तुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळा कशी निवडलीत / निवडाल?

Submitted by निवांत पाटील on 19 September, 2014 - 04:21

बरेच दिवस हा विषय मनामध्ये घोळत होता. काहि बाफ वर या विषयी थोडीफार चर्चा झाली आहे.

तर लहान मुलांची शाळा हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. काहि ठिकाणी तर त्यावर राजकारण केले गेले. पेपरमध्ये कित्तेकदा सकाळी ४-५ वाजल्यापासुन प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांचे फोटो आले. काहि शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन लोक लोकप्रतिनिधींची चिठ्ठी घेउन येतात तर काही ठिकाणी पैसे. याउलट काहि शाळा मुलांअभावी बंद पडताहेत (या सगळ्या सरकारमान्य नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अथवा जिल्हापरिषदेच्या आहेत ज्या पटसंख्येअभावी बंद पडायच्या मार्गावर आहेत) याची कारणे सर्वश्रुत आहेत त्याबद्दल कृपया इथे चर्चा नको.

विषय असा कि, तुम्ही तुमच्या मुलाला / मुलीला शाळेत घालताना नेमका काय विचार केलात? ( the decision making process).

१) तुम्हाल शाळेकडुन काय अपेक्षा होत्या?
२) त्या अपेक्षा तुम्ही निवडलेली शाळा पुर्ण करेल असे तुम्हाला का वाटले? (नेमका काय सर्वे केलात?)
३) तुम्ही निवडलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा पुर्ण झाल्या का? किती प्रमाणात? कि पुर्ण अपेक्षाभंग झाला? आणि झाला तर त्यावर तुम्ही काय उपाय केलात?
४) आता अपेक्षा व्यतिरिक्त तुम्ही नेमका कोणता कन्व्हिनियन्स बघितला?
५) प्रवेश घ्यायच्या अगोदर तेथील मॅनेजमेंट / स्टाफ यांच्याशी बोललात का?
६) समजा ३-४ शाळांची निवड करुन त्याची प्रायोरिटी ठरवली असेल तर निवड करण्याचे निकष आणि प्रायोरिटी ठरवण्याचे निकष कोणते होते? ( नेमक्या कोणत्या हव्या हव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला? )
७) दुसर्‍या लोकांना तुम्ही या प्रोसेस मध्ये कशी मदत केलीत किंवा त्यांच्याकडुन घेतलीत?

या फक्त काहि रुपरेषा आहेत. याव्यतिरिक्त काहि गोष्टी असतील तर त्याही जरुर नमुद कराव्यात.

धन्यवाद Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'अक्षरनंदन' शाळेमध्ये पुधच्या वर्षी मिळू शकेल. पण त्या शाळेत ४० मुल. घेतात. जर तिकडे नाही प्रवेश मिळाला तर उगाचच. त्याच वर्ष वाया जाएल. शिवाय त्या शाळेत सेमि-एन्ग्लिश नाही.
अभिनव चा अनुभव चान्गला नाही का?

गोळवलकर मध्ये अभ्यासाव्यतिरीक्त बाकीच्या activities घेतात? म्हणजे, खेळ, सन्गीत, सहली?
Spoken english आहे का?

लिटिल मिलेनियम- सोमाट्णे फाटा. . या बबत कोणाल काही माहिती आहे का? किंवा ओव्हरऑल लिटिल मिलेनियम

शाळा निवडिचे निकष -
१) शाळेचे अंतर - घरापासुन १० मिनिट अंतरावर निवड केली. School Bus नको कारण मुंबई मध्ये नेहमी काही न काही होत असते आनी मग बसेस बंद etc etc..
२) आभ्यासक्रम - ICSE कारण जवळच्या शाळेत आहे. मला SSC हवा होता पण होम मिनिस्टर नी ICSE ला प्रधान्य दिले.
३) शाळेचा स्टाफ - शाळा संशोधन चालु असताना त्या त्या शाळेतील स्टाफची वागनूक.
४) मैदान - आवश्यक आहे.
५) फी - जास्त परवडते म्हनून द्यावी हे होम मिनिस्टरला अमान्य.
६) Crowd - उच्च मध्यम वर्गिय असावा.

एकुनच आम्हाला लेक कशी adjust होईल हा प्रश्न होता कारण कि तिचे playgroup to Sr. Kg सिंगापुर मध्ये झाले होते. पण ती छान रुळली आहे आणि आम्हिहि निश्चिंत आहोत.

पुण्यातील वॉल्नट शाळेबद्दल काही ऐकले आहे का?
शिवणे याठिकाणी नवीनच सुरु झालेली असावी.
भाच्याला घालायच्या विचारात आहे.

ऑर्किड इंटरनॅशनल या शाळेबद्दल माहिति हवी आहे. त्यांच्या विविध ठिकाणी शाखा आहेत. कोणत्याही शाखेबद्दल अनुभव असल्यास कृपया सांगावा.

बंगलोर मधल्या शाळांबद्द्ल कोणी माहिती देऊ शकेल कां? CBSE शाळा ... कारण कन्नड भाषा नकोय शक्यतोवर २nd किंवा ३rd language म्हणून ..

अमि, माझ्या ओळखीतल्यांनी ऑर्किडमध्ये मुलाला घातले आहे. त्यांचा अनुभव चांगला आहे. त्यांनी नवी मुंबैत घातले होते. आता ते कुटुंब नोकरीनिमित्त बेंगुळुरात जात आहे. तिथे मुलाला याच शाळेत ट्रान्स्फर करून घेतले आहे.

अमि, हो! ऑर्किड इंटरनॅशनल शाळा चांगली आहे. They teach the best of cbse+icgse (international).. cbse affiliation ची चौकशी करा.

गजानन, तुमच्या ओळखीतल्यांबद्दल - बंगलोर ऑर्किड इंटरनॅशनल चे cbse affiliation under process आहे. शाळा नवीन आणि अजून 7th पर्यंतच आहे. Languages opitions - कन्नड / फ्रेंच असे आहेत. - 1st to 3rd french compulsory. पुढे optional ... . त्यांच्या area नुसार branch-wise थोडा फरक असू शकेल .

आम्हीही सध्या सुपात आहोत … तर just for info! Happy

शुभेच्छा !!

ओवी, अच्छा.
त्यांचा पाल्य बहुतेक आता पहिलीत जाईल. आणि बेंगुरुळात प्लॅन करून दोनच वर्षे वास्तव्य असणार आहे. (त्यांनीही चौकशी केली असेलच अर्थात पण) ही माहितीही त्यांना कळवतो. धन्यवाद.

ओवी, गजानन माहितीबद्दल धन्स. माझ्या घराजवळच ऑर्किड इंटरनॅशनल सुरु झालय. तिथे मी cbse affiliation बद्दल विचारले तर त्यांनी गुळमुळित उत्तरे दिली. तरीही मी नेटाने खोदून चौकशी केल्यावर त्यांनि कबुल केले की त्यांचे affiliation अजुन आले नाही आहे. आणि ते प्रयत्न करतायत.

शाळा नविन असल्याने प्रत्यक्ष शिक्षकांबद्दल सांगणारे अजुन कोणी भेटले नाही.

च्यामारी, जवळ जवळ १ वर्शंअनी मी धागा वर काधला, पण माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारे कोणिच नाही?

affiliation अजुन आले नाही आहे >>> हाच कळीचा मुद्दा आहे !

पुण्यातली आता काही कल्पना नाही गं मुग्धा… तू मला बंगलोर मधले सांग बरं! Wink

affiliation ला वेळ लागतो असे ऐकून आहे. ICSE सुद्धा ६वी पर्यंत तुकड्या सुरु केल्याशिवाय देत नाही. चेंबूरमद्ये ग्रीन एकर्स शाळेने affiliation नाही मिळालय असं स्पष्ट लिहिलं होतं. त्यामुळे ऑर्कीड च्या लपवाछपवीचा राग आला.

हम्म … ऑर्किड नविन आहे पण promising आहे. तुम्हाला cbse board च हवे असा काही issue नसेल तर विचार करायला हरकत नाही. Establish झाली की reputation वाढेल तिचे! आणि मग फी पण !! Happy
अर्थात लपवा-छपवी नकोच.

वॉलनट शाळा शिवणे त आहे
अजुन ३रे पर्यन्त च आहे बहुतेक
मिलेनियम च्या च लोकांनी सुरु केलि अहे अस ऐकून आहे

माझ्या एका मैत्रिणीची मुलगी या वर्षी वालनट( व+ऑ कसं लिहायचं..?) मधे 5 वीत आहे..
ती अन लेक शाळेवर खुश आहेत...
मिलेनियमच अवनी ने लिहीलय तसंच ती सांगत होती..

मी अमि, माझ्या मुली जातात ऑर्किड्स मध्ये. हे पहिलेच वर्ष आहे त्यांचे. आम्ही लंडनहून इकडे (ठाण्यात) रहायला आलो नुकतेच. शाळेचा अनुभव उत्तम. सीबीएसई अफिलियेशन साठी प्रयत्न चाललेत त्यांचे. शाळेचे दुसरेच वर्ष आहे. त्यामुळॅ थोडा वेळ लागू शकतो.
मी ही शाळा का निवडली -
१. शाळेची वेळ - ९ ते ४, नंतर डेकेअर ची शाळेतच सोय
२. एका वर्गात जास्तित जास्त ३० मुले.
३. फूटबॉल ग्राऊंड - शाळेला मैदान हा माझा निकष नव्हता कारण हल्लीशाळांन्मध्ये फावल्या वेळात, फ्री तासाला बाहेर खेळायला पाठवत नाहीत. पण इकडे फुटबॉल ही एक अ‍ॅक्टिविटी आहे, आठवड्यातून एकदा.
४. शाळेच्या अभ्यासक्रामातच स्विमिंग, कराटे/स्केटींग, गिटार्/कीबोर्ड, नाच सारखी रोज १ तास अ‍ॅक्टीविटी. पूर्ण वेळ अभ्यास नाही.
५. सतत परिक्शा नाहीत. वर्षातून २च मोठ्या परिक्षा. बाकीच्या अचानकच, न सांगता घेतात.
६. स्वच्छ हवेशिर वर्ग. मजल्यावरही भरपुर मोकळी जागा.
७. हिंदीला पर्याय फ्रेंच. इंग्लंडमध्ये राहिल्याने मुलीना फ्रेंच येत होते पण हिंदी अजिबात येत नव्हते.
८. मराठी कंपल्सरी विषय. - या देशात परत येताना मुलींना उत्तम मराठी समजावे आणि लिहीताही यावे अशी इच्छा होती. घरी मराठीच बोलत असल्याने मुलींना मराठी समजत होतेच.
९. फिल्ड ट्रिप्स. - शिकवलेल्या धड्याशी संबधित फिल्ड ट्रिप्स असतात मोठ्या मुलांनाही. नेहरू प्लॅनेटोरिअम, फायर स्टेशन, संजय गांधी नॅशनल पार्कला नेले. त्याचबरोबर जवळच्या जवळही कुठेतरी काहीतरी दाखवायला नेतात.

चुकीच्या वाटलेल्या गोष्टी -
१. सारखे कशासाठीतरी पैसे भरायचे असतात.
२. वाद्ये शिकवणारे शिक्शक बदलत रहातात.
३. मधून मधून अभ्यास पूर्‍ण करण्यासाठी शनिवारी शाळा असते.
४. सगळ्याच बाबतित अजूनही थोडा नवखेपणा आहे. पण शाळा नविन आहे त्यामुळे हे अपेक्शित आहेच.

प्रत्येक शाळेचे काही फायदे तोटे असतातच. आम्हालातरी शाळा आवडली. मुलीना सगळ्याच शिक्षिकांचा उत्तम सपोर्ट मिळाला. विषय समजावून सांगण्याची पद्धत चांगली आहे.

सीबीएसई अफिलियेशन साठी प्रयत्न चाललेत त्यांचे >> हे असेल तर हिंदी दुसरी भाषा होईल म्हणजे ऐच्छिक विषय नसेल.

अदिती, खुप चांगली माहिती दिलिस.
या माहितीशी मी त्यांच्या कुर्ल्याच्या शाळेची तुलना केली तर हे मुद्दे मनात येत आहेतः
३. फूटबॉल ग्राऊंड -ग्राऊड असे जे काही आहे ते लहान आहे.
स्वच्छ हवेशिर वर्ग. मजल्यावरही भरपुर मोकळी जागा. - आधीच कमी जागेत इमारत बांधलेली असल्याने खुप मोकळी जागा नाही.

Pages