विविध देशांतल्या, प्रदेशातल्या श्रद्धा - अंधश्रद्धा आणि गमतीजमती, किस्से

Submitted by गमभन on 23 August, 2013 - 03:28

सध्या मायबोलीवरील वातावरण श्रद्धा,अंधश्रद्धा यांच्या चर्चेने काहीसे गरम झालेय. एक नाही, दोन नाही तर चार चार धागे चर्चेने धो-धो वाहत आहेत.

या तंग वातावरणाला थोडे हलके करण्याचा हा प्रयत्न!

http://www.maayboli.com/node/44750 या धाग्यावर रैना यांनी कुठल्याशा देशात नवीन काम सुरु करण्याआधी डुकराचे पिल्लू कापणे, घरात छत्री उघडणे इ. अंधश्रद्धाबद्दल सांगितले, त्यावरुन एक कल्पना सुचली.

आपल्याला माहिती असलेल्या अंधश्रद्धा(भारतातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या/देशांतल्या, ), गैरसमजुती, त्यातील गमतीजमती या धाग्यावर टाकूया.

१. घरात छत्री उघडणे
हे लोक छत्री कुठे व कशी वाळवत असतील? Happy

२. शिळेवर गाणे वाजवणे हे रशियात अपशकूनी मानतात. (संदर्भः लोकसत्तातला एक लेख) यामुळे काम लांबणीवर पडते असे म्हणतात.
भारतात सरकारी कार्यालयात कोणी शिळ घालत असतो का?

३. इंग्लंडमध्ये काळे, पांढरे ठिपक्यांचे कुत्रे दिसले की शुभ मानतात.

४. लहानपणी आम्ही असे मानायचो की लाल रंगाची मारुती वॅन दिसली की काहीतरी खाऊ मिळणार. शाळेत येताना, जाताना, टाईमपास करतानादेखील खिडकीतून लाल मारुती वॅन दिसतेय का बघत बसायचो.

५. मातीत खेळताना अनेकदा नखांवर ओरखडे यायचे. असे ओरखडे म्हणजे शनीची पीडा समजायचो. जो पर्यंत ते जात नाहीत तो पर्यंत पीडा आहे. मग नखे वाढली की लगेच कापायचो. नखे वाढून आपसूकच ते ओरखडे निघून जायचे.

६. लहानपणी कोणी खाऊ खाताना आपल्याबरोबर असेल आणि आपण त्याला खाऊ न देता एकट्यानेच खाल्ला की पोटात दुखते.
यातील चांगली बाब म्हणजे सोबतच्या मित्रांबरोबर खाऊ शेयर करणे (अगदी मनात नसेल तरीही :))
मी तर कुत्रा, मांजर, मुंग्या यांसाठीसुद्धा कॅडबरीचा तुकडा काढून ठेवल्याचे आठवतेय (आणि आता हसू येतेय)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्यात उंबर्‍यावर शिंकले की उंबर्‍यावर पाणी टाकतात.... मामासाठी वाईट असतं म्हणे

हे कितीही खोटं आहे म्हणलं तरी मला वाटत रिस्क नको घ्यायला
मी कुठेही असले की उंबर्‍यावर असताना शिंक येतेय असं वाटलं की उंबर्‍यावरून बाजुला पळते
अगदीच नाही जमलं की पाणी टाकतेच... अगदी ऑफिसात सुद्धा!

मजेदार आहेत हे (अंध) विश्वास मात्र लहानपणी कसोशीने पाळायचो आम्ही ते बगळ्याची माळ्वाली गम्मत

पावसाळ्याच्या दिवसात सिनेमाला जायच्या वेळी धोधो पाऊस पडू लागला कि आम्ही आपला एक केस उपटून दोन दगडां मधे ठेवत असू,अश्याने पाऊस थांबतो म्हणे... कधीकधी खरंही होत असे... Proud

दुसरा विश्वास्,बाहेर गेलेला माणूस लौकर घरी परतण्याकरता मागच्या दारात लोखंडी सांडशीअडकावून ठेवायची...

आत्ताच थोड्या वेळापूर्वीबाक्ल्कनीत बसून चहा पिताना रस्त्यावर पाहात होते..एक माणूस बिल्डिंगमधे येत होता,तेव्हढ्यात त्याला एक मांजर आडवी क्रॉस करणार होती.तिला पाहून त्यानेच पटकन टुण्णकन उडी मारून
मांजरीला स्वतःच आडवा गेला Lol

लहानपणी मीठाचा हात डोक्याला लागला तर केस पांढरे होतात असाही एक गैसमज होतात

एक अवांतर किस्सा.. माझ्या वडीलांचे एक सहकारी शिक्षक होते आणि त्यांच्या एका मुलाचे डोळे तिरळे होते. एकदा त्यांच्या घरी गेलेलो आम्ही तर निघताना मी त्यांना म्हणलं की मला तुमच्या अमोलसारखे डोळे करता येतात. Sad त्यामुळे तसे डोळे तिरळे करून वार्‍यात गेलं तर कायमचे अडकून बसतात असं माझे वडील मला सांगून घाबरवायचे.. Lol
का तर पुन्हा मी असं कुणाला चिडवू नये म्हणून.. तो प्रसंग आठवला की वाईट वाटतं मला. Sad

तीन तिघाडा काम बिघाडा म्हणून तिघे जण असले तर कुणीतरी एक दगड खिशात ठेवणे.

एक काडीवर तीन सिगारेटी पेटवू नयेत. याला कारण युद्धात सैनिकांनी तसे केले तर त्या काडीचा प्रकाश लांबून दिसून शत्रूला कळते. आता भारतात रेल्वे स्टेशन वर उभे राहून एका काडीने तीन सिगारेटी पेटवायला काय हरकत आहे? पण नाही!

झक्की, आणि कात्रीत (दोन बोटात ओढताना पकडतो तशी पकडलेली) सिगरेट द्यायची नाही दुसर्‍याला हे नव्हते का तुमच्या काळी? त्याने म्हणे भांडणे होतात.

टिटवीचं ओरडणं, पालीचा चुकचुकाट अशुभ
भारद्वाज पक्षी दिसणं, सापसुरळीच्या शेपटीला हात लावणं अतिशय लाभदायक
पोपट, ससे, माकड पाळणं अशुभ
चिचुंद्री घरात असणं शुभ
शनिवारी चणे-फुटाणे खाउ नये, नाहीतर गरिबी येते. (हे माझी आई अजुनही पाळते). याला आधार कृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीचा दिला आहे. कृष्ण-सुदामा गुरुगृही एकदा जंगलात गेले असतांना वादळी पावसात अडकले होते. त्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सुदाम्याला गुरुपत्नीने दिलेले ओले चणे/ हरबरे त्याने एकट्याने खाउन टाकले, श्रीकृष्णाला दिले नाही. म्हणुन त्याला गरिबी आली वै.वै. आणि तेव्हा शनिवार होता!
बाप्रे काय काय आणि कुठे संदर्भ लावतात हे जुने लोक!!

१)फळं झेलु नये, नाहीतर महाग होतात.
२)जेवायला वाढतांना पोळी बोटांमधे कात्रीसारखी पकडु नये.
३)अन्नाचा घास खातांना एक बोट(तर्जनी) उंचावत मुखात घालु नये.(आमची आज्जी खाटकन लाटणं/ उलथनं फेकुन मारायची असं केलं तर. Sad )
४)जेवतांना डावा हात जमिनीवर ठेउन जेउ नये.
४) टीफीन देतांना त्यात ३ चपात्या देउ नये. २ किंवा ४ द्याव्या. तीनच चपात्या खाणारा असला तर एका चपातीचं तुकडा मोडुन ठेवावा. याचं कारण म्हणे कुणी 'गेल्यावर' ३ र्या दिवशी 'सावडायला' जातांना स्मशानात नैवेद्य ठेवावा लागतो, त्यात ३ पोळ्या देतात म्हणुन. Uhoh
५)खुर्चीवर बसुन पाय हलवु नये (मुलींनी तरी)

अशी अनेक बंधनं होती आम्हाला लहानपणी.

ग्रहण चालू असताना सर्व खाद्य पदार्थ, पाण्याची भांडी (भरलेली) यामधे तुळशीपत्र ठेवणे.....

परवाच एक बर्टन नावाच्या ईंग्रजी माणसाचे चरित्र वाचत होतो. त्यात पुर्वी अफ्रिकेमधे एखादा महत्वाचा पाहूणा, व्यक्ति, जर शहरा मधे किंवा राज्यात आला तर त्याच्या सन्मानार्थ नरबळी द्यायची प्रथा होती असे लिहिले आहे. तो तिथे गेला असता अका राजाने त्याच्या साठी पण बळी दिला होता

,तेव्हढ्यात त्याला एक मांजर आडवी क्रॉस करणार होती.तिला पाहून त्यानेच पटकन टुण्णकन उडी मारून
मांजरीला स्वतःच आडवा गेला

>>> मांजरीचे काम झाले नसणार. Lol

कात्रीत (दोन बोटात ओढताना पकडतो तशी पकडलेली) पकडुन पैसे पण देऊ नये म्हणतात. एका वेटरने मला झाडले होते त्यासाठी. Sad

अजून तेरा आकड्याबद्दल नाही लिहिलं का कोणी? रस्त्यावरच्या घरांना, इमारतीच्या मजल्यांना तेरावा क्रमांक देत नाहीत. जेवायला तेरा लोकांनी एकत्र बसणं फारच अशुभ. युशुख्रिस्ताच्या लास्ट सपरला तेरा लोक होते.
फ्रायडे द थर्टिन्थ ही संगणकांसाठी फारच खतरनाक वेळ.

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन्स ८७(१००-१३) च्या धावसंख्येला टरकून असतात. इंग्लिश लोक १११,२२२,३३३ या सिंगल,डबल्,ट्रिपल नेल्सन स्कोरला वचकून असतात.

चीन मधे ४ हा आकडा अशुभ मानतात .चीनी भाषेत ४ ला।,'स्स'म्हणतात ज्याचा अर्थ आहे,'मृत्यू
म्हणून बिल्डिंग्स मधे चौथ्या मजल्याला ३ ए, चौदाव्या मजल्याला १३ ए असे नंबर्स दिलेले असतात.

बर्फ पडताना किंवा पडून गेल्यावर, धातूच्या टेलिफोनच्या किंवा झेंड्याच्या पोलला जीभ लावली तर तुमची जीभ लगेच चिटकून बसते असा समज ऐकला होता. मला ही अंधश्रद्धा वाटायची.

पण हा प्रकार चक्क खरा निघाला. शेजारची मुलगी (म्हणजे तिची जीभ) खांबाला चिटकून बसली होती तिला गरम पाणी टाकून सोडवताना मी तिथे होतो.

आणि जीभ चिकटायला एक सेकंद ही खूप जास्त होतो.

हे का होते
http://www.livescience.com/32237-will-your-tongue-really-stick-to-a-frozen-flagpole.html

कात्रीत (दोन बोटात ओढताना पकडतो तशी पकडलेली) पकडुन पैसे पण देऊ नये म्हणतात. एका वेटरने मला झाडले होते त्यासाठी. अरेरे Lol वेटर चा मार खाल्ला Sad

मी एकदा संध्याकाळी भाजी घेतांना, भाजीवाल्याकडे डाव्या हाताने पैसे देत होते (मी लेफ्टी आहे) तर तो म्हणाला,' बाई, उजव्या हाताने पैसे द्या'! (डाव्या हाताने पैसे दिले तर फिरुन आपल्याकडेच येतात म्हणे) Uhoh

टण्या | 23 August, 2013 - 21:25 नवीन
झक्की, आणि कात्रीत (दोन बोटात ओढताना पकडतो तशी पकडलेली) सिगरेट द्यायची नाही दुसर्‍याला हे नव्हते का तुमच्या काळी? त्याने म्हणे भांडणे होतात.
<<
'थोटूक' शेअर करताना अशी दिली, तर घेणार्‍याच्या हाताला चटका बसतो हमखास. मग भांडण होणे नॅचरल आहे.
***
कात्रीत धरून पैसे देऊ नयेत. तसे पैसे फक्त पीएसडब्ल्यूना देतात अशी समजूत आहे.

झक्की, आणि कात्रीत (दोन बोटात ओढताना पकडतो तशी पकडलेली) सिगरेट द्यायची नाही दुसर्‍याला हे नव्हते का तुमच्या काळी? त्याने म्हणे भांडणे होतात.
>>>>>>>
माझा एक मित्र असाच म्हणायचा आणि सिगरेट पन द्यायचा नाही तशी घेतली तर Wink

कात्रीत (दोन बोटात ओढताना पकडतो तशी पकडलेली) पकडुन पैसे पण देऊ नये म्हणतात. एका वेटरने मला झाडले होते त्यासाठी
>>>>>>>>>>>>>>>>>>>

आई पोळ्या करत असताना जेवायला बसल आणि पोळी २ बोटात पकडली की उलतान्याचा फटका मिळायचा हातावर

उंदराचा उपाय वाचला बरं का Happy

अजून काही भर- सासरी आज्जी, पणजी, खापर पणजी अश्या अनेक जणींकडून ऐकलेल्या सुरस व रम्य कथा. ह्यातल्या बर्‍याच गोष्टी मनाविरुद्ध ऐकाव्या लागल्या असल्याने चांगल्याच लक्षात आहेत. Happy

कोणाला गिफ्ट म्हणून किसणी, सुरी, कात्री असले काही देवू नये. भांडणे होतात.

पुरणाच्या पोळीची कणीक मळताना त्याच वेळी तिथे काकडी कोचवू नये. कणकेची तार जाते(हे शास्त्र आहे की अं.श्र. माहीत नाही पण लॉजिक उलगडले नाही.)

मुलीचे/मुलाचे लग्न लागताना ते आईने बघायचे नाही.

लहान बाळाचे लोकासमोर कौतुक करायचे नाही. फोटोज फेबु वर टाकायचे नाहीत्..द्रुष्ट लागते. लोकांसमोर लहान बाळ ट्रान्स्परंट बाटलीने दूध पित असेल तर बाटलीला कापड गुंडाळायचे.

आपण जेवतोय आणि अचानक परका (कुरिअरवाला किंवा पोस्ट्मन किंवा कोणीही न्-नातेवाईक) कोणी आलाच तर अन्न लगेच झाकून ठेवायचे. त्याला खायला द्यायचे असेल तर डिशमधे पदार्थ घालून द्यायला हरकत नाही. परंतु सहसा परक्यासमोर अन्न कायम झाकूनच ठेवायचे.

परक्या कोणासमोर ताक पण घुसळायचे नाही. लोणी आत विरघळते म्हणे.
गर्भवतीला एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली व ती पुरवली नाही तर बाळाचा कान फुटतो.

चुकून उपास मोडला गेल्यास गायीला शिवून यायचे. अश्याने उपासाचे पुण्य इन्टॅक्ट रहाते. Happy

दारावरुन प्रेतयात्रा गेली तर तांब्याभर पाणी अंगणात फेकायचं म्हणे.

आमच्यात अजुनही मुलीचं लग्न, तिची आई बघत नाही. एकीकडे मंगलाष्टकं सुरु असतांना आई तुळशीला पाणी घालत असते.

<<घरातून कुणी बाहेर गेल्यावर आपण लगेच आंघोळीला जाउ नये असं आजी म्हणायची<<
ती बाहेर गेलेल्याच्या 'नावाने' आंघोळ केल्यासारखं होतं म्हणुन.
आणि लगेच घर झाडुनही टाकु नये. घरातली 'घाण' गेली असं वाटेल म्हणुन. Uhoh

<<उंबरठ्यावर शिंकू नये हे मी ही ऐकलंय. आणि तसं झालं तर माझी आई अंगावर पाणी मारायची.<<
अंगावर नाही गं, उंबरठ्यावर पाणी शिंपडतात. Lol

अंगावर नाही गं, उंबरठ्यावर पाणी शिंपडतात >>>> आमच्याकडे डोक्यावर शिंपडतात...

ग्रहणात गर्भवती स्त्रियांची कसोटीच लागते. झोपायच नाही मुल आंधळ होत, खायच नाही, काही चिरायच नाही वै वै...

<<ग्रहणात गर्भवती स्त्रियांची कसोटीच लागते. झोपायच नाही मुल आंधळ होत, खायच नाही, काही चिरायच नाही वै वै...
<<
हो, काही चिरलं वै. तर ओठ फाटलेलं मुल जन्मतं म्हणे.
ग्रहणातच नाही तर इतर वेळेसही गर्भवती स्त्रीवर फार बंधनं येतात.
गर्भवती स्त्रीने पाय मुडपुन बसायचं नाही. दिवेलागणीला बाहेर फिरायचं नाही. ..
गर्भवतीच्या उजव्या पायाची नस दुखत असेल तर मुलगा होणार, डावा पाय दुखत असेल तर मुलगी.

Lol
कढई/पातेल्यात उरलेली भाजी असेल तर डायरेक्ट त्यातच खाउ नये. नाहीतर खाणार्याच्या लग्नात पाऊस पडतो.
कुत्र्यावर उष्ट/ खरकटं पाणी टाकु नये.
मुलींनी विळीवर लिंबु चिरु नये.
स्त्रीयांनी नारळ फोडु नये.
आता आम्ही सर्रास लिंबु चिरतो, नारळ फोडतो.

आई माझी अजूनही कोणाला उशीर झाला तर लाटणे पाण्यात ठेवते, तसे केल्याने माणूस लवकर येतो असा समाज आहे. >>> ओलं लाकूड जोरात लागतं नाई?

कच्चे तांदुळ खाल्ले तर खाणार्‍याच्या लग्नात पाऊस पडतो ।।।

मी नाहीतर सतिशने नक्की खाल्ले असणार. डिसेंबरमधे लग्न असून्पण धो धो पाऊस पडला होता ऐन मुहुर्ताच्या वेळी.

Pages