रताळ्याचे गव्हले, आणि त्याची खीर

Submitted by दिनेश. on 18 October, 2012 - 05:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
काही आठवणी, काही वाचन, आणि रिकामपणाचे उद्योग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यातल्या शेवया तेव्हढ्या अशा केलेल्या आठवल्या.. सही वाटायचं तेव्हा.... Happy
शक्यतो लहान मुलींना खाली वेळुन घ्यायला बसवायचे.. लग्न ठरले की रुखवतातला पहिला पदार्थ गोड करायचा म्हनुन अजुन ही शेवयाच केल्या जातात.

मस्त वाटतायत सर्व रेसिपी.
रताळ्यांच्या गव्हल्यांमधे कणकेऐवजी उपवासाचं दुसरं काही वापरता येइल का? जेणेकरुन खास उपवासाला खीर करता येइल! आणि कडकडीत उन्हात वाळवल्याने हे टिकत असतील ना महिनाभर तरी?? Uhoh

लग्नाचा मूहुर्त करायला लग्नघरी गेलो की अजूनही करतो आम्ही हे गव्हले, मालत्या वै. प्रकार. पण अर्थात कुणी वडीलधारी स्त्री करत असेल तर ते बघायचे व तसे करायचे.

आमची काकू मालत्या फुसिली पास्ता सारख्या पीळ असलेल्या करते. बहुतेक पळी वापरून. लग्नात मुलीची ओटी माल्त्याने भरतात - तू पोटातून आलीस, वाढवले तेव्हा इतका पीळ पडला इ इ किंवा मुल वाढवताना इतका पीळ पडतो असले काहीतरी विचित्र त्यामागे आहे.
खूप सुंदर लेखन!!

पुर्वी त्या हाताने
वळत असत. त्यासाठी साधारण १५ सेमी रुंद आणि १०० सेमी लांब असा लाकडी पाट असे. त्याला अगदी
बारीक वळ्या असत. हा पाट साधारण ३५ ते ४५ अंश कोनात राहील असा आधाराने ठेवत असत. मग पिठाचा
मुठीएवढा गोळा घेऊन, त्या पाटावर वळत अगदी बारीक शेव पाडली जात असे>> त्या पाट-शेवया!
हाताने म्हणजे सुत काततात तसे हातानेच वळायचे अगदी बारिक शेवई होईस्तोवर वळायचे मग एखादी अनुभवी बाई ते हातावर घ्यायची आणी अलगद दा.न्डीवर वाळत घालायची.
हा प्रकार आग्दी ईतिहास्र जमा वैगरे नाही झालाय अजुन्ही गावाकडे हे प्रकार भर्पुर प्रमाणात केले जाते
हवा असेल तर गोल शेवया.न्चा फोतो देवु शकेल..

दिनेशदा,

तुम्ही आम्हा मायबोलीकरांवर किती ऊपकार करत आहात,

जस तुम्ही म्हट्ल त्याप्रमाणे ह्या सर्व पा क्रु विस्म्रुतीत जाणार !! त्यांना पुनरुत्जिवन देण्याच
महत्वाच काम तुम्ही करत आहात.

माझी आई जे पाक प्रकार करत असे त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त पदार्थ पुढच्या पिढीने विस्म्रुतीत ढकलल्या
आहेत. अर्थात यात दोष ह्या पिढीचा नसला तरी परंपरा खंडीत झाली.

सर्वांचे आभार,
विवेक तसे काही नाही, अजून बरेच प्रकार आहेत.

आर्या, साबुदाण्याचे पिठ घालता येईल. थोडा चिकटपणा हवा, वर्‍याचे पिठ घातले तर तो येणार नाही बहुतेक,

सिमम्तिनी, हा संदर्भ नव्हता माहित मला. छान अर्थ आहे.

प्राजक्ता, एखाद्या घरी त्याच प्रांतातल्या सुना आल्या, म्हणजे हे प्रकार पुढे चालू राहतात. माझ्या आजोळी ( कोल्हापूर जिल्हा ) सर्व माम्या कोकणातल्या, त्यामूळे हे प्रकार बंद झाले. जेवणाची पद्धत पण बदलली !

मस्त दिनेशदा!
लग्नघरी हे सारे करतात. आज-काल अगदी शास्त्रापुरते थोडेसे केले जाते. त्याचबरोबर पापड आणि सांडगेही करतात मुहुर्ताचे

lahan astana he sagle+ maltya dali vagaire kele aahet.
Shivay mala hatavarchya shevaya pan yetat.
Tyamule ha lekh khup chan vatle vachatana.

जस तुम्ही म्हट्ल त्याप्रमाणे ह्या सर्व पा क्रु विस्म्रुतीत जाणार !! त्यांना पुनरुत्जिवन देण्याच
महत्वाच काम तुम्ही करत आहात.>>>>>>+१

नखुल्या,मालत्या,बोटवे हे ऐकून माहीत होते.आज वाचून फऱ़क कळला.एरवी गव्हल्यांची, शेवयांची खीर परिचयाची आहे.रताळ्याचे गव्हले मस्त प्रकार आहे.

मैद्याच्या चाळणीला आमची आजी 'सपीटाची चाळणी' म्हणत असे.

देवाच्या पळीच्या टोकाला नागफण असते. म्हणून ती टोकदार. घंटेवर गरूड उभा असतो. त्याचा मुकुट तो टोकदार. म्हणून ते मालत्या बनवताना वापरायचे.

पाटावरच्या शेवया कितीही बारीक केल्या तरी जाडच. त्यापेक्षा हातावरच्या जास्त सुंदर, बाऽरीक. खानदेशातल्या पाटावरच्या शेवया करणार्‍या बायका शेवया वळत असताना, मशिनगनला बुलेट्स फीड करणारा एक फ्लंकी असतो, तशी एक मुलगी लाटी देत जाते अन दुसरी दुसर्‍या बाजूने येणारी शेवई खेचत हात - दोन हात लांब झाली की तोडून शेजारी ठेवलेल्या बाजेवर वाळायला टाकत जाते.

हातावरच्या शेवया, ताटात जपमाळेसारखी लाटी खेचून खेचून लांबवल्या जात. लाटी सुकू नये म्हणून त्यावर धोतराचं ओलं फडकं झाकलेलं. हात लपवून जप करणार्‍या साधूंसारखं दिसायचं ते. मग शेवटी एकादी एक्स्पर्ट आज्जी दोन्ही हातांवर त्या लोकरीचा गुंडा करताना गुंडाळतात तश्या घेऊन मग दोन्ही हात बाजूला नेऊन लांबवत असे. याने फारच बारीक धाग्यासारख्या शेवया बनत. नंतर त्या काठीवर वाळत घालत असत.

लहानपणच्या या सगळ्या आठवणी.

याच्याच सोबत लाटायचे, पळीवाढी, असले नागलीचे, उडदाचे पापड. कुरडया. बिबड्या. अन काय काय. शिडीवरून धाब्यावर चढवलेले गरम उकडीचे भले मोठे पातेले. कावळ्यांपासून उन्हात राखण करताना पोटभर खाल्लेले अन मग संध्याकाळी सुकल्यावर त्यावर पाणी मारून सोडवलेले पापड. पातेल्यातल्या खरवडीवर तेल-तिखट-जिरं-मीठ टाकून खाण्याची चव! काय अन काय.

आजीच्या गव्हल्यांना डिझाइन असे. शंखासारखे, करंजीसारखे, असे वेगवेगळे गव्हाच्या दाण्याइतके छोटे छोटे आकार. इतकी किचकट कलाकारी करायचा वेळ अन उत्साह कुठून यायचा कुणास ठाऊक.. अर्थात एकट्याने ही कामे होत नसत. आजूबाजूच्या शेजारणीपाजारणी लेकीसुनामुलींसह एकत्र येऊन दुपारचा वेळ सत्कारणी लावत असत.

असो.

नॉस्टाल्जिआ.

सुंदर लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण एव्हढे सोपस्कार करायचे म्हणजे वेळ आणि मनुष्यबळ पाहिजे. तयारीलासुद्धा वेळ लागतो. पीठ अमुक इतकेच घट्ट किंवा सैल व्हायला पाहिजे. गहूसुद्धा अमुक एक प्रकारचाच पाहिजे वगैरे. खपली गव्हाचे नाव ऐकले होते. तो चांगला असतो का?
इब्लिस, छान प्रतिसाद. गव्हल्यांचे वेगवेगळे आकार पाहिले आहेत. इंग्लिश w आकार एकापुढे एक जोडला की होणारे डबल डब्ल्यू आकाराचे गव्हलेही पाहिले आहेत. सध्या मॅक्रोनी मिळते वेगवेगळ्या आकारात तसे.

इब्लिस, किती छान वाटलं वाचताना . माझे बालपण मुंबईतच गेले, तरी आई हे सगळे करत असे. शेजारी पण हौशी होते.

खपली गव्हाचे नाव ऐकले होते. तो चांगला असतो का?>>> हो. गव्हाची खीर, वळवट, कुरवड्यावगैरेंसाठी हा गहू वापरतात. आत्ताच्या भारतवारीत यंत्रावर वळलेलं ताजं वळवट मिळालं. ती संपूर्ण प्रोसेसपण पहायला मिळाली. तेव्हाच खपली गव्हाबद्दल ऐकलं. आमच्याकडे हातावरचं वळवट फक्त लग्नकार्य, मुंज वगैरे प्रसंगी मुहूर्ताचं म्हणून अगदी थोडंच होतं. बाकी वळवट यंत्रावर. खिचडी आणि खिरीसाठी एकदम मस्त. भरपूर लसूण-कोथिंबीर आणि चमचा दोन चमचे दाण्याचं कूट घातलेली वळवटाची खिचडी आम्हा सगळ्या भावंडांची आवडती.

दिनेश _________/\___________

यापैकी गव्हले सोडून काहीच माहीत नव्हतं.. केव्हढी माहिती .. खूप छान वाटलं वाचताना.. Happy

मस्त!

पुर्वी गव्हले केले होते ३-४ वेळा. मालत्या मी पिळाच्या पाहिल्या आहेत आणि एकदा केल्या आहेत. भोकाच्या मालत्या माहित नव्हत्या. दुसरे दोन प्रकार माहित नव्हते.

इब्लिसांची पोस्ट पण मस्त.

Pages