विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
हा छान जमला आहे हायझेनबर्ग
हा छान जमला आहे हायझेनबर्ग विशेषतः
Gollum - ऑसी टीम - "My precious"
>>
इन्ग्लिश टीम -- Thorin and 13 dwarves.
"sad or merry, I must leave it now. Farewell"
निलिमा बँग ऑन, पण मी थॉरिन
निलिमा बँग ऑन, पण मी थॉरिन ओकेन्शील्ड आणि एबी असा विचार करत होतो. त्याचे ही परक्रमी पूर्वच्ज असेच काय चोक करत असतात.
अमलाला तर गेट अप नाही करावा लागणार, बालिन चा.
डु प्लेसी आणि डी कॉक ला अनुक्रमे फिली आणि छोटा किली बनवून टाकू.
इंपोर्ट केलेल्या ताहिरला ड्रॅगन स्लेयर बार्ड.
जाई.. तु एवढे सगळे मस्त मस्त
जाई.. तु एवढे सगळे मस्त मस्त गोड पदार्थ देणार म्हटल्यावर मी रमड व वैद्यबुवा ला आपण वर्ल्ड कप जिंकलो तर साखर देईन अस म्हटल्याचे आठवले व तुझ्या एवढ्या मस्त ट्रिट्नंतर माझी साखर म्हणजे मेरुपर्वतासमोर मुंगी असेल अस वाटायला लागले..:)
अरे असामी.. कालचा तो मॅक्सवेलचा चौका मला तरी निव्वळ मटका वाटला.. कशी बशी बॅट लावता आली त्याला बाउंसरपासुन सुटका करुन घेताना. काल वॉर्न त्याला व ए.बी डी ला एकाच तराजुत मोजत होता ते ऐकुन माझ्या डोक्यातच गेला वॉर्न.. मॅक्सवेल फटकेबा़जी करु शकतो हे मान्य पण त्याची फटकेबाजी अडमतडम प्रकारातली (पण इफेक्टिव्ह) अशी म्हणता येईल.. पण ए बी डी हॅज अ अनबिलीव्हेबल क्लास!
खरच काल पाकीस्तानने मोक्याचे झेल पकडले असते तर सामना चुरशीचा झाला असता. पण बॅटींग वॉज अॅट्रॉशिअस! मला तर वाटले की पाकीस्तानचे फलंदाज एरन फिंचला मिड्विकेट बाउंडरी वर कॅच प्रॅक्टिस देत आहेत की काय! वहाबला तो बॅटींग करताना स्टार्कने उखडवल्यामुळे वहाबने जिव तोडुन बोलिंग केली. त्याचा पहिला स्पेल मस्तच होता. असो..
आणी फारेंड आला का.. अब हुइ ना बात! मी केव्हाच म्हटले होते की या बीबीवर फारेंड दिसत नाही ये बात कुछ ह्जम नही होती.. आता रार बाकी आहे.. पण बहुतेक ती क्रिकेटला सोडुन अमेरिकन फुट्बॉल्,सायकलींग व मॅरेथॉन रनींग मधेच आता जास्त रमली आहे..
रार ला ही आणतो बोलावून. अरे
रार ला ही आणतो बोलावून. अरे मी सुरूवातीला जरा बिझी होतो भारतात. मग बराच मागे पडलो, आणि इतरांनी लिहीलेले आधी वाचू म्हणून थांबलो. नाहीतर काहीतरी निरीक्षण आपणच जगात पहिल्यांदा केल्याच्या थाटात येथे लिहायचो, आणि ते आधीच कोणीतरी लिहीलेले असायचे
पाक कडे सिरीयस वन डे गेम खेळण्याचा पेशन्स नाही असेच काल वाटले. बॅटी फिरवायच्या, जमतील तेवडे रन्स करायचे, आणि मग बोलिंग च्या भरवश्यावर सगळे. असे दिसते. आफ्रिकेविरूद्ध चालले ते.
हेझलवूडची पहिली विकेट ,अहमद
हेझलवूडची पहिली विकेट ,अहमद शेहझाद, त्यात स्विंग झालाय बॉल पण थोडाच. बाकी विकेट मध्ये चांगली फ्लिड प्लेसमेंट आणि टाईट लाईन मुळे कॅच गेलेत. >> बुवा अहो बॉल फार स्विंग होत असेल तर सोडून देणे सोपे जाउ शकते, ह्याउलट थोडासा स्विंग, तोही अतिशय उशिरा होत असेल तर लाईन लेंग्थ असलेला बॉलर जास्त हाहा:कार माजवतो. हेझलवूड त्या प्रकारामधे मोडतो, त्याची टेस्ट मधली आपल्या विरुद्धची बॉलिंग पाहायला हवी होतीत. ऑसी बॉलीग्चा ताप हा आहे का पहिले दोन (समजा स्टार्क नि हेझलवूड) नीट खेळून काढले तरी first change येणारे johnson नि वॉटसन हे चांगले बॉलर आहेत. वॉटसन बाकीच्या तिघांच्या पाठी राहून विकेट्स काढतो. पाचवा फॉकनर, तो फिट नसेल तर मजा येईल कारण मग एक तर डोहार्टी आत येईल किंवा मॅक्स्वेलला दहा ओव्हर्स टाकाव्या लागतील. दोन्ही बोनस ठरतील.
असामी तुझ्या आताच्या वरच्या
असामी तुझ्या आताच्या वरच्या पोस्टीचा व्यत्यास बघु..
भारतीय बॅटींगचा ताप हा आहे की पहिले दोन्(समजा रोहीत नि धवन) जरी फेल गेले तरी त्यानंतर येणारे कोहली नि रहाणे हे चांगले बॅट्समन आहेत. रैना त्यांच्यानंतर येउनही चांगल्या रन्स करतो. सहावा धोनी.. तो जर पेटला तर मजाच मजा..आणी जडेजाचा दांडपट्टा जर चालला तर तो बोनस ठरेल!
काय आहे.. आपण फॅन्स प्रतिस्पर्ध्याचे स्ट्राँग पॉइंट्स अधोरेखीत करताना आपल्या स्ट्राँग पाँइंट्सना तेवढे महत्व देत नाही..:)
आता बघा... शिवाजी महाराजांनी जर अफझलखानच्या प्रचंड देहयष्टीकडे बघुन घाबरुन नांगी टाकली का? केला ना त्याचा पराभव.. स्वतःच्या हुशारीवर व धाडसावर विश्वास दाखवुन व व्य्वस्थीत प्लानिंग करुन? म्हणुन हायझेनबर्ग.. लेफ्ट आर्म सिमर्सची भिती वाटुन भारताच्या बॅट्समननी बॅटिंग न करता आपल्या अॅबिलिटीवर विश्वास ठेवुन बॅटींग केली तर ऑस्ट्रेलियाबरोबर विजयश्री आपलीच आहे!:)
फारेंड तुझ्या निरीक्षणात तथ्य आहे असे कालची मॅच आठवल्यावर वाटु लागले. खरच.
फा, त्यांच्याकडे टेंपरामेंट
फा, त्यांच्याकडे टेंपरामेंट नाही असे म्हाणायचे आहे का ? की अनुभव कमी पडला?
दोन्ही, बहुधा. आफ्रिदीला
दोन्ही, बहुधा. आफ्रिदीला टेम्परामेण्ट नसण्याचाच अनुभव आहे असेही म्हणता येइल :). युनूस खान, उमर अकमल, मिसबा - आता ७-८ वर्षे तरी किमान खेळत आहेत. मधल्या ओव्हर्स मधे सिक्स मारण्याचा अनेकांचा प्रयत्न, ते ही ऑफ चे बॉल मिड विकेटला, हे मला पेशन्स नसण्याचे उदाहरण वाटले.
तुझ्या प्रतिसादांमधले अफ्रिदी
तुझ्या प्रतिसादांमधले अफ्रिदी आणि अकमल सोडून दे पण मिस्बाह आणि युनूस खान तर बरे आहेत ना. म्हणा स्वतः मिस्बाह ची वन डे मध्ये १०० नाहिये. अकमल च्या १ का २ आहेत. म्हणजे राहता राहिला युनिस खान. त्यांच्याकडे जसे इंझमाम, मियांदाद, अनवर सारखे टिकून खेळणारे चिवट कोणीच दिसत नाही. मिस्बाह चा प्रॉब्लेम मला तरी कळत नाही.
आता रार बाकी आहे.. पण बहुतेक
आता रार बाकी आहे.. पण बहुतेक ती क्रिकेटला सोडुन अमेरिकन फुट्बॉल्,सायकलींग व मॅरेथॉन रनींग मधेच आता जास्त रमली आहे.. >> बस काय मुकुंदा ! येहीच पहचाना अपुनको इतने सालोंमे.
आहे रे आहे... सगळ्या मॅचेसही बघतीये, फक्त इथे लिहिताना ऑलरेडी इतकं वाचायचं राहिलंय, की फा म्हणतो तसं आपण काही फंडे मारायचे, आणि त्यावर चर्चाही जुनी झालेली असायची... म्हणून लिहित नाहीये इतकंच.
मुकुंद, रमड, फा. यांना काल
मुकुंद, रमड, फा. यांना काल मिस केलं खरच.
आपली सेमी फाइनल पण गुरुवारीच आहे नेमकी!
आपण फॅन्स प्रतिस्पर्ध्याचे
आपण फॅन्स प्रतिस्पर्ध्याचे स्ट्राँग पॉइंट्स अधोरेखीत करताना आपल्या स्ट्राँग पाँइंट्सना तेवढे महत्व देत नाही. >>तुमचा गैर समज होतोय मुकुंद. प्रतिस्पर्ध्याचे स्ट्राँग पॉइंट्स काय आहेत ते बघून तेंव्हा सांभाळून खेळून त्यांच्या weak points वर हल्ला लढवायला हवा ह्यासाठी हे असे बघणे जरुरी आहे. म्हणूनच माझ्या पोस्टच्या शेवटी पाचव्या बॉलरचा उल्लेख केला आहे.
आफ्रिदीला टेम्परामेण्ट नसण्याचाच अनुभव आहे असेही म्हणता येइल >>
अकमल हा जात्याच आक्रमक फलंदाज आहे त्याच्या अजिबात नीट उपयोग पाकिस्तानने केला नाहिये. युनिस खान काळ खेळला नसताना त्याच्याबद्दल का बोलत आहात ? तुम्हाला पाकिस्तान बाधा झाली कि काय ?
असामी, फार स्विंग होत असेल तर
असामी, फार स्विंग होत असेल तर बॉलर बरोबर आणखिन सरकून (म्ह्णजे मोअर टुवर्ड्स बॅट्समन) टाकेल ना? जेणेकरुन बॉल बॅट्समनला बरोबर मारुकीनको मारुकीनको करुन सोडतो.
लेट स्विंग बाबत तुझा मुद्दा लक्षात आला, सो आय गेट इट.
मी नाही पाहिली त्याची/त्यांची बॉलिंग आधी त्यामुळे मी आत्ता जे दिसतय त्यावरुन म्हणत होतो. बॉलिंगला भरपूर ऑप्शन आहेत त्यांना ह्याबद्दल पण +१. आपल्याला ते नक्कीच नाहीत पण आपल्याला बॅटिंगला ऑप्शन जास्त आहेत जर आपण काही घोळ नाही केले तर.
फार स्विंग होत असेल तर >>
फार स्विंग होत असेल तर >> बुवा तसे नाही, जर बनाना स्विंग होत असेल तर बॉलर चा प्रचंड कंट्रोल लागतो लाईन नि लेंग्थ वर, कारण थोडा अधिक बाहेर गेला कि वाईड जाउ शकतो (ODI cricket) एव्हढा precise control असणारे बॉलर्स हे आहेत का ह्याबाबत data नाही. पिचेस तशा स्विंगला फारशी condusive वाटत नाही. ह्याउलट थोडासा swing होत असेल तर slight err in line can be forgiving and can still be deadly. ह्यामूळे थोड्याशा स्विंगला underestimate करू नका असे म्हणतोय. left handed बॉलर चा स्विंग धरू नका, त्यांना मूळात आधी angle चा प्रचंड फायदा असतो जो उजव्या हातावाल्यांना कधीच मिळत नाही. तुम्ही हे वाचलय का ?
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/851399.html
वाचलं नाही पण हायझनबर्गनी पण
वाचलं नाही पण हायझनबर्गनी पण लिंक दिलीये आधी. जमेल तसा वाचतो.
धोनी टीम बद्दल काही बोलला का
धोनी टीम बद्दल काही बोलला का कालच्या मॅच नंतर? चेंज असेल तर तो एकदम टॉसलाच ऊघड करेन म्हणा.
धोनी विनिंग काँबिनेशन चेंज करण्याची रिस्क घेईल असे आजिबातच वाटत नाही पण मोहित ऐवजी भुवनेश्वरला आत आणण्याबद्दल काय मत आहे? गरज पडल्यास भुवनेश्वर १५-२० रन्सचा स्टँड ही देऊ शकतो. मोहित ने सध्या पकडलेला मोमेंटम त्याला झुकतं माप देण्यास भाग पाडतोय हे खरं पण भुवीचा स्विंग अणि एकंदर परफॉर्मन्स बघता, ही ईज टू गूड टू बी लेफ्ट आऊट ईन बिग गेम्स (प्रोवाईडेड ही ईज टोटली फिट.)
मला तरी वाटत नाहिये सध्या
मला तरी वाटत नाहिये सध्या काही बदल करायचे गरज आहे म्हणून. त्यापेक्षा सापळा लावा बरोबर ऑसींसाठी म्हणजे मस्त कांगारूंची शिकार करता येईल. (धोनीने बरोबर प्लॅन करायला पाहिजे आता, आणि तो करतही असेल)
बस काय रार.. मित्रांची इतकी
बस काय रार.. मित्रांची इतकी पण मजा करायचा हक्क नाही का?:)
पण तु काय, फारेंड काय.. असल्या जबरी क्रिकेट फॅन्स असलेल्यांना इथे न बघुन कसेसेच होत होते.
नाही रे असामी गैरसमज नाही.. मला तुझा मुद्दा समजला. मला फक्त एवढेच म्हणायचे होते की आपल्याकडे पण बाकीच्या जगाला हेवा(व प्रतिस्पर्ध्याला भिती!) वाटेल असे स्ट्राँग पॉइंट्स आहेत हे आपण विसरु नये. पण तु प्रोफेसर व्हायला पाहीजे होतेस.. मुद्दे खरच मस्त समजवुन सांगतोस..:)
वत्सला.. अग(का अहो?) अमेरिकेत या सगळ्या मॅचेस पुर्ण रात्रभर चालु असतात.. झोपेचे पुर्ण खोब्र!त्यामुळे पहिल्या दोन मॅचेसनंतर काल जागरणाचा खुपच हँगओव्हर होता.. म्हणुन आलो नाही.. पण आपल्या ऑस्ट्रेलियाच्या मॅचला मात्र इथे एकच कल्ला याची गॅरंटी.. काय वैद्यबुवा आणी बाकी मायबोलिकर.. बरोबर ना?
येस! बरोब्बर मुकुंदा!
येस! बरोब्बर मुकुंदा!
वत्सला, थॅन्क्स आठवण
वत्सला, थॅन्क्स आठवण काढल्याबद्दल :). कॅलिफोर्नियात निदान पहिला डाव पूर्ण मिळतो व दुसर्या डावाच्या पहिल्या ओव्हर्स पाहून ठरवता येते की पुढे बघायची की नाही. अमेरिकेत इतर ठिकाणी (म्हणजे हवाई ई सोडून
) सुरूच लेट होत असेल बरीच.
भुवनेश्वर चांगली टाकतो का?
भुवनेश्वर चांगली टाकतो का? काहीच कल्पना नाही. धोनी बदल करणार नाही काहीच असं वाटतय.
मुकुंद, तर तर! फुल्ल कल्ला!
पण तु प्रोफेसर व्हायला पाहीजे
पण तु प्रोफेसर व्हायला पाहीजे होतेस.. मुद्दे खरच मस्त समजवुन सांगतोस.. >>> मला वाटले पुलंच्या "कॉफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका" वाल्या मास्तरांप्रमाणे इतकी चुकीची माहिती इतक्या ठामपणे सांगतो म्हणून. दिवे असाम्या
मला वाटले पुलंच्या "कॉफिन
मला वाटले पुलंच्या "कॉफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका" वाल्या मास्तरांप्रमाणे इतकी चुकीची माहिती इतक्या ठामपणे सांगतो म्हणून. >>
मुकुंद, तिकडे लोक आयटी वाल्यांवर उठलेत इथे तुम्ही प्रोफेसरांवर
फा बरं मी काही भाषण नाही
फा
बरं मी काही भाषण नाही केलं पुढे बनाना स्विंग वगैरे वर. वरना माझ्या कॉफिनमदी पण खिळा ठोकला होता फा नी.
असामी, अरे जीवावर उठलेत म्हण बाबा!!

तर हे असं घडलं तर.
नो वंडर वहाब रियाझ तडकला ते! स्टार्क पेक्षाही रियाझ चे बॉल खत्तरनाक होते पण! बघा!
http://www.starsports.com/cricket/tour/icc-cricket-world-cup-2015-164/ma...
रियाझचं अग्रेशन आवडलं आपल्याला! त्या रुबेलला म्हणा शिक काहीतरी.
स्टार्कनी केलेली रियाझची चेष्टा आजिबात आवडली नाही. तो टेल एंड चा बॅट्समन आहे. एखाद्या टॉप ऑर्डर बॅट्समॅन ला बेकार लूक दिली, काही म्ह्ंटलं थोडंफार, ठीक आहे पण ह्या असल्या प्रकाराची काहीच गरज नाहीये.
It was a total display of bad character on Starc's part. जितका त्याच्या बॉलिंग विषयी आदर होता मला तितकाच डोक्यातून उतरला तो माझ्या. टॅलेंट आहे ह्याचा अर्थ दुसर्याला कमी लेखायचा हक्क नाही मिळत कोणाला.
अत्ताच पाकी बातम्या ऐकल्या ,
अत्ताच पाकी बातम्या ऐकल्या , त्याचा खेळडुना विमानाची ति़किटे मिळत नाही आहेत. बांगलादेश आणि श्रीलिंकेमुळे मिळत नाहीत, का घरी जाताना लोक अंडी वगैरे फेकुन मारतिल म्हणुन राग शांत झाल्यावर जायचे आहे. का खरेदी, कैसिनो वगैरे करुन जायचे आहे ते माहित नाही.
बुवा, मला तरी स्टार्कचे ते
बुवा,
मला तरी स्टार्कचे ते स्लेजिंग डेलिबरेट वाटले. बोल्टच्या झंझावाताला बळी पडलेली ऑसी टीम रियाझ एकटाच त्यांची बॅटींग अडचणीत आणण्यास समर्थ आहे हे ओळखून होती. त्याला सायकॉलॉजिकली डिस्टर्ब केले तर तो चिडून जाऊन स्पीड मिळवण्याच्या नादात चुकीची लाईन अँड लेन्ग्थ टाकेल असा त्यामागे कयास असावा.
त्याला ऊचकावण्याचे मला तरी दुसरे काहीच कारण दिसत नाही. बिचार्या वॉटसनला मात्रं त्याची फळं भोगावी लागली.रियाझ गेव देम द टेस्ट ऑफ देअर ओन मेडिसीन.
हायझनबर्ग, आधी जरा लांबचं
हायझनबर्ग, आधी जरा लांबचं कनेकश्न वाटलं पण खुप अतर्क्य ही वाटत नाही तसं असेल तर.
वहाब इतकाही नवीन नाहीये की तो अशा गोष्टींना बळी पडेल म्हणजे मला ऑस्ट्रेलियानी तसा विचार जरी केला असेल तर तो चुकीचा वाटतो. हे असले प्रकार न करता सुद्धा नीट खेळता येतं. ऑस्ट्रेलियाल वाल्यांना वाईट खोडच आहे ह्या सगळ्याची.
आत्ताच वाचलं रियाझ आणि वॉट्सन दोघांनाही चार्ज केलय. स्टार्कला का नाही केलं काय माहित.
आफ्रिदीला टेम्परामेण्ट
आफ्रिदीला टेम्परामेण्ट नसण्याचाच अनुभव आहे असेही म्हणता येइल.... फारेंड...:हहगलो:
हायझेनबर्ग.. प्लान्ड एनकाउंटर, "बोल्ट"च्या झंझावाताने बळी पडलेले ऑस्ट्रेलियन, रियाझ हा ऑस्ट्रेलियासाठी मोठी थ्रेट आहे.. असले डेंजरस शब्द जर कोणा क्रिकेट लिंगो समजत नसणार्याने एफ बी आय ला ट्रान्सलेट करुन सांगीतले तर कठीण आहे..:)
काही खेळाडूंना मैदानावर वाद
काही खेळाडूंना मैदानावर वाद घातला की जास्त फोकस करता येते (स्टीव वॉ, हरभजन ई), तर काहींचे उलटे होते (आमिर सोहैल
). यातले पहिल्या प्रकारचे लोक काहीतरी उकरून काढतात बर्याच वेळा. स्टीव वॉ ने त्याबद्दल लिहीले आहे. भज्जीची २००८ मधली ऑस्ट्रेलियातील कामगिरी पाहिलीत तर लक्षात येइल.
रियाझ मला २०११ मधे जेवढा भेदक वाटला तेवढा यावेळेस वाटला नाही. पण मी पाक च्या ज्या थोड्या गेम्स जेवढ्या पाहिल्यात तेवढ्यावरच हे निरीक्षण.
मी पण आधी लिहिलय फा, आपल्या
मी पण आधी लिहिलय फा, आपल्या विरुद्ध तो इतका भेदक नाहीच वाटला तो. आज मात्र तुफान स्पेल होतं त्याचं.
Pages