विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
विटोरीला दुसर्या ओवर मधेही
विटोरीला दुसर्या ओवर मधेही तुडवलं
२० ओव्हर्सनंतरही रिक्वायर्ड
२० ओव्हर्सनंतरही रिक्वायर्ड आणि अॅक्चुअल रनरेट सारखाच आहे, अमेझिंग फाईटबॅक!!! पण कदाचित दोन विकेट जास्ती गेल्यात आणि गेल शेवटपर्यंत असणे अत्यावश्यक होते.
हो आगावा, सॅमी होता तोपर्यंत
हो आगावा, सॅमी होता तोपर्यंत मलाही जबरी वाटत होती सिच्युएशन. सॅमी व कार्टर हाणत होते, व्हेटोरीला धुतले होते. ८ चा रन रेट होता.
रनरेट मारायची क्षमता
रनरेट मारायची क्षमता विंडीजमध्ये आहे, प्रश्न आहे कुठवर ?? >>>> ८ चा रनरेट ठेवूनच खेळत आहेत.. कुठवरचे उत्तर मात्र २२०-८ असे आलेय..
रनरेट अजूनही ८ चा आहे आणि
रनरेट अजूनही ८ चा आहे आणि विकेट्स पण
Last 5 ovs 49/2 RR
Last 5 ovs 49/2 RR 9.80
>>
बहुतेक वेस्ट इंडीज दाखवुन देण्याचा प्रयत्न करत आहे की जसे तुम्ही आम्हाला धुतले आम्ही देखील तुम्हाला हाणु शकतो
सुस्साट खेळत आहे विकेट जाओ अथवा न जाओ प्रत्येक ओव्हर मधे फोर सिक्स लावतच आहेत
आता पर्यंत २७ ओव्हर मधेच १६ सिक्स लावले आहेत वेस्ट इंडीज ने.
कोणाला मारायचे कोणाला इज्जत
कोणाला मारायचे कोणाला इज्जत द्यायची, कोणी उचलायचे कोणी एक साईड लावून धरायची, काहीही प्लानिंग न करता उतरलेले, किंबहुना कोण कसा चालतेय हे बघूनही ठरवायच्या भानगडीत पडले नाही. बस्स एकच प्लॅन होता, ८ ची धावगती मारायची, मारत मारत ५० ओवर खेळलो तर झाले ४०० ..
असो, वेस्टईंडिज म्हटले की हे अपेक्षित होतेच.. पण हेच करायच होते तर त्या पोलार्डला का घेऊन आले नाहीत ? आणखी काही सिक्स आज बघायला मिळाले असते..
आजच्या मॅचचे आतापर्यंतचे एका
आजच्या मॅचचे आतापर्यंतचे एका वाक्यात वर्णनः- गुप्टिल २३७ नाबाद !!! ... विंडीज २३७/९
वाईट वाटले. होल्डरने हवा टाईट
वाईट वाटले. होल्डरने हवा टाईट केली होती खरे तर!
२५० झाले आणि संपली मॅच
२५० झाले आणि संपली मॅच
आजतागायत ५० ओवरच्या सामन्यात
आजतागायत ५० ओवरच्या सामन्यात कोणी ३० ओव्हरमध्ये २५० मारले आहेत का? कि वेस्टईंडिजच रेकॉर्ड झालाय?
ऋन्मेष, ३० ओव्हर्समध्ये २५०
ऋन्मेष,
३० ओव्हर्समध्ये २५० झाल्याचे आठवत आहे कधीतरी!
आपल्या बहुदा १८ ओव्हर्स मधेच
आपल्या बहुदा १८ ओव्हर्स मधेच १४४ काहीतरी होते दक्षिण आफ्रिके बरोबर. नंतर ३० ओव्हर मधे किती झाले माहीत नाही
ऋन्मेष, बाकी गेलमुळे एकदा टी
ऋन्मेष,
बाकी गेलमुळे एकदा टी ट्वेन्टीमध्ये २० ओव्हर्समध्ये २६५ झालेले होते हे आठवतंय का? त्यात गेलच्या काहीतरी १७५ होत्या.
२० ओव्हरमध्ये ठिक आहे, कारण
२० ओव्हरमध्ये ठिक आहे, कारण तेव्हा सामनाच २० ओवरचा असल्याने तश्या मेंटॆलिटीमध्येच बॆट्समन उतरतात.. पण ५० ओवरच्या सामन्यात कोण पहिल्या ३० ओव्हरमध्ये २५० मारायला उतरतो असे होत नाही म्हणून विचारले..
मागे एकदा ऒस्ट्रेलियामध्ये तिरंगी सामन्यात बहुधा लंकेविरुद्ध आपल्याला ५० ओवरच्या सामन्यात रनरेट सुधारायला ४० ओवरमध्ये ३०० वगैरे मारायचे असताना कोहली खेळलेला आणि आपण सहज मारलेले तेव्हा आपले ३० ओव्हरमध्ये आपले किती झालेले ते बघायला हवे..
ऑस्ट्रेलिया हे छोटे आव्हान
ऑस्ट्रेलिया हे छोटे आव्हान नाही. भारताने मिळालेल्या वेळात भरपूर सराव करायला हवा.
अरे, शंबरच्या वर पोस्ट्स
अरे, शंबरच्या वर पोस्ट्स वाचूवाचून इथं येईपर्यंत मॅचच संपली की
द बेस्ट ४ आर इन द सेमीज,
द बेस्ट ४ आर इन द सेमीज, व्हॉट अ वर्ल्डकप धीस इज!!!
गुप्तिल ने सिक्स मारल्यानंतर
गुप्तिल ने सिक्स मारल्यानंतर हाताने २ ची खुण केली होती ती का होती त्याचे कारण हे
https://www.facebook.com/CricSpiritOfficial/photos/a.733641083420754.107...
विंडीजने थोडा शांत पणा दाखवला
विंडीजने थोडा शांत पणा दाखवला असता तर जिंकले असते
गप्टिल जबरी खेळला
अबाबाबाबा!!! काय रन केले का
अबाबाबाबा!!! काय रन केले का चेष्टा! ४४ व्या ओवर ला २८० झालेले होते!
पुढच्या सहा ओवर मध्ये ११३ रन! आबाबाबा
क्रिस गेल पण खरच सुटला होता जबरी! पण तो काय करणार एकटा? टीमवर्क हवं.
इतके शॉट्स मारलेत की चांगले बॉल टाकले असतील थोडेफार त्याची बात करायचीच गरज नाही. केवढं जब्बरदस्त अॅक्सलरेट केलय शेवटी? आपणही हे करु शकतो. विकेट टिकणं फार महत्वाचं आहे आपल्याकरता. आपली टीम सुद्धा कुणा एकाच्याच जोरावर उभी नाहीये ते एक बरं आहे. कोणी ना कोणी येऊन खेळी करतच.
ग्राऊन्ड लहान असल्याचा फायदा
ग्राऊन्ड लहान असल्याचा फायदा विडींज ला शक्य असुन पण घेता आला नाहि. जो तो फक्त २०/२० खेळायला आला असा खेळत होता.
ह्या अशा छोट्या ग्रांउड वर हिन्दुस्तान कीती स्कोर मारेल. एक शन्का?
ह्या अशा छोट्या ग्रांउड वर
ह्या अशा छोट्या ग्रांउड वर हिन्दुस्तान कीती स्कोर मारेल. एक शन्का? > आज बॉल स्विंग होत नव्हता. जर झाला असता जसा ऑसी-न्युझीलंड मॅच मधे झालेला तर आज इतका स्कॉर बनलाच नसता. बोल्ट ला ज्या विकेट्स मिळल्या त्या अचुकते मुळे आणि वेस्ट इंडीज डोक्याला कफन गुंडाळुन आल्यामुळे मिळाले.
जर स्वींग झाला नाही तर आपण ३५० पेक्षा जास्तच मारु कमी होणारच नाही.
आजतागायत ५० ओवरच्या सामन्यात
आजतागायत ५० ओवरच्या सामन्यात कोणी ३० ओव्हरमध्ये २५० मारले आहेत का? >> आपणच दोनदा केले आहेत रे, एकदा लंकेविरुद्ध तू लिहिलेस नंतर तसे नि नंतर ३-४ महिन्यांमधे परत अशिया कपमधे अशाच परिस्थ्तितीत बांग्लादेशमधे पाक किंवा लंकेच्या विरुद्ध. दोन्ही वेळेला ३५-३८ ओव्हर्स मधे ३०० केले होते.
विंडीज हरले ते बरेच झाले. अजिबात जिंकण्याची इच्छा असल्यासारखे वाटले नाही त्यांची. ९५-९६ मधे असेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरायचेच ठरवून खेळले होते सेमी मधे नि हरलेले ते आठवत होते. frustrating to watch.
कोणी तरी आयसीसी च्या टेक्निकल कमीटीला सांगून बॉल नि बॅटमधलि मॅच जरा इव्हन साइडेड करायला हवी. बॅट नि ग्राउंड ह्यांचे साईझ, आकार थोडे तरी सारखे ह्वएत.
असामि +१.. मॅच हि फक्त विक्रम
असामि +१.. मॅच हि फक्त विक्रम करन्यासाठि खेळवळि गेलि का अशि एक शंका आहे. पण न्युझीलंड ला हे छोटी ग्रांउड वापरन भारी पड्नार सोउथ आफ्रीके बरोबर..
फक्त विचार करा या छोट्याश्या
फक्त विचार करा या छोट्याश्या ग्राउंड वर डिव्हिलिअर्स टिकला तर किती हंगामा करेल.. जो खेळाडु ऑस्ट्रेलियामधल्या मोठ्या ग्राउंडवर चौकार षटकारांचा पाउस लिलया पाडतो तो इथल्या ग्राउंड्वर काय काय चमत्कार घडवेल?
न्युझीलंडमधे एकदा आयपीएल स्पर्धा खेळवावी. सगळे मागचे पुढचे विक्रम साफ होतील
गप्टीलनी केलं ते आपल्या टीम
गप्टीलनी केलं ते आपल्या टीम मधलं सुद्धा कोणीतरी करु शकतं. अगदी २००+ नाही केले तरी १२५+ हा वन डे मध्ये सॉलिड स्कोअर आहे. इतका मोकळा फक्त आपण कोणाला सुटू देऊ नये आपल्या विरुद्ध.
पहिला त्याचा कॅच ड्रॉप केला त्यानंतर मात्र आजिबात जीवदान नाहीये ना आजिबात? जबरीच खेळला!
असामी, मी तो आपला सामना लगेच
असामी, मी तो आपला सामना लगेच चेक केला होता ती पोस्ट टाकल्यावर तेव्हा 30 ओवरला आपले काहीतरी 230 ला 3 दाखवत होते.. 10 ओवरमध्ये अजून 90 हव्या होत्या.. पण कोहली त्यानंतर जे सुटला त्यात मलिंगासुद्धा धुपला आणि 6-7 ओवरमध्येच ते रन्स आले..
तसेच आफ्रिकेच्या ऑसीजविरुद्ध ऐतिहासिक चेसमध्येही त्यांनी मारले असावेतच.. कारण त्यांचे सुरुवातीपासूनच करंट रिक्वायरडपेक्षा जास्त होता तेव्हा..
पण 50 ओवरच्या सामन्यात असे 30 ओवरमध्ये 250 मारून सर्वबाद हा पराक्रम नक्कीच कोणी केला नसावा .. अशी ती पोस्ट लिहितानाची भावना होती
असामी फ्रस्ट्रेशन हा शब्द
असामी फ्रस्ट्रेशन हा शब्द अगदी बरोबर आहे वेस्ट इंडिजसाठी... मी पण वैतागुन काल म्हटले होते...
"अगदी इरीटेटींग वाटावे इतके लेड बॅक अॅटीट्युड!"
ऋन्मेष.. तुला लूजिंग कॉजमधे ३० ओव्हर्समधे २५० रन्स केल्याचे एवढे अप्रूप वाटते? हे म्हणजे वॉर हरलो ना कोइ.. बात नही.. पण आम्ही त्या वॉरमधे एक ( ते सुद्धा अगदी इन्सिग्निफिकंट!) छोटेसे बॅटल जिंकल्याची शेखी मिरवण्यासारखी गोष्ट आहे..:(
गप्टीलच्या खेळीचे श्रेय हिरावुन घ्यायचे नाही पण कोकण्या म्हणतो त्यात मात्र तथ्य आहे.. न्युझिलंडकडे त्यांच्या छोट्या ग्राउंड्मुळे एक खोटा आत्मविश्वास निर्माण झाला असेल व ए बी डी व साउथ आफ्रिका त्यांच्या तसल्या रिडीक्युलसली छोट्या मैदानावर त्यांना एक जबरदस्त वेक अप कॉल देउ शकतील! पण तोपर्यंत खुप उशीर झाला असेल...
मी तर काल वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीच्या अश्या चिंधड्या उडवल्या गेल्यानंतर फ्रस्ट्रेट होउन सरळ झोपायला गेलो.. आज पाडवा.. लवकर उठायचे होते..:)
या बीबीवरच्या समस्त क्रिकेट्प्रेमींना पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्या भारतीय संघाला व तुम्हालाही भरघोस यश व आनंद घेउन येवो हीच सदिच्छा!
समस्त क्रिकेट्प्रेमींना
समस्त क्रिकेट्प्रेमींना पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्या भारतीय संघाला व तुम्हालाही भरघोस यश व आनंद घेउन येवो हीच सदिच्छा! >_१+१
मुकुंदा, इरीटेटींग जास्त योग्य आहे. काल फार जागरण न केल्याचे बरे वाटतेय आत्ता.
Pages