तुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळा कशी निवडलीत / निवडाल?

Submitted by निवांत पाटील on 19 September, 2014 - 04:21

बरेच दिवस हा विषय मनामध्ये घोळत होता. काहि बाफ वर या विषयी थोडीफार चर्चा झाली आहे.

तर लहान मुलांची शाळा हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. काहि ठिकाणी तर त्यावर राजकारण केले गेले. पेपरमध्ये कित्तेकदा सकाळी ४-५ वाजल्यापासुन प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांचे फोटो आले. काहि शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन लोक लोकप्रतिनिधींची चिठ्ठी घेउन येतात तर काही ठिकाणी पैसे. याउलट काहि शाळा मुलांअभावी बंद पडताहेत (या सगळ्या सरकारमान्य नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अथवा जिल्हापरिषदेच्या आहेत ज्या पटसंख्येअभावी बंद पडायच्या मार्गावर आहेत) याची कारणे सर्वश्रुत आहेत त्याबद्दल कृपया इथे चर्चा नको.

विषय असा कि, तुम्ही तुमच्या मुलाला / मुलीला शाळेत घालताना नेमका काय विचार केलात? ( the decision making process).

१) तुम्हाल शाळेकडुन काय अपेक्षा होत्या?
२) त्या अपेक्षा तुम्ही निवडलेली शाळा पुर्ण करेल असे तुम्हाला का वाटले? (नेमका काय सर्वे केलात?)
३) तुम्ही निवडलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा पुर्ण झाल्या का? किती प्रमाणात? कि पुर्ण अपेक्षाभंग झाला? आणि झाला तर त्यावर तुम्ही काय उपाय केलात?
४) आता अपेक्षा व्यतिरिक्त तुम्ही नेमका कोणता कन्व्हिनियन्स बघितला?
५) प्रवेश घ्यायच्या अगोदर तेथील मॅनेजमेंट / स्टाफ यांच्याशी बोललात का?
६) समजा ३-४ शाळांची निवड करुन त्याची प्रायोरिटी ठरवली असेल तर निवड करण्याचे निकष आणि प्रायोरिटी ठरवण्याचे निकष कोणते होते? ( नेमक्या कोणत्या हव्या हव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला? )
७) दुसर्‍या लोकांना तुम्ही या प्रोसेस मध्ये कशी मदत केलीत किंवा त्यांच्याकडुन घेतलीत?

या फक्त काहि रुपरेषा आहेत. याव्यतिरिक्त काहि गोष्टी असतील तर त्याही जरुर नमुद कराव्यात.

धन्यवाद Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडेही फूटबॉल ग्राऊंड लहानच आहे पण माझ्या माहितीतल्या मोठे ग्राऊंड असणार्‍या शाळांमध्येही बाहेर खेळायला फारसे पाठवतच नाहीत. माझ्या दॄष्टीने तो मुद्दा गौण होता.

@ राजू, सी बी एस ई झाल्यावरही हिंदीऐवजी फ्रेंच ठेवता येते. आजच शाळेशी बोलून कंफर्म केले. माझ्या ओळखितल्या एका मुलीने आताच दुसरा विषय फ्रेंच घेउन सीबीएसी ची १०वीची परिक्शा दिली, चेन्नईमध्ये.

ऑर्किड्स ठाणे मध्ये मराठी मात्र कंपल्सरी आहे १०वी पर्यंत.

धन्स अदिती!

मीपण माहिती काढली (म्हणजे बायकोला विचारलं). आमच्याकडे नवी मुंबईत, एपीजे स्कूल, नेरूळ मध्ये
तिसरीपर्यत इंग्लिंश आणि हिंदी निर्वाय भाषा, नंतर चौथीला इंग्लिंश, हिंदी आणि मराठी निर्वाय भाषा, पाचवी ते आठवी इंग्लिंश आणि हिंदी निर्वाय भाषा आणि ऐच्छीक म्हणून मराठी/ फ्रेन्च/ संस्कृत आहे नंतर नववी आणि दहावीला इंग्लिंश निर्वाय भाषा आणि ऐच्छीक म्हणून हिंदी/ मराठी/ फ्रेन्च/ संस्कृत आहे.

I think in CBSE Hindi is compulsory second language up to 8th. After 8th we can chose between Hindi, French, German, Spanish etc.

मुलीचा जन्म सप्टें २०१५ चा आहे, कांदिवली मधल्या चांगल्या शाळा सुचवु शकाल का? शक्यतो कांदिवली पुर्व.
निकषः
शाळा जास्त लांब नसावी, ईंग्लिश माध्यम, अभ्यासाचे जास्त बर्डन नको. एक्स्ट्रा अ‍ॅक्तिव्हीटीज हव्यात.
गुंडेचा (?) शाळेचा फीडबॅ़क कसा आहे?

माझा मुलगा गुंडेचा मधेच आहे. नर्सरी. शाळा चान्गली आहे. सेप्ट. ऑक्टो. मधे फोर्म्स येतात. पण या वर्षी बहुतेक अजुनही अ‍ॅडमिशन्स चालू आहेत. शाळेत कंफर्म करुन घ्या.

Pages