वास्तुशांती विषयी माहिती हवी आहे,

Submitted by manuruchi on 5 May, 2015 - 05:44

वास्त्॑शांतीच्या वेळी काही गुरुजी वास्तुपुरूष जमिनीमध्ये पुरण्यास सांगतात तर काही देवारयात टेवण्यास सागतात नेमके काय करावे, वास्त्॑शांती आणि सत्यनारायणाची पुजा एकत्र करता येते का

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< उगा त्य अंधश्रद्धेला निसर्ग/पर्यावरण रक्षणाची फोडणी देऊन भाकड कर्मकांडाला "शास्त्र" ठरवणे चालू झाले होते. त्या वरून विषय तिकडे गेला. >>
--------- सहमत.... वास्तुशान्ती किव्वा सत्यनारायणात शून्य शास्त्र आहे, आहे त्या केवळ थापा. सर्व मित्र परिवार एकत्र येतो, खाण्या पिण्याची चन्गळ यापेक्षा त्याला जास्त महत्व नाही.

जसे सोईचे वाटते तसे करा. मानव हा पण निसर्गाचाच भाग आहे हे विसरायला नको. निसर्गात बदल होतच असतात, त्यान्च्याशी जुळवुन घेतले तर काही काळ टिकाव आहे अन्यथा इतिहासात कायम स्वरुपी जमा व्हावे लागेल, या आधी ९९ % प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. नष्टतेची प्रक्रिया भविष्यात पुर्ण होणार आहेच, पण आपल्या मुर्खपणामुळे ते लवकरही करणे शक्य आहे.

वास्तुशांत पटत असेल तर करा किंवा करु नका. त्यात निसर्ग नी मानव आणि यांव न त्यांव आणून विषय भरकटवायला हवाच का?>>>>1000 प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद नाही दिला तरी चालतो. किंवा आपले वाद, प्रतिवाद वि पु नाहीतर दूसरी कडे करावे उगा इथे त्या संबंधित धागा विषयावार माहिती वाचायला यावे तर नको ते प्रतिसाद टाळून माहिती वाचवी लागते.

भाग्य की बात होती है किसीं धागेका कुऋक्षेत्र बनना
काश मुझे ये भाग्य मिलता...काश मै मेरे किसीं धागे का कुऋक्षेत्र बना सकती...
(हे सगळं गोलमाल मधल्या दिना पाठक ला समजवणार्या देवेन वर्मा च्या आवाजात वाचा ☺️☺️☺️)

आमच्या येथे कोणत्याही धाग्यांचे कु.ऋ क्षेत्र बनऊम मिळेल.
चौकशी साठी भेटा वा लिहा,
1 ते 4 बंद

उरलेले प्रतिसाद वाचले. नानबा, तुमच्याशी पूर्ण सहमत.

बाकी काही ठराविक आयडी प्रत्येक धाग्यावर जाऊन धागाविषय सोडून स्वतःचे मुद्दे रेटू पाहतात, त्यांच्या मुद्द्याविरोधात मांडलेल्या मुद्द्यांना त्यांच्याकडे उत्तर नसले की त्यांचा वेगळाच थयथयाट सुरू होतो, मुद्द्यांवरून गुद्द्यांवर पोचल्यासारखे वागणे सुरू होते. हे इतर अनेक धाग्यांवर पाहिलंय, इथेही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.....

बिल्डिंग मधे रहात असताना वास्तु न पुरन्या मागचे कारण असे की तो जमिनीत पुरला जात नाही. तो लटकता राहतो एक प्रकारे.>>> मग building flat मध्ये वास्तुशांती न करता फक्त गणेश पुजन कलश पुजन आणि गृहप्रवेश करावा का. Please reply. जाणकारांनी सुचवा.

वास्तुशांती विषयी माहिती हवी आहे>> हे सर्व थोतांड आहे. गेल्या आठवड्यातलीच गोष्ट - पुण्यात माझ्या मित्राचा फ्लॅट असलेली नवीकोरी अनधिकृत बिल्डींग तिचे पिलर्स तडा गेल्यामुळे महापालिकेकडुन पाडण्यात आली. माझ्या मित्राच्या फ्लॅटच्या वास्तुशांत समारंभाला गेल्यावर्षी मी सहकुटुंब गेलो होतो. त्याच दिवशी त्या बिल्डिंग मधे अजुन ३ वास्तुशांती होत्या हे तिथेच कळाले होते (मुहुर्त होता म्हणे मोठा..!) आणि काय आश्चर्य सगळे फ्लॅट्स एकाच कु-मुहुर्तावर कोसळले. कशाची वास्तुशांत आणि कशाचं काय.. असं सोनं पुरुन-देव्हार्‍यात ठेऊन वास्तु खरेच शांत होत असती तर मग काय..!

मग building flat मध्ये वास्तुशांती न करता फक्त गणेश पुजन कलश पुजन आणि गृहप्रवेश करावा का. >>>> माझ्या घराबाबत भटजींनी हेच सुचवले होते.मीही गणेश पूजन केले होते.अर्थात त्यादिवशी अक्षय तृतीया असल्याने भटजींना वास्तुशांतीऐवजी,लग्न-मुंजीचे काँन्ट्रॅक्ट मिळाले असेलही.

मी पण गणेश पुजन कलश पुजन आणि गृहप्रवेश करणारे. आमचे गुरुजी म्हणाले की एकदा वास्तुशांती केली कि घरात खिळा पण ठोकू नये. म्हणून आम्ही गृहप्रवेश करून काही furniture वगैरे करून काही महिन्यांनी वास्तुशांती करणारे.

कोणी तरी या धाग्यावर विचारले होते कि वास्तुशांती दर पाच वर्षांनी करावी असे त्यांच्या गुरुजींनी सांगितलं होते. आमचे गुरुजी म्हणले एकदा वास्तुशांती करा. आणि घरात दर वर्षाला होम हवन यज्ञ करा. ते कोणताही हवन असो. समिधांच्या आहुतीने आणि मंत्रो उच्चारणाने घरात मंगल वातावरण राहते. मग तुम्ही तुमच्या बाळाच्या नवऱ्याच्या किंवा घरातील इतर व्यक्तीच्या नावाने हवन करू शकता. जसे 1st bday cake कापून करण्या ऐवजी तुम्ही आयुष्यहोमम करू शकता. असे नाहो कि वास्तुशांती च करायला पाहिजे. असो. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि असेही त्यांनी force नाही केला. आम्हाला बोलले कि तुम्ही पाडव्याला तुमचा तुम्ही घरात गणेश पुजन करुं राहायला जाऊ शकता. गुरुजींना नाही बोलावले तरी चालेल. आणि आपण हिंदूंनी यज्ञ हवन नाही करायचे तर कोणी करायचे. आणि finally its upto you to do or not the traditional things.

आमचे गुरुजी म्हणले वास्तुशांती केली नाही तरी चालेल पण एकदातरी बिल्डरच्या नावाने शंख करा. आम्ही मग तेच केले, बरे वाटले जीवाला.

बरं तुमचे घरच्यांचा पण असच म्हणणं आहे का. आपण कितीही पुढारलेले असलो तरी आई सासू किंवा तत्सम मोठी वडीलधारे यांना पटतंय का ते?

<<< वडीलधारे यांना पटतंय का ते? >>>
तुम्ही पण स्वतः: असला भंपकपणा केला तर मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला मग? उद्या तुमची मुलं पण तेच म्हणणार मग की वडीलधारे यांना पटतंय का ते?

शितल ताई तुमचे विचार किती उच्च व आदरणीय आहेत. धन्यवाद. मला एक विचार करायची नवी दृ ष्टी मिळाली आहे. अप्रतिम प्रतिसाद्, धन्यवाद

अमाताई धन्यवाद!!! माझे विचार उच्च आणि आदरणीय वाटल्या बद्दल. असो. ते माझे विचार नाहीयेत. गुरुजींनी ने जे सांगितलं ते लिहिला आहे. आणि असे ही फक्त प्रतिसाद लिहताना, लेख आंतरजालावर टाकतानाच बरेच लोक स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असतात. नाहीतर real life मध्ये सगळा करून करून दमले असतात. ते करतानाचा अगतिकपणा, मनस्ताप दिसून येतोच प्रतिसादात. आपण घरी real life मध्ये असेच वागतो का? कि इथे फक्त आपण पुढारलेले आहोत हेच दाखवायचा म्हणून काहीही टाईपचा?

Maza asa prashna aahe ki...vastu purusha sthapana agneya konyat karavi he barobar ahet pan kahi guruji ase mhantat ki sthapana agneya konyat karavi pan vastu purusha pratimeche tond ishanya dishela karaycha anhi kahi guruji ase mhanatat ki agneya konyat sthapna karavi aani vastu purusha pratimeche tond agneya diahela karava...kuthla barobar aahe

Pages