=================================================
=================================================
कधी कधी एखादे पुस्तक, कादंबरी, कथा वाचताना त्यातील एखादे वाक्य खुप आवडुन जाते किंवा मनाला पटते आणि त्या वाक्याची नोंद करण्याचा मोह आवरत नाही. कॉलेजात असताना कथा, कादंबरी, वृत्तपत्रे यातील अशीच आवडीची वाक्ये डायरीत नोंद करण्याची सवय होती. जर स्वत:चे पुस्तक असेल तर त्यावरच मार्क करायचो आणि ग्रंथसंग्रहालयातील पुस्तक असेल तर त्याची नोंद डायरीत व्हायची. एकदा "वपूर्झा" वाचनात आले आणि त्यातील वाक्यांची नोंद डायरीत करत गेलो. नंतर लक्षात आले कि हे सारे पुस्तकच संग्रही ठेवण्यासारखे आहे. :-). अशीच तुम्हाला आवडलेली वाक्ये (कथा, कादंबरी, वृत्तपत्रे, सुविचार, इ. इ. ) आपण येथे शेअर करूया. जर पुस्तकाचे, लेखकाचे नाव माहित असेल तर त्याची नोंद अवश्य करा.
=================================================
=================================================
आवडलेली वाक्ये
Submitted by जिप्सी on 23 February, 2011 - 00:49
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....तरी पण बिनवाचणार्यान्नी
....तरी पण बिनवाचणार्यान्नी खूप वाचायला हवे. कारण वाचनाने फार काही साधत नाही, हे देखील कळते खूप खूप वाचल्यावरच!
- अवधूत परळकर
Facebook च्या रोजच्या updates
Facebook च्या रोजच्या updates मधून आलेली ही एक पोस्ट. मला आवडली म्हणून पोस्ट करते आहे. नाही आवडलं किवा ह्या धाग्याशी सुसंगत पोस्ट नसेन तर कृपा करून सांगा....मी काढून टाकेन.
प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव आणि कुठेतरी संभाळून सेव ही ठेवा परत वाच्यानासाठी!
'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...
- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.
मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...
एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..
~ सुप्रभात , mkpka.... ~
By: Me ka prem kele asav ?
पारिजातकाचे झाड हलवावे आणि
पारिजातकाचे झाड हलवावे आणि धपाधप फुलांचा सडा पडावा, तसं सुख यावं आयुष्यात....
कावळ्याची बायको अंडी सांभाळत
कावळ्याची बायको अंडी सांभाळत असल्यामुळे कोकिळा लता मंगेशकर ठरू शकते
-'बेफिकीर'!
मनाला येईल तसे वागता
मनाला येईल तसे वागता येण्यासाठी वक्तृत्वकला आवश्यक आहे. फक्त ही कला आईसमोर नाही सादर करता येत
-'बेफिकीर'!
खरे तर, माणूस फक्त रिअॅक्ट
खरे तर, माणूस फक्त रिअॅक्ट मोडमध्ये असतो
गणपती दूध प्यायला होता त्याच
गणपती दूध प्यायला होता त्याच वर्षी इन्टरनेटची संकल्पना अस्तित्वात आली
मी माझ्याबरोबर जेव्हा फिरायला
मी माझ्याबरोबर जेव्हा फिरायला जातो, तेव्हा आमच्या गप्पाच होऊ शकत नाहीत
मी नोंदवलेली सर्व वाक्य माझी
मी नोंदवलेली सर्व वाक्य माझी आहेत
इतरांची वाक्ये नोंदवायची असल्यास कल्पना नाही
याच तारखेला भारतातील सकाळी संपादीत करेन
-'बेफिकीर'!
(ही सर्व वाक्ये मी ज्या वेळी प्रकाशित केली त्याच वेळी लिहिली, हेही संपादीत करेन)
गांधींचा विरोध हाही गांधीवादच
गांधींचा विरोध हाही गांधीवादच असून गांधीवादाचा पुरस्कार हा गांधींचा विरोध आहे
-'बेफिकीर'!
जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा
जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना आता कोणीही करत नसल्यामुळे जन्मोजन्मी नेमका तोच नवरा मिळतो
-'बेफिकीर'!
............ह्सण आणि ह्सवण !
............ह्सण आणि ह्सवण ! वा: वा:! परमेश्वराचि माण्साला हि केवधि देणगि ! फक्त माण्साला त्या देणगिचि जाणिव हवि......
पुस्तक......... दोस्त
लेखक्...........व.पु. काळे
गणपती दूध प्यायला होता त्याच
गणपती दूध प्यायला होता त्याच वर्षी इन्टरनेटची संकल्पना अस्तित्वात आली >> आं ? कायच्याकाय ? तुम्हाला असे काही असते असे कळले असेल. इंटरनेटची संकल्पना फार पूर्वीची आहे.
"माझ्या सिगारेट्स सूर्य
"माझ्या सिगारेट्स सूर्य पेटवित नाही म्हणून सुर्याला शिव्या देण्यात काही अर्थ नाही " -कार्लाइल
"जर देव असतील तर मी देव नसणे कसे शक्य आहे ? म्हणून देव नाहीतच "- झरतुष्ट्र
असेच कुठेतरी वाचलेले "A white
असेच कुठेतरी वाचलेले
"A white candle In a holy place, So is the beauty of an aged face"
" कुणाची जरी असली तरी आई ह्या
" कुणाची जरी असली तरी आई ह्या नात्याला फसवू नये :
-- व.पु.काळे
"जीवन्तपणी मरण अनुभवायच असेल
"जीवन्तपणी मरण अनुभवायच असेल तर माणसाने प्रेम कराव. कारण प्रेमात आणी मरणात "स्व" उरत नाही"
- -व.पु.काळे
जीवन्तपणी मरण अनुभवायच असेल
जीवन्तपणी मरण अनुभवायच असेल तर माणसाने प्रेम कराव. कारण प्रेमात आणी मरणात "स्व" उरत नाही >> हल्लीच्या पिढीला अपील होईल का हे ?
घाई कशाला हो करता ? तुमच्या
घाई कशाला हो करता ? तुमच्या हॉर्नमुळे सिग्नल बदलणार नाही.
- पुण्यातलं एक वाहन, लेखक - अज्ञात
हॉर्ममुळे > हॉर्न मुळे
हॉर्ममुळे > हॉर्न मुळे >>असे असेल
बरोबर धन्यवाद प्रितीभूषण
बरोबर
धन्यवाद प्रितीभूषण
विंचवाच्या नांगीत विष तर
विंचवाच्या नांगीत विष तर सापाच्या डोक्यात विष! जनावरांच्या बाबतीत पटकन सांगता तरी येतं, माणूस हा एकच असा प्राणी आहे की त्याचं विषाचं मर्मस्थान सापडलेलं नाही.
गणपती दूध प्यायला होता त्याच
गणपती दूध प्यायला होता त्याच वर्षी इन्टरनेटची संकल्पना अस्तित्वात आली
>>
गणपती दूध प्याला होता १९९५ की १९९६ ला. त्यावर्षी लेखकाला इन्टरनेट माहीत झाले असेल.
एका कार च्या पाठी मागे
एका कार च्या पाठी मागे लिहीलेले..
लेखक/कवि/ओवीकार.. अज्ञात..
मन रुपी मोगरा अर्पुनी ईश्वरा...
पुनरपी संसारा येणे नाही..
मन हा मोगरा अर्पुनी
मन हा मोगरा अर्पुनी इश्वरा
पुनरपि जन्मा येणे नाही.
..
हे गाणे आहे.
यश हे केवळ यश असतं, तोपर्यंत
यश हे केवळ यश असतं, तोपर्यंत सारं ठीक असतं; पण यशाला क्रमांक दिला जाऊ लागला, की खरी अडचण सुरु होते.
वन लाईनर्स आवडायचे दिवस
वन लाईनर्स आवडायचे दिवस असतात. वपुंचे वन लायनर्स मागच्या पिढीला आवडायचे. त्यांच्यामुळं पार्टनर वाचलं त्यालाच कितीतरी वर्षं झाली. त्यातली काही वाक्यं कथेच्या ओघात ठीक. पण पुस्तकात अशा वन लाईनर्सची पेरणी अशी केलेली असायची की ते एखादं बोधवाक्य असावं. कॅची लाईनर्स हे वपुंचं वैशिष्ट्य होतं. पण काही वर्षांनी ती वाक्यं अपील होत नाहीत. आजच्या पिढीला कितपत होतील याबद्दल शंका वाटते. एकदा अनुभवण्यासाठी मात्र उत्तम आहेत.
उदा.
दोघात तिसरा येणं हा नरकच
ज्या वेळी गरज असेल तेव्हां दोघात तिसरा न येणं हा ही नरकच.
दवणीय वाक्यांचे अनेक चाहते
दवणीय वाक्यांचे अनेक चाहते असतीलच. पूर्वी दवणीय साहीत्याचा बोलबाला असतांना अनेक वाक्यं लक्षात राहीलेली.
मृत्युंजय - शिवाजी सावंत
आठवणी हत्तीच्या पायांसारख्या असतात. खूप खोलवर आपला ठसा उमटवून जातात.
त्या वेळी आवडलेलं पण आता नावीन्य असावं असं वाटत राहणारं असं हे एक वाक्यं.
आयुष्य ही एक बासरी आहे, जवळ
आयुष्य ही एक बासरी आहे, जवळ घेता आली पाहिजे
आपलेच श्वास आपलेच ओठ सुरात लावता आली पाहिजे.
मला खूप आवडणा-या ओळी आहेत. मी शाळेत असताना अमच्या एका सरानी सान्गितल्या होत्या
इतका उत्तम धागा काढल्याबद्दल
इतका उत्तम धागा काढल्याबद्दल मनापासून आभार...
सगळ्यांचे प्रतिसाद छान आहेत.....पुन्हा पुन्हा वाचले... अतिशय सुरेख...
Pages