विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण बराच वेळ बघितली मॅच पण नंतर बोअर व्हायला लागलं म्हणून बंद करुन टाकली.

अफ्रिकेनी एन्झी वाल्यांसमोर नांगी टाकू नये असं फार वाटतं, एकदम चुरशीची झाली मॅच तर फार मजा येइल. ऑस्ट्रेलिया एन्झी च्या मॅच सारखी लो स्कोरिंग मॅच व्हायची टोटल शक्यता आहे.

समस्त क्रिकेट्प्रेमींना पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्या भारतीय संघाला व तुम्हालाही भरघोस यश व आनंद घेउन येवो हीच सदिच्छा! > १+२ ! Happy

ऋन्मेष.. तुला लूजिंग कॉजमधे ३० ओव्हर्समधे २५० रन्स केल्याचे एवढे अप्रूप वाटते? हे म्हणजे वॉर हरलो ना कोइ.. बात नही.. पण आम्ही त्या वॉरमधे एक ( ते सुद्धा अगदी इन्सिग्निफिकंट!) छोटेसे बॅटल जिंकल्याची शेखी मिरवण्यासारखी गोष्ट आहे..
>>>>>>>>>>>

मुकुंद माझ्या आधीच्या पोस्ट वाचा, हे अप्रूपाने वा कौतुकाने म्हटलेले नाहीये. Happy

५० षटकांच्या सामन्यात २० षटके फुकट घालवत ३० षटकात २५० धावा ठोकत का होईना सर्वबाद होणे हे मुर्खपणातच मोडते.
परिणामी या ३० मध्ये १० ओवर तुम्हाला सर्वोत्तम गोलंदाज बोल्टच्या खेळाव्या लागल्या.

समस्त क्रिकेट्प्रेमींना पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नविन वर्ष
आपल्या भारतीय संघाला व तुम्हालाही भरघोस यश व आनंद घेउन येवो हीच सदिच्छा! >>>> +1

लोक्स , तुमची एनर्जी भारत व्हर्सेस ऑस्ट्रेलिया साठी सांभाळून ठेवा. जागरण वगैरे या match साठी करा

गुडलक इंडिया

धोनीची देहबोली अफलातून झाली आहे. पहिल्यांदाच असे वाटत आहे की ऑस्ट्रेलियाशी खेळण्याचे टेन्शन येत नाही आहे, Happy

भारत वि बांग्लादेश कॉ फा मध्ये १७ चुका अंपायरनी केल्या होत्या आणि त्यामुळेच भारत जिंकला असा दावा आयसीसीच्या प्रेसींडेंट बांग्लादेशच्या मुस्ताफा कमाल यांनी केलाय.

भारत वि बांग्लादेश कॉ फा मध्ये १७ चुका अंपायरनी केल्या होत्या आणि त्यामुळेच भारत जिंकला असा दावा आयसीसीच्या प्रेसींडेंट बांग्लादेशच्या मुस्ताफा कमाल यांनी केलाय.
>>>>>>

१७ ???
म्हणजे मी बातमी वाचली ही आणि इग्नोर मारली...
सारी कायनात जुटी है भारत को ये विश्वचषक जिताने को टाईप होती..
पण १७ चुका वगैरे आकडा नव्हता त्या बातमीत.. कोणत्या १७ चुका? एवढ्या तर माझ्या पेपरात स्पेलिंग मिस्टेकही व्हायच्या नाहीत..

रोहितचा नो बॉल निश्चितच चुकीचा निर्णय होता जो बांग्लाला महागात गेला. पण नंतर मात्र कुठेही रोहितनी त्यांना जमू नाही दिलं.
They could've trapped him again like we did Vs West Indies. I think Gayle was dropped once but we trapped him again. They can't blame the umpire for their own problems.
Sore losers.

मुळात असे फिक्सिंग करवत भारताला जिंकवायचे असते तर व्हाईटवॉश वाल्या कसोटी मालिकांमधील एखादी कसोटी तरी जिंकवली असती.. भारतीय पब्लिकचा ईंटरेस्ट बनून राहायला.. तसेच या विश्वचषकाच्या आधीच्या तिरंगी मालिकेतही सर्वच सामने हरायला लावले नसते..

<<रोहितचा नो बॉल निश्चितच चुकीचा निर्णय होता >> हे खरे आहे. रोहित तसाही तेव्हा आउट झाला असता तर हिन्दुस्तान चे २०/३० रन्स कमी झाले असते कदाचित. आणि २७०/२८० पाठलाग करने बांग्ला ला शक्य नव्हते.. म्हन्जे रीझल्ट काहि चेंज झाला नसता..

विश्वचषक सुरु होताना वर्तवलेला सेमीजचा अन्दाज तर बरोबर आला ..... पण आता पुढच्या मॅचेसचा अंदाज चुकावा असे मात्र मनापासुन वाटतेय
Screenshot_2015-03-22-08-29-02_1.jpg

तसे असेल तर आपली पहिली फलंदाजी असताना कोहलीला अनुष्काने टार्गेट दिले पाहिजे. अमुकतमुक धावा करशील तर अमुकतमुक.. Wink

काल रात्री हायलाईट्स मधे गुप्तिलची खेळी बघण्यात आली. फारच सुरेख खेळला. सगळे षटकार त्याने क्रिजमधुनच मारले होते एकही शॉट बाहेर येउन मारला नाही. अर्थात न्युझीलंड च्या छोट्या ग्राउंड्स वर जागच्याजागी देखील षटकार मारु शकतातच. परंतु एक बाब लक्षात आली. इतक्या प्रदिर्घ खेळीत गुप्तीलला अजिबात थकवा जाणवला नाही अथवा दम लागलेला देखील बघितले नाही. दुसरीकडे वेस्ट इंडीजचे बॉलर फिल्डर यांना घामाचा वर्षाव होत होता. पण गुप्तिलला घाम अजिबातच आलेला दिसला नाही? गुप्तिल बरोबर खेळणारा टेलर ज्याने तब्बल ९० मिनिट मैदानात घालवली त्याला देखील घाम आलेला होता. या प्रकाराची तुलना म्हणुन सकाळी रोहितच्या इनिंग्स बघितल्या. २०० रन्स म्हणजे जवळपास २५ ओव्हर्स पेक्षा जास्त खेळणे इतका वेळ दम न लागता , घामटा न निघता खेळणे निव्वळ अशक्यच आहे. वेलिंग्टनचे तेव्हाचे तापमान बहुदा १५सेल्सिअस पेक्षा जास्त होते.

या बाबींवर अजुन कुणाचे लक्ष गेले का?

अरे बाप रे!
क्रिकेट मध्ये उत्तेजक द्रव्य चाचणी बंद केली का?
की घेतच नाहीत कधी?

वाडा तर्फे क्रिकेटर्सच्या टेस्ट केल्या जातात ना?

फिटनेस देखील असु शकतो परंतु २२५ मिनिट तो मैदानात होता म्हणजे जवळपास ४ तास कंटीन्यु खेळत होता. भारतीय उपखंडात १ तासातच हेल्मेट मधुन पाणी गळु लागते हे बघितले आहे. इथे ३३ सेल्सिअस तापमान सरासरी जरी धरले तर न्युझीलंडचे तापमान सरासरी १२-१४ सेल्सिअस धरता येईलच. इतक्या तापमानात ४ तास घामाचा लवलेशही न येता खेळत राहणे फक्त खटकले. कारण त्याच मैदानावर इतर खेळाडुंच्या घामाच्या धारा लागलेल्या. बॉलरचा स्टार्टअप जितका असतो तितके अंतर बॅट्समन एका धावेत धावतो. ६०-७० रन्स सिंगल्स आणि २० + रन्स हे डब्बल मधे काढले आहेत.

म्हणुन ही बाब खटकली आणि अधिक माहिती कळण्याकरीता इथे टाकली. इतकेच Happy

मुद्दा नाही म्हणु शकत बेफी. त्यावेळेस मी मॅच बघितली नव्हती नुसते स्कोरबोर्ड कंम्पुटर वर बघितलेला. काल हायलाईट्स बघितल्या तेव्हा लक्षात आले. आपल्याला इथल्या मॅचेस बघण्याची जास्त सवय. त्यामुळे सतत खेळाडुंचे घामजलेले चेहरे. फलंदाजांचे दम घेण्यासाठी थांबणे, हेल्मेट मधुन पाणी दाबुन काढणे, ग्लोज बदलणे, हे सगळे बघंण्याची एक सवय झाली आहे. त्या मॅच मधे गुप्तिलबाबत असे काहीच घडले नाही. म्हणुन सवयीप्रमाणे अरेच्चा असे कसे म्हणुन खटकले इतकेच

काल रात्री हायलाईट्स मधे गुप्तिलची खेळी बघण्यात आली > >हायलाईटस्मधे घाम गाळताना दाखवला नसेल असे साधे स्पष्टीकरण असू शकेल ?

हायलाईटस्मधे घाम गाळताना दाखवला नसेल असे साधे स्पष्टीकरण असू शकेल ?> नक्कीच असु शकेल परंतु जशी ही गोष्ट मी इथे सांगितली तशीच मित्रांना पण विचारली ज्यांनी पुर्ण मॅच बघितली. त्यांना देखील जाणवले.
दम लागणे हे हायलाईट मधे लपुन राहिले नसते. कारण शेवट पर्यंत तो तसाच खेळला जसा सुरुवातीला खेळला.
ज्यांनी कोणी मॅच प्रत्यक्ष लाईव्ह बघितली त्यांना जाणवेल कदाचीत. मी काही या गोष्टी आरोप म्हणुन बोलत नाही मी फक्त या नेहमी घडणार्‍या गोष्टी त्या मॅच मधे त्याच्या बरोबर घडल्या नाही इतकेच बोलत आहे.

माझ्या माहितीप्रमाणे आयसीसीचे सुध्दा उत्तेजक द्रव्य चाचणीचे नियम आहेत. एका वर्ल्डकप स्पर्धेपुर्वी शेन वॉर्न उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती.

हायलाईटस्मधे घाम गाळताना दाखवला नसेल असे साधे स्पष्टीकरण असू शकेल ? >>>>> अगदी!!
कबीर तुम्ही फक्त सांगितलं असेल पण लोकं लगेच उत्तेजक द्रव्यांपर्यंत पोहोचली ना ! एकदम conclusion काढून मोकळे लगेच !

ख्रिस गेलला घाम येतो, गप्टिलला येत नाही

(त्याला पाऊस आवडतो, तिला आवडत नाही - या चालीवर वाचावे Proud )

>>>कबीर तुम्ही फक्त सांगितलं असेल पण लोकं लगेच उत्तेजक द्रव्यांपर्यंत पोहोचली ना ! एकदम conclusion काढून मोकळे लगेच !<<<

माफ करा, पण जर तिथे पोचायचे नसेल तर हा मुद्दा नुसता सांगण्यात काही अर्थच नाही ना?

हा खरे तर फार महत्वाचा मुद्दा आहे.

किंबहुना आता मलाही आठवत आहे की गुप्टिल एकदम फ्रेशच वाटत होता.

अवांतर - आजच सिंहगडवर भाच्याबरोबर गेलेलो होतो तेव्हा निव्वळ शंभर पायर्‍या चढून दम लागला आणि घामही आला. भर उन्हात गेलो होतो म्हणून! तेव्हा त्यावरून विषय निघाला की क्रिकेटर्स इतके धावतात तेव्हा डिहायड्रेट कसे होत नसतील? इतर बरीच चर्चा झाली आणि रोहित शर्माच्या २६४ चा विषयही निघाला. अधल्यामधल्या ब्रेक्समध्ये भरपूर एनर्जी ड्रिंक्स, पाणी वगैरे देऊन डिहायड्रेशन टाळले जाते अशी चर्चा झाली. आत्ता कबीरांचा हा मुद्दा वाचून हा प्रसंग आठवला इतकेच.

उत्तेजक द्रव्यांपर्यंत पोहोचली ना > कोण कुठे पोहचेल यावर माझे बंधन नाही. मी बहुतेक मॅच बघितल्या आहे. रात्री मॅच पॉईंट मधे देखील दाखवतात आणि ११ नंतर पुर्ण मॅच देखील. त्यामु़ळे बहुदा मला तो फरक जाणवला. इतकेच आता तो बदल इतरांना जाणवला का ? इतकेच मी विचारले. कारण त्याचे ताजेतवाने इनिंगच्या शेवटी असणे मला थोडे ऑड वाटले. हा थकलाच नाही काय फिटनेस आहे व्वा. असे विचार सुरुवातीला आलेच होते. अजुन ही आहेतच.
दुसर्या बाजुने बोलणे म्हणजे उत्तेजक द्रव्याचाच संशय घेणे असे दरवेळेला नसतेच.

Pages