पुण्या-मुंबईतील दर्जेदार कॅफेज, टपऱ्या, canteen, restaurants, pubs, फूड स्ट्रीट आणि भन्नाट आठवणी

Submitted by हर्ट on 6 April, 2015 - 06:10

विषयात म्हंटल्याप्रमाणे पुणे आणि मुंबई शहरात असलेल्या उत्तमोउत्तम कॅफेजची इथे यादी तयार करायला कृपया मदत करा. धन्यवाद.

अलिकडे उषा खन्ना ह्यांचे 'कॅफे समोवर' बंद झाले. हे नाव कधी ऐकले नाही. पण नंतर हे आहे तरी काय हे गुगल करुन पाहिल्यानंतर आपण काहीतरी मिस केले असे वाटत राहिले आहे. तसे गुगल करुन पाहिले तर खूप काही मिळेल पण इथे खास कुणी माबोकरांनी रेकेमेन्ड केलेले कॅफे असेल तर त्याचे महत्त्व गुगलपेक्षा मला जास्त वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात नुकतीच लॉ कॉलेज रोड वर जर्मन बेकरीची एक शाखा सुरु झाली आहे, मला प्रचंड आवडली, मित्र, कोणा स्पेशल वा एकटेही संध्याकाळ स्पेंड करायला मस्त जागा वाटली. Happy

थोडी रश असते, पण संध्याकाळच्या वेळी, मंद लाईट्स, मंद आवाजातील संगीतामुळे आपण स्वतः मध्येच इतके मंत्रमुग्ध होतो की, आजूबाजूला काय चाललंय जाणवतही नाही.

veg, non veg, drinks, smoke अशा सर्व गोष्टींसाठी योग्य जागा वाटली.

चर्चगेट स्टेशन च्या जवळ असणारी कॅफे - टी सेंटर (रेशम भवन), स्टेडिअम हॉटेल (इराणी), पिझ्जा बाय द बे, गेलॉर्ड बेकरी (सकाळच्या वेळेस मिळणारे तर्‍हेतर्‍हेचे गरम ब्रेड्स)
बाकी मग मोशेज, लिओपोल्ड वगैरे आहेतच.

प्रशू धन्यवाद. मला ज. बे. मधे जायचे होते पण इतकी लांब होती ही जागा की कधी गेलो नाही. पण लॉ कॉ. ला जाणे अगदी सोयीचे आहे.

वाघ बकरी टी लाऊंज. याची ओळख करून द्ल्याबद्दल नीरजा आणि शर्मिला दोघींना थँक्स. तिथं कुणी "उठा,. बास की आता" म्हणत नाही!!!ह्शिवाय अप्रतिम चहा. Happy

पण लॉ कॉ. ला जाणे अगदी सोयीचे आहे >>>>> नक्की, जायच्या आधी मलाही कळवा, जमल तर नक्की येइन. आणि कोरेगाव पार्क मधल्या शाखेपेक्षा ही शाखा थोडी सुटसुटीत वाटली, सो बऱ्यापैकी प्रायव्हसी मिळते.

जमल तर औंध मधील The Chocolate Room पण ट्राय करा.

पुण्यातील जुने कॅफेज: कॅफे गुडलक (गुडलक चौक, डेक्कन), वोहुमन कॅफे (जहांगिर हॉस्पिटल समोर), मार्झोरिन (एम. जी रोड, कँप), नाझ बेकरी (इस्ट स्ट्रीट, कँप), ब्लु नाइल रेस्टॉरंट (पूना क्लब जवळ), अजून आठवतील तसे लिहिन.

नविन कॅफेज ची विशेष माहिती नाही.

पुण्यात मोलेदिना स्ट्रीटवरचे कॉफी हाऊस (जुने). गेली अनेक वर्षे तिथे जाणे झाले नाही. त्यामुळे सध्याची स्थिती माहीत नाही.

चर्चगेट स्टेशन च्या जवळ असणारी कॅफे - टी सेंटर (रेशम भवन), स्टेडिअम हॉटेल (इराणी), पिझ्जा बाय द बे, गेलॉर्ड बेकरी (सकाळच्या वेळेस मिळणारे तर्‍हेतर्‍हेचे गरम ब्रेड्स)>> पैकी टीभव्न अधून मधून आणि स्टेडीयम अलमोस्ट रोजच्या रोज लंचला जायचं ठिकाण होतं.

कॅफे गुडलक (गुडलक चौक, डेक्कन), वोहुमन कॅफे (जहांगिर हॉस्पिटल समोर), मार्झोरिन (एम. जी रोड, कँप), नाझ बेकरी (इस्ट स्ट्रीट, कँप), >>>>> +१०००

पैकी health conscious लोकांसाठी मार्झ-ओ-रिन अप्रतिम जागा आहे, सर्व पदार्थ, ४०-६० च्याच रेंज मध्ये आहेत, आणि हव तितका वेळ बसता येत. अजून एक गोष्ट म्हणजे, आता उन्हाळा असल्याने, बाहेर असलेल्या टेबलांच्या वरून ते मंद पाण्याचा फवारा सोडतात. ही कल्पना मी पहिल्यांदाच पाहिली Happy

ब्लु नाइल रेस्टॉरंट >>>>> त्या पेक्शा एखाद्या जत्रे मधील stall बरे

कयानी बेकरी >>>>> माझ्या मते ही बेकरी आहे, कॅफे नाही.

केपी मधील hard rock cafe पण मस्त जागा आहे. Happy

मुंबई हायकोर्टाच्या आत ( त्याच इमारतीत ) एक कॅफे आहे. वकिलांना वेळ असल्यास त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उत्तम जागा आहे. पदार्थही छान असतात. ( बहुदा वकीलच इथे बिल भरतात Happy )

कयानी बेकरी (इस्ट स्ट्रीट, कँप),>>>>

अहो तिथे बसायला सोडाच, उभे रहायला सुद्धा जागा मिळत नाही.... तिथे फक्त पदार्थ विकत मिळतात . खायला जागा नाही....

.

धागाकर्ता पक्षी बी याना कॅफे , जिथे निवात खात खात गप्पा मारता येतील असे स्पॉट्स हवेत. खाद्य पदार्थाच्या जागा खादाडी त येतात . मला वाटते कयानी त्यात येऊन गेले आहे....

पृथ्वी कॅफे.

समोवारसारखेच वाद, गप्पा, चर्चा करण्याचे ठिकाण.
मी अनेकदा दुपारी तिथे लिखाणाला जाऊन बसलेली आहे. लिमिटेड वर्दळ असते आणि जी असते ती सिरीयस (दिखाऊच्या विरूद्धार्थी) नाटकवाल्यांचीच. त्यामुळे मधे मधे लिखाणात ब्रेक पण रिवॉर्डिंग असतात.

दुबेजी गेल्यापासून माझं पृथ्वी कॅफेला जाणं कमी झालं मात्र.

ब्लू नाईलदेखील कॅफे नाही.
वोहुमन कॅफे सध्या वर्षभरासाठी बंद आहे. नंतर ते रुबी हॉलजवळ पुन्हा सुरू होईल.

मला आवडलेले कॅफे -

कर्वे रस्त्यावर यात्री हॉटेलाजवळचं 'काहवा'.
भांडारकर रस्त्यावर 'ल प्लेझिर'.
Bread'n'butter (कर्वे रस्ता आणि बाणेर)
कॅफे कोलंबिया (वानवडी)
कॅफे गार्डन (कॅम्प)

आम्ही पुण्यात सडायचो ते कॅफे म्हणण्यासारखे नव्हते कुठलेच. पण कटींगवर सडता यायचं.
तेव्हा कॅफे प्रकार बोकाळलाच नव्हता आणि खिश्यात पैसेही नसायचे.
यातले किती अजून आहेत आणि काय परिस्थितीत आहेत माहित नाही. पण मला अजूनही याच जागा आवडतात सीसीडी वगैरेपेक्षा
१. मधुबन - ओंकारेश्वराच्या देवळाशेजारी. टपरीवजा हॉटेल. चहा, वडा वगैरे छान मिळायचं.
२. टेरिया (असे आम्ही म्हणायचो) - बालगंधर्वचा कॅफेटेरिया. आता काय परिस्थिती आहे माहित नाही.
३. अतुल पावभाजी - हा एक स्टॉल आहे. रात्री रस्त्याच्या समोरच्या बाजूला खुर्च्या लागतात. कल्पना-विश्वकडून सारसबागेकडे जाताना वाटेत उजवीकडे गल्ली लागते आदमबागच्या बाजूला त्या गल्लीच्या तोंडाशी आहे. आम्ही जेवणं झाल्यावर रात्री कॉफी प्यायला म्हणून तिथे जातो कधी कधी. पदार्थ काही ग्रेट आहेत असे नाही पण सडता येते.
४. आद्य सडू अड्डे कल्पना आणि विश्व याशिवाय पुढे जाता येणार नाही. यामधे कॉर्नरचं जे आहे तिथे आता सडता येत नाही फार काळ.
५. युनिव्हर्सिटीतले ओल्ड कॅन्टीन - एम ए चं पहिलं वर्ष इथेच काढलंय. मग आळेकर आल्यावर त्यांनी आम्हाला खेचून वर आणलं (शब्दशः कारण आमच्या डिपार्टमेंटच्या बाजूच्या पायर्‍या उतरून गेल्यावर ओल्ड कॅन्टिन होते.
हे आता बंद झाले. आमचे समोवार हेच होते पण. ते बंद झाल्यानंतर मला कळले त्यामुळे शेवटची भेटही देता आली नाही यामुळे जीव हळहळलाच.
६. युनिव्हर्सिटीतली नामदेव समोरची टपरी ज्याला आता ओपन कॅन्टीन म्हणतात. इथे उपमा भन्नाट मिळतो. बरोबर सांबार, चटणी, शेवेसकट. १० वर्षांपूर्वी साडेसात रूपयाला प्लेट होती. एवढ्यात खाल्ला नाही.
५. टिळक रोडच्या गिरीजाच्या शेजारचं औदुंबर तेव्हा अमृततुल्य टाइप दुकान होतं आणि ते ८-९ ला बंद व्हायचं. मग त्या बंद दरवाज्याच्या समोर आमचा अड्डा जमायचा. गिरीजाचा(हॉटेलचा) वाढदिवस असला की आम्हाला अर्धा ग्लास ज्यूस फ्री मिळायचा. Happy
६. आज्यूबा - कर्वे रोड. आनंद ज्यूस बार असे फार क्वचित म्हणले गेले असावे त्याला पूर्वी. एक खोके आणि समोरच्या बिल्डींगच्या रिकाम्या आवारात टाकलेली खुर्च्या टेबले असा प्रकार होता. खुर्च्या नसल्या तर बंद झालेल्या शोरूमच्या पायर्‍यांवरही बसता यायचे. कोवळी उन्हेचा स्नेहसदन ला प्रयोग झाला की आज्यूबा गाठायचे आणि टीटीएमएम मधे काय ते खायचे प्यायचे आणि प्रयोगाबद्दल गप्पा मारून घरी जायचे असा एक नियम होता.
आता हे प्रॉपर हॉटेल झालेय. पावभाजी, उडपी वगैरे टाइप्स. पूर्वी तिथला मसाला पाव आणि पा भा दोन्ही मस्त असायचे. आता बोर आहे.

युनिव्हर्सिटीतले ओल्ड कॅन्टीन, युनिव्हर्सिटीतली नामदेव समोरची टपरी ज्याला आता ओपन कॅन्टीन म्हणतात >>> +१
ओल्ड कॅन्टीन बंद झालेले माहित नव्हते...अरेरे..माझी फारच आवडीची जागा

अगं ३-४ वर्ष झाली.
ओल्ड कॅन्टिनमधे बाहेरचा व्हरांडा, आतला मोठा हॉल होता. पण अजून आतमधे एक हॉल जिथे तीन-चार लांबलचक टेबले( एकावेळेला साधारण १५ विद्यार्थी मावायचे तीन बाजूंनी) आणि बसायला बाक असा प्रकार होता. ते पाह्यलंयस का तू?
तोड नव्हती त्या आतल्या जागेला.

स्टेडियम (चर्चगेट) आहे चालू अजून? सही आहे ते..तिथे बिर्यानी भारी मिळायची...कितीही वेळ ग्रुप करुन बसता यायचं.

बाणेर-पाषाण लिंक रोडवरच्या रिजंट प्लाझा मॉलमधील पगदंडी ?? ह्या कॅफेला भेट दिलीय का कुणी ? समोवरसारखंच कस्टमर्सनी शिकवलेले मेन्यू कार्डावर बघून गंमत वाटली. शिवाय रेटिंगही खूपच चांगलं दिसतंय.

वा! मस्त माहिती मिळते आहे. इथे सिंगापुरात अनेक कॅफे आहेत पण बहुतेक ठिकाणी डिप डिप बॅग गरम पाण्यात टाकली की झालं त्यांच काम. मला तर नवल वाटत स्टारबक्सच्या चहा कॉफीमधे असे काय असते!

पुणे मुंबै मिक्स धागा का केला ?>> कारण मी हा धागा मुंबईची खादाडी मधे तयार केला. पुण्याची खादाडी असा सेक्सन दिसलाच नाही. आणि नवीन सेक्सन तयार करता येत नाही.

पृथ्वी कॅफे.>>> मस्तच जागा. मास कॉमला असताना तिथं बर्‍याच वेळी मित्रांना भेटायला जायचे.

पण नाटक एकच पाहिलं. नीरजाचं!! वेबमास्तर आले होते ते गटग पृथ्वीलाच झालं होतं ना??

पगदंडी >> मधे कवितावाचन, शेरोशायरीचे कार्यक्रम पण असतात.. ऑफिसमधला एक ग्रुप भाग घेतो.. रिव्युज मस्त आहेत..

बाणेर-पाषाण लिंक रोड <<
हे पण पुण्यात येतं हे माझ्या अजून पचनी पडत नाही. Wink

ते गटग पृथ्वीलाच झालं होतं ना?? << हो हो. नाटक बघायला नव्हते वेमा.

Pages