पुण्या-मुंबईतील दर्जेदार कॅफेज, टपऱ्या, canteen, restaurants, pubs, फूड स्ट्रीट आणि भन्नाट आठवणी

Submitted by हर्ट on 6 April, 2015 - 06:10

विषयात म्हंटल्याप्रमाणे पुणे आणि मुंबई शहरात असलेल्या उत्तमोउत्तम कॅफेजची इथे यादी तयार करायला कृपया मदत करा. धन्यवाद.

अलिकडे उषा खन्ना ह्यांचे 'कॅफे समोवर' बंद झाले. हे नाव कधी ऐकले नाही. पण नंतर हे आहे तरी काय हे गुगल करुन पाहिल्यानंतर आपण काहीतरी मिस केले असे वाटत राहिले आहे. तसे गुगल करुन पाहिले तर खूप काही मिळेल पण इथे खास कुणी माबोकरांनी रेकेमेन्ड केलेले कॅफे असेल तर त्याचे महत्त्व गुगलपेक्षा मला जास्त वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी आता तिथे गाड्या नसतात. बी एम सी सीचे कॅन्टीन पण बरे होते. तिथे बनवडा मिळायचा. बनपावचा गोड पाव आणि ब. वडा. Happy

बोळ म्हणजे एक बोळवाज रस्ता आहे तो. खूप निमुळता आहे म्हणून बोळ म्हणालो. आणि रुपाली समोर एक कुठले तरी ईन्स्टियुट की विद्यापीठाचा एक विभाग आहे.

आमचा नवसह्याद्री मधील मानकर डोसे वाले आहेत का आता?
त्यांचा अमुल बटर डोसा आणि चटणी, म्हणजे अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी...................

मानकर डोसा वाले आहेत अजुन तिथेच..

लॉ कॉलेज रोड आणि बी एम सी सी रोड मिळतात त्या चौकात आहे जर्मन बेकरी..

बीएमसीसीचा बनवडा+++ १ आणि अनेक.
मुद्दाम तुलना करायला म्हणून सिम्बी चा बनवडा १-२ दा खाल्ला होता, पण त्याला आमच्या बीएमसीसीची सर नव्हती Happy

आमच्या गरवारे कॉलेजसमोर एक प्रशांत म्हणून टपरी होती. तिथे पहिल्यांदा बनवडा खाल्ला होता. मस्त सडू जागा होती आमची ज्यु कॉ दरम्यान. एका बंगल्याच्या अंगणातच होती ती टपरी. मग ती बंद झाली आणि बहुतेक कर्वे रोड पण रूंद झाला त्यामुळे त्या बंगल्याचे आवार अगदीच लहान झाले. आता तो बंगलाही आहे की त्याचे अपार्टमेंट झाले लक्षात नाही.

पण त्याला आमच्या बीएमसीसीची सर नव्हती > अगदी मित.. सिंबीचे कॉमर्स कॉलेज बी एम चे ईतके इमिटेशन करायचे.. सेम गत त्यांच्या लॉ कॉलेजची जे ILS Law ची कॉपी करायचे.

अरे वा नताशा, मित .. कोणती बॅच? मी २००१ पास आउट. बी एमला मिसळ नामक वाटाणा उसळ आणि फरसाण मिक्स असेपण मिळायचे, बेक्कार चवीचे..

इंडसर्चच्या शेजारी पण मस्त बनवडा मिळायचा.. दुकानाचे नाव आठवत नाहीये... ते पण असेच पडिक रहायचे ठिकाण होते... एका वेळी सगळी ऑर्डर तिथे कधीच दिली नाही.. कायम एकाचे खायचे आले की पुढच्याची ऑर्डर जायची..

मी पण !!! >> आपली ओळ्ख असेल मग कदाचित.. तू CA की CS की CWA?

पुण्यात कॅम्प साईडला जे क्ल्ब आहेत जसे की पूना, रेसिडेन्सी, लेडीज ई. तिथली फूड क्वालिटी पण उत्त्म आहे. थोडे महाग आहेत (आणि मेंबरशीप नसेल तर १०० एक रुपये अजून एंट्रंस फी) पण ambience आणि फूड दोन्ही उत्तम. केक्स, fruit funnyआणि पेस्ट्रीज एक नंबर Happy

टीळक रोड वरचं बादशाही!! तिथले स्नॅक्स बरेच प्रसिद्ध होते. आणि तिथे थाळीसुद्धा मिळायची. आता आहे की नाही माहित नाही.

आहे अजून आहे.
थाळी बरीच वाढवलीये आता त्यांनी.

त्यांच्याकडे एक पोटॅटो टोस्ट म्हणून प्रकरण मिळते. बटाट्याच्या गोळ्याच्या मधे चटणी भरलेली असते आणि तळलेले असते. बरोबर पातळ दह्याचा बेस असलेली एक चटणी देतात. प्रचंड कॅलरीज पण अ प्र ति म असते प्रकरण.

But I am saying about George only Wink

Also all of you must be in school or pre school, but Poona
Coffee House bang opposite Deccan Bus Station was quite glamourous in those days, ( thats what we middle class kids felt. ) lamps out of beer bottles and ac and that lovely smell of smoke plus sambhar!!!

next to it there used to be a flower shop with western style bouquets and not phulacha puda. He used to sell coloured tuberoses which was height of glamour next to it came up Venkys chicken. Also a small stall selling Do it - a soft drink and potato pattie in pita bread.!! I had written to Parlle to give me the Franchise of this .. sweet dreamy days.

पोटॅटो टोस्ट आणि चटणी...खरंच अप्रतिम!! आम्ही एस. पी. च्या स्विमिंग पूलवर जायचो पोहायला आणि नंतर बादशाही!!

बोळ म्हणजे एक बोळवाज रस्ता आहे तो. खूप निमुळता आहे म्हणून बोळ म्हणालो. आ
>>
मला वातते असा बोळ वजा रस्ता रुपालीसमोर आहे.बीएम्सीसी रोड आणि रुपालीसमोरची दुकाने यांच्यामध्ये हा रस्ता आहे. दुकानांच्या मागे सोसायट्यांत जाण्यासाठी.... वि द घाटे रोड त्याचे नाव !

वाडीया कॉलेज जवळ ढोले पाटील रोडला कपिला काठी कबाब नावाची टपरी होती. कॅफे नव्हता हा. बसायला पण जागा मिळायची नाही पण काठी कबाब अप्रतिम मिळायचे. त्याच्याजवळच नंदुज पराठा होतं. कॉलेजमध्ये असताना ही दोन्ही ठीकाणं अगदी फेवरिट होती.

सुमुक्ता तुझे पोस्ट खादाडेच्या बीबीला सुयोग्य आहे. इथे पदार्थांच्या चवीपेक्षा तिथे गप्पाष्टक जमवण्याची जागा म्हणून प्रसिद्ध अशा जागांची चरच्या चालू आहे. स्टॅन्ड अप खाद्यालयांची नव्हे !

हिम्सकूल, तू बहुतेक सुरूची बद्दल बोलतो आहेस. बनवडा तिथेच मिळतो. आणि बहुतेकांची ऑर्डर देण्याची हीच पद्धत असायची Proud

येस्स.. सुरुची.. पूर्वी एकदम साधी टपरी वजा हॉटेल होते आता एकदम चकाचक झालय.. परत एकदा जाऊन बनवडा खाऊन यायला पाहिजे... अड्डा जमवायला पाहिजे परत एकदा तिथे...

Pages