सध्या मायबोलीवरील वातावरण श्रद्धा,अंधश्रद्धा यांच्या चर्चेने काहीसे गरम झालेय. एक नाही, दोन नाही तर चार चार धागे चर्चेने धो-धो वाहत आहेत.
या तंग वातावरणाला थोडे हलके करण्याचा हा प्रयत्न!
http://www.maayboli.com/node/44750 या धाग्यावर रैना यांनी कुठल्याशा देशात नवीन काम सुरु करण्याआधी डुकराचे पिल्लू कापणे, घरात छत्री उघडणे इ. अंधश्रद्धाबद्दल सांगितले, त्यावरुन एक कल्पना सुचली.
आपल्याला माहिती असलेल्या अंधश्रद्धा(भारतातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या/देशांतल्या, ), गैरसमजुती, त्यातील गमतीजमती या धाग्यावर टाकूया.
१. घरात छत्री उघडणे
हे लोक छत्री कुठे व कशी वाळवत असतील?
२. शिळेवर गाणे वाजवणे हे रशियात अपशकूनी मानतात. (संदर्भः लोकसत्तातला एक लेख) यामुळे काम लांबणीवर पडते असे म्हणतात.
भारतात सरकारी कार्यालयात कोणी शिळ घालत असतो का?
३. इंग्लंडमध्ये काळे, पांढरे ठिपक्यांचे कुत्रे दिसले की शुभ मानतात.
४. लहानपणी आम्ही असे मानायचो की लाल रंगाची मारुती वॅन दिसली की काहीतरी खाऊ मिळणार. शाळेत येताना, जाताना, टाईमपास करतानादेखील खिडकीतून लाल मारुती वॅन दिसतेय का बघत बसायचो.
५. मातीत खेळताना अनेकदा नखांवर ओरखडे यायचे. असे ओरखडे म्हणजे शनीची पीडा समजायचो. जो पर्यंत ते जात नाहीत तो पर्यंत पीडा आहे. मग नखे वाढली की लगेच कापायचो. नखे वाढून आपसूकच ते ओरखडे निघून जायचे.
६. लहानपणी कोणी खाऊ खाताना आपल्याबरोबर असेल आणि आपण त्याला खाऊ न देता एकट्यानेच खाल्ला की पोटात दुखते.
यातील चांगली बाब म्हणजे सोबतच्या मित्रांबरोबर खाऊ शेयर करणे (अगदी मनात नसेल तरीही :))
मी तर कुत्रा, मांजर, मुंग्या यांसाठीसुद्धा कॅडबरीचा तुकडा काढून ठेवल्याचे आठवतेय (आणि आता हसू येतेय)
साउथला तोंड आणि नॉर्थ ला पाय
साउथला तोंड आणि नॉर्थ ला पाय करून झोपूही नये >> त्याने काय होते?? कसे झोपावे?
डू नॉट फीड द ट्रोल्स हे पाठ
डू नॉट फीड द ट्रोल्स हे पाठ का नाही करत सगळे?
माझ्या अंदाजाप्रमाणे उंबरठा
माझ्या अंदाजाप्रमाणे उंबरठा हे श्रीनरसिंहाचं कार्यक्षेत्र आहे. म्हणून ते अपवित्र होऊ न देण्याची काळजी घेतली जाते.>>>
मानव शि़कल्याने नरसिंहाच कार्यक्षेत्र अपवित्र होतं?? पैलवान, तेल लावा गुडघ्याला. 
अरे कुठला तरी धागा घाणेरड्या
अरे कुठला तरी धागा घाणेरड्या वादांशिवाय सोडा ना.
माझ्या अंदाजाप्रमाणे उंबरठा
माझ्या अंदाजाप्रमाणे उंबरठा हे श्रीनरसिंहाचं कार्यक्षेत्र आहे. म्हणून ते अपवित्र होऊ न देण्याची काळजी घेतली जाते. > रोज संध्याकाळी श्रीनरसिंह आपले कार्य करण्याकरीता प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येतात का?
त्यांनी आपले अवतारी कार्य संपन्न करून दैत्याची इहलोकी यात्रा संपुष्टात आणली. काम संपले दैत्यही सुटला अवतारही संपला. पण काही लोक मात्र अजुन उंबरठ्यातच अडकून बसली आहे. या बालिशपणामुळेच खरा धर्म आणि देव बदनाम होतात. कृपया याप्रकारच्या रुढी अंधश्रध्दा बंद कराव्या.
अरे कुठला तरी धागा घाणेरड्या वादांशिवाय सोडा ना.>> +१०० प्रत्येक धाग्यावर यालोकांचे तेच चालू आहे. कुठे वाईट अंधश्रध्देच्या धाग्यावर विज्ञानाला बोल लावत आहेत ( त्याच विज्ञानाने इथे प्रतिसाद देता येत आहे हे मात्र विसरतात) तर कुठे इतर धाग्यावर खोट्या बातम्यांवरुन कलाकारांचा द्वेष करत आहे.
नाठाळ, >> मानव शि़कल्याने
नाठाळ,
>> मानव शि़कल्याने नरसिंहाच कार्यक्षेत्र अपवित्र होतं?? पैलवान, तेल लावा गुडघ्याला.
तुम्ही कुठलेसे पेय प्रश्न करून तर बसला नाहीत? हा समज माझा नसून लोकांचा आहे.
आ.न.,
-गा.पै.
साउथला तोंड आणि नॉर्थ ला पाय
साउथला तोंड आणि नॉर्थ ला पाय करून झोपूही नये >>> मला वाटतं ते साउथला पाय करून झोपू नये असं आहे. एखादी व्यक्ति मृत झाली की तिला तसं ठेवतात म्हणून बहुधा. साउथ ही यमाची दिशा मानतात असं काहीतरी आहे त्यामागे.
रिचमंड हिल, ओन्टारीओ
रिचमंड हिल, ओन्टारीओ (टोरोंटोचं उपनगर) मध्ये हल्लीच सिटीने law पास केला की नवीन डेव्हलपमेंट मध्ये ४ नंबर घराला दिला जाणार नाही. कारण केण्टोनीज आणि म्यान्डेरीन मध्ये ४ चा उच्चार मृत्यू सारखा होतो. १४/ २४ इ. नंबर दिले जातील. तुमच्या घराचा नंबर ४ असेल तर तो ४ब असा बदलून मिळवायला तुम्ही अर्ज करू शकता.
http://www.thestar.com/news/gta/2013/05/30/richmond_hill_bans_number_fou...
rmd यांचे बरोबर आहे. साउथला
rmd यांचे बरोबर आहे. साउथला पाय करून झोपू नये म्हणतात.
मग नोर्थ पोल वर कसे झोपायच.
मग नोर्थ पोल वर कसे झोपायच.
म्हणून तिकडे ६ महिने दिवस
म्हणून तिकडे ६ महिने दिवस असतो तर. झोपायाच्च नाही.
उरलेले सहा महिने काय करणार ते विचारू नका.
रिचमंड हिल, ओन्टारीओ
रिचमंड हिल, ओन्टारीओ (टोरोंटोचं उपनगर) मध्ये हल्लीच सिटीने law पास केला की नवीन डेव्हलपमेंट मध्ये ४ नंबर घराला दिला जाणार नाही. कारण केण्टोनीज आणि म्यान्डेरीन मध्ये ४ चा उच्चार मृत्यू सारखा होतो. १४/ २४ इ. नंबर दिले जातील. तुमच्या घराचा नंबर ४ असेल तर तो ४ब असा बदलून मिळवायला तुम्ही अर्ज करू शकता>>>>
हो चीनी लोकना ४ थामजला पण चालत नाही, आता ईमारतीचा ४ मजला मजला पण काढुन टाकावा लागेल
भाई, (नॉर्थ) पोलला टेकून उ उ
भाई, (नॉर्थ) पोलला टेकून उ उ झो घ्यायची
चौथा मजला काढून टाकला तर वरचे मजले अधांतरी नाही का राहणार?
मजह्या आजीचं आणि माझं वाकडं
मजह्या आजीचं आणि माझं वाकडं होतं कायम ह्या असल्या अंधश्रद्धांमुळे.
ती जगातील प्रत्येक अंधश्रद्धा पाळते असं माझं मत.
ह्या तिच्या श्रद्धा आणि माझ्यासाठी अंधश्रद्धा.
१) उंबर्यावर बसून शिंकू नये.
(मी झाल्यावर आजीने बंद केले सांगायला एका सूनेला. ):फिदी:
२) दिवेलागणीला रडू नये(हे खास माझ्यासाठी कारण मला बाहेर खेळायचेच असायचे आणि ती संध्याकाळच्या आरतीला बोलवायची. ज्याचा मला राग येवून मग रडायला यायचे)
३) लहान मुलाच्या टाळूवर तेल चोपडावे पहिल्यांच आल्यावर. (आम्हाला नाही बा उंदराचा त्रास कधीच कारण पुण्यात राहून सुद्धा चांगलं भरपूर तेल चोपडायच आलेल्या बाळाच्या टाळूवर)
४) गालावर खळी असलेल्या मुली सूना म्हणून करु नये. सासू मरते.
५) चप्पल उपडी करून दारात ठेवू नये.
आणखी लिहिते...
साउथला तोंड आणि नॉर्थ ला पाय
साउथला तोंड आणि नॉर्थ ला पाय करून झोपूही नये >> त्याने काय होते?? कसे झोपावे?>>>
पुर्व - पश्चिम झोपावं . साउथ म्हणजे दक्षिण हि यमाची म्हणजे मृत्यूची दिशा आहे . दक्षिणेला तोंड करून जेवू नये . दक्षिणेला घराचे दरवाजे असू नयेत (दक्षिणेला मुख्य दरवाजा असणारं घर काही विशिष्ट व्यक्तींनाच लाभतं) . दक्षिणेला उतरत जाणारे जिने घराला - दुकानाला असू नयेत .देव्हार्याच , मुर्त्यांच तोंड दक्षिणेला असू नये . ह्या सगळ्या गोष्टींमुळे नुकसान हमखास होतं . आजारपण , वाईट स्वप्न , दारिद्र्य,मृत्यू वगेरे वगेरे .
नाटकाच्या प्रत्येक थिएटरमधे
नाटकाच्या प्रत्येक थिएटरमधे एक नटाचे भूत रहात असते अशी पाश्चात्य देशांमधली समजूत आहे. खरी पण असेल कुणास ठाऊक, भुतं मला नक्की घाबरत असणार म्हणून मला दिसली नाहीत कधी.
असो तर आमच्या यूजीएच्या फाइन आर्टस थिएटरमधेही एक भूत आहे. ते कुणाचे आहे, तो कसा मेला(हे जनरली स्टेजवर किंवा बॅकस्टेजला किंवा तालमीत आलेले मरण असते) वगैरे स्टोरीजही आहेत.
फाइन आर्टस बिल्डींगमधे हे फाइन आर्टस थिएटर आहे. प्रचंड मोठ्या प्रोसिनियम थिएटरच्या आजूबाजूने बाकी बिल्डींग आहे. बिल्डिंगच्या एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे जायचे तर तळमजला, पहिला मजला किंवा तिसर्या मजल्याच्या वरती असलेले बोळकांडे असे अॅक्सेस आहेत.
स्टेजच्या खाली असलेल्या ग्रीनरूम्सच्या बाहेर एक व्हरांडा आहे. ज्याचे एक दार आमच्या कॉश्च्युम शॉपकडे जाणार्या दाराला जवळ आहे. त्या दारातून व्हरांड्यात शिरले की व्हरांड्याच्या एका टोकाला जिने आहेत. खाली उतरणारा जिना परत तळमजल्याच्या पातळीच्या ४ पायर्या खाली असलेल्या सेलर थिएटरच्या मागच्या दाराकडे उतरतो. तिथून सरळ येऊन चार पायर्या चढून कॉश्च्युम शॉपकडे जाता येते.
व्हरांड्याच्या टोकाला असलेला दुसरा वरती जाणारा जिना फाइन आर्टस थिएटरच्या बॅकस्टेजला जातो.
मी ग्रॅड स्कूलमधे होते ती असिस्टंटशिपवर. माझी असिस्टंटशिप कॉश्च्युम शॉपमधे काम करण्याची होती. नाटकांचे रन चालू असले की आम्हा ग्रॅड असिस्टंटसच्या लाँड्री ड्युट्या लागायच्या. प्रयोगाचे धुण्याची गरज असलेले कॉश्च्युम्स धुणे, वाळवणे, तुटले-फाटले-मोडले मेण्ड करणे वगैरे. ग्रीनरूम्समधून बास्केटस भरून कपडे घेऊन यायचे. शॉपमधल्या वॉ म मधे लावायचे. ते होईतो मेण्डिंग पूर्ण करायचे आणि झाले की परत सगळे घडी करून बास्केटस ग्रीन रूममधे ड्रेसर स्टेशन वर ठेवून यायचे. वीकेंडला ही ड्युटी लागली म्हणजे आख्ख्या बिल्डींगीत तुम्ही एकटेच असला प्रकार असायचा.
तर आमच्या बिल्डींगीतले थिएटरवाले जे भूत आहे त्याबद्दल मला सुरूवातीला काहीच माहिती नव्हती. वीकेंडला मी माझी ड्युटी करून गेले. दुसर्या दिवशी अंडरग्रॅडज मला विचारू लागल्या. आर यू ओके वगैरे. मग मला ही सगळी आख्यायिका कळली. मग त्या अंडरग्रॅडजनी सांगितले की खालच्या व्हरांड्यात किंवा तिसर्या मजल्याच्या मेझेनिनवरच्या बोळकांड्यात भूत वावरते.
तोवर मी या दोन्ही ठिकाणाहून एकटीच य वेळा जा ये केली होती. मला काही भूत दिसले नव्हते.
त्यावर एक अंडरग्रॅड म्हणे.. डोण्ट वरी इटस अ फ्रेंडली घोस्ट. से हॅलो टू हिम अॅण्ड टेल हिम प्लीज डोण्ट हर्ट मी, आय डोण्ट वॉण्ट टू हर्ट यू.
मी बरं हा असे म्हणून विषय बदलला..
>>से हॅलो टू हिम अॅण्ड टेल
>>से हॅलो टू हिम अॅण्ड टेल हिम प्लीज डोण्ट हर्ट मी, आय डोण्ट वॉण्ट टू हर्ट यू.
रच्याकने तुम्हाला जल्ला भिती नाय वाटली नंतर ?
मी बरं हा असे म्हणून विषय बदलला>>
हा हा हा...से हॅलो टू हिम अॅण्ड टेल हिम.... हे सान्गणारा तुमचा ज्युनीअर ग्रेट आणि
"बरं !!" म्हणून विषय बदलणार्या तुम्ही पण ग्रेट
जल्ला भिती काय वाटायची
जल्ला भिती काय वाटायची त्यात?
त्यांनाच म्हणजे भुतांनाच वाटली असेल भिती.
आणि अहो वीकेंडला लाँड्री ड्युटी करणारी मी एकटी थोडीच होते. अनेकदा अनेकांनी केलीये ही ड्युटी. करतच होतेही. मग मै अकेली क्यू डरू?
ते दक्षिणेकडे (आयडी नाही
ते दक्षिणेकडे (आयडी नाही दिशा) पाय करुन झोपु नये यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे.
आठवलं कि नक्की टाकते इथे.
१) उंबर्यावर बसून शिंकू नये.
>> ते वर लिहिलंय तेच कारण. तोल जाण्याची शक्यता.
३) लहान मुलाच्या टाळूवर तेल चोपडावे पहिल्यांच आल्यावर. (आम्हाला नाही बा उंदराचा त्रास कधीच कारण पुण्यात राहून सुद्धा चांगलं भरपूर तेल चोपडायच आलेल्या बाळाच्या टाळूवर)
>> हे नाही कळले. तेलाने उंदीर येत नाहीत का?
५) चप्पल उपडी करून दारात ठेवू नये.
>> अडखळून कोणी पडू नये हेच लॉजिक असावे. कारण उपडी चप्पल सरळ चपलेइतकी स्थिर नसते.
ह्या कारणासाठी खरं तर कोणाच्या पायात येईल अशी चप्पल ठेवुच नये खरंतर.
नीधप, नाटकाच्या प्रत्येक
नीधप,
नाटकाच्या प्रत्येक थिएटरमधे एक नटाचे भूत रहात असते अशी पाश्चात्य देशांमधली समजूत आहे. तुमचे मुळ पाश्चात्य देशातिल नाही, मग ते भुत तुम्हाला कसे दिसणार.
हे लॉजिक मला माझ्या मुलाने ७ वर्षाचा असताना सांगितले होते. त्यावेळी आम्ही सिंगापुर मध्ये होतो आणि त्याचा शाळेत भारतिय, चायनिज, मलेशियन मुले होती. चायनिज आणि भारतियाचा भुता वर भरपुर विश्वास तर मलेशियन भुताना मानत नाही. त्यामुळे मुलाची अशी समजुत होती की भुत मलेशियन लोकाना दिसत नाहीत .
ह्याच गोष्टीवरुन आणखी एक किस्सा. आपण पित्रुपक्ष १५ दिवस पाळतो, तसे चायनिज तो १ महिना पाळतात. (त्याचा पित्रुपक्ष आपल्या १ महिना आधी येतो). ते लोक पिंडासाठी जेवणाबरोबर दारुच्या बाटल्या, मर्सिडी गाडीचे मॉडेल , खोट्या नोटा पण ठेवतात. तसेच ह्या महिन्यात ते बर्याच खोट्या नोटा जाळतात. त्याचा मते ह्या नोटा भुताना मिळतात. बरिच चायनिज ह्या काळात (आणि अमवसेला) नवीन कामे करायचे टाळतात.
तुमचे मुळ पाश्चात्य देशातिल
तुमचे मुळ पाश्चात्य देशातिल नाही, मग ते भुत तुम्हाला कसे दिसणार.<<
ऐसाभी लॉजिक होता है?
गमतीत म्हणत असाल तर... बर बर असेल.
सिरीयसली म्हणत असाल तर .. बॉर!!
३) लहान मुलाच्या टाळूवर तेल
३) लहान मुलाच्या टाळूवर तेल चोपडावे पहिल्यांच आल्यावर. (आम्हाला नाही बा उंदराचा त्रास कधीच कारण पुण्यात राहून सुद्धा चांगलं भरपूर तेल चोपडायच आलेल्या बाळाच्या टाळूवर)
>> हे नाही कळले. तेलाने उंदीर येत नाहीत का?>>>
अस म्हणतात , की लहान बाळ पहिल्यान्दा आपल्या घरी पाहुणे म्हणून आलं तर परत जाताना त्याच्या टाळूवर तेल घालतात . नाहीतर रात्री आपल्या घरात उंदीर येतात असं म्हणतात . का?? माहीत नाही ..
ते वधूच्या मागे की वधू
ते वधूच्या मागे की वधू वरांच्या मागे थुंकायची पद्धत पण आहे ना कुणाची तरी?
बहुतेक माय बिग फॅट ग्रीक वेडींग मधे आहे.
राम नगरकरांच्या रामनगरीमधे
राम नगरकरांच्या रामनगरीमधे 'नवरदेव परण्या निघाला' हा किस्सा आठवला.
Pages