आवडलेली वाक्ये

Submitted by जिप्सी on 23 February, 2011 - 00:49

=================================================
=================================================
कधी कधी एखादे पुस्तक, कादंबरी, कथा वाचताना त्यातील एखादे वाक्य खुप आवडुन जाते किंवा मनाला पटते आणि त्या वाक्याची नोंद करण्याचा मोह आवरत नाही. कॉलेजात असताना कथा, कादंबरी, वृत्तपत्रे यातील अशीच आवडीची वाक्ये डायरीत नोंद करण्याची सवय होती. जर स्वत:चे पुस्तक असेल तर त्यावरच मार्क करायचो आणि ग्रंथसंग्रहालयातील पुस्तक असेल तर त्याची नोंद डायरीत व्हायची. एकदा "वपूर्झा" वाचनात आले आणि त्यातील वाक्यांची नोंद डायरीत करत गेलो. नंतर लक्षात आले कि हे सारे पुस्तकच संग्रही ठेवण्यासारखे आहे. :-). अशीच तुम्हाला आवडलेली वाक्ये (कथा, कादंबरी, वृत्तपत्रे, सुविचार, इ. इ. ) आपण येथे शेअर करूया. जर पुस्तकाचे, लेखकाचे नाव माहित असेल तर त्याची नोंद अवश्य करा.
=================================================
=================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती खोल पात्र आहे! केवढं विस्तीर्ण! अलिकडे पाण्याचा प्रवाह. पलिकडे पसरलेलं वाळूचं अफाट मैदान.

नाही, पण हें कुणीं केलं? कुणी रचलं हें एवढं कौतुक! मनुष्य लहानसं झोपडं बांधतो, तर त्याच्यावर शानदार नांवाची पाटी लावून ठेवायला धडपडतो. अमुकानं हे बांधलं. तो तमुकाचा मुलगा. अमुकाचा नातू. अमुकाचा पणतू. अमुकाचा खापरपणतू. एवढं त्याचं वय. असा त्याचा रंग. असा त्याचा बांधा. एवढीं त्याला मुलं - काय काय अन् काय काय?

तर मग हे एवढं थोरलं विश्व ज्यानं रचलं, तो कां कधीच असलं कांही सांगत नाही? कधीच कसा पुढे येत नाही?

या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत म्हणे. दिसूं न शकणार्‍या. आमचं सूर्यमंडळ म्हणजे त्यापुढं कांहीच नव्हे. अनंत हा शब्दही सांत होतो - कुठंतरी थबकतो, तिथंच विरून जातो.

त्याच्याहि पलिकडे जें उरतं, तें किती - कसं - केवढं!

पण कर्ता माहीत नाही - माहीत होण्याची शक्यता नाही. केवढी दाहक व्यथा!

(कुणा एकाची भ्रमणगाथा)

Hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies. - Shawshank Redemption

Pages