Net Neutrality - भारतामध्ये आंतरजालाची तटस्थता

Submitted by धनि on 13 April, 2015 - 15:45

नेट न्युट्रॅलिटी म्हणजे सोप्या भाषेत मला कळले ते म्हणजे सध्या कुठली ही वेबसाईट किंवा अ‍ॅप सारख्याच स्पीड नी आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे इंटरनेट हे कुठल्याही सर्वीसच्या बाबतीत न्युट्रल आहे.

पण ट्राय (Telecom Regulatory Authority of India) च्या नविन नियमानुसार, ते काही सर्व्हीस ना ओव्हर द टॉप सर्व्हीस OTT म्हणणार आहेत (उदा: व्हॉट्स अ‍ॅप, नेफी वगैरे) म्हणजे मग नेट कंपन्यांना (एअर्टेल, वोडाफोन) या सर्व्हीसेस कडून किंवा त्यांच्या ग्राहकांकडून जादा पैसे मिळवता येतील.

म्हणजे आपण डेटा चार्ज पण भरायचा आणि व्हॉट्स अ‍ॅप वापरतो म्हणून एक्स्ट्रा पण!!

आपले आंतरजाल तटस्थ ठेवण्यासाठी (Net Neutral) आपणच प्रयत्न करणे भाग आहेत. ट्राय नी त्यासाठी लोकांकडून काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

ट्रायची वेब साईटः http://www.trai.gov.in/

त्या प्रश्नांची उत्तरे आणि ट्रायला इमेल पाठवण्याकरता http://www.savetheinternet.in/ या पत्त्यावर जा.

तिथे तुम्हाला ती उत्तरे बदलायची पण सोय आहे. (edit answer) तिथेच तुम्हाला प्रश्न आणि उत्तरे वाचता येतील.

नेट न्युट्रॅलिटी USA ने तर अंगीकारलीच आहे पण ब्राझील आणि चिली सारख्या विकसनशील देशांनीही तसे कायदे केले आहेत. आपले इंटरनेट मुक्त ठेवण्याकरता आपल्यालाच प्रयत्न करायला हवेत.

हा सगळा मुद्दा सोप्या भाषेत समजावून सांगण्याकरता ए आय बी नी एक व्हिडीओ तयार केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=mfY1NKrzqi0

या धाग्याचे प्रयोजन म्हणजे ट्राय नी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे २४ एप्रिल च्या आत मागितली आहेत.

त्यामुळे सरकारच लोकांना सांगते आहे की तुम्ही तुमचे म्हणने नोंदवा अशा वेळेस उगीच हे सरकारचे काम आहे असे म्हणून वाद घालणे व्यर्थ आहे.

अजुन उपयुक्त चर्चा:

निकीत | 15 April, 2015 - 03:22
नेट न्युट्र्लिटि ह-वी-च.
नेट न्युट्र्लिटि म्हणजे सेपरेशन ऑफ कॅरेज (डेटा कनेक्शन / नेटवर्क) आणि कंटेंट (वेबसाइट्स). असामीनेही हाच मुद्दा मांडलाय आणि त्याला कोणीही उत्तर दिलेले नाही. आधीच्या कॉमेंट्स बघितल्य. उत्तर सापडलं नाही.

अर्थशास्त्रामधील एक बेसिक नियम आहे: कोणत्याही नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये (जसे वीज, gas pipelines, टेलिफोन, रस्ते इ.) असे सेपरेशन हे अधिक कार्यक्षम असते. कारण कॅरेज बांधायच्या प्रचंड खर्चामुळे त्यात स्पर्धा हि नेहेमीच (प्रचंड) कमी असते. याउलट कंटेंट तयार करणे हे तुलनेने कमी खर्चिक आणि रिस्की आहे म्हणून त्यात बरीच स्पर्धा असते. एकदा कंटेंटला तटस्थ कॅरेज मिळाले कि आपोआपच त्यातल्या स्पर्धेचे फायदे ग्राहकांपर्यंत पोचतात.

आता, सध्याच्या चर्चेच्या अनुषंगाने डेटा मिळण्यासाठी दोन बिझिनेस मॉडेल संभवतात: (१) सेपरेशन (नेट न्युट्र्लिटि) आणि (२) कॅरेज आणि कंटेंटचं एकत्रीकरण (ट्रायचे प्रस्तावित नियम).
तर, कॅरेज मध्ये कंटेंट इतकी स्पर्धा कधीच निर्माण होऊ शकत नाही.(थोडक्यात, टेलिकॉम कंपन्या या वेब्साइट्स इतक्या डायव्हर्स होऊच शकत नाहीत.) कारणे वर दिलेली आहेत. त्यामुळे सेपरेशन हे ग्राहकांसाठी नेहमीच जास्त फायद्याचे ठरणार. त्याच्यामुळे कॅरेज-कंटेंट एकत्रीकरणानंतर, त्यांचं कार्टेल मनमानी करायला लागल्यावर ग्राहक दुसऱ्या टेलेकोम कंपनी कडे जातील हे लॉजिक इथे गैरलागू आहे. कारण पहिली सिस्टीम ही नेहमीच अधिक एफ़िशियंट आहे.

नंबर पोर्टेबिलिटिसाठी सुद्धा हेच (तटस्थ कॅरेज) हेच लॉजिक होतं, बाय द वे.

दुसरा मुदा आहे किमती वाढण्याचा. हा महत्वाचा जरी असला तरी एकदा तटस्थ कॅरेज कायद्याने अनिवार्य झालं की त्याची किंमत किती लावायची हे बाजारावर अवलंबून आहे. आणि डिफ़रन्शियल प्रायसिंग आजही चालू आहेच की.

बेफ़िकीर | 15 April, 2015 - 03:40
निकीत,
तुमचा मुद्दा समजला पण शंका आहे.
कॅरेज आणि कंटेट ह्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर कंपन्या मनमानी करतील व ती मनमानी सहज चालू शकेल असे का वाटत आहे?
मुळात वीज, रस्ते, टेलिफोन व गॅस पाईपलाईन ह्यांची तुलना कंटेंट म्हणजे येथे वेबसाईट्सशी करणे हे समजले नाही. वेबसाईट अनंत असतील.

निकीत | 15 April, 2015 - 04:25
बेफिकीर:

कॅरेज आणि कंटेट ह्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर कंपन्या मनमानी करोत वा ना करोत - मुद्दा असा आहे की सेपरेशन हे नेहमीच एकत्रीकरणापेक्षा एफिशियंट असणार आहे.

वीज आणि gas आणि टेलिकॉम या उद्योगातले बिझिनेस मॉडेल अतिशय सारखे आहे ( **नेटवर्क पुरते मर्यादित कारण चर्चा त्यावर चालु आहे **). कोणालाही वीज निर्मिती प्रकल्प उभारता येतो - पर्यावरणीय कारणे वगळता शासनाला परवानगी नाकारता येत नाही. पण नेटवर्क (ट्रान्स्मिशन लाइन्स) उभारायला लायसन्स लागतो आणि त्यावर त्यांची मक्तेदारी असते. ग्राहकाला कोणाची वीज खरेदी करायची याचा पूर्ण चॉइस आहे. अनेक मोठे ग्राहक तो वापरतही आहेत. मुंबईत तर अनेक घरगुती ग्राहकसुद्धा रिलायन्स कडून टाटाकडे पळाले आहेत. नेटवर्क रिलायन्सचं पण वीज टाटाची. फक्त आमचं नेटवर्क वापरल्याचे चार्जेस भरा - जे पळालेल्या आणि न पळालेल्या लोकांसाठी एकच आहेत.
तीच गत पाइपलाइन गॅसची. Gas कोणीही इम्पोर्ट करू शकतो. पाइपलाइन कंपन्यानी सरकारकडून अमुक एका शहराची / भागाची मक्तेदारी विकत घेतलेली असते. ग्राहकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे कोणाचा गस वापरायचा. पाइपलाइन कंपन्याना तो द्यावाच लागतो. (हे आता फक्त मोठ्या ग्राहकांपुरतच मर्यादित आहे).

तसेच, वेबसाइट कोणीही उघडू शकतो. टेलिकॉम कंपन्या सरकारकडून एका badwidth वरची मक्तेदारी विकत घेतात (२-G, ३-G स्पेक्ट्रम ऑक्शनस) आणि त्याद्वारे ग्राहकाला वेबसाइट पर्यंत पोचवतात. ग्राहकाला त्यांचे नेटवर्क वापरून कोणती वेबसाइट वापरायची याचे स्वातंत्र्य अजूनपर्यंत तरी आहे.

असो. आधी म्हटल्याप्रमाणे मुख्य मुद्दा असा कि कंपन्या मनमानी करोत वा ना करोत - सेपरेशन (न्युट्रलिटि) हे नेहमीच एकत्रीकरणापेक्षा एफिशियंट असणार आहे.

बाकी स्पेक्ट्रम ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यावरची मक्तेदारी विकत घेऊन टेलिकॉम कंपन्या त्यांच्या आवडीचा कंटेंट न वापरणाऱ्या ग्राहकांना deprive कसं करू शकतात वगैरे एथिकल मुद्दे आहेतच.

१. एफिशियंट = इकॉनोमिकली एफिशियंट = स्वस्त आणि मस्त (तुलनेने) सेवा = ग्राहकांना फायदा.
२. न्युट्रलिटि = कंटेंट मधली स्पर्धेचा फायदा जसाच्या तसा ग्राहकांना = एफिशियंट
३. कंटेंट मधील स्पर्धा > कॅरेज मधील स्पर्धा. कारण आधी लिहिल्याप्रमाणे.
म्हणून, न्युट्रलिटि मधील स्पर्धा > एकत्रीकरनामधील स्पर्धा.
त्यामुळे जरी कंपन्या छान छान वागल्या तरी,
४. न्युट्रलिटि मधील (इकॉनॉमिक) एफिशियन्सी > एकत्रीकरणाची (इकॉनॉमिक) एफिशियन्सी. नेहमीच.
म्हणून चार-चार-चार मधली कोणतीही कॉम्बिनेशनससाठी न्युट्रलिटि ही नेहमीच अधिक चांगली.

थोडक्यात समरी:
१. टेलिकॉम कंपन्या मनमानी करोत वा ना करोत, न्युट्रलिटि मधील (इकॉनॉमिक) एफिशियन्सी > एकत्रीकरणाची (इकॉनॉमिक) एफिशियन्सी. नेहमीच. माझ्या आधीच्या अनेक प्रतिसादात मी याचं लॉजिक दिले आहे.
२. इतर नेटवर्क इंडस्ट्री मध्ये न्युट्रलिटि कायद्याने अनिवार्य आहे (आधी नव्हती, नंतर अनिवार्य केली). टेलिकॉम कंपन्याचे नेटवर्क बिझिनेस मोडेल त्याच्यापेक्षा फारसे वेगळे नाही.
३. नेटवर्क न्युट्रल ठेवूनही डिफ़रन्शियल प्रायसिंग करता येतेच.
४. स्पेक्ट्रम ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यावरची मक्तेदारी विकत घेऊन टेलिकॉम कंपन्या त्यांच्या आवडीचा कंटेंट न वापरणाऱ्या नागरिकांना deprive कसं करू शकतात वगैरे एथिकल मुद्दे आहेतच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

>> (बहुतेक गामांचाही हाच मुद्दा आहे ना?)

येस्सर! Happy

म्हणूनच जो काही प्रीफर्ड कॉंटेंट दाखवायचा आहे तो टेलीकॉम कंपन्यांनी स्वत:च्या स्वतंत्र उपजालावर दाखवावा. मुख्य आंतरजालास हात लावू नये.

आ.न.,
-गा.पै.

Cleartrip also stands up for #NetNeutrality, pulls out of Internet.org
[source: http://zeenews.india.com/news/sci-tech/cleartrip-stands-up-for-net-neutr...

Very nicely stated by ClearTrip :
Snippet start ...

If Cleartrip supports Net Neutrality, then one might legitimately ask why Cleartrip chose to participate in the Indian launch of Internet.org.

Here’s why:
a few weeks back, Facebook reached out and asked us to participate in the Internet.org initiative with the intention of helping us deliver one of our most affordable products to the more underserved parts of the country.

There was no revenue arrangement between us and Internet.org or any of its participants — we were neither paid anything, nor did we pay anything to participate. Additionally we don’t make any money out of that product. Since there was absolutely zero money changing hands, we genuinely believed we were contributing to a social cause.

But the recent debate around #NetNeutrality gave us pause to rethink our approach to Internet.org and the idea of large corporations getting involved with picking and choosing who gets access to what and how fast.

What started off with providing a simple search service has us now concerned with influencing customer decision-making by forcing options on them, something that is against our core DNA.

So while our original intent was noble, it is impossible to pretend there is no conflict of interest (both real and perceived) in our decision to be a participant in Internet.org. In light of this, Cleartrip has withdrawn our association with and participation in Internet.org entirely. We believe that the Internet is a great leveler and that freedom of the Internet is critical for innovation. Cleartrip is and always will be a fully committed supporter of #NetNeutrality.

Snippet end !

नमस्कार,

हे सर्व रिलायन्स जिओ ४जी साठी चालु आहे का? मागच्यावेळेस रिलायन्स टेलिकॉम उभी राहण्यास तत्कालिन एनडीए सरकारने बरीच उदारता दाखवली होती. बीएसएनएल एमटीएनएल चे कर्मचारी अजुन ही त्यांच्यानावाने खडे फोडत आहेत. आता ही काही दिवसांमधे रिलायन्स जिओ ४जी चालु होणार आहे त्यांचे कर्मचारी ऑप्टीकल फायबर सर्वत्र टाकण्यात मश्गुल आहे. नविन टॉवर देखील उभे राहतात. अश्यामधे ४जी सर्विसमधे स्पीड दुप्पट वाढल्याने इंटरनेट कॉल सुस्साट लागणार आहे. आता व्हॉट्सअप, स्काईप मधे जो डिस्टर्बन्स येतो तसा त्यात अजिबात येणार नाही. असे झाल्यास जशी एसएमएस सेवा बंद पडली तशीच फोन कॉलिंगसेवा देखील बंद पडणार. भविष्यात हे घडण्याची शक्यता नाकारता येणार नाहीच. हे सगळे त्यासाठी तर नव्हे ?

धन्यवाद

>>भविष्यात हे घडण्याची शक्यता नाकारता येणार नाहीच. हे सगळे त्यासाठी तर नव्हे ?<<

अर्थात, त्यासाठीच. पण एक बाब लक्षात घ्या कि टेक्नॉलॉजीशी, तिच्या वेगाशी जुळवुन घेताना या कंपन्यांना इवॉल्व होणं आवश्यक आहे आणि न्हणुनच त्यांचं बिझ्नेस मॉडेल बदलत असतं.

अमेरिकेत तरी लँड्लाइनचं अस्तित्व हळुहळु कमी होत चाललेलं आहे. ऑन्डिमांड, ऑन्लाइन कंटेट प्रोवायडर्स्नी ट्रडिशनल केबल टिवीचं कंबरडं मोडलेलं आहे. व्हाओआय्पी वाल्यांनी ट्रडिशनल व्हॉइस कॉलसेवा देणार्‍यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. तर अशा परिस्थितीत या कंपन्यांना बिझनेस मध्ये टिकुन रहाण्यासाठी, टेक्नॉलॉजी बरोबरचा पेस सांभाळण्यासाठी, उत्तम सेवा देण्यासाठी असले प्रकार करणं भाग आहे. न्युट्रलिटीच्या नावाने लोकं आता बोंब मारतील पण जेंव्हा समानतेचे दुष्परीणाम काहि दिवसांनी दिसायला लागतील तेंव्हा त्यांचे डोळे उघडतील... Happy

वरच्या काहि प्रतिसादात वाच्लं कि काहि लोक प्रिमियम सेवा (फास्ट स्पीड, गुड क्वालिटी इ.) करता पैसे मोजायला तयार आहेत पण तीच लोकं न्युट्रलिटीच्या बाजुने आवाज उठवत आहेत. आयएस्पीज त्यांच्या नावडत्या वेब्साइट्स ब्लॉक करणार आहेत, असं कुठे म्हटलं आहे का? तुम्ही विकत घेतलेलं प्रिमीयम पॅकेज/बँड्विड्थ त्या वेब्साइट्स्चा कमी झालेला (किंवा सो कॉल्ड कमी केलेला) स्पीड थोड्या फार प्रमाणात ऑफ्सेट करणार नाहि का?

दिनेश्क,

>> असे झाल्यास जशी एसएमएस सेवा बंद पडली तशीच फोन कॉलिंगसेवा देखील बंद पडणार. भविष्यात हे घडण्याची
>> शक्यता नाकारता येणार नाहीच. हे सगळे त्यासाठी तर नव्हे ?

अगदी अचूक निदान आहे तुमचं.

इथली इंग्लंडमधली गोष्ट सांगतो. इथे व्हर्जिन मीडिया नामे कंपनी दूरचित्र (टीव्ही), दूरभाष (फोन) आणि आंतरजाल स्थापितजोड (ब्रॉडबँड) अशा तीन तारसेवा (केबल सर्व्हिसेस) एकत्र देते. आता केबल म्हंटली की तिच्यावर सुमारे १००० वाहिन्या आरामात दिसू शकतात. स्थापितजोड साठी अलग जोडणी नाही. ती केवळ एक (दुमार्गी) वाहिनी आहे. प्रकाशतंतू तंत्रामुळे केबलचा वेग अचाट आहे. आता गंमत अशी आहे की आंतरजालवेग कितीही वाढवता येतो, पण तितका वेग ग्रहण करणारे संगणक आजून वापरत आलेले नाहीत. शिवाय वाढीव वेग व क्षमतेमुळे जालफेरी (वेब ब्राऊझिंग) काटण्यास फारशी चवड (बँडविड्थ) आवश्यक पडत नाही. अतिरिक्त क्षमता बाकी राहते.

जालवितरकांना ही अतिरिक्त क्षमता विकायची आहे. त्यासाठी सामान्य ग्राहकांना वेठीस धरणे होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे. जालवितरकांनी स्वत:चं उपजाल विकत घेऊन हव्या त्या सुविधा पुरवाव्यात. Happy

आ.न.,
-गा.पै.

न्युट्रलिटीच्या नावाने लोकं आता बोंब मारतील पण जेंव्हा समानतेचे दुष्परीणाम काहि दिवसांनी दिसायला लागतील तेंव्हा त्यांचे डोळे उघडतील... > नक्की काय दुष्परीणाम दिसणार आहेत न्युट्रलिटीचे ?

आयएस्पीज त्यांच्या नावडत्या वेब्साइट्स ब्लॉक करणार आहेत, असं कुठे म्हटलं आहे का? >> गेल्या वर्षी verizon ने fox n/w शी फिसकटलेले डिल सुधारेपर्यंत त्यांच्यावर बंदी घातली होती जरी ते नेटवर्क पॅकेजमधे included असलेले होते त्यामूळे काही ब्लॉक होणारच नाही असे जरुरी नाही. It can be used as a pressure tactic. FTC recently imposed fine on ATT for data throttling (https://www.ftc.gov/news-events/blogs/business-blog/2014/10/ftcs-mobile-...) त्यामूळे कंपन्या हे सर्व ग्राहकांच्या भल्याकरता - उत्तम सेवा देण्याकरता करत आहेत ह्याच्या पेक्षा अधिक गैरसमज नसावा.

न्युट्रलिटि ला विरोध करणाऱ्या लोकांनी, कृपया असामी, गामा आणि माझे आधीचे प्रतिसाद वाचावे. फार मागे जावे लागणार नाही.
थोडक्यात समरी:
१. टेलिकॉम कंपन्या मनमानी करोत वा ना करोत, न्युट्रलिटि मधील (इकॉनॉमिक) एफिशियन्सी > एकत्रीकरणाची (इकॉनॉमिक) एफिशियन्सी. नेहमीच. माझ्या आधीच्या अनेक प्रतिसादात मी याचं लॉजिक दिले आहे.
२. इतर नेटवर्क इंडस्ट्री मध्ये न्युट्रलिटि कायद्याने अनिवार्य आहे (आधी नव्हती, नंतर अनिवार्य केली). टेलिकॉम कंपन्याचे नेटवर्क बिझिनेस मोडेल त्याच्यापेक्षा फारसे वेगळे नाही.
३. नेटवर्क न्युट्रल ठेवूनही डिफ़रन्शियल प्रायसिंग करता येतेच.
४. स्पेक्ट्रम ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यावरची मक्तेदारी विकत घेऊन टेलिकॉम कंपन्या त्यांच्या आवडीचा कंटेंट न वापरणाऱ्या नागरिकांना deprive कसं करू शकतात वगैरे एथिकल मुद्दे आहेतच.

निकीत तुझे पोस्ट जे सकाळी वाचले होते ते अतिशय योग्य असून ह्या बाअफाच्या डोक्यावर टाकले जावे असे वाटते. It summarizes issues perfectly.

barring personal attacks, which is inevitable, a very good, informative Thread!
Experts, please continue to comment.

Personal attackers, if net neutrality goes away, please note it's gonna literally 'cost' you to curse! Happy just kidin!

>>नक्की काय दुष्परीणाम दिसणार आहेत न्युट्रलिटीचे ? <<
हा पॉइंट मागच्या प्रतिसादात आलेला, परत सांगतो. आयस्पींना, बॅडविड्थ हॉगिंग करणार्‍या सर्विसेस्ना वाढिव फि लावता येत नसेल तर त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करुन स्टेट-ऑफ-द आर्ट इंफ्रास्ट्रक्चर का उभारावे/मेंटेन करावे. माझ्या मागच्या पोस्टमधिल आयओटी चा संदर्भ (गुगल करुन) वाचा. भविष्यात डेटा ट्रांस्पोर्ट फक्त ह्युमन-मशीन न रहाता मशीन-मशीन होणार आहे (सुरुवात ऑलरेडी झालेली आहे). डेटा इज गोइंग टु एक्स्प्लोड; अँड स्टोरिंग, ट्रांस्पोर्टिंग, चर्निंग धिस शिट (बिग डेटा) वुड नीड २४/७, फेल-सेफ इंफ्रास्ट्रक्चर. कल्पना करा कि, आयएस्पीज रिफ्युज टु अप्ग्रेड देअर डेटा सेंटर्स टु मीट दिज डिमांडस अन्लेस दे गेट पीस ऑफ द पाय. इन सच सिनॅरिओ, हु गेट्स इंपॅक्टेड? मेक्स सेंस नाउ? Happy

>>गेल्या वर्षी verizon ने fox n/w शी फिसकटलेले डिल सुधारेपर्यंत त्यांच्यावर बंदी घातली होती<<
इर्रेलेवंट उदाहरण. या घटनेत, कॉक्स मिडिया आणि वेरायझन यांच्यातला फि डिस्प्युट कारणीभुत आहे; त्यात नेट न्युट्रलिटीचा प्रश्न कुठे आला? धिस हॅपन्स ऑल द टाइम बिटवीन केबल प्रोवायडर्स अँड प्रोग्रॅमिंग चॅनल्स...

>>टेलिकॉम कंपन्या त्यांच्या आवडीचा कंटेंट न वापरणाऱ्या नागरिकांना deprive कसं करू शकतात वगैरे एथिकल मुद्दे आहेतच.<<
प्लीज जरा हे विस्कटुन सांगाच. आतापर्यंत या धाग्यावर आलेली उदाहरणं (एआयबीचा स्टुपिड विडिओ धरुन) न्युट्रलिटीच्या नावाखाली फुकट्या लोकांचं समर्थन करणारी आहेत. अहो या जगात अलिखित नियमच आहे - यु गेट वॉट यु पे फॉर... Happy

सरकारचे मुख्य काम एकॉनोमिकली एफिशियंट मार्केट तयार करून त्यात सर्व नागरिकांचे हित होते आहे हे एन्शुअर करणे हे आहे. टेलिकॉम कंपन्या लॉस मध्ये चालल्या असतील तर त्यांनी किमती वाढवाव्या. सर्व बड्या कंपन्या अमाप प्रॉफिट कमवत आहेत (गुगल करा नंबर्स मिळतील). त्यामुळे "आम्ही नेटवर्क अपग्रेडच करत नाही जा" या त्यांच्या मक्तेदारीतून आलेल्या ब्लाक्मेलला बळी पडण्याची सरकारला गरज नाही. किंबहुना असे होऊ नये म्हणूनच रेग्युलेटर (ट्राय, एफसीसी) बसवलेला आहे. कारण पहिले वाक्य. सरकारचे मुख्य काम एकॉनोमिकली एफिशियंट मार्केट तयार करून त्यात सर्व नागरिकांचे हित होते आहे हे एन्शुअर करणे हे आहे.
परत एकदा: न्युट्रलिटि मधील (इकॉनॉमिक) एफिशियन्सी > एकत्रीकरणाची (इकॉनॉमिक) एफिशियन्सी. नेहमीच.

ईण्टरनेत कोणीही फुकट मागत नाहीये. जास्त वापरणार्याला जास्त पैसे लावणे मान्य आहे आणि कंपन्या ते लावतातच. ग्राहकाने कुठला कंटेंट वापरायचा याच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा चालू आहे.
कोणताही स्पेक्ट्रम / bandwidth कंपन्यांच्या मालकीचा नाही; तो त्यांनी सरकारकडून काही वर्षांसाठी लीज वर घेतलेला असतो.

>>ग्राहकाने कुठला कंटेंट वापरायचा याच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा चालू आहे.<<
अरे मग असं उदाहरण आहे का जिथे ग्राहकाच्या गळ्यात "य" सेवा मारलेली आहे पण त्याचा चाॅइस "क्श" आहे. उगाच "डोंगराला आग लागली पळा रे पळा" अशी हाकाटी देण्यात काय अर्थ आहे?
(फ्लिपकार्ट-एअरटेल झिरो ची केस उदाहरणादाखल देण्याआधी प्लीज त्या बातमीचे डिटेल्स वाचा)

लास्टली, एफिशियंसी इज ए फंक्शन आॅफ टाइम. नेट न्युट्रलिटी सपोर्टेड इकाॅनाॅमिक एफिशियंसी (योर टर्म), माझा परफाॅरमंस इश्यु (स्पीड ~ टाइम) कसा रिझाॅल्व करेल हे जरा समजावुन सांगा... Happy

ओ, बायदवे ॲम स्टील वेटींग टु हिअर अबाउट ए थ्राॅटलिंग इंसिडंस बाय ॲन आयएसपी अगेन्स्ट ए स्माॅल टायमर... Happy

@राज,
सद्ध्या टेली कंपन्या समाजसेवा म्हणून फुकट नेट देत असुन, ते आता त्यांना परवडेनासे झाले आहे आणि म्हणून त्या न्युट्रलिटी व्हयोलेट करुन थोडाफर चार आण्याचा नफा कमावु पाहत आहेत, ते त्यांना करु द्यावे, विरोध करु नये, असे तुमचे म्हणने आहे का?

ईतर क्षेत्रात टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली नाही का? त्यांनी सग्ळ्यांनी बेकायदेशीर अनैतीक मार्गानेच नवीन सेवेचे दर आकारले का?
५-१० वर्षापुर्वी चे नेट चे भाडे कमी होते. आज ३जी वगैरे आल्यावर लोकांनी आजच्या रेट प्रामाणे भाडे देउने ते घेतले नाही का? मग पुढेही वेळेप्रमाणे जसे भाडे वाढेल तसे लोक जादा भाडे देणार नाहीत का? त्यासाठी अनैतिक / बेकायदेशीर मार्गच वापरला पाहीजे असा नियम आहे का?

ज्या प्रोडक्टची गरज संपली आहे त्या कंपनीने एकतर मरावे किंवा स्वतःला - रिझनेबल - कायेदेशीर - नैतीक - परिघात राहीन बदलावे आणि नवीन सेव / प्रोडक्ट आणावे. हे करण्याएवजी टेली कंपन्या अनैतीक / बेकायदेशीर मार्ग्जाचा वापर करुन जिवंत राहू पाहत आहेत ते का म्हणुन होऊ द्यावे?

परत एकद, "लोक फुकट नेट मागत आहेत" असे म्हणुन धागा आणि लोकांचे लक्ष भरकटवु नका.

तुम्हाला जर एवढेच वाटत होते तर, तिकडे असताना हे सगळे तुम्ही व्हेरिजॉन / कॉम्कास्टच्या बाजुने बोललात का? लिंक्स? त्या कंपन्यांच्या बाजुने उभे राहीलात का? लि़क्स किंवा इमेल्स द्या.
नसलात तर ,तो राग इ़कडॅ कशाला काढता आहात?

आधी तिकडे स्वतःच्या घरात काय चाललय ते बघा. स्वतःच्या कंपन्या वाचवा आधी. इ़कडच्या कंपन्यांच आम्ही बधुन घेऊ.

ज्यांना समर्थन करायचे आहे त्यांनी आताच एअरटेल इ. कंपनींचे त्याप्रकारचे कनेक्शन घेउन सुरुवात करा.
उगाच वायफळ बाता नका करु.

अरे मग असं उदाहरण आहे का जिथे ग्राहकाच्या गळ्यात "य" सेवा मारलेली आहे पण त्याचा चाॅइस "क्श" आहे. >> सिरीयसली? त्याचं काय आहे, अजून नेट न्युट्रलिटि आहे. त्यामुळे असं करणं बेकायदेशीर आहे. ट्राय चे प्रस्तावित नियम जर पास झाले तर लवकरच उदाहरण देता येईल. एफसिसि चे होउ शकले नाहीत हे आपणास ठाउक असेलच.

नेट न्युट्रलिटी सपोर्टेड इकाॅनाॅमिक एफिशियंसी (योर टर्म), माझा परफाॅरमंस इश्यु (स्पीड ~ टाइम) कसा रिझाॅल्व करेल हे जरा समजावुन सांगा... >> पुन्हा एकदा, सिरीयसली? उत्तर आहे डिफ़रन्शियल प्रायसिंग.

ट्रायच्या साईटवर आंतरजाल तटस्थतेच्या बाजूने नोंदणी केली. असामी, निकिता,गा.पै., अभिजेत नवले यांचेमुळे निर्णय घेऊ शकलो म्हणून त्यांना धन्यवाद.

बेफिकीर, राज व गुगळे यांना ही धन्यवा़द कारण त्यांनी मांडलेल्या मुद्यांमुळेच निकिता व अभिजीत नवले वगैरेंचे विचार जास्त चांगल्या रितीने समजू शकले.

महत्वाच्या विषयाला हात घातल्या बद्दल धनि यांनाही धन्यवाद.

धन्यवाद!

सगळ्या प्रतिसाद कर्त्यांचेही. चर्चा करून सर्व माहिती करून दिल्याबद्दल.

जर तुम्हाला एमेल पाठवायचे असेल तर अजुनही वेळ आहे. २४ एप्रिल पर्यंत पाठवू शकता

धनि,

धाग्यासाठी धन्यवाद!

शाम भागवत - आपल्यासाठी एक स्पष्टीकरण Happy

नेट न्युट्रॅलिटी असावी की नसावी ह्याबाबत माझी आधीची भूमिका अशी होती की त्यातील काहीही असावे, मी एखाद्या विशिष्ट बाजूसाठी आग्रही असणार नाही.

ह्या नंतर मला खालील मुद्दे वाचायला मिळाले.

१. गोपनीयतेचा भंग

२. अधिक पैसे द्यावे लागणे

३. निवडीचा वाव मिळण्यात पारदर्शकता नसणे.

हे सर्व मुद्दे मी माझ्या परीने खोडून काढलेले होते व चर्चेच्या त्या त्या टप्प्याला ते ते मुद्दे मांडणारे आपला सहभाग थांबवत जात होते.

पण निकीत ह्यांनी (माझ्या आकलनानुसार) (त्यांच्या पहिल्या नव्हे, तर दुसर्‍या प्रतिसादात) वेगळा मुद्दा मांडला. जो लक्षात आल्यानंतर मला नेट न्युट्रॅलिटीबाबत 'न्युटरल' असणे योग्य नसून आग्रही असणे योग्य आहे हे पटले व मी माझ्याकडून चर्चा थांबवली.

त्यांनी मांडलेला मुद्दा असा, की कंपन्या पारदर्शकपणे वागल्या, गोपनीयता अबाधित राहिली आणि वाढीव पैसे द्यायला जनता तयारही झाली तरीही 'कॅरेज आणि कंडक्ट' ह्यांचे एकत्रीकरण 'कार्यक्षमता' प्रभावित करते, जे होऊ नये म्हणून न्युट्रॅलिटीसाठी आग्रही असावे. (बहुधा हाच मुद्दा गामा थोड्या वेगळ्या भाषेत सांगत होते म्हणून मी गामांना दोनवेळा शंका विचारल्या होत्या, पण त्यांचे निरसन होण्याआधीच निकीत ह्यांचे प्रतिसाद आले होते).

आता निकीत ह्यांचा हा 'कार्यक्षमतेचा' मुद्दाच 'आम्ही आधीपासून म्हणत होतो' असे कोणी म्हणणार असेल तर पुन्हा चर्चेस सुरुवात करू आणि बघू की असे कोण कोण खरेच म्हणत होते! Happy

अर्थात, ह्या प्रतिसादातून अभिजित नवले ह्यांच्यावर टीकाटिपण्णी करायची नाहीच आहे. त्यांच्याकडे काहीतरी स्ट्राँग मुद्दे होते हे नक्की समजत होते पण ते मुद्दे वाचकांनी स्वतःहून समजून घ्यावेत ह्यावर त्यांचा भर दिसत होता. माझी अपेक्षा अशी होती की त्यांनी ते मुद्दे चर्चेत नोंदवून चर्चेचा भाग बनवावेत. Happy

>>अरे मग असं उदाहरण आहे का जिथे ग्राहकाच्या गळ्यात "य" सेवा मारलेली आहे पण त्याचा चाॅइस "क्श" आहे. >> सिरीयसली? त्याचं काय आहे, अजून नेट न्युट्रलिटि आहे. त्यामुळे असं करणं बेकायदेशीर आहे. ट्राय चे प्रस्तावित नियम जर पास झाले तर लवकरच उदाहरण देता येईल. एफसिसि चे होउ शकले नाहीत हे आपणास ठाउक असेलच. <<
अमेरिकेत नेट न्युट्रलिटीचं एफ्सीसी रुलिंग गेल्या महिन्यातच आलेलं आहे. पुर्वि असा नियम नव्हता, तेंव्हा तसले प्रकार एखाद्या आय्स्पी ने केले का? वरील प्रश्न हा असा होता. तर ते असो.

>>नेट न्युट्रलिटी सपोर्टेड इकाॅनाॅमिक एफिशियंसी (योर टर्म), माझा परफाॅरमंस इश्यु (स्पीड ~ टाइम) कसा रिझाॅल्व करेल हे जरा समजावुन सांगा... >> पुन्हा एकदा, सिरीयसली? उत्तर आहे डिफ़रन्शियल प्रायसिंग.<<
हे उत्तर खरोखर मला बुच्कळ्यात पाडणारं आहे. डिफरंशियल प्रायसिंग म्हणजे एकाच प्रॉड्क्ट किवा सेवेचं वेगवेगळं प्रायसिंग, कस्टमरच्या डिमांड/बिहेवियर नुसार ठरवलं जाणारं. आता तुमच्या म्ह्णण्याप्रमाणे जर माझा परफॉर्मंस इशु डिफरंशियल प्रायसिंगने रिझॉल्व होइल, तर मग यात न्युट्रलिटी कुठे राहिली? सुरुवातीपासुन मी तेच म्हणतो आहे कि टियर्ड सर्विस (बेस्ड ऑन प्रायसिंग स्ट्रक्चर) असावी. तुम्ही विकत घेतलेल्या सर्विसनुसार तुमचा इंटर्नेट स्पीड फास्ट्/स्लो चालेल, यात वेब्साइट्स ब्लॉक करायचा प्रश्नच येत नाहि. मग नेट न्युट्रलिटी हविच कशाला??? Happy

आधीची भूमिका अशी होती की त्यातील काहीही असावे, मी एखाद्या विशिष्ट बाजूसाठी आग्रही असणार नाही.
>>
ज्या बाबतीत आपण स्वतः न्युट्रल आहोत, त्या बाबतीत आपले न्युट्रल मत मांडण्या एवजी, विरोधी मते मांडुण, आपल्या मताने जनमत त्या गोष्टीच्या विरोधी जात असेल, तर मुळात आपले आधिच न्युट्रल असेलेले मत मांडावेच कशाला? ज्या गोष्टीने आपल्याला काहीही फरक पडत नाही, त्या गोष्टिविरोधात जनमत तयार करावेच काशाल / ते तसे विरोधी जनमत होईल अशे प्रतिसाद द्यावेच का?
यात पाय खेचने या व्यतिरिक्त आणखी काय दिसुने येते?

हे सर्व मुद्दे मी माझ्या परीने खोडून काढलेले होते
>>
हट्टी पणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधीत नसलेली मते, ते तंत्रज्ञान समजुन न घेता, केवळ "अमुके एक आता मान्य व्हावे, तमुक एक मान्य व्हायला हरकत नसावी" अश्या तर्हेचे वाक्य लिहिणे म्हणजे मुद्दे खोडुन काढणे नव्हे.

या त्या टप्प्याला ते ते मुद्दे मांडणारे आपला सहभाग थांबवत जात होते
>>
"यांना नेट म्हणजे अमुक वाटते, खि खि खि,
यांना नेट म्हण्जे तमुक वाटते, खि खि खि"
अशा "मेंटलिटीच्या" प्रतिसादांना भिक का म्हणुन घालावी?
इथे किर्तन चाललेले नाही. की फक्त "पांडूरंग हरी विठ्ठल" या ओळीला आपला सहभाग नोंदवावा. तंत्रज्ञानाच्या विषयात जर समोरच्याला स्वतः मेहनत घेउन अभ्यास करायचा नसेल तर, तर मी का म्हणुन त्याचे पुर्वग्रहदुषित मतांना प्रतिसाद द्यायचा?

अर्थात, ह्या प्रतिसादातून अभिजित नवले ह्यांच्यावर टीकाटिपण्णी करायची नाहीच आहे. त्यांच्याकडे काहीतरी स्ट्राँग मुद्दे होते हे नक्की समजत होते पण ते मुद्दे वाचकांनी स्वतःहून समजून घ्यावेत ह्यावर त्यांचा भर दिसत होता. माझी अपेक्षा अशी होती की त्यांनी ते मुद्दे चर्चेत नोंदवून चर्चेचा भाग बनवावेत.
>>
आधी समोरच्याने त्याची वैचारीक बैठक अपग्रेड करण्याची तयारी दाखवावी. स्वतःची मेहनत दाखवावी.
जेनुईनली कोणाला शिकायची / समजुन घ्यायची ईच्छा आहे ते लगेच समजते.
ईथे तुम्ही बोलत नसुन तुमच, "ईतर" क्षेत्रातला "अनुभव" बोलत होता / आहे.

जेव्हा स्वतःचे सामान्या ज्ञान काळाशी सुसंगत नाही हे लक्षात आले. तेव्हा रडीचा डाव खेळुन प्रशासनाच्या कुशीत जाउन बसलात, त्यांनी तुमच्या बाजुने मते मांडावीत म्हणून. प्रशासन काय तुमचे मोठे भाउ आहेत का तुमच्ये अज्ञान संभाळुन घ्यायला?

अहो, या घटनेमुळेच तर नेट न्युट्रलिटीचा वाद निर्माण झाला. कॉम्कास्ट-नेट्फ्लिक्स तयार होते डिल करायला, कस्टमर तयार होते वाढिव पैसे द्यायला. त्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहित आहेच.

बायदवे, नेट्फ्लिक्स इज अगेंस्ट नेट न्युट्रलिटी (एकेए टायटल २ इन अमेरिका)... Happy

ते असु द्यात हो.
इथले जनमत कंपन्यांच्या बाजुने तयार होण्यासाठी, जी एवढी मेहनत तुम्ही घेत आहात,
तर तेव्हढीच तिकडे घेतली का?
जरा आम्हाला पण कळु द्या कशी घेतलीत ते?
ज्या व्यक्तीने स्वत:च्या घरात मुग गिळून गप्प बसने पसंत केले असेल, त्याने दुसर्यांच्या घरात जाउन अक्कल शिकवावीच कशाला?

>>>जेव्हा स्वतःचे सामान्या ज्ञान काळाशी सुसंगत नाही हे लक्षात आले. तेव्हा रडीचा डाव खेळुन प्रशासनाच्या कुशीत जाउन बसलात, त्यांनी तुमच्या बाजुने मते मांडावीत म्हणून. प्रशासन काय तुमचे मोठे भाउ आहेत का तुमच्ये अज्ञान संभाळुन घ्यायला?<<<

नाही. तेव्हा मला असे वाटले होते की प्रशासन अधिक अधिकारवाणीने सांगू शकेल.

बाकी, तुमच्या प्रतिसादाबद्दल माझ्याकडून फक्त एक स्मितहास्य! Happy

>>>यात पाय खेचने या व्यतिरिक्त आणखी काय दिसुने येते?<<<

मी पाय कशाला खेचू कोणाचे? आयुष्यात असे काहीही केले नाही. मी तेव्हा माझ्या मतांशी प्रामाणिक होतो. माझे विचार बदलण्यास (माझ्यामते) कारणीभूत ठरणारा प्रतिसाद आल्यावर मी गप्प बसलो.

काही असो, ह्या चर्चेत मी अज्ञान पाझळले आणि अनेकांचा वेळ घालवला असा समज झालेल्यांसमोर मी दिलगीर आहे. Sad

Pages