीडीयालाच दम द्यायला झालेला आहे Happy स्पष्टीकरण देऊन किरेन रिजिजू यांनी सणसणीत थोतरित दिली आहे मिडियाच्या.

रिजिजू यांनी आधी जे बोलले होते त्याची प्रत पाहावी
राहिले मिडीया ते तर आधीच अंबानीचे आहे डायरेक्ट मालकाचाच गळा पकडा ना Wink

Indian express has published the audio of his speech and this does not leave any scope for being misquoted.

व्यवस्थितच बोलले आहेत ते. आता सोयीचाभाग तेवढा हायलाइट करायची सवयच असेल तर त्याला कोण काय करणार. Happy That is what called as misquoted.

चालुद्या.

Uhoh

वर ज्या-ज्या अड्डागॅंगच्या बाटग्यांची, गोमास न मिळाल्यामुळे उपासमार होत आहे, त्यांनी जाव की जिथे गोमांस खाण्यास कायदेशीर परवानगी आहे तिथे, किंव्हा सरकारकडे अथवा न्यायालयात जावे ह्या कायद्याविरुध्द. इथे मायबोलीवर गळा काढुन काय उपयोग.

पूरे देश में गोमांस (बीफ) पर बैन की अटकलों को केंद्र सरकार ने खारिज कर दिया है और इसे राज्य सरकारों पर छोड़ दिया है. केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू ने गुरुवार को कहा कि एनडीए सरकार की देश में बीफ बैन करने कोई योजना नहीं है और राज्य सरकारें चाहें तो 'स्थानीय भावनाओं' के आधार पर इस तरह का फैसला ले सकती हैं.

और भी... http://aajtak.intoday.in/story/no-central-ban-on-beef-states-must-decide...

चड्डी गँगने बोंबलणे आता बंद करावे

Proud

गोहत्याबंदी देशभर नाही - अमित शहा यांचे पणजी येथे वक्तव्य.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Amit-Shah-rules-out-nation...

साहजिक आहे, गोव्यात भाजपाचे सरकार आले आहे ते किरिस्तावांनीही दिलेल्या मतांमुळे. बीफ बंदी केल्यास हा पाठिंबा एका रात्रीत जाईल आणि पुढच्या निवडणूकीत मात खावी लागेल.

(पण ह्याला लांगुलचालन नै म्हणायचं बरं का!!)

Proud

http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2015/05/blog-post_9453.html
भाजप शासन देशात बहुसंख्य असणार्या हिंदूंच्या भावनांचा विचार करत नाही, हे लक्षात घ्या ! गोमांसावर बंदी न घालणे म्हणजेच सरळसरळ गोहत्येला प्रोत्साहन दिल्यासारखेच आहे. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. असा भाजप हिंदूंना चांगले दिवस काय दाखवणार ?

चुकिची लिंक दिली वाटते Rofl

अंगणवाडीतील मुलांना उकडलेली अंडी देण्याचा प्रस्ताव म प्र सरकारने अमान्य केला कारण मुख्यमंत्री शाकाहारी आहेत. आता महाराष्ट्रात कांदा लसूण यावरही बंदी येइल.

आता महाराष्ट्रात कांदा लसूण यावरही बंदी येइल. >> तसं असेल तर नितीनभौंनांच महाराष्ट्राचे मुमं करा बुवा. Wink

Pages