विविध देशांतल्या, प्रदेशातल्या श्रद्धा - अंधश्रद्धा आणि गमतीजमती, किस्से

Submitted by गमभन on 23 August, 2013 - 03:28

सध्या मायबोलीवरील वातावरण श्रद्धा,अंधश्रद्धा यांच्या चर्चेने काहीसे गरम झालेय. एक नाही, दोन नाही तर चार चार धागे चर्चेने धो-धो वाहत आहेत.

या तंग वातावरणाला थोडे हलके करण्याचा हा प्रयत्न!

http://www.maayboli.com/node/44750 या धाग्यावर रैना यांनी कुठल्याशा देशात नवीन काम सुरु करण्याआधी डुकराचे पिल्लू कापणे, घरात छत्री उघडणे इ. अंधश्रद्धाबद्दल सांगितले, त्यावरुन एक कल्पना सुचली.

आपल्याला माहिती असलेल्या अंधश्रद्धा(भारतातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या/देशांतल्या, ), गैरसमजुती, त्यातील गमतीजमती या धाग्यावर टाकूया.

१. घरात छत्री उघडणे
हे लोक छत्री कुठे व कशी वाळवत असतील? Happy

२. शिळेवर गाणे वाजवणे हे रशियात अपशकूनी मानतात. (संदर्भः लोकसत्तातला एक लेख) यामुळे काम लांबणीवर पडते असे म्हणतात.
भारतात सरकारी कार्यालयात कोणी शिळ घालत असतो का?

३. इंग्लंडमध्ये काळे, पांढरे ठिपक्यांचे कुत्रे दिसले की शुभ मानतात.

४. लहानपणी आम्ही असे मानायचो की लाल रंगाची मारुती वॅन दिसली की काहीतरी खाऊ मिळणार. शाळेत येताना, जाताना, टाईमपास करतानादेखील खिडकीतून लाल मारुती वॅन दिसतेय का बघत बसायचो.

५. मातीत खेळताना अनेकदा नखांवर ओरखडे यायचे. असे ओरखडे म्हणजे शनीची पीडा समजायचो. जो पर्यंत ते जात नाहीत तो पर्यंत पीडा आहे. मग नखे वाढली की लगेच कापायचो. नखे वाढून आपसूकच ते ओरखडे निघून जायचे.

६. लहानपणी कोणी खाऊ खाताना आपल्याबरोबर असेल आणि आपण त्याला खाऊ न देता एकट्यानेच खाल्ला की पोटात दुखते.
यातील चांगली बाब म्हणजे सोबतच्या मित्रांबरोबर खाऊ शेयर करणे (अगदी मनात नसेल तरीही :))
मी तर कुत्रा, मांजर, मुंग्या यांसाठीसुद्धा कॅडबरीचा तुकडा काढून ठेवल्याचे आठवतेय (आणि आता हसू येतेय)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुधी चुकून रविवारी राहणार असेल तर आई तो तुळशीत ठेवते, रविवारी दुधीला राक्षस समजतात. मी आईला म्हणते अग आई दुधी इतका बहुगुणी आहे आरोग्याच्या बाबतीत तर त्यात एखादया दिवशी राक्षसी गुण कसे येतील.

मधले बोट शनीचे समजतात म्हणून त्याच्या बोटात शनीच्या खडयाशिवाय दुसरी अंगठी घालत नाहीत, आपली कामे अडून राहतात असा समज आहे.

पोळी किंवा भातपण नुसता देत नाहीत वरती काहीतरी घालतातच.

भात नुसता पानात वाढुन घ्यायचा नाही... पांढर्या भातावर तुप घ्यायचे / वाढायचे नाही. कारण श्राद्धपक्षाच्या दिवशी त्या पानाला / ताटाला तुप लावुन घेऊन किंवा तुपाचा थेंब वाढुन मग पां भात वाढतात.

किती गोष्टी आहेत ...मला आई म्हणायची, शनिवारी आणि सोमवारी केस धूऊ नयेत्.मी तिला घरातील पुरुषांचे उदाहरण दयायचे..आणि मी आवर्जुन तेव्हाच केस धुवायचे..
रात्री नख काढु नयेत..
साउथला तोंड करुन जेवायला बसु नये..
मुर्तिचे तोंड पुर्वेकडे असावे..
यातल मला कधीच काही करण जमल नाही..सगळ आईच्या मनाविरुध करत आले आणि शिव्या खात आलेय्...अजुन पण सुरु आहे तेच..:(

मला अजुन एक न उलगड्लेल गुढ्..
लिहु कि नको अस झालय पण तुम्चे सगळ्यांचे विचार कळतील..
स्त्रीयांनी मासिक पाळी मधे कोणताही धार्मिक विधी कराय्चा नाही..देवपुजा, मंदिरात प्रवेश सगळ मना...:(
गावांमधे अजुन्ही खुप पाळतात्..मला यात काहीच लोजिक दिसत नाही...काही घरांमधे तर बायंकाना बाजुला बसवतात..मला खुप बावळट प्रकार वाट्तो हा...

गणेश चतुर्थीला चंद्र बघु नये..
>>
चोरीचा आळ येतो. खुद्द श्रीकृष्णावर चोरीचा आळ आला होता गणेश चतुर्थीला चंद्र बघितल्यामुळे.

चुकुन चंद्र पाहिला तर कुठला तरी श्लोक आहे तो म्हणायचा म्हणजे दोष टळतो.

शोनू-कुकु : - किमान ४ दिवस सगळ्या कामातुन सुटका, असं तर्क असावं. पुर्वी देवाची कामे, म्हणजे पहाटे उठुन आंघोळ करुन स्वैपाक करणे, सडा टाकणे, वगैरे कष्टाची कामे होती, त्यातुन सुटी म्हणुन असं काही केलं असावं.
अर्थात बर्‍याचश्या चालीरीत्या अश्याच काहीश्या तर्काने सुरु झाल्या असाव्या, पण काळानुसार न बदलल्याने त्या अंधश्रद्धा बनल्या.

अर्थात बर्‍याचश्या चालीरीत्या अश्याच काहीश्या तर्काने सुरु झाल्या असाव्या, पण काळानुसार न बदलल्याने त्या अंधश्रद्धा बनल्या.

>> याला अनुमोदन.

माझी आजी सांगायची रात्री नखे कापू नकोस, चोरीचा आळ येतो.

पण माझी खोड अशी की मी रात्री तिच्या समोरच नखे कापत असे आणि बोलत असे की आता कोण घेतोय चोरीचा आळ बघतोच..

अंधश्रद्धा नाही पण एक रीत म्हणून.. माझी एक कछ्छी कलिग सांगते की त्यान्च्या घरात मुली कोणाच्याच पाया पडत नाहीत कारण मुलगी घरची लक्ष्मी असते . ( पण दूसर्याच्या घरातल्या मुली - म्हणजे सूना - मात्र पाया पडतात Happy )

घरात चप्पल,बूट उलटी पडली असेल तर त्या घरात भांडणे होतात.
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्य़क्ती ला पैसे देताना, सरळ हातात देवू नये, त्याच्या समोर ठेवावेत.
पांढरे खाद्य पदार्थ खास करुन दुध, दही, ताक प्रवासात नेवू नये. भुतं मागे लागतात.

पण दूसर्याच्या घरातल्या मुली - म्हणजे सूना - मात्र पाया पडतात

>> किती हा दुटप्पीपणा राग>>>>+++ १
आपल्या संस्कृती मध्येच दुटप्पीपणा आहे.लेक सासरी कशीही वागली तरी तीच चांगली तिच्या सासरचे वाईट आणि सून कितीही चांगली वागली तरी तीच वाईट.या प्रकाराला फार कमी अपवाद असावेत. विषयांतराबद्दल सॉरी.

पण दूसर्याच्या घरातल्या मुली - म्हणजे सूना - मात्र पाया पडतात

>> किती हा दुटप्पीपणा >>>>> आम्हीही तिला हेच म्हणतो . आता घरी पाया पडत नाही पण उद्या लग्न होउन गेली की तिथे सासरी पडणार

दक्षिणा.... उंबरठ्यावर शिंकू नये, उंबर्‍यावर शिंकले की उंबर्‍यावर पाणी टाकतात.... याला शास्त्रीय कारण असे की पूर्वी घरांचे उंबरठे खूप
उंच असत. शिंकताना आपले डोळे मिटले जातात व तोल पुढे जातो. त्यामुळे वरुन पडन्याचा व डोकयावर आपटन्याचा संभव जास्त. त्यामुळे कदाचित डोक्यावर पाणी मारतात.

शिंकताना आपले डोळे मिटले जातात व तोल पुढे जातो. त्यामुळे वरुन पडन्याचा व डोकयावर आपटन्याचा संभव जास्त. त्यामुळे कदाचित डोक्यावर पाणी मारतात.>>>

पण असं पाणि मारूनच हबक्याने तोल जायची शक्यता जास्त , नाही का ?

अजय पडवळ, माझ्या अंदाजाप्रमाणे उंबरठा हे श्रीनरसिंहाचं कार्यक्षेत्र आहे. म्हणून ते अपवित्र होऊ न देण्याची काळजी घेतली जाते.
आ.न.,
-गा.पै.

लोकहो,

रॉल्फ बुकहोल्झ याने अंगछिद्रे पाडून घेण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यास दुबईत प्रवेश नाकारण्यात आला. तो काळी जादू करीत असल्याचा दुबई सीमाधिकाऱ्यांचा संशय आहे.

इंग्रजी दुवा : http://www.bbc.co.uk/news/world-middle-east-28831106

आ.न.,
-गा.पै.

आमच्या Houston, Texas मधल्या ऑफीसच्या इमारतीत १३वा मजलाच नाही. अपशकुनी/अनलकी वगैरे समजामुळे!

Lift.jpg

Houston मधलीच अजून एक बातमी (जुनी आहे)
Houston downtown मधे एकदम मोक्याच्या जागी Enron चा टॉवर होता. तो घेतल्यावर Enron बुडाली. मग तो टॉवर एका कंपनीने विकत घेतला. त्या कंपनीचा मालक लगेच एका विमान अपघातात गेला. त्यामुळे त्यानंतर अत्यंत महत्वाच्या जागी असुनही हा टॉवर अनेक वर्षे रिकामाच होता. शेवटी शेजारच्या इमारतीत असलेल्या Chevron ला अत्यंत सोयिस्कर असल्यामुळे त्यांनी २००७ मधे तो विकत घेतला.

घरी सालदाराने खरवस आणुन दिला की ती किटली रिकामी पाठवायची नसते , असे आई सांगते, आमच्या शेतात गाय व्यायली की ती खरवस घेऊन येणार सालदारा सोबत ती किटली भरुन भाजलेल्या उत्तम धान्याचा भरडा पावशेर गुळ, बाळंत शोप अन वावडींग वगैरेचा बनवलेला साग्रंसंगीत बाळंतविडा बनवुन पाठवत असे कपिलेस!!!

"मुकं जनावर आपल्या वासराच्या वाटचे दुध तुला देतंय न हसत खेळत म्हणुन थोडी सेवा" म्हणायची!!!, तिची श्रद्धा होती का अंधश्रद्धा की तिचा पायगुण माहिती नाही पण शेती विके पर्यंत गोठा सतत भरलेला असायचा आमचा Happy

आमच्यात शूटदरम्यान ग्लास फुटला की फिल्म निर्विघ्नपणे पार पडणार, यशस्वी होणार असे म्हणतात. पूर्ण शूटींगमधे फुटला नाही (असे शक्यच नसते) तर कुणीतरी फोडतातच एखादा ग्लास.
कधीकधी खरेही होते हे.. Proud

आमच्या एका फिल्म वेळी, निर्मात्याला ही गोष्ट माहित होती, पण शुटींग वेळी तो ती विसरून गेला, आणि अचानक ४ थ्या का ५ व्या दिवशी क्रेनचा Balance गेला, एका मुख्य कलाकाराच्या ड्रेस ची bag गहाळ झाली, २nd AD चा अपघात झाला,

सो फायनली ७ व्या दिवशी निर्मात्याने स्वताहून ग्लास फोडला, Biggrin नंतर २२ दिवसांचे स्केड्युल निर्विघ्न पार पडले , Happy

पण मुंबईला परत आल्यावर निर्मात्याने ती फिल्म पूर्ण न करण्याचा निर्णय घेतला.

आमच्या या फिल्मच्यावेळी पहिल्या शेड्युलला माझ्या हातून आपोआप फुटला. डोक्यात काहीतरी चालले होते त्या नादात हातात चहाचा ग्लास आहे हेच विसरले आणि पडला तो हातातून. फुटला.
सगळ्यांनी मला निर्मातीला जबाबदारीचे भान आहे वगैरे विनोद ऐकवले.. Wink

बर्फ पडताना किंवा पडून गेल्यावर, धातूच्या टेलिफोनच्या किंवा झेंड्याच्या पोलला जीभ लावली तर तुमची जीभ लगेच चिटकून बसते असा समज ऐकला होता.>>>
ह्यामागे शास्त्रीय कारण आहे . मी एकदा icecrem बनवलं होतं उन्हाळ्यात . स्टील च्या पातेल्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवलं होतं .उन्हाळा असल्यामुळे फार गरम होत होतं . थोड्या वेळाने भांडं बाहेर काढलं . गार लागतंय म्हणून चेहऱ्यावरून फिरवत होते . तर माझे ओठ चिकटून बसले न त्याला . म्हणून जरा जोर लावून ओढलं तर ओठांचं सालपट निघून रक्त आलं होतं Sad

मुलीचे लग्न लागताना ते आईने बघायचे नाही.>>>
मुलगी तिचं घर सोडून जाणार असते . ती मंगलाष्टक सुरु झाली कि आईच्या डोळ्याला धारा लागतात .

रुमाल कोणाला गिफ्ट केल्यास तो माणूस भांडण होवून किवा गैरसमज होवून दुरावतो असा ३ वेळा अनुभव घेतलाय

साउथला तोंड करुन जेवायला बसु नये.>>>
साउथला तोंड आणि नॉर्थ ला पाय करून झोपूही नये . हे मात्र खरं आहे .हि अंधश्रधा नाही . ह्याचाही अत्यंत भयंकर अनुभव आहे आणि बर्याच लोकांना पण आहे .

स्त्रीयांनी मासिक पाळी मधे कोणताही धार्मिक विधी कराय्चा नाही.>>>
ह्या काळात स्त्री शरीरातल्या हार्मोन्स बदलामुळे 'रजोगुण' अत्यंत प्रभावी असतो म्हणून .

Pages