वास्तुशांती विषयी माहिती हवी आहे,

Submitted by manuruchi on 5 May, 2015 - 05:44

वास्त्॑शांतीच्या वेळी काही गुरुजी वास्तुपुरूष जमिनीमध्ये पुरण्यास सांगतात तर काही देवारयात टेवण्यास सागतात नेमके काय करावे, वास्त्॑शांती आणि सत्यनारायणाची पुजा एकत्र करता येते का

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्त्॑शांती आणि सत्यनारायणाची पुजा एकत्र करता येते का >>> जाणकार सान्गितलचं.

आई - बाबानी नविन घर घेतल तेन्व्हा गुरुजीनी सन्गितलं वास्तुशांत झाल्याशिवाय सत्यनारायण पुजु नये .
मग एकाच दिवशी सकाळी वास्तुशांत आणि दूपारी पूजा केली .

माझ्या सासरी सगळे जरा वेगळ्या पंथाचे आहेत . माझी फार इच्छा होती पण , आमच्या नविन घरात वास्तुशांत केलीच नाही , ४ महिन्यानी घरातल्या घरात सत्यनारायण पूजला.

>>>> वास्त्॑शांतीच्या वेळी काही गुरुजी वास्तुपुरूष जमिनीमध्ये पुरण्यास सांगतात तर काही देवारयात टेवण्यास सागतात नेमके काय करावे, <<<<<<
प्राणप्रतिष्ठापना केलेली वास्तुपुरुषाची प्रतिमा घराचे आग्नेय दिशेला खड्डा करून त्यात, प्रतिमेचे डोके आग्नेय दिशेकडे करून पालथी स्थापन करायची असते व खड्डा बुजवायचा असतो.
देवालयातील मूर्ति जशा "चल" नसतात (पक्क्या बसविलेल्या असतात) तसेच वास्तुप्रतिमेचेही आहे. वास्तुपुरुषाची प्रतिमा ही "चल" मूर्तिंमधे देवघरात ठेवत नाहीत. मात्र प्रतिमेच्या निक्षेपास (खड्डा करुन स्थापनेस) अन्य सोईस्कर जागा नसेल तर देवघराचे आग्नेय कोपर्‍यात खड्डाकरुन तिथे निक्षेप करतात.

>>>> वास्त्॑शांती आणि सत्यनारायणाची पुजा एकत्र करता येते का <<<<<
नाही.
वास्तुशांत आधी केली जाते. त्याची देवता रुद्र/शिवस्वरुप. त्या विधीनंतर आवाहित देवतांचे विसर्जन केल्यानंतरच, मग विष्णुरुपाचे अर्थात सत्यनारायणाचे आवाहन करुन सत्यनारायणाची पूजा स्वतंत्रपणे केली जाते.
व्यावहारिक कारण म्हणजे, वास्तुशांतीकरता देवतेचा नैवेद्य पायस (खीर) असा असतो व जोडीने अन्य हवनीय पदार्थ असतात, अर्थात हा नैवेद्य "प्रसाद" म्हणून देणे शक्य नसते, द्यायचाही नसतो. पण घर बघायला पाहुणे वगैरे तर बोलावलेले असतात, त्यानिमित्ते आहेर/देणी-घेणी/जेवणावळी असा मोठा बेत असतो, मग पाहुण्यांकरता प्रसाद कशाचा? तर सत्यनारायणाचा...
शिवाय वास्तुशांत हे प्रायश्चितांगभूत कर्म आहे, ते शुभ कर्म मानले जात नाही, तेव्हा त्यानंतर शुभ कर्मांची सुरुवात म्हणूनही सत्यनारायण करण्याची प्रथा पडली आहे.
वास्तुशांती नंतर सत्यनारायणाची पूजा केलीच पाहिजे असे नाही. पण सोय/काळवेळ वगैरे बघुन एवढा वास्तुशांतीचा घाट घातलाच आहे तर एकात एक अशी ती केली जाते.

तुम्हांस नेमके काय करावयाचे आहे? हे प्रश्न किंनिमित्ते पडले?

बहुमजली इमारती मध्ये वास्तुप्रतिमा पुरता येते का? आणि कशी?>> हो.
फरशी थोडीशी फोडुन.

limbutimbu, खूप छान माहिती दिली आहे.
आम्ही कोणत्याही घरात वास्तू प्रतिमा पुरली नाही आहे. आजीच्या घरातही पुरली नाही आहे. Uhoh
गावात एक नविन फ्लॅट घेतला तिथे फक्त गृहप्रवेश केला आणि क्वचित कधीतरी त्या घरात राहतो. वास्तूशांती नाही केली.

अजून एक प्रश्न सरकारी क्वार्टसमध्ये राहताना वास्तूशांती नसलेल्या घरातच राहतो त्याबद्दलही माहीती द्या

धन्यवाद सगळ्याना, छान प्रतिसाद दिलेत सगळ्यानी. मझ्या घराची वास्तुशांती करायची आहे. म्हणून मनातील शंका विचारली. कारण आता पर्यंत २ वेळा वास्तुशांती केली त्या गुरूजींनी फ्लअ‍ॅट मध्ये वास्तुपुरूश देव्हार्यत ठेवण्यास सांगितले होते.

आरती. तुमचा प्रश्न मूलभूत आहे.
सरकारी क्वार्टर्स काय किंवा लॉज काय किंवा प्रवासात वाटेत कुठेही घेतलेला उघड्यावरचा आसरा काय, सर्व ठिकाणि स्थानशुद्धि करणे आवश्यक असतेच. व ते आपण वेगवेगळ्या उपचार/पूजा पद्धतिंनी करतोच.
वास्तुशांत मात्र जेव्हा स्वतःचे मालकीची वास्तू उभारली जाते, तेव्हा वास्तूदेवतेची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करून स्थापना (अर्थात पालथी पुरणे) करणे अपेक्षित असते.
वास्तुशांत केलीच नाही, अगदी स्वतःचे घराचीही, तरीही, जर विशिष्ट आकार घेऊन विशिष्ट जागी वास्तू उभी असेल, तर त्या वास्तुची देवता तिथे अस्तित्वात असतेच असते अशी हिंदु धर्मश्रद्धा आहे. अन त्यामुळेच, वास्तुशांत करा वा नका करू, सणसमारंभाला नैवेद्य काढताना गोग्रास/काकबली बरोबरच वास्तुचा नैवेद्यही काढायचा असतो/काढला जातो.
वास्तुशांत झालीच नाही म्हणुन चिंता करण्याचे कारण नाही. पण जसे घरातील थोर/कर्त्या पुरुषाची बसण्या उठण्याची एक ठराविक जागा/वेळ वगैरे सहसा असतेच तसेच या वास्तुदेवतेसही नामाभिधान देऊन आदर करून, त्याची दखल घेऊन, त्यास निश्चित जागेवर बसविणे योग्य ठरते.
अडचण तेव्हाच येते, जेव्हा उभारलेली वास्तू "दुषित" जागी उभारली गेली असेल, जसे की, अशी जागा, जिथे पूर्वी हत्या/युद्ध/अपमृत्यू वगैरे झाली आहेत, जिथे स्मशान/दफनभुमि होते, वा अन्य लक्षणांवरुन जिथे वाईट शक्तिंचाच वास आहे/होता असे जाणवते, अशा जागी उभारलेल्या वास्तुत रहिवाशांस निरनिराळे वाईट अनुभव निरनिराळ्या प्रकारे येतात. वास्तुशांत झाली असेल तर असे परिणाम कमी होतात अशी श्रद्धा आहे.
तसेच, वास्तुशांती आधीच, ज्या जागेचा पुर्वेतिहास माहित नाही, वा माहित आहे व तो चांगला नाही, अशा ओसाड/कनिष्ठ जागी काही बांधकाम करायचे आधी "राक्षौघ्न होम" करतात. मगच पाया खणण्यास वगैरे कामास सुरुवात करतात.
चिंचवडच्या दगडी खाणी जिथे सध्याचे कोणते ते मल्टिप्लेक्स अन मॅकडोनल्ड वगैरे उभारले आहे, त्या जागेत काम सुरु करण्या आधी चिंचवडचे काही गुरुजींकडून वरील होम करुन घेण्यात आला.
दगडांच्या खाणी सुरु करण्या आधी क्रशर स्थापनेवेळेस मी स्वतःही असा होम ज्येष्ठांचे मार्गदर्शनाखाली केला आहे.

आमच्या घराच्या वास्तुशांतीला प्रतिमा घराच्या एका कोपर्‍यात एक टाईल काढुन त्याच्या खाली पुरली.
(लिंबुनी सांगितलेले अगदी परफेक्ट)

>>>> जुने घर पाडुन नवे घर बांधले तर करायला लागते का?जुन्या घराची केलेली हो ती शांत> <<<<

जुन्या वास्तुची वास्तुशांत झालेली असेल, तर अर्थातच वास्तुपुरुषाची प्रतिमा पूरून स्थापित केलेली असणार.
जेव्हा केव्हा कोणत्याही देवतेची स्थिर पक्की सुस्थापित प्रतिमा हलवायची असते, तेव्हा "अघोर होम" करुन ती प्रतिमा जागेवरुन काढली जाते. व नविन वास्तु/मंदिर/प्रासाद इत्यादी बांधुन झाल्यावर पुनर्स्थापित केली जाते.

जुन्या घरात वास्तुपुरुष कोठे स्थापित केला आहे हे माहितच नसेल, वा आधीच पाया वगैरे खणताना वा अन्य कारणांने तो गहाळ झाला असेल तर वेगळे उपाय आहेत, जाणकारांकडून माहित करुन घ्यावे लागतील.

हे सर्व वाचून माझ्या मनात काही प्रश्न आले

१. आमच्या घरी वास्तुशांत झाली तेंव्हा त्या गुरुजींनी असे सांगितले होते कि साधारणपणे ५ वर्षांनी परत शांत करावी . हे त्या वास्तूसाठी व कुटुंबासाठी चांगले असेते .
२. जर मोकळी जमीन (प्लॉट ) घेतली तर तिथे वास्तुशांत करावी का ? लौकिक अर्थाने ती आमची वास्तू नाही, आम्ही तिथे राहत नाही आणि इतक्यात तिथे बांधकाम पण करणार नाही. पण विकत घेतली आहे. अशा वेळी काही वेगळा विधी करायचा असतो का ?
३. घरच्या देवांना आपण जसा सणासुदीला नैवैद्य दाखवतो तसा वास्तुपुरुषाला पण नैवैद्य दाखवावा का ?

मृणाल, मला ह्यातील काहीच माहिती नाहिये. तरीपण...

१) हे काहितरीच त्या गुरुजींचं. वास्तुशांत एकदाच करतात असं आतापर्यंत पाहिलं आहे. अश्या काहितरी अमेंडमेंट्स(?) स्वतःच्या मनाने हे लोक करतात आणि जे मूळ शास्त्रोक्त असते ते विकृत होते. किंवा तुमची समजण्यात चूक झाली असेल. त्यांनी पाच वर्षांनी उदक शांत सांगितली असेल. ते एकवेळ ठिक आहे. पण तुमची इच्छा असेल तरच करा. भिती बाळगून नको. त्यापेक्षा जर श्रद्धावान असाल तर रोज नेमाचं काही पठण होत असेल तर ती स्पंदनं घरात असतातच. वेगळं नैमित्तीक काही करायची गरज नाही.

२) मोकळ्या जमिनीत बांधकामाआधी भूमीपूजन करतात असं ऐकलं आहे.

३) वास्तुपुरुषाला काही घराण्यांमध्ये नैवेद्य दाखवतात. ही घरं त्यांची पिढान्पिढ्यांची होती.

@ अश्विनी - मलाही नव्हतेच पटले त्यावेळी. आता त्यालाही ८-९ वर्ष झाली . पण आत्ता हे वाचताना आठवले .

मोकळ्या जमिनीत बांधकामाआधी भूमीपूजन करतात असं ऐकलं आहे. - पण मी आत्ता तिथे काही बांधकाम करणार नाहीये. ती जागा आता आपली झाली म्हणून तिथे काही विधी करतात का ?

समजा घर आपलं आहे.
सर्व वास्तु शांत पुजा वै केली आहे.
पण काहि कारणास्तव त्या घरात रहायला गेलोच नाही.
परगावी राहतोय तर आपण वास्तुपुरुषाला नैवेद्य वै दाखवु शकणार नाही.
मग कसं करायच अशा वेळी?
समजा घरात भाडेकरु आहेत.
अशा वेळी काय उपाय आहे?

परगावी राहतोय तर आपण वास्तुपुरुषाला नैवेद्य वै दाखवु शकणार नाही. - दाखवावा का ? असेल तर काय ? आत्ता एक मैत्रीण म्हणाली की दही भात दाखवावा म्हणे

मृणाल१ व अश्विनीके,

>>>>> १. आमच्या घरी वास्तुशांत झाली तेंव्हा त्या गुरुजींनी असे सांगितले होते कि साधारणपणे ५ वर्षांनी परत शांत करावी . हे त्या वास्तूसाठी व कुटुंबासाठी चांगले असेते .<<<<<

त्या गुरुजींनी सांगितलेले बरोबर आहे. फक्त अशा नंतरच्या शांतीच्या वेळेस वास्तुप्रतिमा निक्षेप असत नाही.
प्रत्यक्षात, पाच वर्षे राहूदेच, लोक घरात पाचपंचवीस वर्षे राहिली तरी पहिलीच वास्तुशांत करीत नाहीत.
अन केली तरी नंतर वर्षानुवर्षे वास्तुचा नैवेद्य वगैरे आदरेखुन काढणे होतेच असे नाही. त्याव्यतिरिक्त, दरम्यानच्या कालखंडात सगळ्याच घरातील सगळीच कृत्ये "अगदि पवित्र" अशी असतातच असे नव्हे.
अशी श्रद्धा आहे की घरात जे बरेवाईट उच्चारले जाईल, जी बरीवाईट इच्छा व्यक्त होईल, जे बरेवाईट कृत्य केले जाईल, वास्तुदेवता त्यासच सदैव तथास्तु म्हणत रहाते. तेव्हा, ठराविक कालखंडानंतर परत एकदा सग्रहमक वास्तुशांत विधी करणे उचित होय.
पूर्वी ब्राह्मण कुटुंबात, बहुतेक सर्व पुरुष/स्त्रीया या विधींशी परिचित असायच्या, त्यांना स्वता:लाही हे करता यायचे, सबब कौटुंबिक उपाध्याय बोलावुन घरच्याघरी थोडक्यात व कमी खर्चात हे विधी व्हायचे. हल्ली हे विधी कैच्याकैच खर्चिक बनल्याने परत ५ वर्षांनी करणे जिकीरीचे वाटणे साहजिक आहे. यावर मजपाशी तरी काही उपाय नाही.

विषय निघाला म्हणुन, उदकशांत ही तर दरवर्षी करावी, अशी गरज नाही की केवळ (मर्तिक वगैरे) अशुभ घटनेनंतरच करावी. प्रत्यक्षात हल्ली यातिल काहीच घडत नाही.

>>>>> २. जर मोकळी जमीन (प्लॉट ) घेतली तर तिथे वास्तुशांत करावी का ? लौकिक अर्थाने ती आमची वास्तू नाही, आम्ही तिथे राहत नाही आणि इतक्यात तिथे बांधकाम पण करणार नाही. पण विकत घेतली आहे. अशा वेळी काही वेगळा विधी करायचा असतो का ? <<<<<<
नाही. मोकळ्या जमिनीस "वास्तु" संबोधता येत नाही. सबब तिथे वास्तुशांत असे काही करणे नाही.
तसेच, ज्या ठिकाणि आपण रहाणार नाही, आपले वास्तव्य नाही, अशा मोकळ्या जागेवर उगीचच देवता स्थापन करू नये, सबब, तिथे या प्रकारची पूजा अर्चा अपेक्षित नाही.
मात्र काही कारणाने, वर उल्लेखिलेला राक्षौघ्न होम करणे आवश्यक असल्यास तो करता येईल.
माझ्या मते, जोवर जमिन विकत तर घेतली आहे, पण तिथे जाणेयेणेही नाहीये, तर "कुंपणीच्या भिती" व्यतिरिक्त काहीही करू नये.
अन अर्थातच जेव्हा कम्पाऊण्ड वॉल करु जाल, तेव्हा भूमिपूजन हे (केले तर) होतेच ज्यात क्षेत्रपाल/दशदिक्पाल यांचेही पूजन होते.

>>>> ३. घरच्या देवांना आपण जसा सणासुदीला नैवैद्य दाखवतो तसा वास्तुपुरुषाला पण नैवैद्य दाखवावा का ? <<<<
अर्थात. वरील एका पोस्टमधे उल्लेख केला आहे की वास्तुशांत झाली असेल वा नसेल, पण ज्या वास्तुत रहाता आहात, त्या वास्तुच्या देवतेस (वास्तुपुरुषास) नैवेद्य दाखवावा.
साधारणत: सणासुदीला पाच नैवेद्य काढले जातात, पैकी एक कुलस्वामी/स्वामिनी/घरचे देव यांचे करता, दुसरा सणासुदीच्या मुख्य आवाहित देवते करता, जसे की गणपतीत गणेश, नवरात्रात देवी इत्यादि, उरलेले तीन गोग्रास (गाईकरताचा नैवेद्य), वास्तुपुरुषाचा नैवेद्य व काकबली (पितरांकरताचा नैवेद्य) असे काढले जातात. पहिले दोन मोठ्या ताटात वाढून ते यजमानांनी ग्रहण करायचे असतात, तर बाकी तीन (व्यावहारिक दृष्ट्या योग्य म्हणुन) लहान पानावर काढून ज्याचे त्याला द्यायचे असतात, म्हणजे गोग्रास गाईला, वास्तुपुरुषाचा गाईला/नदीत वहावणे, काकबली गच्चीवर नेऊन ठेवणे.

आशा आहे की तुमच्या शंकांना उत्तर देऊ शकलो आहे.

>>>>> समजा घर आपलं आहे.
सर्व वास्तु शांत पुजा वै केली आहे.
पण काहि कारणास्तव त्या घरात रहायला गेलोच नाही.
परगावी राहतोय तर आपण वास्तुपुरुषाला नैवेद्य वै दाखवु शकणार नाही.
मग कसं करायच अशा वेळी?
समजा घरात भाडेकरु आहेत.
अशा वेळी काय उपाय आहे? <<<<<

>>>> परगावी राहतोय तर आपण वास्तुपुरुषाला नैवेद्य वै दाखवु शकणार नाही. - दाखवावा का ? असेल तर काय ? आत्ता एक मैत्रीण म्हणाली की दही भात दाखवावा म्हणे <<<<

झकोबा, असे होऊ शकते. अशा वेळेसही ज्याप्रमाणे, कुलस्वामी/स्वामिनी व मूळ गावचे ग्रामदैवत जरी दूर गावी असले तरी नैवेद्य दाखवतो, तशाच प्रकारे तुमच्या जितक्या वास्तु वेगवेगळ्या प्रदेशात असतील तितक्यांच्या नावे नैवेद्य काढून दाखवावा.... एरवीही किमान मनोभावे स्मरण तरी करावेच.
घरात भाडेकरू असतील, तर त्यांस वास्तुनिक्षेप केलेली जागा दाखवुन तेथिल पावित्र्य जपण्यास सांगावे. त्यांचा त्यांनी स्वतंत्ररित्या नैवेद्य काढीत असतील तर काढु द्यावात. तरीही आपण जिथे रहातो तिथेन आपल्या वास्तुचे स्मरण व नैवेद्य काढणे थांबवू नये.

दहीभात सहसा काकबली म्हणुन काढला जातो. दहीभात नसेल तर जे काही केले असेल ते पाण्याच्या वाटी सोबत गच्चीवर/ बाहेर उघड्या जागी नेऊन ठेवावे.
वास्तुकरीता/देवतांकरता नैवेद्य काढताना जे काही केले असेल त्यातिलच काढावा.

@ limbutimbu -माझ्या प्रश्नांना इतका वेळ देवून उत्तर दिल्याबद्दल खरच धन्यवाद.
खूप वेळा अशा गोष्टी मनात येतात व निरसन न होता तश्याच विरून जातात.

वास्तु ह्या अर्थ फक्त बांधकाम केलेली जागा नसुन कुंपणाने बंदिस्त केलेला प्लॉट असा आहे.

वास्तुशास्त्राचे प्रयोजन खुपच व्यावहारिक आहे असे एका जाणकाराची व्याख्याने ऐकल्यावर जाणवले.

वास्तु निवडण्यापुर्वी वास्तु शास्त्र सुरु होते.

१) प्लॉट निवडताना २ बाय २ बाय २ फुट चा खड्डा करुन त्यात पाणी भरावे. पाणि काठोकाठ भरल्यावर शंभर पावले मागे जाउन लगेच परत येऊन पातळी पहावी. जर पाणि जसे च्या तसे असेल तर प्लॉट उत्तम, चार बोटे पाणी कमी झाले असेल तर मध्यम आणि पाणी अजिबात शिल्लक नसेल तर ही जागा घर बांधण्यास योग्य नाही असे समजावे.

अश्या जागी पाया लागणार नाही. किंवा वास्तु पाया निट न लागल्यास दिर्घकाळ सुस्थितीत रहाणार नाही.

२) दक्षीण आणि पश्चिम दिशा उंच व जड ( जाड ) असाव्यात .

आपल्या गोलार्धात सुर्य पुर्वेकडुन पश्मिमेकडे जाताना जास्त काळ दक्षीण आणि पश्चिम दिशांवर सुर्य प्रकाश रहातो. ही उष्णता घरात कमीत कमी येऊन घरनिसर्गत: थंड रहावे यासाठी पश्चिमेच्या आणि दक्षिणेच्या भिंती जाड ( डबल जाडीच्या ) असाव्यात. गच्चीवरची भिंत सुध्दा उंच करावी म्हणजे त्याची सावली पडुन गच्ची तापणार नाही.

या सारखे उपाय घर सुख दायी होण्यासाठीच आहेत असे वाटते.

अर्थातच फ्लॅट ला हे लागु पडत नाही. वास्तु प्रतिमा निक्षेप सुध्दा भुमीच्या कुशीत असावा असे म्हणले आहे त्यामुळे पहिला मजला किंवा त्यावर ते करणे किती योग्य आहे ? याचा अर्थ वास्तु शांतीचा यज्ञ करु नये असे मात्र नाही. यावर वास्तुशांत ही मल्टीस्टोरेड बिल्डींग मध्ये एकच व्हावी. एकच वास्तुनिक्षेप करावा असे वाटते जे व्यवहाराला धरुन असेल असे नाही.

>>>> माझ्या प्रश्नांना इतका वेळ देवून उत्तर दिल्याबद्दल खरच धन्यवाद <<<<<
खरे धन्यवाद "मायबोली साईट" ला दिले पाहिजेत, जिथे तुम्ही सहजगत्या विचारू शकताय अन मी (वा मजसारखे अन्य) हे मनमोकळेपणे लिहू शकतोय.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी असे का म्हणतोय, पण नेटविश्वात बाकी अनेक साईट्स चा चालकवर्ग विशिष्ट विचारधारा खासकरून निधर्मी/समाजवादी/अन्निस/बुप्रा चिकित्सक/रगेल-रंगेल अशा प्रकारचा असेल, तर तिथे वरील लेखन पसंतीस उतरत नाही/असे लेखन अडगळीत टाकले जाते/अशा लेखनास शक्य तितके अडथळे उत्पन्न होतात.
मायबोलिचालकांची स्वतःची विचारधारा/विचारसरणी कोणतीही असेल, तरी तिचा परिणाम ते येथिल लेखनस्वातंत्र्यावर सहसा होऊ देत नाहीत. अन म्हणूनच इथे धार्मिक विभाग जितका फुललेला दिसतो, तितका तो कुठेच दिसत नाही.

लिबुंजी माझाही एक प्रश्न आहे. तुमच्या फ्री कन्सलटंन्सीचा आम्ही जास्तच फायदा घेतोय असे वाटल्यास उत्तर नाही दिलेत तरी चालेले Happy

सणाच्या दिवशी अथवा एरवी उपवासाला देवाला नैवद्य काढले जाते पण मला नेहमीच नैवद्य काढताना चुकचुकायला होते कारण बर्‍याच वेळेस सकाळी अंघोळ न करता डब्बा बनविला जातो किंवा 'त्या' पाच दिवसात घरात स्वंयपाक करणे होते त्यामुळे अर्थातच स्वयंपाकाच्या सामानाला हात लागलेला असतो त्यामुळे त्याच सामानातुन शिजविलेले अन्न देवाला नैवद्य म्हणुन अर्पण करायला मन धजावत नाही. आणि कुलदेव/देवता, वास्तुपुरुष यांच्याबद्दल तर थोडी भितीच असते मनात त्यामुळे काय करावे हे कळत नाही.

निल्सनजी,

देव भावाचा भुकेला. तुमच्या मनात कृती करताना काय भाव आहे हे महत्वाचे.

देव जर असले विचार करत असता तर कान्होपात्रेला देवाने दर्शन दिले नसते.

पुर्वीच्या काळी घर मोठे असायचे आणि घरात स्त्रीयांची संख्याही एकत्र कुटुंब पध्दतीमुळे जास्त असायची अश्या वेळेला आपण म्हणता ते नियम पाळणे शक्य होते. आता किती पाळावेत यावर इथे चर्चा नको.

जुन्या नियमात स्वच्छतेच्या अपुर्‍या व्यवस्था आणि आजही हायजीनचे व्यक्ती आणि समाज परत्वे वेगळे नियम याचे धर्माच्या व्यवस्थेतुन सुसुत्रीकरण असा काही हेतु असावा.

आपल्याला येणार्‍या शंका या संस्कारामुळे आहेत. फारच त्रास होत असेल तर यावर उपाय पण आहे. गोमुत्राने सर्व शुध्द होते असे मानले जाते. फार त्रास करुन घेऊ नये.

लिंबूजी << वास्तुशांत हे प्रायश्चितांगभूत कर्म आहे, ते शुभ कर्म मानले जात नाही, >>याबाबत मतभेद असू शकतात . आमच्याकडे सर्व ब्रहमवृंद मंडळी वास्तुशांत हे शुभकर्म च मानत आलेली आहेत . अर्थात,त्यात प्रायश्चित्तातमक संकल्प असेलही ,पण म्हणून काही ते अशुभ कर्म होत नाही ...

>>>>> . आमच्या घरी वास्तुशांत झाली तेंव्हा त्या गुरुजींनी असे सांगितले होते कि साधारणपणे ५ वर्षांनी परत शांत करावी . हे त्या वास्तूसाठी व कुटुंबासाठी चांगले असेते .<<<<< पुरोहितांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे सांगितले असावे . कोकणात कुठेही अशी प्रथा नाही . तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता?

महत्त्वाचे म्हणजे पुणे व आसपास शहरी वस्तीत प्रचंड वाढ झाल्याने वास्तु व संबंधित कन्सल्टनसी यांचे पेवच फुटले आहे. त्यामुळे प्रत्येक "वास्तूतज्ज्ञ " आपआपल्या ज्ञाना नुसार व काहीवेळा व्यावसायिक फायदा डोळ्यासमोर ठेवून स्वत:च्या मनानेच सल्ले देत असतात , अशावेळी आपण तारतम्य दाखवून वागावे ,असे वाटते !

मृणाल १ >>

दुसरे म्हणजे पूर्वी वास्तुशांती झालेल्या घरात काही वर्षानी वास्तुसंबंधी काही त्रास निर्माण झाला आहे ,अशी शंका आल्यास गुरुजींच्या मदतीने "वास्तुपूजन" हा विधी करता येतो.चौरंगावर तांदूळ ठेवून कलश ठेवावा . गणेशपूजन ,वरुणपूजन करून कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवून नारळात वास्तुदेवतेचे आवाहन करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी. जेवणाचा नैवेद्य दाखवावा. व गुरुजींकडून /स्वत: वास्तुमंत्राचा 11000 किंवा 28000 /1 लाख जप करून घेणे असा विधी काही ठिकाणी प्रचलित आहे .
वास्तुमंत्र- वास्तोष्पते नमस्तूभ्यं भूशय्याभिरत प्रभो
मदगृहे धनधान्यादी समृद्धं कुरू सर्वदा ... 1

पूजितोसी मया वास्तो होमाद्य अर्चने शुभे
प्रसीद माहि देवेश सर्वारिष्टम निवारय .... 2

यानंतर सर्व घरात प्रोक्षणविधी करून घेणे आवश्यक आहे . असो
अधिक माहितीकरता विपु करावी .

वास्तुशांती ही पारंपारिक अर्थाने जरी मला मान्य नसली तरी वास्तुशी आपल एक नात तयार होत असत. आपला मेंदु आयुष्यातील सुख दु:खाच्या गोष्टी वास्तुशी असोसिएट करतो. एक नॉस्टल्जिक नात ही तयार होत. त्यामुळे वास्तु ही निर्जीव असली तरी या नात्यामुळे तिच्या प्रती एक कृतजता व्यक्त करण्यासाठी एखादा समारंभ करणे ही त्या व्यक्तिची मानसिक गरज असू शकते.
आपण जर वास्तू शांत केली नाही तर ती वास्तू आपल्यावर सूड उगवेल या भयापोटी मात्र वास्तू शांती करु नये. ही कृतज्ञता नव्हे हा जुलमाचा रामराम झाला.
वास्तू अशी असावी एखाद्या अश्रद्ध व नास्तिक माणसाला सुद्धा तिथे शांतता समाधान प्रसन्नता वाटेल. हवा उजेड स्वच्छता नीटनेटकेपणा असावा. वास्तु शांती केल्याने वास्तु शांत होते का माहित नाही पण आपल्या मनाची मात्र शांती होते असे मानणारे लोक आहेत.

Pages