पुण्या-मुंबईतील दर्जेदार कॅफेज, टपऱ्या, canteen, restaurants, pubs, फूड स्ट्रीट आणि भन्नाट आठवणी

Submitted by हर्ट on 6 April, 2015 - 06:10

विषयात म्हंटल्याप्रमाणे पुणे आणि मुंबई शहरात असलेल्या उत्तमोउत्तम कॅफेजची इथे यादी तयार करायला कृपया मदत करा. धन्यवाद.

अलिकडे उषा खन्ना ह्यांचे 'कॅफे समोवर' बंद झाले. हे नाव कधी ऐकले नाही. पण नंतर हे आहे तरी काय हे गुगल करुन पाहिल्यानंतर आपण काहीतरी मिस केले असे वाटत राहिले आहे. तसे गुगल करुन पाहिले तर खूप काही मिळेल पण इथे खास कुणी माबोकरांनी रेकेमेन्ड केलेले कॅफे असेल तर त्याचे महत्त्व गुगलपेक्षा मला जास्त वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्सकूल, आता त्याचं नाव कोलाज झालंय आणि बरेच पदार्थ अ‍ॅड केलेत त्यांनी मेनू मधे. होपफुली तिथला बनवडा अजूनही तसाच लागतो. गेलास तर एक बनवडा माझ्यावाटचा पण खाऊन ये Proud

आम्हा बर्‍याच टाळक्यांचा सुरूची हा ऑफिशियल अड्डा होता एकेकाळी. प्रत्येकजण आपापली कामधामं संपवून ६ नंतर तिथे यायला सुरूवात करायचा. ग्रूपमधलं शेवटचं टाळकं येईपर्यंत मधे ठेवलेली भेळ एकेक शेव-कुरमुरा करत आम्ही तोंडात टाकत राहायचो Lol तो हॉटेल मालक हाकलायचा कसा नाही कोण जाणे! अर्थात भेळेची ही गत असली तरी चहा मात्र अग्नीहोत्रासारखा चालू असायचा. तिथला चहा पण एकदम फेवरेट्ट होता!

आता भारी नॉस्टॅल्जिक झाले! Proud

कल्पना आणि विश्व अड्डे असणार्‍या पिढीतले नाहीत का कोणी इथे? किंवा अभिनव वाले?
अरे हो अभिनव वाल्यांचा अजून एक अड्डा होता. गिरीजाच्या डायगोनली ऑपोझिट. तिथेच मेस पण होती. आमचे अनेक अभिनवचे होस्टेलवाले मित्र तिथे जेवायचे. ४ अक्षरी नाव होतं काहीतरी.

रमड.. नक्कीच खाणार..

अनिलच्या नावानी नुसती हाकाटी चालायची तिथे..

तिथे एक काटकोनातल्या कर्णासारखे तिरके गेलेले मोठे झाड आहे.. त्याला बघून. आमच्या शेजारच्या टेबलावरचा एक महान माणूस ओरडला होता.. पायथागोरस इथे बसूनच त्याचा थियरम मांडत होता की काय? आम्ही फक्त हसून हसून पडायचे बाकी होतो..

कल्पना आणि विश्व हे सपवाल्यांचे अड्डे.. आमच्या शाळेतल्या खो खो खेळणार्‍या पोरांचा अड्डा होता कधीकाळी..

अय्या! अनिल माहीतीय तुला? अजून आहे का रे? तू २००३ ते २००८ च्या दरम्यान असायचास का तिथे म्हणजे?

पायथागोरस >>>> Lol ते झाड आठवतंय.

कल्पना आणि विश्व हे अड्डे नव्हते कधी. त्याऐवजी आम्ही तिथे जवळच मिळणारी पाणीपुरी (गिरीजाच्या शेजारची) किंवा कच्छी दाबेली ( आतमधल्या रस्त्यावरची) खायला जायचो आणि तिथेच गाड्या लावून तासंतास गप्पा मारायचो.

नाही मी एम आय टी मध्ये होतो पण माझे दोन मित्र तिथे मॉडर्न गेस्ट हाऊस मध्ये (आता काय नाव आहे काय माहिती) रहायचे. आणि तिथेच टिळक रोडला दोन क्लास पण होते. त्यामुळे सतत वावर पहिले दोन वर्ष तरी तिकडेच होता.

अजुन माझे बरेच मित्र ११-१२ ला एस पी ला होते त्यामुळे सुद्धा इंजिनियरिंग च्या सुरूवातीला एस एस, लिटील चायना, कल्पना भेळ असा खादाडी प्रोग्रॅम असे.

आम्ही पण अनिलच्याच नावानी हाका मारायचो.. २००३ ते २००५... त्यानंतर मात्र जाणं झाल नाहीये.. आजकाल संध्याकाळी त्या रस्त्यावर प्रचंड गर्दी असते.. त्यामुळे टाळलाच जातो तो रस्ता...

गिरीजाच्या शेजारच्या आजींकडली पाणीपुरी... एकदम अप्रतिम.. पेपरमध्ये पण लेख आला होता त्यांच्यावर..

कल्पना हॉटेल. भेळ नव्हे.
कल्पना हॉटेल आणि विश्व हॉटेल शेजारी शेजारी आहेत. कल्पना भेळेपासून सारसबागेकडे निघालं की पहिला चौक लागतो त्या कॉर्नरला.

पेपरमध्ये पण लेख आला होता त्यांच्यावर.. <<
त्यांच्या गाडीवर त्याचे कात्रण लावलेले आहे. पण आजी असल्या तरच टेस्ट येते त्या पाणीपुरीला. अन्यथा नाही.

नीधप मला दोन्ही माहीती आहेत. दोन्ही रस्त्याच्या दोन टोकांना आहेत. पण आमचा मुक्काम भेळ वाल्याकडे अधिक आणि उडपी कडे कमी असायचा Lol

ओके ओके.. Proud

मी अजूनही पुण्याला गेल्यावर कल्पना भेळ खाल्ल्याशिवाय निघत नाही पुण्याहून. नाहीतर पाप लागतं अशी माझी श्रद्धा आहे. Proud

अमा, काय मस्त आठवण काढलीस! पीसीएच आमच्या फॅमिलीचे फार आवडते ठिकाण होते. मी लहान असताना प्रचंड वेळा तिकडे गेलो आहोत. ते बंद झाल्यावर फारच वाईट वाटले होते. Sad

मानकर डोसा - अमेझिंग प्रकार आहे. मला पूर्वी डोसा आवडायचा नाही. मी टोमॅटो ऑम्लेट घ्यायचे. तेही छान होते. मग एकदा ट्राय केला डोसा, उत्तप्पा.. तेव्हापासून डोसा आवडू लागला. Happy एकंदरीत हा रस्ता फार लाभदायक आहे छोट्या गाड्यांवरच्या स्टॉल्सना! ( दी ओरिजिनल- काटेचमच्याचा लोगो असलेला) गणेश भेळवाला हातगाडीवर इथे सुरवातीच्या कोपर्‍यावर थांबायचा. तो तर प्रसिद्ध झालाच. मानकर डोसा तिथून पुढे गेल्यावर उजव्या हाताच्या बोळात सुरू झाला. त्याच्या भरपूर शाखा झाल्या आहेत आता. Happy

भरपूर शाखा झाल्यावर गुणवत्तेवर परिणाम होतच असणार. तुम्ही फॉर्म्युला देऊ शकता. पण डोश्यासारख्या पदार्थाचे बनवणार्‍याच्या हाताचेही कौशल्य असतेच.

हा धागा पुन्हा खादाडी कडे वळतोय का?

नीधप आणि इतर काही लोकहो,
मान्य आहे तुम्ही कधी काळी पुण्यात होतात सो या धाग्यामुळे तुम्ही nostalgic होणे साहजिकच आहे, पण तुम्ही ज्या जागा, टपऱ्या, canteen, restaurants बद्दल बोलत आहात, त्यातल्या बहुतेक आता बंद झाल्या आहेत आणि असल्याच तरी सर्वजणच अशा गोष्टी प्रेफर करतीलच असेही नाही.

सो तुमच्या आठवणीना उजाळा देण्यापेक्षा आपण या धाग्या कडे एक माहितीपुर्वक धागा म्हणून पाहूया का ? (कारण मी पुण्यात नवीन आहे, सो माझ्यासारख्याना हा धागा महत्वाचा आहे, पण तुमच्या आपापसातीलच गप्पा इतक्या होत आहेत की, त्या गप्पांमधून दर्जेदार कॅफे शोधणे अवधड होत आहे. ) Happy

मी ह्या धाग्याचे नाव बदलवू शकतो. ते माझ्या हातात आहे. जेणेकरुन ही चर्चा आणि मला अपेक्षित काय ते दोन्ही साधता येईल. काय करु धाग्याचे नाव?

instead of दर्जेदार कॅफे टपऱ्या, canteen, restaurants, फूड स्ट्रीट अशा सर्व जागा कव्हर करणार तसेच या संदर्भातील आठवणींना उजाळा देणार असू द्या, जेणेकरून ही चर्चा अशीच चालू राहील Happy

प्रशू.. पुण्यातली खादाडी नावाचा एक धागा आहे.. त्यात पुण्यातल्या बर्‍याच ठिकाणांची माहिती आहे..

प्रशू, हिम्याशी सहमत. या धाग्याची सुरूवात नॉस्टॅल्जिकपणा(!) साठीच झाली होती.

माहितीकरता वेगळा धागा आहे. आणि तेथे दर्जेदार कॅफे व इतर रेस्टॉ चे प्रकार आहेत बरेच लोकांनी लिहीलेले.

फारएण्ड तू जो धागा म्हणत आहे तो मला तरी नाही आढळला इथे. मी हा धागा काढण्यापुर्वीच तसा धागा आहे की नाही हे शोधून पाहिले होते. पण व्यर्थ! कदाचित पुर्वीच्या हितगुजवर होता तसा धागा पण नवीन मायबोलीवर नाही पाहिला. चुभुदेघे!

लंपन, <सेम गत त्यांच्या लॉ कॉलेजची जे ILS Law ची कॉपी करायचे<> +१००००००००००००० आएलेस, आsssए ए लेस.....

असल्याच तरी सर्वजणच अशा गोष्टी प्रेफर करतीलच असेही नाही. <<<

हे अशा गोष्टी काय आहे?
हे जाम खटकलेले आहे.

बाकी नॉस्टॉल्जिया बाजूला ठेवून शुद्ध माहिती हवी असेल तर झोमॅटोसह अनेक साइटस आहेत. इथे वैयक्तिक अनुभवांचा हातभार आहे म्हणून इथली माहिती महत्वाची असेल तर हे तुमचा नॉस्टॉल्जिया ठेवा बाजूला अशी सूचना करणं मला तरी पटलेलं नाही.

तुम्ही लोक एंजॉय करा.

मी धागाकर्ता आहे म्हणून मी सांगत आहे की मला तरी आठवणी वाचून छान वाटत आहे. म्हणून मी धाग्याचे नाव देखील बदललेले आहे. कृपया राग लोभ बाजूला ठेवा अशी प्रेमळ विनंती आणि लिहा.

पण आजी असल्या तरच टेस्ट येते त्या पाणीपुरीला. अन्यथा नाही. >>> आजींच्या हातची चव Light 1 सॉरी, फाकोचा मोह आवरला नाही.

मार्झोरिन आणि जर्मन बेकरी बीएमसीसी रोडच्या जवळ आहे ही माहितीच माझ्यासाठी नवीन आहे. धन्यवाद.

मला काहीच problem नाही, माझा उद्देश कोणालाही दुखवायचा नव्हता. फक्त एक गोष्ट शोधायला गेलो तर सलग आपापसातील गप्पांच्याच पोस्टी दिसल्या म्हणुन थोडा इरिटेड झालो इतकेच.

एनी वे, धाग्याचे नाव बदललेले आहे सो राग लोभ बाजूला ठेवा and carry on Happy

अरे वा आता कसं

कोरेगाव पार्कात साऊथ मेन रोड आहे त्यावर एक हातगाडी असते. तिथे गरमागरम पोहे , उपमा, मेदूवडा ई. स्वदिष्ट असे पदार्थ मिळतात. रवीवारी सकाळी लाँग रन झाल्यावर बरेचदा आम्ही तिथे खातो.

बिपिन ही टपरी कर्वे रोड्ला रेल्वे बुकिंग केंद्र आहे त्याच्या समोर सह्याद्री हॉस्पिटल लगत आहे. तिथे मिसळ पॅटीस आणि गोड शिरा हे पदार्थ मस्त मिळतात.
तिथे शहराच्या पुर्व भागात रहाणारी आमची मित्र मंडळी शनिवारी सकाळी तिथवर सायकल चालवत येतात आणि मग यथेच्छ हादडतात. एरवीही सकाळी प्रभात रोडवर पळून लवकर आटोपले बहुतेक वेळा आम्ही थांबतोच तिथे

अगो, बालभारतीचे सर्कल आहे तिथे जर्मन बेकरी आहे (आधी तिकडे एक हुक्का बार होता ) पण शहराच्या ह्या भागात मार्जोरिन नाहीये बहुदा.

Pages