Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जे झाले तो गुन्हाच आहे.
जे झाले तो गुन्हाच आहे. त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे.
>>>>
+ १ बी..
मला सलमानबद्दल ना राग ना लोभ ना प्रेम..
जगात असे कित्येक अपघात होतात आणि कित्येक मरतात, कित्येकांना शिक्षा होते कित्येक सुटतात..
पण आपण इथे चवीने चर्चा करत आहोत कारण सलमान हा एक सेलिब्रेटी आहे! तो देखील पॉप्युलर सेलिब्रेटी..
पण कोणाला इथे अश्या गुन्ह्यांच्या मूळ कारणात शिरण्यात ईंटरेस्टच नाहीये हे दुर्दैवी आहे
ऋन्मेऽऽष बाबा , बर्याचदा तुझ
ऋन्मेऽऽष बाबा ,
बर्याचदा तुझ बोलण वैताग आणणार असत पण जाऊ दे म्हणून इग्नोर करतो .
पण थोडातरी सारासार विचार कधीतरी करून लिहि .
दारू पिणारे (किती आणि
दारू पिणारे (किती आणि कितीवेळा हे बाजूलाच ठेवा) आणि दारू प्यायल्यामुळे गुन्हे केलेले, दारूमुळे संसाराची वाट लागलेले यांच्या प्रमाणाचा काही अभ्यास आहे का?
उग्गाच गरीब बिच्चारा तो सलमान करत नको तिथे तीर....
पण आपण इथे चवीने चर्चा करत
पण आपण इथे चवीने चर्चा करत आहोत कारण सलमान हा एक सेलिब्रेटी आहे! तो देखील पॉप्युलर सेलिब्रेटी..
>>> सेलिब्रिटी नसता ना तर केव्हाच शिक्षा झाली असती... एव्हाना शिक्षा संपलीही असती... त्या सेलेब्रिटीत्वामुळे त्याने एवढी वर्षे शिक्षा टाळली आहे, जी केव्हाच व्हायला हवी होती ... म्हणून एवढी चर्चा सुरू आहे.
जन्मठेप म्हणजे मरण येई पर्यंत
जन्मठेप म्हणजे मरण येई पर्यंत तुरुंगात राहावे लागेल. १४ वर्षाची शिक्षा म्हणजे ७ वर्षाची शिक्षा असते यात देखील पेरॉलवर काही दिवस सुट्टी देण्यात येते. साधा तुरुंगवास आणि सक्तमजुरी असे दोन प्रकार असतात. सक्तमजुरी मधे कैद्याला १२ तास अंगमेहनतीचे काम करावे लागते. सलमानला सक्तमजुरीची शिक्षा बहुदा मिळाली नाही आहे
पूनम ज्या माणसाला आपण ज्याचा
पूनम ज्या माणसाला आपण ज्याचा फॅक्ल काढलाय त्याचं नावही माहित नाही अशा माणसाला तु निकालपत्र वाच म्हणून सांगतेयस?
>>>>>
मी कैवल्य फॅन क्लब काढलाय.
जर कोणी स्पायडरमॅन फॅन क्लब काढला तर त्याची भुमिका करणार्याचे नाव माहीत असणे गरजेचे नसते..
असो, हा विषय त्या धाग्यावर येऊद्या..
तुर्तास ऑफिसकाम कल्टी
ऋन्मेष, गुन्ह्याचे मूळ कारण
ऋन्मेष,
गुन्ह्याचे मूळ कारण आहे माज.
मी सेलेब्रिटी आहे. पैसे वाला आहे. मी काहीही केलं तरी पैशाच्या बळावर कोणतीही यंत्रणा वाकवू शकतो हा माज.... असे गुन्हे घडण्यास कारणीभूत आहे.
सलमान दोषी होताच. चूक त्याची
सलमान दोषी होताच. चूक त्याची नाही दारूची होती हे विधानही कोणी करू शकतं यावर माझा विश्वास बसला नसता. पण मायबोलीवर तर वाचायलाच मिळालं. धन्य हो! <<
अक्षरश:
पण थोडातरी सारासार विचार कधीतरी करून लिहि .<<< काहीही अपेक्षा...
सेलिब्रिटी नसता ना तर केव्हाच शिक्षा झाली असती... एव्हाना शिक्षा संपलीही असती... त्या सेलेब्रिटीत्वामुळे त्याने एवढी वर्षे शिक्षा टाळली आहे, जी केव्हाच व्हायला हवी होती ... म्हणून एवढी चर्चा सुरू आहे. <<<<<<
+१०००००००००००
वाईट खरी दारू आहे.. तसे असेल
वाईट खरी दारू आहे..
तसे असेल तर ........................
उद्या एखाद्याने रागाच्या भरात खून केला तर "राग खरा वाईट आहे" म्हणून त्याला शिक्षा नको असेच म्हणावे लागेल
रिया तु म्हणतेस ते सगळे
रिया तु म्हणतेस ते सगळे मुद्दे बरोबर आहेत. ते लागू ही पडतात या केसमध्ये आणि न्याययंत्रणा ते मुद्दे/कलमं घालेलच बहुतेक. मूळ गुन्हा दारूच्या नशेत मनुष्यवधाचा प्रयत्न असाच आहे.
हे अर्धीच वर्षे शिक्षा हे मी
हे अर्धीच वर्षे शिक्षा हे मी इथेच पहिल्यांदा वाचले. याबद्दल खात्रीशीर कुठे कळेल?
हे अर्धीच वर्षे शिक्षा हे मी
हे अर्धीच वर्षे शिक्षा हे मी इथेच पहिल्यांदा वाचले. याबद्दल खात्रीशीर कुठे कळेल?
सलमान कडे
सलमान खान नशेत होता म्हणून
सलमान खान नशेत होता म्हणून असे घडले हे तरी तुम्ही लोक्स मान्य करता ना? जर तो नशेत नसता तर कदाचित असे झाले नसते. म्हणून मी दोष नशेत असण्याला दिलेला आहे. मात्र ह्याचा अर्थ असा होत नाही की सलमान खान अॅज अ परसन दोषी नाही. तो नक्कीच आहे. पण ही चुक तो नशेत असल्यामुळे घडली असे विधान मला करायचे आहे.
मिस्टर किरण कुमार (तुमचे नाव अगदी फिल्मी वाटते मला :)) , राग हा षडरिपुंमधे अगदी पहिला रिपु आहे. तो तर खरा गुन्हेगार आहे.
सलमान वाईट नाही. दारू वाईट.
सलमान वाईट नाही. दारू वाईट.
महादेव७१ | 6 May, 2015 -
महादेव७१ | 6 May, 2015 - 04:45 नवीन
१२ तासाचा दिवस तुरुंगात असतो. संपूर्ण दिवसाचे २४ तास
असल्यामुळे ५ वर्षाची शिक्षा प्रत्यक्षात २.५ वर्षाची असत>>>>>>>>>>
हे कोणत्या दिडशहाण्याने सांगीतले तुम्हाला?पाच वर्श म्हणजे संपुर्ण पाच वर्श जेलमध्ये जावे लागते.
नाही. हवे तर तुम्ही वकिल
नाही. हवे तर तुम्ही वकिल यांना विचारुन बघावे
हे कोणत्या दिडशहाण्याने
हे कोणत्या दिडशहाण्याने सांगीतले तुम्हाला?पाच वर्श म्हणजे संपुर्ण पाच वर्श जेलमध्ये जावे लागते.>>
ही अशी विधाने फक्त माबोवरच वाचायला मिळतील आणि ह्यावर विश्वास ठेवणारे बघून कोण नवल वाटले मला
सलमान वाईट नाही. दारू वाईट. >> सहमत +१०००
आता सल्लु हायकोर्टात जामीन
आता सल्लु हायकोर्टात जामीन घेणार आनी निवांत् बाहेर राहनार ,मी तर असे ऐकले आहे की जज लोकांनापन विकत घेता येते म्हनुन
सलमान वाईट नाही. दारू वाईट.
सलमान वाईट नाही. दारू वाईट. >> सहमत +१००० >>
डोंबल सहमत. ते वाक्य हास्यास्पद आहे म्हणून हसलो होतो मी. म्हणे सहमत.
दक्षुतै, थँक्स! मग तर ५ वर्षे
दक्षुतै, थँक्स!
मग तर ५ वर्षे ही फारच कमी शिक्षा आहे
रीया , अग आपली न्याय व्यवस्था
रीया ,
अग आपली न्याय व्यवस्था पाहता ही शिक्षा झाली हेच खूप आहे .
थांबा भांडू नका, माझ्या
थांबा भांडू नका, माझ्या बाजूलाच लिगल टिम बसते त्यांना विचारून नक्की काय ते सांगते. आत्ता ते लोक लंच ला गेलेत. मग कळेलच शिक्षेचं स्वरूप नक्की काय आणि कसं असतं ते.
डोंबल सहमत. ते वाक्य
डोंबल सहमत. ते वाक्य हास्यास्पद आहे म्हणून हसलो होतो मी. म्हणे सहमत.>>
तुमचा खळखळाट आला ऐकायला पण तरीही दारू वाईट नाहीच असे वाटते तुम्हाला ????
मी हसाव की रडाव मला कळेना.
ह्यावर एक जोकः
पापा और 12 साल का बेटा एक होटल में गए।
पापा- वेटर एक बियर और एक आईसक्रीम लाओ।
बेटा - आईसक्रीम क्यों पापा, आप भी बियर लीजिये ना।
नीधपच्या सगळ्या पोस्ट्सना +
नीधपच्या सगळ्या पोस्ट्सना + १११११११११११११११११
बी आणि ऋन्मेष>>> तुमची मते ऐकून हताश झाले
रागही आला 
बी आणि ऋन्मेषला थोडा वेळ
बी आणि ऋन्मेषला थोडा वेळ ब्रेक देता येईल का इथुन?
चांगले महत्वाचे मुद्दे बाजुला रहातायेत
सलमान वाईट नाही. दारू
सलमान वाईट नाही. दारू वाईट.
>>
वावावा अति उत्तम! उद्या कोणी म्हणेल ती माणसं तिथे का झोपली होती? त्यांचीच चुकी. सलमान वाईट नाही, दारू आणि रस्त्यावर झोपलेली माणसं वाईट
निधप का एवढ्या चिडल्यात
निधप का एवढ्या चिडल्यात सलमानवर?श्वासच्या ऑस्कर प्रमोशनला चॅरीटी दीली नाही म्हनुण काय.....
बी, दारू वाईट नाही असं कुठे
बी, दारू वाईट नाही असं कुठे म्हणालो? वाट्टेल ते बोलू नका. पिण्याच्या आधी माणूस शुद्धीवरच असतो ना?
@बी, दारु न पिता गाडी
@बी,
दारु न पिता गाडी चालवणा-या ड्रायवर्स कडून आजपर्यंत "एकही" अपघात झालेला "नाही",
हे सिद्ध करणारे, काही सर्वे / संशोधन पेपर्स आहेत का तुमच्याकडे?
चांगले महत्वाचे मुद्दे बाजुला
चांगले महत्वाचे मुद्दे बाजुला रहातायेत >>
रीया, मुद्दे कसले गं. दारू ढोसून गाडी चालवली आणि रस्त्यावरच्या एकाला चिरडून मारला. त्याला शिक्षा झाली. खलास.
Pages