गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2015 - 16:46

१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.

पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.

बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...

यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.

कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.

तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंगणाने आयटम साँग्स करणार नाही (संदर्भ: सत्यमेव जयते) अशीही भूमिका घेतली आहे जी प्रशंसनीय आहे.

शाखा मात्र गोरे होण्याच्या क्रीमची जाहिरात करत असतो.
वास्तविकतः त्याने अँटी एजिंग क्रीमची जहिरात करायला हवी ना?
Wink

राहुल, SRKला मधे आणून धागा भरकटवण्याचं काही कारण आहे का?
धागा कंगणाबद्दल आहे आणि तीचं कौतुक केलं तर फार काही बिघडणार नाही.

रुन्मेश (सॉरी मोबाईल वरून टाईप करता येत नाहीये) चा धागा आहे म्हणून गोंधळ घालायाचाच का?

छान धागा.
कंगनाचे अभिनंदन.
कंगना माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

कंगना ही मुळात एक सुजाण नागरीक आहे व ताकदीची अभिनेत्री आहे असे आधीपासूनच वाटते. तिने निवडलेल्या भूमिकांचा विचार करण्याचे धाडसही काही समकालीन बाहुल्या करणार नाहीत. पण ह्या धाग्यात दिलेल्या तिच्या त्या एका कृतीचे जास्त उदात्तीकरण होऊ नये. बाकी तिच्या माणूसपणाला, प्रतिभेला, सादर सलाम!

प्रीती झिंटानेही अशीच कणखर भूमिका घेऊन न्यायालयात साक्ष दिली होती / की देणार असे ठरवले होते.

ह्याबाबत लिहिताना:

डर्टी पिक्चर आणि कहानीसारखे सुपरहिट सिनेमे एकटीच्या खांद्यावर पेलणार्‍या विद्या बालनसमोरही अनेक सुखद रस्ते आले असतील. ते तिने निवडलेही असतील. पण ते करत असतानाही काकूबाईटाईप पातळ नेसून आणि चष्मा लावून 'शौचालयांचा प्रसार करणार्‍या' जाहिरातीही तिने केल्या हेही मला स्तुत्य वाटते. तिचे तसे दिसणे हे तिच्या व्यावसायिक कारकीर्दीला काहीसे मारकही ठरू शकते.

(शाहरुख खानचा येथे संबंध नाही)

एक फारच अवांतर -

गेल्या काही दिवसांत अंबानींच्या लठ्ठ मुलावर अनेक विनोद व्हॉट्स अ‍ॅपवर फिरले. (माझ्यापुरता मी त्याचा निषेध करत होतो). त्या व्यंगावर विनोद करणे, ते व्हायरल करणे आणि त्यावर हसणे हेही मला अजाणपणाचे वाटते. (ऋन्मेष, म्हणून माझ्यावर धागा काढू नका कंगनासारखा :फिदी:)! पण तुम्हाला सगळ्यांना असे विनोद केले जाणे पटते का? हे इथे विचारायचे कारण असे की एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर मी अतिशय सौम्यपणे 'असे करू नये' असे सुचवले तर अ‍ॅडमीनने मलाच सुनावले की 'हे असे चालणारच'! म्हणून येथील सदस्यांना त्यांचे मत विचारावेसे वाटले.

कंगनाचे कौतुक आहेच.
पण याच न्यायाने तिने प्लॅस्टिक सर्जरीदेखिल करायला नको होती; तेसुद्धा ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिने सिद्ध केलेलं असतांना.

काही वर्शापूर्वी अशी भूमिका चित्रांगदा ने घेतली होती . >> हो, त्या वरच्या बातमीत तिचेही नाव आहे.

शाहरूख खानच्या उदाहरणातील एसआरके फॅक्टर वगळा आणि ईतर बडे बडे स्टार्सनी अश्या फेअरनेसच्या जाहीरातीत काम केलेय असे जनरल स्टेटमेंट टाका. (अन्यथा चर्चा शाखाभोवतीच भरकटेल)

तरीही त्यांनी फार मोठा अपराध वा गुन्हा केलाय असे म्हणत आपण त्या स्टार्सवर टिका करू शकत नाही, फक्त ते या कौतुकास पात्र नाही ईतकेच पुरेसे आहे.

माझा आवडीचा विषय - मद्यपान निषेध
मद्यपानाच्या जाहीरातीतही कित्येक स्टार्स काम करतात तर काही नकार देणारेही असतात. नकार देणार्‍यांचे कवतुक पण काम करणार्‍यांवर टिका करायचे म्हटल्यास आधी चार बोटे आपल्यावर येतील.

<< माझा आवडीचा विषय - मद्यपान निषेध
मद्यपानाच्या जाहीरातीतही कित्येक स्टार्स काम करतात तर काही नकार देणारेही असतात. नकार देणार्‍यांचे कवतुक पण काम करणार्‍यांवर टिका करायचे म्हटल्यास आधी चार बोटे आपल्यावर येतील. >>

का बुवा? तुम्ही कधी कुठल्या मद्याच्या जाहिरातीत काम केलेय का?

रच्याकने, इथे मायबोलीवरच एक धागा आहे. "उजळ कांती हवी". हे शीर्षक भेदभावदर्शक नव्हे का? "नितळ कांती हवी" असे शीर्षक हवे ना? त्या शीर्षकाचाही नीषेध.

मायबोलीवरचे ८०% धागे भरकटवण्यामागे "अप्पाकाका" असतात याचा पुरावा त्यांनी स्वतः दिला आहे.
आचरट विधाने करुन धाग्यांना वेगळे वळण लावणार्‍या अप्पाकाकांचा जाहीर निषेध

कंगणाचे अभिनंदन,मात्र गोरा रंग हे सौदर्याचे प्रतिक आहे हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, काळ्याढुस्स रंगात कसले आलेय सौंदर्य?--( गोरापान मंदार)

गोरा रंग हे बहुसंख्य प्रदेशांमध्ये पारंपारीकरीत्या सौंदर्याचे प्रतीक मानले गेले आहे हे सगळ्यांनीच मान्य करायला हवे. 'कांती आहे त्यापेक्षा प्रयत्नांनी थोडी अधिक उजळ होऊ शकते' हे सत्य असल्यामुळेच 'उजळ कांती हवी' असा धागा असणार. तेव्हा त्या धाग्याचा निषेध संयुक्तिक वाटत नाही. कृपया ह्या धाग्यावर शाहरुख खान हा विषय नकाच येऊ देऊ कोणी, अशी विनंती! असे म्हणावेसे वाटले कारण कंगना रानावतने खरोखरच काहीतरी सूज्ञ व ग्लॅमर वर्ल्डला एरवी न शोभणारा हटके विचार केलेला दिसत आहे. चु भु द्या घ्या

बेफिकीर, शा.खा.चा उल्लेख काढलेला आहे. मात्र त्या उजळ कांती या शीर्षकाचा नीषेध मला योग्यच वाटतो कारण तो भेदभावनिदर्शक आहे.

ओके

छान धागा.
कंगनाचे अभिनंदन.

व्यंगावर विनोद करणे, ते व्हायरल करणे आणि त्यावर हसणे हेही मला अजाणपणाचे वाटते. >>> +१ अजाणपणापेक्षा मला ते असंवेदनशील वाटते.

ऋन्मेऽऽष,

कंगणा राणावतचा दृष्टीकोन एका अर्थी आवडला आणि पटला. केवळ गोरी त्वचा म्हणजे सौंदर्य नव्हे, याच्याशी सहमत आहे. आपण एक वलयांकित व्यक्ती असल्याची जाणीव तिला आहे. तरुणांसमोर उदाहरण ठेवण्याची जबाबदारी तिने स्वत:हून उचलली आहे. त्याबद्दल तिचं अभिनंदन.

मात्र तिने ही जाहिरात केली असती तर तिच्याकडून तिच्या बहिणीस एका प्रकारे कमी लेखलं गेलं असतं, या मुद्द्याशी असहमत आहे. बहीण काळी असूनही सुंदर आहे असं कंगणाचं मत आहे. त्यामुळे गोरेपणाच्या मलमाची जाहिरात करणे हा बहिणीचा पाणउतारा होऊ शकतच नाही.

आ.न.,
-गा.पै.

अहो गामा,

गोरे करणार्‍या क्रीमची जाहिरात करणे म्हणजे गोरे नसणारे कमी सुंदर असतात असे कुठेतरी मान्य करणेच नाही का?

बाकी ऋन्मेष,

तुम्हाला कंगना आवडत नाही ह्यावर तेल का घालवले आहेत काही कळले नाही.

दारू पिण्यात वाईट काय आहे ..

तसे हि शाहरुख तर ३-४ ब्रांड च्या दारू साठी ad केली आहे . ( वेगवेगळ्या वेळी )

फक्त आमीर खान ने केली नसावी - तो तर सर्वात मोठा फ्रौड आहे.

“In wine there is wisdom, in beer there is Freedom, in water there is bacteria.”
― Benjamin Franklin

विचार चांगले आहेत तिचे.

सचिनने तर अशा अनेक जाहीराती, त्याला पटल्या नाहीत म्हणून नाकारल्या होत्या.

रेखा, कुठलेही उत्पादन स्वतः वापरून बघितल्याशिवाय जाहीरात करत नसे.

पण तरीही, या सर्व कलाकारांनी लोकशिक्षणासाठी जाहीराती कराव्यात असे मला वाटते.

Pages