वास्तुशांती विषयी माहिती हवी आहे,

Submitted by manuruchi on 5 May, 2015 - 05:44

वास्त्॑शांतीच्या वेळी काही गुरुजी वास्तुपुरूष जमिनीमध्ये पुरण्यास सांगतात तर काही देवारयात टेवण्यास सागतात नेमके काय करावे, वास्त्॑शांती आणि सत्यनारायणाची पुजा एकत्र करता येते का

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>दक्षिणमुखी जागा घेतली तर चालते का?<<

एनर्जी एफिशियंसीच्या दृष्टिकोनातुन उत्तर किंवा दक्षिणमुखी घर, पुर्व-पश्चिम घरापेक्षा चांगले...

मी आत्तापर्यंत ६ घरे विकत घेतली, एकाही घराची वास्तुशांत केली नाही, गृहप्रवेशासाठी पूजा केली नाही. तुमच्या लॉजिकने हे कर्म चांगलेच असणार कारण आजतागायत फळे गोड मिळाली आहेत.>>>>

वास्तुशांत केली की कर्म चांगले व केली नाही की वाईट हे मी लिहिलेय का?

कर्म फळा बद्दल लिहायच्या आधी 2 वाक्ये लिहिलीत, निसर्गाचा अनादर करणाऱ्या मानवाबद्दल. ती वाचून मग कर्मफळाचे वाक्य वाचा.

बाकी जी काही भरभराट किंवा हानी होते त्याला प्रत्येकाची कर्मे जबाबदार आहेत.

दक्षे खरंच आहे तुझं.. खरं म्हणजे वास्तुशांत करत असताना जे मंत्रपठण होते त्यामुळे एक प्रकारचे मांगल्य निर्माण होत असणार त्यामुळेच मनाला शांती लाभत असणार.. मंदिरातहि शेवटी हेच होत असतं ना.. कोणत्याहि मंदिरात गेलं कि किती शांत वाटत असतं.. काय मानाव किंवा काय मानु नये हे शेवटी प्रत्येकाच्या मनावर अवलंबुन आहे.. मला तर हे वास्तुशांत चं पटत.. आता लवकरच करणार आहे घरात. Happy

निसर्गाचा अनादर करणाऱ्या मानवाबद्दल.
<<
बरं.

तै,

निसर्गाचा "आदर" करणार्‍या मानवेतर प्राणी, पक्षि, मासे, झाडांबद्दल मला जरा सांगणार का?

निसर्गाचा आदर म्हणजे नक्की काय? आहे ते आहे तसे ठेवायचे. यालाच निसर्गाचा आदर म्हणावा का?

सजीवांच्या लक्षणांतले एक महत्वाचे लक्षण म्हणजे, सजीव आपला सभोवताल (एन्व्हिरॉन्मेन्ट) आपल्याला अनुकूल असा बदलायचा प्रयत्न करतात, हे आहे, व सर्वायवल ऑफ स्पिसीज तेव्हाच होते, जेव्हा सजीव स्वतःला सभोवतालाशी, व सभोवतालाला आपल्याशी सोयिस्कर रित्या बदलतात.

उदा.
पक्षी घरटे बांधतो.
झाडांची मुळे खडक फोडतात.
प्राणी.. बरंच काही करतात. उदाहरणे भरपूर आहेत.

तर.

Concept of being thankful for what nature is giving you, is there in all cultures and there are rituals built around it, -in human culture,- since a very looooong time.

But, it is NATURAL to TAKE from the nature. त्याशिवाय सर्वायवल नाही..

या "घेण्यात" अनादर कुठून येतो ते समजले नाही.

शिवाय, हा अनादर झाला, म्हणून रिच्युअली, मी मनातल्या मनात माझ्या सभोवतालास धन्यवाद म्हणणे, याविरुद्ध : २ पुरोहित, ५० नातेवाईक आणून, घरात खड्डा खणून त्यात "वास्तुपुरूष" गाडून, अन घरावर लाल झेंडे लावून वास्तू "शांत" करावी, हा बावळटपणा नाहिये का? उगंच, " आमच्या गुरुजींनी त्यामागचा "शास्त्रार्थ" असा सांगितला बरं का! अहो, किड्या मुंग्यांची घरं आपण हिरावून घेतो ना?" असली हंबग मला तरी पटत नाही. मी मेलो की फारतर २-४ तासात चान्स मिळाला की हे किडे मुंग्या माझ्या पार्थिवात स्वतःची घरं बांधायला लागतात. त्यावेळी वास्तु "शांत" करतात की नाही ते ठाऊक नाही.

तर,

मी निसर्गाचा भाग आहे.

मी निसर्ग आहे.

मला "इथे" रहायचे आहे.

माझ्या घराची जागा बळकावून बसणार्‍या किडे, मुंग्या, घुशी, उंदरांना इथून हाकलून लावणे हा माझा हक्क आहे. खांडववन जाळणार्‍या कृष्णार्जुनाइतकाच.

नो अपमान ऑफ एनीवन.

टोटली सहमत. मी निसर्ग आहे, आणि मी जे करतो तेच सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट आहे. पिरियड.
किडा मुंग्यांना सॉरी म्हणून मग बेगॉनच मारायचं ना?
आणि याची तुलना डायटेक्ट खांडववन दहनाशी? तो अमानुष प्रकार होता, बाहेर येऊ येऊ पहाणारे साप मारले.... पण कर्म फल मिळालेच अर्जुनाला. कृष्णाला नाही का कर्मफल?

इथे रहाणार्‍या भारतीय कम्युनिटीतही (जास्त करुन साऊथ इंडियन्स) दक्षिणमुखी घर नको किंवा घराच्या दारासमोरच रस्ता नको (रोड सुला) वगैरे प्रकार फार बोकाळले आहेत. ह्या मंडळींचे आईवडील भारतात बसून त्यांना ज्ञानदान करत असतात.

घराच्या दारासमोरच रस्ता नको >>> म्हणजे कसे? रस्ता असणारच की घरा समोर. की मेन दार फ्र्नट ऐवजी साइड ला वगैरे असावे लागते?

घराच्या दारासमोरच रस्ता नको म्हणजे घरात आहे पण परसात नाही, खोली आहे पण रुंदी नाही प्रकार झाला.
साईडला दारवाली घरं छान दिसतात पण. कर्ब अपील का काय वाटतं.

सरळ रस्त्यावर नाही, पण कर्व्ह.. म्हणजे दोन साईडला रस्ता आहे तिकडे. आणि टाउन असलं तर अशा घरांना टिपिकली डबल गराज असतं.

म्हणजे आय थिंक टी जन्क्शनच्या समोरचं घर म्हणते आहे सायो.

मी ऐकलंय हे - घरासमोर रस्ता नको, दारासमोर जिना नको, दगडासमोर माती नको इ. इ. Proud

टी-जंक्शन समोर अस्लेल्या घरांची न्युसंस वॅल्यु (रात्री हेडलाइट्स, स्टॉप साइन अस्ल्याने होणारं प्रदुषण वगैरे) जास्त असल्याने त्यांची प्रॉपर्टी वॅल्यु सबडिविजन मधल्या इतर घरांपेक्षा बर्‍याच प्रमाणात कमी असते. लवकर विकली हि जात नाहित...

बेस्ट की मग! इथल्या बिल्डर लोकांना ही टिप द्या. असली वास्तू कॅटेगरी घरं अशा बेकार जागी बांधा. विन विन!

>>इथल्या बिल्डर लोकांना ही टिप द्या.<<

अगदिच शक्य नसेल तरंच बिल्डर थेट टी-जंक्शन्वर घर बांधतो आणि ते घर डिस्काउंटवर विकायला मार्केट मध्ये आणतो. शेवटी त्यालाहि पैसे कमावयचे असतात

मला साइड ला दार असलेली घरं विचित्र वाटतात नेहमी. काहीतरी सिमेट्री डिस्टर्ब झाल्यासारखी. >> सेम टू सेम. मला पण. बर्‍याच वेळेला, थेट रस्त्यातून घरातले दिसू नये, धूळ येऊ नये, दिशा इ. कारणासाठी वगैरे दरवाज्याची दिशा बदलत असावेत.
बाकी नजर लागणे (येणारा जाणार्‍यांची) ह्या प्रकारांवर ही विश्वास ठेवतात अजून लोक

>>> टी-जंक्शन समोर अस्लेल्या घरांची न्युसंस वॅल्यु (रात्री हेडलाइट्स, स्टॉप साइन अस्ल्याने होणारं प्रदुषण वगैरे
बघा, आपल्या पूर्वजांना सगळं आधीच... इ.इ. Proud

ती माफी कशी मागावी हे आपण ठरवायचे. श्रद्धा असेल व खिश्यात पैसे असतील तर थाटात वास्तूशांत करावी. अन्यथा वास्तू शांत न करता साधी पूजा करून व मनापासून माफी मागून तुम्ही वास्तूत राहू शकता.>>>> साधनाताई १११% सहमत.

इकडे तर साऊथ इंडिअन लोकांनी इतकी घर घेतली आहेत कि मध्ये मी जेव्हा घर पाहायला गेलो तेव्हा अमेरिकन सेल्समेन ने डायरेक्ट सुरुवात केली कि तुम्ही साऊथ इंडिया मधून आले आहेत ना म्हणजे तुम्हाला साऊथ facing घर नकोच असेल (मी साऊथ इंडियन नाही हे समजावण्यात १० मिनिटे गेलीत) ... जर तुम्हाला ईस्ट facing घर हवे असेल तर मग १५००० डॉलर प्रीमियम चार्जे भरावा लागेल ... आता बोला

<<<माझ्या घराची जागा बळकावून बसणार्‍या किडे, मुंग्या, घुशी, उंदरांना इथून हाकलून लावणे हा माझा हक्क आहे. खांडववन जाळणार्‍या कृष्णार्जुनाइतकाच.>>>
अहो, कृष्णार्जुनांनी खांडव वन जाळले होते. तुम्ही काय घर जाळणार काय?

बरे,
माझा रिसेल चा फ्लॅट आहे,
आधीच्या मालकाने मागितलेली माफी पुरेल? की मला परत मागावी लागेल?

@सिम्बा, ना तुम्ही ना पहिल्या मालकाने बिल्डिंग बांधताना झाडेतोड, किडेहत्या केली. ती केली बिल्डरने. तुमची वा पहिल्या मालकाची माफी चालेल का हे 'तज्ज्ञांना' विचारून या.

परवाच घरी पेस्ट कंट्रोल करुन निसर्गाचा अनादर केला (वट्ट ७०० रुपये). मग आता मला कितीची माफी मागायला लागेल? पेस्ट, आय मीन ते जेल सारखं काय अस्तं ते, ऑर्ग्यानिक होतं म्हणे; मग काही डिस्कौंट मिळेल का? माफी मी मागायची की ज्याने पेस्ट कंट्रोल केलं त्याला पुजेला बसवावं लागेल?

ल्डर लोकांना ही टिप द्या. असली वास्तू कॅटेगरी घरं अशा बेकार जागी बांधा. विन विन! >> इथे टोल ब्रदर्स नावाचे महागडे मॅक मॅन्शन बनवणारी कंपनी आहे. त्यांच्या नव्या प्रो़जेक्ट्सवर वास्तू कंसल्टंट असतात. घराचे मेन दार पासून सर्व गोष्टींचि दिशा, अगंणात योग्य जागी वॉटर फीचर वगैरे ऑप्शन्स ( $$$$ ) सिलेक्ट करता येतात . भारतीय कस्टमर दिसले की लगेच वास्तू कंसल्टंट मागे लागतो...

पल्याडला शीत कटिबंधीय भागात तरी दक्षिणमुखी घरे जास्त सॉट आफ्टर असायला हवीत. या घरांत हीटींगचे बिल कमी येईल. असे वाटते. आपल्या देशात पश्चिम/दक्षिणेकडील खोलीत भर उन्हाळ्यात जाम गरम होते.
***

अहो, कृष्णार्जुनांनी खांडव वन जाळले होते. तुम्ही काय घर जाळणार काय?
<<
तुम्ही एकदा ते महाभारत का काय ते नीट वाचा बरं. ते खांडववन जाळून त्याजागी इंद्रप्रस्थ नावाची राजधानी बांधली होती म्हणे जख्खी अख्खी.

विंटरात कितीही सूर्यप्रकाश घरात आला तरी ढिम्म फरक पडत नाही कारण प्रुथ्वीचा कललेला आस. आणि समरला प्रचंड गरम होतं. सो जगात कुठेही रहा, घरात कमित कमी सूर्यप्रकाश येईल अशाच बेताने घर घ्या.

Pages