पुण्या-मुंबईतील दर्जेदार कॅफेज, टपऱ्या, canteen, restaurants, pubs, फूड स्ट्रीट आणि भन्नाट आठवणी

Submitted by हर्ट on 6 April, 2015 - 06:10

विषयात म्हंटल्याप्रमाणे पुणे आणि मुंबई शहरात असलेल्या उत्तमोउत्तम कॅफेजची इथे यादी तयार करायला कृपया मदत करा. धन्यवाद.

अलिकडे उषा खन्ना ह्यांचे 'कॅफे समोवर' बंद झाले. हे नाव कधी ऐकले नाही. पण नंतर हे आहे तरी काय हे गुगल करुन पाहिल्यानंतर आपण काहीतरी मिस केले असे वाटत राहिले आहे. तसे गुगल करुन पाहिले तर खूप काही मिळेल पण इथे खास कुणी माबोकरांनी रेकेमेन्ड केलेले कॅफे असेल तर त्याचे महत्त्व गुगलपेक्षा मला जास्त वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

-

पण हे सगळे रस्ते केवढे भरगच्च ठिकाणी आहे. बालभारती समोरचे रस्ते तर इतके बिकट असतात की तिथे जावेसे वाटत नाही. मला तर रहदारी म्हंटले की कितीही चांगले दुकान असे ना जायची इच्छा होत नाही. निवांत ठिकाणे ही माझी निवड आहे.

तिलकची आठवण निघाली ते बरं झालं. तसंच आमचं एसेसचं कळकट कँटीनही एक नंबर. वाटायचं ते एसपीचं कँटीन पण प्रायव्हेट होतं स्वामी'ज बहुतेक. तिथला युनिक ब्रेड मसाला आणि कटींग चहा. वा.
ग्राहक पेठेशेजारीच पूर्वी असलेले आता म्युझिक लव्हर्सपलीकडे सरकलेले वृंदाज. धमाल नुसती. स्वस्तात मस्त.
रामनाथ, श्रीकृष्णची मिसळ येक नंबर पण जेमतेम बुड टेकवायला जागा मिळाली तरी गेल्या जन्मीचं वर्षभराचं पुण्य खर्ची पडतं.
प्रबोधिनीसमोर नवीन अड्डे लॉंच झालेत. अनारसे समोसेवाल्यांनी झोकात दुकान थाटलंय, जिवाला खा. शेजारीच कोल्ड कॉफी, २०रूपयात मिल्कशेक अशी अटळ प्रलोभनं आहेत. तिकडेही अर्धा तास उभं राहिलं तरी महिन्याभराची ऊर्जा रीचार्ज होते.
नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळची संध्याकाळची वडापावची गाडी कुणीतरी विचारलीये, आण्णाचा वडा. अजून चालू आहे.
जंगली महाराज रोडवरचं शुभम, वरचा मजला हा तर अजूनही आवडता स्पॉट आहे. धसफस नसते.
फर्गसनसमोरचं सवेरा, तिथले पनीर पकोडे एक नंबर. आता त्याचं नवीन नाव रूमानी झालंय. रोमँटिक वाटतंय, नाहीतर पूर्वी अक्षरशः लोक ब्रश करून सवेरात येऊन बसलेत संध्याकाळी पाचलाही असा जनरल फील होता.
तिथूनच पुढे गेलं की मनमीत पराठा वन अॉफ द बेस्ट पराठा, छोले भटुरे, बास्केट चाट, नंतरची गरम जिलबी, रबडी क्या दिन थे. तिथेही सर्वांना कंटाळा येईतो धृवपद. आता ते वाकडला गेलंय पण अजून तिकडे जावेसे वाटले नाही.
सवेराची गल्ली आणि जं म रोड जोडणार्या रस्त्यावर पथिक म्हणून एक होते तिथेही आओ जाओ घर तुम्हारा. एकदा तिथे काहीतरी रशियन सलाड मागवल्यावर जे टॉर्चर झाले त्यानंतर आम्ही त्यास पथेटिक म्हणू लागलो इतकेच.
वैशालीच्या समोरचं आर्यन/ केतन. खूप दिवसांनी भेट झाल्यावरच्या चिकार गप्पा पण शांत वातावरणासाठी.
आणि आपल्या मायबोली गटगंचे जगप्रसिध्द अड्डे? मल्टिस्पाईस, गंधर्व, वैशालीचं टेरेस, वाडेश्वर.

जंगली महाराज रोडवरचं शुभम, वरचा मजला हा तर अजूनही आवडता स्पॉट आहे. धसफस नसते. <<< क्या बात कही!! बेस्ट!

पथेटिक शिरोळे रोडला नाहीये. सेन्ट्रल पार्क म्हणून तो हॉल/ हॉटेल की तत्सम आहे त्याच्या बाजूला आहे. पूर्वी कॉर्नरला कामत होतं त्याच्या.

हां हां, बरोबर. गल्ल्या सांगताना तेव्हाही चुकायचेच.
शनिपारचौकातल्या मुरलीधरला, तुबातल्या अगत्यला, कावरेला केफेची मंजूरी दिली नाही तरी किमान मीटींग स्पॉट म्हणून दफ्तरी नोंद घ्यायलाच पाहिजे. केवळ या तीन ठिकाणांवर आजतागायत तुबातली शॉपिंग गटग चालली आहेत!
आधी आरोग्य मंदिरची भजीही एवन असायची. पण भज्यांनी आरोग्यापासून फारकत घेतल्यानंतर तेही बंद पडलं.
जोगेश्वरीच्या बोळातला पाचसहा हातगाड्यांचा अड्डा. जिभेचे चोचले नुसते.

सुजाता मस्तानीचा उल्लेख नाही आला का कुठे? पुण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये सुजाता मस्तानीचा उल्लेख व्हायलाच हवा!! (अर्थात कॅफे नाहिये हा)

बी दिवसा पुण्यातली गल्ली बोळं फिरुन झाली की मग रात्री ड्रेस अप करायचं आणि डिनरसाठी एक्स्क्लुसिव ठिकाणं शोधायची.

'Independence' - पासपोर्ट ऑफिसशेजारी, मुंढवा किंवा वाढीव केपी म्हणते मी या एरियाला. यांची स्वतःची Brewery आहे. अति उत्तम बियर मिळते. खुप चवी देतात मग आपल्याला कोणती हवी ते ठरवायचं. मी बियर फॅन नाही पण फक्त इथल्याच आवडतात. एकदम मस्त आहेत. मेन्युकार्ड छोटं आहे पण छान पदार्थ आहेत.

Hard Rock Café - लाउड म्युझिक, पण मस्त माहौल असतो. मला प्रचंड आवडतं. गप्पा मारता येत नाही पण डान्स फ्लोअर आणि ड्रिक्स, कंपनी आणि क्राउड साठी मस्त आहे. बिल पण झकास देतात. Wink

Squisito - प्युअर वेज आणि उत्क्रुष्ट इटालिअन. मी जगातली सगळ्यात मोठी फॅन आहे या रेस्तराँची. बिल भरभक्कम Happy

Café Mezzuna - छान मित्रमैत्रिणींची कंपनी आहे म्हणुन ४-५ तास मस्त महागडा ब्रेफा करायचा असेल तर बेश्ट ! बिल पण तेवढंच बेश्ट. Wink

Thousand Oaks - परत लाउड म्युझिक. म्हणुन गप्पा मारायला नाही पण डोळ्यात डोळे घालुन बसायला आणि ड्रिक्स, कंपनी आणि क्राउड साठी मस्त आहे. गप्पा मारायच्या असतील तर बाहेर शांत असतं. पण तो एरिया फॅमिलीज साठीच असतो. मजा नाही येत. बिल पण लाउड.

Touche’ the Place - सिझलर्स साठी कितीही नविन जॉइन्ट्स निघाले तरी मी इथली लॉयल कस्टमर आहे.
पत्ता - मोलेदिना स्ट्रीट. वेस्ट एन्डच्या बाजुला कॅम्प.

Prem’s - असंच छान आहे. केपीमधे.

चायनिज खाना - ओन्ली Chinese Room . इस्ट स्ट्रीट. कॅम्प

चांगली बिर्याणी - George. इस्ट स्ट्रीट. कॅम्प
नाव मोठं लक्षण खोटं अर्थात बन्डलेस्ट बिर्याणी - Blue Nile पुना क्लब समोर.
अति उत्तम बिर्याणी - ही फक्त टेक अवे आणि किलोज मधे मिळते. साळुंके विहार रोड Foot Art केटरर्स. घरी पार्टी असेल तर उत्तम पर्याय. एक किलो मधे हावरट ६-७ जण तुडुंब खातात. नॉर्मल खाणारी ८-९ जण.

बेस्टेस्ट क्वालिटी फ्रुट्सचे बेस्ट ज्युसेस आणि अतिउत्तम मिल्क शेक्स जॉर्ज च्या बाजुला ;Juice Worldमधे. इथले पराठे पण मस्त असतात. नंदुजचं नाव आहे पण फार गलिच्छ ठिकाण वाटतं मला ते. बिल एकदम परवडणेबल.

Panash – Four Points Sheraton बेस्ट जॅपनीज फुड, नगर रोड.

Malaka Spice - साउथ इस्ट एशियन डेलिकसीज. इथली पेंटिंग्ज पण पहाण्यासारखी आहेत.

Copper Chimney के.पी. - नॉर्थ इंडियन अतिउत्तम जेवण. मला याचा अ‍ॅम्बिअन्स पण आवडतो.

कोयला - के.पी. - क्लासी हैद्राबादी फुड मिळायचं. बंद झालं का कोणास ठावुक. जागात टेस्टी फुड मिळायचं इथे. दोनच जण गेले तरी चार आकडीच्च बिल. कधीच कमी नाही.

आता झोप आली आहे शिवाय सगळी बिल्स आठवल्यावर खाण्यात किती पैसे घालवले याचं दु:ख पण वाटायला लागलं आहे. पण अजुनही लांबलचक लिस्ट आहे. सांगेन परत कधी. Happy

मनिमाऊ, तू जी यादी दिलीस अशीच स्थळं मी शोधित होतो. धन्यवाद Happy ह्या जागा नक्की कुठे आहेत हे आता मला गुगल करावे लागेल Happy लिहायचे असते ना पत्ते Happy

येह लो ! एरिया आणि जवळपासचं एखादं ठिकाण लिहिलं आहे की. अजुन पोस्टल अ‍ॅड्रेस द्यायचा होता का? Happy फेमस ठिकाणं आहेत ही. नेटवर मिळतील, त्या एरियात गेलं कि पत्ता विचारयचा आणि सगळ्यात बेस्ट गुगल मॅप झिंदाबाद आहेच की.

शिवाय सगळी बिल्स आठवल्यावर खाण्यात किती पैसे घालवले याचं दु:ख पण वाटायला लागलं >> Lol
मस्त यादी दिली आहेस मनिमाऊ!

लॉ कॉलेज रोडवर एका गल्लीच्या तोण्डावर एका बाजूला वाडेश्वर आहे. दुसर्‍या बाजूला एक साधं दिसणारं रेस्तरा आहे. एकदा दुपारी दीड्च्या सुमारास मी त्या भागात होतो. जाम भूक लागली होती म्हणून वाडेश्वरला गेलो तर कोव्हीड च्या ५०% नियमामुळे आत प्रवेश मिळाला नाही. माझ्या सारखेच काही जण वाट पहात बाहेर उभे होते म्हणून मी समोरच्या रेस्तरामधे गेलो तर तिथे सगळा शुकशुकाट. गल्ल्यावर एक जण (बहुदा मालक) बसलेले आणि दुसर्‍या बाजूला एका टेबलावर बसून दोन स्त्रीया त्यांचे डबे सोडून जेवत असल्याचं दिसलं. मी परत जायला वळणार होतो पण मालकांनी हाक मारून थांबवलं आणि 'काय हवं' असं विचारलं. एकंदर सगळा सीन पाह्यल्यावर इथे काय मागवावं असा प्रश्न मला पडला होता. ' आलू पराठा चालेल?' मालक म्हणाले तशी मी मान डोलावली. त्याबरोबर एक स्त्री आपलं लंच अर्धवट सोडून उठली आणि तिने पराठा बनवायला घेतला. मी संकोचून गेलो. 'तुमचं जेवून होऊ द्या' असं सांगून पाहिलं पण त्यांनी ते ऐकून न ऐकल्या सारखं केलं आणि पटापट गरमा गरम पराठा बनवला. वरती अमूल लोण्याचा गोळा आणि आचार. त्या जेवणाची लज्जत मी विसरू शकत नाही.

Café Katha - कॅफे कथा, BCL च्या जवळ / मागे एक बंगला कॅफेमध्ये कन्व्हर्ट केला आहे. भरपूर रंगीबेरंगी कुंड्या, दरवाजे, भिंती यामुळे एकदम चिअरफुल वाटतो. फूड मस्त असतं, पेट्सला नेऊ शकता आणि लायब्ररी आहे त्यामुळे खादाडी आणि कॉफीबरोबर छान वाचत वेळ काढता येतो. बिल - बऱ्यापैकी भरपूर

Flour Works - फ्लोअर वर्क्स - कल्याणी नगर (नॉर्थ मेन अव्हेन्यु) - नावच सांगतं की बेकरी आहे. त्यांचे स्वतःचे उत्तम केक आणि बेकरी प्रॉडक्ट्स मिळतातच, शिवाय उत्तमोत्तम कॉन्टिनेंटल डिशेसही मिळतात. आत AC मध्ये बसु शकता किंवा बाहेर ओपन गार्डनमध्ये. गार्डनमध्ये पेट्स आणायला परवानगी आहे. मलकिणीची स्वतःची 2 कुत्री बागेत त्यांच्या बेडवर सतत बसलेली दिसतील. रविवारी तरुण उत्साही मुलांचे लाईव्ह बँडस असतात. शिवाय त्यांची स्वतःची पुस्तकांची रॅक्स आहेत. पुस्तक वाचत तासंतास खात किंवा कॉफी पीत बसायला, मित्रमंडळीबरोबर गटग करायला किंवा रोमँटिक डेट साठी मस्त जागा. कल्याणी नगर असल्यामुळे शांत आणि हिरवं आहे. आमचं रविवारी पडीक असण्याचं ठिकाण आहे.
बिल - भक्कम कचकुन (पण फ्रेशली बेकड ब्रेडची सँडविच खायची आणि फ्रेश यम्मी केक्स /पेस्ट्रीज खायच्या तर बिल भरायला नाही कोण म्हणेल Happy )

हा बाफ 2015 चा आहे. मी पूर्वी लिहिलेली काही ठिकाणं बंद पडली आहेत. Marzorin सारखी ठिकाणं जुना चार्म आणि चव हरवुन बसले आहेत. कॉफी जार, कॅफे ब्लिस सारखी छोटी लोकल ठिकाणं गर्दी खेचुन घेत आहे. काही जुनं मागे पडतं आहे, बरंच नविन गर्दी खेचतं आहे आणि काही आयकोनिक जागा वर्षानुवर्ष भरभक्कम तग धरून आहेत.

Pages