पुण्या-मुंबईतील दर्जेदार कॅफेज, टपऱ्या, canteen, restaurants, pubs, फूड स्ट्रीट आणि भन्नाट आठवणी

Submitted by हर्ट on 6 April, 2015 - 06:10

विषयात म्हंटल्याप्रमाणे पुणे आणि मुंबई शहरात असलेल्या उत्तमोउत्तम कॅफेजची इथे यादी तयार करायला कृपया मदत करा. धन्यवाद.

अलिकडे उषा खन्ना ह्यांचे 'कॅफे समोवर' बंद झाले. हे नाव कधी ऐकले नाही. पण नंतर हे आहे तरी काय हे गुगल करुन पाहिल्यानंतर आपण काहीतरी मिस केले असे वाटत राहिले आहे. तसे गुगल करुन पाहिले तर खूप काही मिळेल पण इथे खास कुणी माबोकरांनी रेकेमेन्ड केलेले कॅफे असेल तर त्याचे महत्त्व गुगलपेक्षा मला जास्त वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ओल्ड कॅन्टीन बंद झाले? तेथील ऑम्लेट मस्त असायचे. आम्ही जास्त नवीन कॅन्टीन मधे (फिजिक्स समोरचे) जायचो. पण कधी कधी तेथूनच झाडीतून पुढे जाउन एक फाटा लागत असे, तेथे नवीन टपर्‍या चालू झाल्या होत्या तेथे जाउन बसायचो. तेथे झाडीमुळे मस्त सावली असे. तसेच नवीन अ‍ॅडमिन बिल्डिंग च्या बाजूला एक गुज्जू कॅन्टीन चालू झाले होते. तेथे कॉफी व पुरी भाजी वगैरे मस्त मिळायचे. ही सगळी ठिकाणे आरामात बसण्याची व गप्पा मारण्याची होती.

बँड स्टँड ला बरिस्ता आणि लँड्स एन्ड च्या समोर एक ज्युस सेंटर कम रेस्टो कम कॅफे आहे.
बरिस्ता मध्ये संध्या ८-८.३० नंतर वर्दळ असतं, डिसेंट (???) क्राऊड असतं. लँड्स एन्ड च्या समोरच्या ज्युस सेंटर मध्ये कधी गर्दी पाहिले नाही, निवांत जागा आहे.

माझ अजुन एक फेव. म्हणजे एनडीए पाषण रस्ता, बावधान मधील 'द पॅलेस', हे कॅफे कम रेस्टॉरंट आहे. ग्रुप सोबत Enjoy करायला मस्त जागा आहे.

पुणे युनिव्हर्सिटी मध्ये सध्या ओपन कॅटींन, मेस आणि तिथेच शेजारी असणारे कॅटींन येवढेच चालू आहे आता..

इथल्या आठवणी फारच नॉस्टॅलजिक करतात.. दोन वर्ष अशक्य धुमाकूळ घातलाय...

बीएमसीसीच्या समोरच्या सगळ्या टपर्‍या गेल्या आता.. तिथेही मस्त टीपी करता यायचा..

पगदंडी >> मधे कवितावाचन, शेरोशायरीचे कार्यक्रम पण असतात >>> चनस, हो का ? चक्कर मारली पाहिजे आता तिथे. ब्रेड अँड बटरमध्येही !

नीरजा, पुणे अ‍ॅनेक्स म्हणूया मग. हाकानाका Happy

नीधप, मधे ३/४ वर्षे भारतात येणं झाले नव्हते. गेल्या वेळेस अगदी कमी वेळासाठी आले होते त्यामुळे ओल्ड कँटीन बंद झालेले कळलेच नाही. मास्टर्स प्रोजेक्ट करत असताना युनिव्हर्सिटी मधील सगळ्या कँटीन्सला भेट द्यायचो आम्ही, पण ओल्ड कँटीनच कायम फेवरिट राहिलं. खूप मस्त आठवणी आहेत तिथल्या!! शेवटी एकदा भेट सुद्धा देता आली नाही Sad

चांदणी चौकातुन आपण जेव्हा पाषाण कड़े जातो (डीआरडीओ एस्टेट मधुन जाणारा रस्ता) तिकडे चांदणी चौक पेट्रोल पंप पासुन थोड़े पुढे गेलो की एक "बायकर्स कॅफे" म्हणुन होता बाइक थीम्ड कॅफे, अगदी सोफे सुद्धा बाइक च्या टाकाऊ पार्ट्स पासुन बनवलेले होते , सद्ध्या आहे की बंद झालाय देव जाणे

सोन्याबापू माझे घर बावधन पाषाणच्या मधेच येते. तुला डी एस के रानवारा माहिती आहे का तिथे.

प्रशू, हो आपण नक्की भेटु जर्मन बेकरीमधे. मला पुण्यात मित्र म्हणून नाहीतचं.

pagdanadi-books chai cafe असे फेबु वर पेज आहे.

फिजिक्स समोरचे << फिजिक्स नक्की कुठेय? >>> नी, मेन बिल्डिंग च्या थोडे अलिकडे, डाव्या हाताला. (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मग मेन बिल्डिंग असा क्रम आहे बहुधा, डाव्या बाजूला). किंवा लायब्ररीच्या समोर म्हंटले तरी चालेल. याच कॅन्टीन च्या बाजूला ती थाळी वाली मेस (रिफेक्टरी) आहे.

हो अनिकेत, बरोबर. नाव विसरलो होतो.

या दोन तीन ठिकाणी चित्रपट संगीतापासून, क्रिकेटपासून राजकारणापर्यंत असंख्य विषयांवर किमान तासभर मारलेल्या गप्पा या केवळ एक कप चहा च्या बळावर असत. कधीकधी अभ्यासावर ही बोलल्याचे आठवते Happy

आळेकर नसण्याच्या काळातले आमचे एम ए चे वर्ष म्हणजे जोक होता. सकाळी आम्ही आपले आपणच ठरवून लवकर पोचायचो. कधी साधना हॉलमधे कुणीतरी रियाज करत असायचं तो बघायचो(नृत्याचा रियाज) किंवा ऐकायचो. साधना हॉल रिकामा असला तर काहीतरी वेडगळ इम्प्रॉव्ह्ज किंवा मग काही आवाजाचे एक्सरसाइझ करून बंगला दणदणून सोडायचो. आणि मग ओल्ड कॅन्टिनात, मागच्या रूममधे भल्या मोठ्या टेबलाशी जाऊन बसायचो. ललितचे कुणी ना कुणी तरी त्या टेबलावर दिवसभर येऊन जाऊन असायचेच. सकाळी पकडलेले टेबल संध्याकाळी सोडायचे अशी प्रथा होती. मधे आम्ही क्वचित लेक्चर झालंच तर ते अटेण्ड करून यायचो. मग आधी असलेले ललितकर उठायचे आपल्या कामाला जायचे. आणि आम्ही तिथे बसायचो असा खोखो सतत चालू.
तिथे विविध प्रकारचं भारतीय संगीत, नृत्य, नाट्य याबद्दल तुंबळ गप्पा मारायचो. कधी एकटाच कुणी असेल आमच्यापैकी तर तो चक्क त्या बाकड्यांवर पाय पसरून पुस्तक वाचत बसायचा/ लिहीत बसायचा वगैरे..
लय धमाल.

मग आळेकर आले. आणि आमची लेक्चर्सही व्हायला लागली, आम्हाला प्रॉडक्शन्सही करायला मिळाली मग ओल्ड कॅन्टीनचा नाद कमी करावा लागला. Happy

साधना हॉल वगैरे म्हणजे ललित कला केंद्र का?

त्या कॅम्पस मधे फक्त ओल्ड कॅन्टिन लाच रेस्टॉ सारखी ऑर्डर व टेबल सर्विस होती हे आठवते.

हो आत्ता आठवले. तू बस स्टॉप वर उभ्या असलेल्या विद्यार्थी का विद्यार्थिनी बद्दल लिहीले होतेस ते बहुधा विद्यापीठातील बस स्टॉप बद्दलच होते ना? अंधुक लक्षात आहे. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तो मेन बिल्डिंग नंतरचा उजवीकडे वळल्यावर लगेच असलेला स्टॉपच आला होता.

बस स्टॉप वर उभ्या असलेल्या विद्यार्थी का विद्यार्थिनी बद्दल लिहीले होतेस ते बहुधा विद्यापीठातील बस स्टॉप बद्दलच होते ना? <<
कुणाबद्दल काही लिहिले नव्हते रे. एका कथेमधे विद्यापिठातल्या एका बसस्टॉपचे नेपथ्य वापरले होते. मेन बिल्डींगनंतर उजवीकडे वळल्यावरचा नव्हता मात्र माझ्या डोक्यात. ओपन पासून मेन गेट कडे यायला लागले की डाव्या बाजूला लगेच जो आहे बसस्टॉप तो होता. Happy

मला आता फारेण्डशी कालच ओळख झाल्यासारखे वाटायला लागलेय.. Proud

हो मग तेच बसले असेल माझ्या डोक्यात :). तेथे कोणाशीतरी संवाद होता किंवा कोणाचेतरी वर्णन होते असे माझ्या डोक्यात बसले आहे. नाहीतर तुझ्या कथेमधे काय होते मी तुलाच काय सांगतोय Happy

@चिनूक्सः वोहुमन कॅफे सध्या वर्षभरासाठी बंद आहे. नंतर ते रुबी हॉलजवळ पुन्हा सुरू होईल.>> चालू आहे की. वहुमन कधी बंद होते? त्याच्या शेजारची टपरी पाडली बहुदा. पण वहुमन चालू आहे. वहुमनचा चीज टोस्ट आणि त्याबरोबर मिळणारे जॅम Happy
@ मुग्धानंद, तुम्ही ILS Law च्या? मी पण.. ILS Law चे कँटीन पण फार भारी आहे.
रंगोली (कॅफे नसला तरी) ला पण कितीही वेळ बसल तरी हाकलायचा नाय तो मालक. मस्त होते रंगोली.
जुन्या पासपोर्ट ऑफिसपाशी १-२ टपर्‍या होत्या (?) पत्रकारनगरला .. भारी वडापाव आणि ब्रेड पॅटीस मिळायचे.
कोणाला लिफ आठवत आहे का? रुपाली समोर होते. मस्त जागा होती. अचानक बंद पडले ते.

लंपन,
माझ्या माहितीनुसार गेल्या महिन्यापासून वहुमन बंद आहे. फेसबुकावर एका पुण्यातील खाद्यप्रेमी लोकांच्या ग्रुपात तशी चर्चाही वाचली. येत्या आठवड्यात तिथे जाऊन खात्री करून घेईन.

चिनूक्स अरे आहे चालू. ऑफिसपासून अगदीच जवळ आहे आणि ऑफिसमधल्या जनतेला दिवसाआड तिथले काहीतरी हवे असतेच बन मस्का, चीज टोस्ट, ड्बल एग चीज ऑम्लेट ई ई

Pages