Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं, मग?
बरं, मग?
चला इथेही वाङयुध्द चालु झाले
चला इथेही वाङयुध्द चालु झाले तर. डॉक मी म्हणलच कशाला बीबी उघडलात म्हणुन. उठाले रे बाबा!!
बालिशपणा मुद्दामहून करता येतो का? >>
+100000000 मोदक.
पण दारूला नावं ठेवले तर त्यात
पण दारूला नावं ठेवले तर त्यात गैर काय? ते या धाग्यावर या विषयावर अवांतर आहे का? नक्कीच नाही! >> दारू काय स्वतःहून सलमानच्या ग्लासात जाउन बसली आणी म्हणाली का की आता मला पी आणी गाडी चालव म्हणून?
आता नवीन धागा निघेल कदाचितः
आता नवीन धागा निघेल कदाचितः माबो आयडींच्या मनात सलमानबद्दल इतका विखार का?
धागाकर्ते कोण असेल ते वेगळं सांगायला नकोच.
बी आणि ऋन्मेषला थोडा वेळ
बी आणि ऋन्मेषला थोडा वेळ ब्रेक देता येईल का इथुन?
चांगले महत्वाचे मुद्दे बाजुला रहातायेत
>>>>>
चांगले आणि महत्वाचे मुद्दे?
ते काय असू शकतील इथे?
दारू हा महत्वाचा मुद्दा नाही का?
कुठेतरी एक ग्राफीटी वाचलेली,
दारू पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे तर बारच्या बाहेर पार्कींग का?
( प्रत्येकाला ड्रायव्हर नाही परवडत, हे गृहीत धरून)
बाळ रुन्म्या, सिगारेट न
बाळ रुन्म्या,
सिगारेट न ओढणारे इतर कारणामुळे मरतात.
सिगारेट ओढणारे सिगरेट ओढल्यामुळे मरतात.
ज्याला "सिगारेट न ओढणारेही कधी ना कधी मरतात आणि सिगारेट ओढणारेही मरतात, मग ओढा बिनधास्त " असे वाटत असेल त्याने सिगरेट सारख वेळखाउ आणि खर्चीक उपाय का करावा? रेल्वे आहे, बस आहे, नद्या आहेत. कीटकनाशक आहे. झालच तर गफ्रेची ओढनी आणि (स्वतःच्या) घरातील फॅन आहे ...
प्रश्न "मरायचच असेल तर काय..." असा नसून,
"हेल्दी जगायच असेल तर काय ..." असा आहे.
तीन तीन खुन करुन
तीन तीन खुन करुन साक्शीदारांना धमकावून मोकाट सुटलेले माजलेले गुंड आहेत या देशात,न्यायव्यवस्थेला ठेंगा दाखवत निवांत फिरतात.त्यामानाने सल्मानने एकाही साक्षीदाराला धमकावल्याचा वगैरे प्रकार केला नाही.आजपर्यंत त्याने चॅरीटीवर 42 कोटी रुपये खर्च केले आहेत ,600 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च उचलला आहे, ईतक्या सह्र्दयी माणसांना शीक्षा देन्यात आपल्या न्यायव्यवस्था मात्र आघाडीवर् असतात.
कुठेतरी एक ग्राफीटी
कुठेतरी एक ग्राफीटी वाचलेली,
दारू पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे तर बारच्या बाहेर पार्कींग का?
( प्रत्येकाला ड्रायव्हर नाही परवडत, हे गृहीत धरून)
>>
वा वा
कित्ती चान चान मुद्दा आहे.
दारू काय स्वतःहून सलमानच्या
दारू काय स्वतःहून सलमानच्या ग्लासात जाउन बसली आणी म्हणाली का की आता मला पी आणी गाडी चालव म्हणून?
>>>>
एक्झॅक्टली, दारू ही निर्जीव वस्तू आहे, ती असे स्वताहोन करणार नाही. मग गुन्हेगार कोण? माझ्यामते दोन. एक पिणारा आणि एक पुरवणारा!
प्रश्न "मरायचच असेल तर
प्रश्न "मरायचच असेल तर काय..." असा नसून,
"हेल्दी जगायच असेल तर काय ..." असा आहे.
>>
BINGO! EXACTLY!!
सलमानला त्याच्या गुन्ह्याच्या
सलमानला त्याच्या गुन्ह्याच्या मानाने खुपच कमी शिक्शा झाली आहे.
आता लव्करात लवकर ह्या शिक्शेची अम्मल्बजावणि व्हावी अशी इश्वराकडे प्रार्थना करुया.
इतके अशक्य आहेत इथले लोक्स
इतके अशक्य आहेत इथले लोक्स आपण एक वाक्य लिहावे अणि त्याचे अनेक उलट सुलट अर्थ काढून आपल्याला इतके चिकटतात की कुठुन बुद्धी सुचली आणि ह्या धाग्यावर लिहिले असे वाटते आहे मला.
मी काय म्हणत आहे आणि ही लोक त्याचा अर्थ काय काढत आहे आणि वर स्वतःची पाठ थोपटणे आणि कंपूचा पाठपुरावा तर बघवत नाही. त्यापेक्षा दारु पिऊन निजलेला मनुष्य बरा.
एक्झॅक्टली, दारू ही निर्जीव
एक्झॅक्टली, दारू ही निर्जीव वस्तू आहे, ती असे स्वताहोन करणार नाही. मग गुन्हेगार कोण? माझ्यामते दोन. एक पिणारा आणि एक पुरवणारा!
>>
चाकू ही निर्जीव वस्तू आह? का नाही? वाईट कोण? भोसकणारा ना? कळतंय का काही?
-डबलपोस्ट-
-डबलपोस्ट-
>> स्पॉक, मग माझाही मुद्दा
>>
स्पॉक, मग माझाही मुद्दा असाच आहे की दारू न पिणारेही अपघात करतात ते इतर कारणांमुळे
देवा! कपाळाला हात लावलेली
त्यापेक्षा दारु पिऊन निजलेला
त्यापेक्षा दारु पिऊन निजलेला मनुष्य बरा.>>
दारू पिऊन निजला तर ठीकाय हो, गाडी नको चालवायला. होक्किनै?
फुटपाथवरच्या माणसांचा
फुटपाथवरच्या माणसांचा जगण्याचा हक्क वगैरे फारसे कुणाला दिसत नाहीयेत वाटतं.
चाकू ही निर्जीव वस्तू आह? का
चाकू ही निर्जीव वस्तू आह? का नाही? वाईट कोण? भोसकणारा ना? कळतंय का काही?
>>>
बरोबरच तर बोलत आहात.. मी देखील तेच म्हणतोय,
भोसकणारा आणि शस्त्रास्त्रे पुरवणारा!
चाकू ही निर्जीव वस्तू आह? का
चाकू ही निर्जीव वस्तू आह? का नाही? वाईट कोण? भोसकणारा ना? कळतंय का काही?>>
दारु हे एक व्यसन आहे. सुरी वा चाकू हे काही व्यसन नाही. त्यामुळे सुरी भोकसणे नक्कीच गुन्हा आहे. सुरी भोकसताना मनुष्य शुद्धीवर अस्तो. तसा तो दारु प्यायल्यावर नसतो.
मायबोलीकरांच्या नशिबात
मायबोलीकरांच्या नशिबात कपालबडवती योग आहे हे निश्चित.
दारू काय स्वतःहून सलमानच्या
दारू काय स्वतःहून सलमानच्या ग्लासात जाउन बसली आणी म्हणाली का की आता मला पी आणी गाडी चालव म्हणून?

>>>
भारी होतं हे!
ऋन्मेष, तू नेमका अतिशहाणा आहेस की मुर्ख तेकळेना झाल्याने माझा पास!
बी,
मी काय म्हणत आहे आणि ही लोक त्याचा अर्थ काय काढत आहे आणि वर स्वतःची पाठ थोपटणे आणि कंपूचा पाठपुरावा तर बघवत नाही.
>>>
यासाठीच म्हणत होते जरा ब्रेक घ्या!
यू (आणि वी अॅज वेल) नीड इट!
ती इंडियन एक्स्प्रेसची लिन्क
ती इंडियन एक्स्प्रेसची लिन्क वाचली, त्यावर सगळ्या बॉलिवुड्यांनी सलमान कित्ती छान आहे असं लिहिलं आहे. फार थोड्या लोकांनी न्यायव्यवस्थेचा आदर करतो असं लिहिलं आहे आणि सलमानला बळ मिळो असं लिहिलंय. बाकी ज्यांनी फक्त तो छान आहे छान आहे असं लिहिलंय त्यांना मुद्दा कळत नाही का? उगिच फक्त आता काहितरी लिहिलंच पाहिजे म्हणून मुद्दा सोडून काहीही लिहायचं?

दिया मिर्झा नं तर लिहिलंय की सलमान ने माझ्या आईला वाचवलं. आता त्याच्या शिक्षेचा आणि तिच्या आईला वाचवण्याचा अर्थाअर्थी काहीतरी संबंध आहे का? कोणता माणूस (माणूस म्हणून) वाईट असतो? त्याला जवळून ओळखणारे तो चांगला आहे असं च म्हणतात की. पण म्हणून त्याच्या हातून एखादी चूक किंवा गुन्हा घडू शकत नाही, किंवा झाला तर निव्वळ तो चांगला माणूस आहे म्हणून त्याला शिक्षा होऊ नये हा कसला युक्तिवाद?
सलमान मला ही आवडतो. बिईंग ह्युमन तर्फे तो जे कार्य करतो त्याचा ही आदर आहेच, पण नकळत का होईना त्याने जो गुन्हा केला त्याबद्दल त्याला शिक्षा झाली हे योग्यच झालं.
रिया तुझ्या मजकुरांवरुन तुझे
रिया तुझ्या मजकुरांवरुन तुझे फार फार मनोरंजन होत आहे असे वाटत आहे. तुला तर आपोआप ब्रेक मिळालेला दिसतो.
फुटपाथवरच्या माणसांचा
फुटपाथवरच्या माणसांचा जगण्याचा हक्क वगैरे फारसे कुणाला दिसत नाहीयेत वाटतं.
>>
प्रॅक्टीकल विचार केला तर फूटपाथ हे झोपण्यासाठी नसते, पण या देशात गरीबांच्या नशीबात असेच जगणे आणि मग असेच मरणे आहे. दुर्दैवी आहे, पण हा मुद्दाही या धाग्यावर लक्षात घ्यायला हवा.
लोकलला गर्दी असते, दाराला लटकतात, कोणीतरी पडते आणि मरते, यात गुन्हेगार कोण?
तो लटकलेला इसम स्वत:?
तो जो कोणी त्याच्यावर नाईलाजाने किंवा स्वत:ला मोकळी जागा मिळायला प्रेशर टाकले असेल?
की रेल्वे प्रशासन आणि सरकार?
सलमान मला ही आवडतो. बिईंग
सलमान मला ही आवडतो. बिईंग ह्युमन तर्फे तो जे कार्य करतो त्याचा ही आदर आहेच, पण नकळत का होईना त्याने जो गुन्हा केला त्याबद्दल त्याला शिक्षा झाली हे योग्यच झालं.>>
मलाही अगदी हेच म्हणायचे आहे दक्षिणा.
सलमान ला शिक्षा झाली हे जरा
सलमान ला शिक्षा झाली हे जरा उशिरानेच पण अतिशय चांगलं झालेलं आहे.
बाकि सलमान वाईट नाहि ह्या वाक्यांना फारसा काहिहि अर्थ नाहि. त्यानि सदोष मनुष्यवध केलेला आहे. बाकि तो किति चांगला मनुष्य आहे आणि किति समाजाला मदत करतो, ह्याचा आणि गुन्ह्याचा काहि एक संबंध नाहि. हा अतिशय दुबळा युक्तिवाद आहे. तो स्वताच्या मर्जिनि दारु प्यायला होता. त्याला त्याच्या गाडितिल लोकांनि सांगितले होते कि स्पीड जास्ति आहे वगैरे. तो बधला नाहि.
बरेच लोक दारु पिउन चालवतात आणि अपघात करतात ह्यावर तोडगा सलमान ला सोडुन देणे हा नसुन त्याहि गुन्हेगारांना शिक्षा करणे हा आहे !!!
काहि वर्षापुर्वि ह्याचे आणि बर्याच डी़. कं वाल्यांचे जव़ळचे संबंध असल्याचेहि वाचले होते (ह्या बद्दल मला नीटसं आठवत नाहिये आत्ता ). तसच त्यानि अनेक वादंगहि केलेले आहेतच, म्हणुन "तो चांगला इसम आहे" वगैरे फार काहि अर्थपूर्ण नाहिये. त्याचा फॅन असणं वेगळ्या जागि आणि केलेल्या गुन्हा माफ वगैरे म्हणण वेगळ्या जागि असं मला तरि वाटत. आणी चांगला इसम असल्यास गुन्हे माफ हा नविन पायंडा पडु शकतो!!
रून्मेश ह्यांचे युक्तिवाद वाचुन फक्त "बाळ तु लहान आहेस, बाहेर जाउन खेळ जरा" एवढेच सांगावेसे वाटते.
बाकि आता बोलिवूड वाल्यांना अचानक प्रेम येइलच सल्लु मियांच
तसच बरेच दुकान बंद झालेले कलाकार लोक काहितरि सनसनाटि बोलुन बातम्यात यायचा प्रयत्न हि करतिलच.
आता विषयांतर - रेल्वे अपघात
आता विषयांतर - रेल्वे अपघात का? वा.
बरेच दुकान बंद झालेले कलाकार
बरेच दुकान बंद झालेले कलाकार लोक काहितरि सनसनाटि बोलुन बातम्यात यायचा प्रयत्न हि करतिलच.>>>> राज बब्बर/ गब्बर होताच की टिव्हीवर.
ऋन्मेष, तू नेमका अतिशहाणा
ऋन्मेष, तू नेमका अतिशहाणा आहेस की मुर्ख तेकळेना झाल्याने माझा पास!
>>>>>>
Pages