वास्तुशांती विषयी माहिती हवी आहे,

Submitted by manuruchi on 5 May, 2015 - 05:44

वास्त्॑शांतीच्या वेळी काही गुरुजी वास्तुपुरूष जमिनीमध्ये पुरण्यास सांगतात तर काही देवारयात टेवण्यास सागतात नेमके काय करावे, वास्त्॑शांती आणि सत्यनारायणाची पुजा एकत्र करता येते का

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितिनचंद्रजी धन्यवाद!
गोमुत्रबद्दल सहमत. बर्‍याच वेळेस हेच वापरले जाते. गावाहुन 'खास गोमुत्र' मागवितो आम्ही Proud शक्यतो गणपतीच्या दिवसात. त्या विकतच्या बाटलतील गोमुत्राला 'गोमुत्र' म्हणवतही नाही. मग जोपर्यंत ते उरलेले असते तोपर्यंत वापरले जाते नंतर पुन्हा पंचाईत.

निल्सनजी, नितिनचंद्र यांनी समर्पक उत्तर दिलेच आहे.

जोवर तुम्ही तुमच्या स्वतःपुरते विधी/उपचार/भक्ति इत्यादी वैयक्तिकरित्या करीत असता, तोवर या बाबींचे स्तोम माजवु नये अशा मताचा मी आहे.
तसेच, अतिकडक नियम "ज्या तांत्रिक-अध्यात्मिक पात्रतेजवळ" गेले असता पाळणे आवश्यक ठरेल, त्या पातळीच्या जवळपासही आपण सामान्यजन फिरकू शकत नसतो. मी नेहेमी सांगतो, की सन्याश्याचे वा हठयोग्याचे नियम "गृहस्थाश्रमी" व्यक्तिस लावून उपयोगी नाही.
सबब, तुमच्या इच्छेने, जेव्हा जेव्हा शक्य तितक्या सोवळेपणे अन्यथा रोजच्या व्यापातील आहे तशा परिस्थितीतही देवाची आठवण ठेऊन जे काय करता येईल ते कसलाही आनमान न ठेवता करावेत.

सबब, तुमच्या इच्छेने, जेव्हा जेव्हा शक्य तितक्या सोवळेपणे अन्यथा रोजच्या व्यापातील आहे तशा परिस्थितीतही देवाची आठवण ठेऊन जे काय करता येईल ते कसलाही आनमान न ठेवता करावेत. >>>
यापुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद. मनीचा भार कमी जाहला. कारण बर्‍याच वेळेस गोडधोड बनते त्यामुळे देवाला नैवद्य दाखविण्याची इच्छाही होते पण आधी सांगितल्या कारणांमुळे मनाची चलबिचल होते आणि नैवद्य ठेवले जात नाही.
त्यामुळे कुठेतरी चुकल्याचुकल्यासारखे पण व्हायचे की घरात गोड बनवुन देखील देवास नैवद्य नाही काढु शकलो.
यापुढे हे सगळे किंतुपरंतु बाजुला ठेवुन आधी माझ्या बाप्पाला खायला घालीन.:स्मित:

>>> पण आधी सांगितल्या कारणांमुळे मनाची चलबिचल होते आणि नैवद्य ठेवले जात नाही <<<

हे उदाहरण मी अनेकदा देतो की अट्टल दारुडाही गुत्त्यावर/बारमधे वा कुठेही दारू प्यायला गेल्यावर प्यायला सुरु करायच्या आधी भरलेल्या ग्लासात दोन बोटे बुडवून आजुबाजुला शिम्पडतो अथवा टेबलवर/जमिनीवर दारुने ओल्या पाची बोटांचे ठसे उमटवतो, अन नंतरच दारु प्यायला सुरुवात करतो. Proud
वरील कृतीने, दारू प्यायला घ्यायच्या आधी दारुचाही "नैवेद्य" त्या दारुड्यास त्याच्या ज्या कुणा दैवतेस दाखवावा वाटतो त्या त्याच्या भक्तिस माझा सलाम असतो.

एक आहे की स्वतःस अमंगळ/अपवित्र वाटत असता, घर सोडून मुद्दामहून देऊळ/समारंभ इत्यादी ठिकाणी टाळता येणे शक्य असूनही जाण्याचा अट्टाहास धरू नये हे देखिल माझे मत आहे. पण जोवर घरातील कर्तव्ये निभावतानाचा वेळप्रसंग आहे, तोवर "कट्टर धार्मिक" नियमांचा अतिबागुलबुवाही करू नये असेही माझेच मत आहे. किंबहून, नियमांमागिल अर्थ/मागिल पूर्वपिठीका/कारणमिमांसा/व्यक्ति-उपासक सापेक्षता समजुन न घेताच अशा अति केलेल्या कट्टर पणामुळेच हिंदु लोक व खास करुन "ब्राह्मण जातीचे" लोकच (ज्यांनी बाकिच्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असते, ते स्वतःच) देवधर्मापासून दुरावत चाललेले बघण्यास मिळतात.

लक्षात घ्या की मला जर एखादा मंत्र विशिष्ट कारणाने सिद्ध होण्यासाठी विशिष्ट संख्येने जप करायचा असेल, तर मला पूर्वनियोजित पद्धतीने शुचिर्भुत होऊनच तो करावा लागेल.

पण तेच जर मला मी रोजच्या रोज तिन्ही त्रिकाळ गिळत असताना, गिळायचे आधी देवाची आठवण काढणे आवश्यक असेल, तर मी ती का काढू नये? तोंडात पहिला घास घालण्याचे आधी देवाचे नामस्मरण वा मनातून अगदी आतून त्याची आठवण काढायला "शरिराच्या बाकी कोणत्या पावित्र्याची" गरज असते? नक्कीच नाही. आठवण होणे महत्वाचे आहे, तद्वतच, रोजच्या धकाधकीच्या शहरी आयुष्यात नैवेद्य काढणे वगैरे बाबीन्ना अजुन "कट्टर कालबाह्य/व्यक्तिसापेक्षबाह्य नियम " लावून भक्तिच्या त्या एका कृतीपासूनही भक्तास वंचित करणारे नियम कितपत पाळावेत हा संदिग्ध प्रश्न वाटला तरी माझ्यामते तसा तो नाही. इथे "व्यक्तिसापेक्ष" वा "परिस्थितीसापेक्ष" हे शब्द कळीचे आहेत. याबाबत ब्रह्मवृंदातच पराकोटीचे कडाक्याचे मतभेद होऊ/असू शकतात.

तसे नसते, तर शबरीची उष्टी बोरे श्रीरामाने ग्रहण केलिच नसती, अन कोण तो भक्त... नाव विसरलो बघा, जो तोन्डात गालफडात शाळिग्राम ठेवायचा, व खाण्याचे वेळेस तोंडातून काढून त्यास धुवुन पुजायचा व मगच अन्न ग्रहण करायचा, त्याची भक्तिही कुचकामी ठरली असती. असो.

एक आहे की स्वतःस अमंगळ/अपवित्र वाटत असता, घर सोडून मुद्दामहून देऊळ/समारंभ इत्यादी ठिकाणी टाळता येणे शक्य असूनही जाण्याचा अट्टाहास धरू नये >>>> या जन्मी तरी माझ्याकडुन शक्य नाही कारण घरातही मी देव्हार्‍याच्या नजीक जाणे टाळते. आमचा देव्हारा उंचीवर आहे तरी अंतर राखुनच असते. तसेच मांसाहार केला असताना देखील मी पुजा करणे, मंदिरात जाणे टाळते.
मला फक्त घरातील अन्नाचे पदार्थ्/साठवणीचे सामान याला हातबोट लागले असताना ते 'नैवद्य' म्हणुन वापरावे की नाही याबद्दल दुविधा होती. अर्थात नैवद्य काढताना वा दाखविताना मी व माझे मन प्रसन्न आणि पवित्रच असणार.

vaastushanti sathi June mahinayat muhurt aahet kaay? aslyas kontya tarkha aahet

प्रकाश घाटपांडे.. >> संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. भीती काढून, किंवा सोडून धार्मिक माणसाला स्वतःचा इच्छेस्तव अशी कर्मे करायची मुभा/मोकळीक/सामाजिक प्रतिष्ठा असली पाहिजे. तर धर्मसमाजात मोकळेपणा आणि उमदेपणा येइल.

> १. आमच्या घरी वास्तुशांत झाली तेंव्हा त्या गुरुजींनी असे सांगितले होते कि साधारणपणे ५ वर्षांनी परत शांत करावी . हे त्या वास्तूसाठी व कुटुंबासाठी चांगले असेते .

हो हे अगदी खरं आहे. याचं कारण असं आहे की पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र थोडं बदलत असतं. त्या मुळे आग्नेय दिशेत बदल होतो.

३० एप्रिलला नासाचं एक यान बुधावर कोसळलं. पृथ्वीशिवाय बुध हा एकच ग्रह आहे (आपल्या सुर्यमालेतील - इतर ठिकाणी आणखीपण असणार) ज्याला चुंबकीय क्षेत्र आहे.

http://www.thetimesgazette.com/magnetic-field-of-mercury-could-be-4-bill...

तिथे एखादा प्लॉट असल्यास त्याच्याही वास्तुपुरलेल्याला योग्य जागी हलवावं लागतं.

आणि दर ५ वर्षांनी तसं करणं गुरुजींसाठीपण चांगलं असतं

आम्च्या प्लॉटच्या इथे पूर्वी पेंढारी लोकांची पुरायची जागा होती म्हणून सांगतात. त्याला हिंदू पद्धतीने वास्तूशांत करून चालेल का? आम्हाला कुणीतरी एक फकीर अवलिया बाबा बोलावून मुसलमानी पध्ध्तीने वास्तूशान्त करायची सांगितलेली आहे. ती कशी करतात?

निष्पाप कोवळा जीव ,

खर तर तुम्ही भुत/ खेत यांना किती मानता यावर हे सर्व अवलंबुन आहे. काही माणसांना अजिबात त्रास होत नाही. त्यांना कोणत्याही पध्दतीने वास्तु शांत न केल्यासही उपद्रव जाणवत नाही.

याउलट ज्यांना ह्या प्रकाराची भिती वाटते ते कोठेही सुखासमाधानाने राहु शकत नाहीत.

मला महाबळेश्वरच्या एम टी डी सी कॉटेज मधे काही अनुभव आले तसेच अनुभव सुमीत राघवन या अभिनेत्याला आले असे काल जोडी तुझी माझी मध्ये त्यांनी सांगीतले.

कोणतीही पध्दत खात्रीने चांगली आहे असे म्हणायला साधन नाही.

अनुभव घेण्यपेक्षा अश्या जागा वास्तु साठी वापरु नयेत.

आम्च्या प्लॉटच्या इथे पूर्वी पेंढारी लोकांची पुरायची जागा होती म्हणून सांगतात. त्याला हिंदू पद्धतीने वास्तूशांत करून चालेल का? आम्हाला कुणीतरी एक फकीर अवलिया बाबा बोलावून मुसलमानी पध्ध्तीने वास्तूशान्त करायची सांगितलेली आहे. ती कशी करतात?>>>>>>>>>>>>

जन्म, मरण हा सृष्टीचाच नियम आहे जन्म पवित्र तर मरण अपवित्र हे कोणी ठरवले? जन्म आणि मरणातील पोकळी म्हणजे जीवन. मृत्यू हे सत्य आहे ते स्वीकारायला हवे त्याला घाबरणे किंवा त्याची घृणा करणे चूक आहे.

वास्तुशांती का करायची कुठलीही वास्तू हि मुळात अशांत नसतेच ती असते एक मानवनिर्मित निर्जीव कलाकृती. निर्जीव कलाकृतीला शांत करण्याच्या नादात सजीव स्वतः यांत्रिक बनतो. कुणीतरी स्वताला जगाचे सारे ज्ञान आहे असे सांगणारा येतो पैसे उकळून जातो नि आपण होतो एक यांत्रिक बाहुली जिचे नियंत्रण दुसरा मेंदू करतो नि आपला मेंदूही कर्मकांड होई पर्यंत निर्जीव होतो..........वास्तू सारखा.

कोवळ्या जिवा ,

मुसलमानांच्यात वास्तुशांत नसते.

http://www.islamhelpline.net/node/6563

There are absolutely no rites, or rituals or duties one has to perform in Islam when one is blessed by their Lord to buy or move into a new house, or a new business, or a new car, or new clothes, etc….except to recognize and be grateful to their Lord for His Favors and Grace, and lawfully utilize it in the Blessed Name of their Lord Most Gracious.

सुभानल्ला !

Happy

वास्तुशांती दिवशी सत्यनारायण न करण्याचा मुख्य कारण

वास्तुशांति च्या मुख्य देवता या वास्तु ध्रुव आणि अघोर या आहेत
त्या दिवशी हे मुख्य देवता असतात आणि सत्यनारायण केलात तर आलेल लोक सत्यनारायणला हलदी कुंकु अक्षता फूल वाहून नमस्कार करतात प्रसाद घेतात निघुन जातात दुर्लक्ष होत वास्तु देवते कड़े

आता समजा घरी मुख्यमंत्री आणि नगरसेवक याना एकदम आमंत्रण दिल आणि मुख्यमंत्री समोर नगरसेवक च्ची वाहवा त्यच्या मान सन्मान चालू आहे मुख्यमंत्रीला कोणी विचारत नाही
क़ाय होईल अश्या वेळी ?
त्यच्या अपमान
हाच प्रकार इथे पन लागू होतो
म्हणून सत्यनारायण करू नये

माझ्या घरी तसेच गावी बांधलेल्या घरी वास्तुशांत केली होती.

वास्तू बांधताना तिथे असलेल्या निसर्गाची हानी होते, आश्रयास असलेले प्राणी, किडे आणि इतर सजीव यांची हत्या होते किंवा ते निर्वासित होतात, वास्तू जिथे उभी आहे त्या भूमीला त्रास होतो. वास्तुशांतीच्या माध्यमातून आपण या सगळ्यांची माफी मागतो. आपल्या हातून मुद्दाम अथवा अनवधानाने घडलेल्या या गुन्ह्याबद्दल जो दोष आपल्या माथी लागलाय त्यातून आपण सुटावे व आपल्याला काही त्रास होऊ नये यासाठी वास्तुशांत करावी. हे विवेचन भटजींनी केले.

वास्तू बांधताना तिथे आधी अस्तित्वात असलेल्या प्राणी व वनस्पतीजगाला त्रास होणार हे मला पटते. तिथे वास्तू बांधून राहावे ही आपली गरज असल्याने ज्यांना त्रास झाला त्यांची माफी मागावी हे गुरुजींचे सांगणेही मला पटले.

ती माफी कशी मागावी हे आपण ठरवायचे. श्रद्धा असेल व खिश्यात पैसे असतील तर थाटात वास्तूशांत करावी. अन्यथा वास्तू शांत न करता साधी पूजा करून व मनापासून माफी मागून तुम्ही वास्तूत राहू शकता.

आणि या कशावरही विश्वास नसेल, पृथ्वी फक्त मानवासाठी बनलेली आहे यावर विश्वास असेल तर काहीही न करता आरामात राहावे. शेवटी जसे कर्म तशीच फळे मिळणार.

स्वस्ति, घराचे तोंड दक्षिणेला असते, म्हणजे दार आतून उघडले तर तुम्हच्या समोर दक्षिण दिशा येते. तुम्ही घरात शिरत असाल तर तुमचे तोंड उत्तरेला.

, घराचे तोंड दक्षिणेला असते, म्हणजे दार आतून उघडले तर तुम्हच्या समोर दक्षिण दिशा येते. तुम्ही घरात शिरत असाल तर तुमचे तोंड उत्तरेला. >>> बरोबर
याबद्दल एखादा धागा असेल तर क्रुपया कोणी लिंक देईल का??

^^वास्तू बांधताना तिथे असलेल्या निसर्गाची हानी होते, आश्रयास असलेले प्राणी, किडे आणि इतर सजीव यांची हत्या होते किंवा ते निर्वासित होतात, वास्तू जिथे उभी आहे त्या भूमीला त्रास होतो. वास्तुशांतीच्या माध्यमातून आपण या सगळ्यांची माफी मागतो. आपल्या हातून मुद्दाम अथवा अनवधानाने घडलेल्या या गुन्ह्याबद्दल जो दोष आपल्या माथी लागलाय त्यातून आपण सुटावे व आपल्याला काही त्रास होऊ नये यासाठी वास्तुशांत करावी. हे विवेचन भटजींनी केले.^^^

पिपिलिका,पल्ली वगैरे ना? मग सहा महिन्यांनी पेस्ट कन्ट्रोल ?
आम्ही वासतूशांती नाही केली,पे०क०ही इल्ले.
पण दक्षिणा बुडवली.

आमच्या गुरुजींनी वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायण करु नये चं कारण असं सांगितलं होतं:
वास्तुशांती ची पूजा बरेच तास चालते.घरचे यजमान यजमानीण बर्‍याच मिसलेनियस विधी मध्ये बिझी असतात.आणि कुटुंबिय त्यांना हे आणून दे ते आणून दे मध्ये.सर्व होऊन जेवायलाही उशीर होतो.अश्यात त्याच दिवशी सत्यनारायण ठेवला तर तुमच्यात येणार्‍या पाहुण्यांशी हसतमुखाने गप्पा मारण्याची, त्यांना एंटरटेन करण्याची एनर्जी अजिबात नसते, सत्यनारायण केव्हाही करता येतो तो केव्हाही करावा.वास्तुशांतीच्या दिवशी मोजके फक्त घरचे आणि कोअर नातेवाईक बोलावून बडेजाव नसलेला साधा सोहळा ठेवावा.

खुप छान माहिती वाचायला मिळाली.. आंम्ही पण नविन घरात रहायला येवुन ३ वर्ष झाली अजुन वास्तुशांत केली नाहि फक्त गणेश पुजन केलं रहायला येतांना.. सत्यनारायण ची पुजा घालायची असं ठरवत होतो.. इथलं वाचुन ते ठिक नाहि हे कळलं.

भागो वास्तुशांती जरूर करून घे. माझा स्वतःचा अनुभव सांगते.
माझ्या नविन घरात मला कायम अनामिक भिती वाटायची. वास्तुशांतीचा रहायला गेल्यावर लगेच मुहुर्त काढला पण तो पुढच्या महिन्यातला निघाला. ज्या दिवशी वास्तुशांती झाली त्यानंतर मला अनामिक भिती कधीच वाटली नाही, शांत शांत वाटले. हा अनुभव घेण्याजोगा आहे. सांगून त्याचा इफेक्ट कळणार नाही.

<<< आणि या कशावरही विश्वास नसेल, पृथ्वी फक्त मानवासाठी बनलेली आहे यावर विश्वास असेल तर काहीही न करता आरामात राहावे. शेवटी जसे कर्म तशीच फळे मिळणार. >>>
मी आत्तापर्यंत ६ घरे विकत घेतली, एकाही घराची वास्तुशांत केली नाही, गृहप्रवेशासाठी पूजा केली नाही. तुमच्या लॉजिकने हे कर्म चांगलेच असणार कारण आजतागायत फळे गोड मिळाली आहेत.

मी पुण्यात २ घरं घेतली आहेत आणि कोकणात एक घर बांधलंय. कुठेही साधी गणेश पूजा देखील केली नाही. गावचं घर हट्टाने दक्षिणमुखी बांधलं. तरी उत्तरोत्तर प्रगतीच होतेय.

एकदा गावी एक दूरच्या नातेवाईक बाई आलेल्या. त्यांची कुंडलिनी जागृत होती म्हणे. त्या म्हणाल्या आमच्या घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. मी मुद्दाम घर दक्षिणमुखी असल्याचं सांगितलं तर म्हणाल्या मुख्य दरवाजा जरी दक्षिणेला असला तरी स्वयंपाकघरातुन बाहेर जायचा छोटा दरवाजा पूर्वेला आहे आणि आई तोच दरवाजा जास्त वापरते याचा परिणाम Lol
भित्या पाठी ब्रह्मराक्षस हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते बेधडक करा.

याआधी आम्हीही घर बांधलेले त्यावेळी वास्तुशास्त्र् तितके प्रचलित नव्हते. अगदी साध्या पद्धतीने वास्तुशांती केली. तिथे काही प्रोब्लेम नव्हता आला. त्यानंतर चार खोल्यांची दोन घरे विकत घेतली. आणि भाडेकरु ठेवले. त्याची वास्तुशांती काही कारणाने जमली नाही. काही वर्षांनी एका भाडेकरुने तिथे आत्महत्या केली. भीती आणि अफवा यामुळे तेथे भाडेकरु येणे बंद झाले. (अजुन बरेच आहे पण प्रतिसाद मोठा होतोय) बाजारभावापेक्षा कमी किमतीत ते घर आणि राहते घर विकुन दुसरीकडे राहायला गेलो. अजुनही त्या आठ खोल्या रिकाम्या पडुन आहेत. असे अनुभव पाठीशी असल्याने मी वास्तुशास्त्र अगदी डोळे झाकुन नाही. पण सोयीपुरते मानतो.

गावचं घर हट्टाने दक्षिणमुखी बांधलं. तरी उत्तरोत्तर प्रगतीच होतेय. >> अरे मला वाटलं आता तुम्ही हट्टाने दक्षिणोत्तर प्रगती होते आहे असं लिहिता की काय! Light 1 Lol बाकी साउथवर्ड आणि नॉर्थवर्ड ग्राफ आणि त्याचा अर्थ आपल्या वास्तुशास्त्रातून आलेला आहे हा जावईशोध कोणी लावला नसेल तर माझ्यानावावर लावा.
स्वयंपाकघरातुन बाहेर जायचा छोटा दरवाजा पूर्वेला आहे आणि आई तोच दरवाजा जास्त वापरते याचा परिणाम >> Lol आपल्याकडच्या "शास्त्रांत" सगळी उत्तरं आहेत फक्त शोधता आली पाहिजेत.
भित्या पाठी ब्रह्मराक्षस हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते बेधडक करा. >> +१

Pages