मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>चांद सिफारिश जो करता हमारी , देता वो तुमको बता...<<

मला अगदी सुरवातीला हे सांड सिफारीश जो करता हमारी, देता वो तुमको बता.......
असे ऐकु यायचे Lol
माझ्या डोळ्या समोर एकदम आपल्या आवडत्या म्हशी ची विनवणी करणारा एखादा म्हश्या/रेडा आला

चाक धूम धूम चाक धूम
हाथी जैसी चाल घोडे जैसी दूम
छोटा बंदरा जा कहासे आये तूम ... असेच ऐकू यायचे सुरवातीला कारण हाथी घोडा मग बंदर असेल असेच काहीतरी

मग नीट ऐकल्यावर ओ सावनराजा कहासे आये तूम असल्याचे कळले

प्यार की कश्ती में ह्या गाण्यातले कोरसचे शब्द मला अजून नीट कळलेले नाहीत! हो गयी शिप शुरू हय्या हो असंच आहे ना ते?

हो गयी शिप शुरू हय्या हो
>>
तरी बरं काय ते ऐकू येतय.
मला हाय उशीश लियू हायला हू असं निरर्थक ऐकू येतं Wink

बरेच दिवस मी खेळ मांडला मधल्या काही ओळी अशा ऐकत होते -

सांडूनी गाडीत भात घेतला वसा तुझा तूच वाट दाखिव बा खेळ मांडला.
मला वाटायचं की भातकुलीचा डाव खेळायचं सोडून (म्हणजे त्यातले तांदूळ फेकून देऊन- रुपक यू नो Wink ) तुझा वसा घेतलाय

मग या विडंबनाच्या वेळेला शब्द गुगलले तेंव्हा कळालं की ते गाडीत भात नसून गं रितभात असं आहे...

हे अंबे यो हे पपा हियो...

प्यार की कश्ती मे चा कोरस असा ऐकु येतो

प्यार की कश्ती मे चा कोरस >>
गूगल वरच्या सगळ्या लिंका Aai ri shi chu ru ru Haiyahoo असं आहे म्हणतायत. अर्थं कुठेच नाही लिहिलेला. खरं काय ते रोशनांनाच माहीत.

सांडूनी गाडीत भात घेतला वसा << हे आवडले.. पूर्वी एस्टीतून लांबचा प्रवास करताना हा अनुभव बर्‍याच वेळा यायचा...
Proud

आप जैसा कोइ मेरी जिंदगी मे आये तो बाप बन जाए.... हां बाप बन जाए...
मी कित्येक वर्ष हे गाण असंच म्हटलय.. Proud

"तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या">> Lol
<<रात कली इक ख्याब में आयी और गले का हार हुवी
सुबहको जब हम निंद से जागे आखं उन्हीसे चार हुवी >>

सुबहको जब हम च्या जागी " हु हु हु हु जब हम निंद से जागे आखं उन्हीसे चार हुवी" असच ऐकू यायचं
आणि नायक थंडीच्या दिवसात "हु हु हु हु "करत झोपेतून उठतो आणि गाण म्हणतो वाटत अस वाटत राहायचं Happy

आप जैसा कोइ मेरी जिंदगी मे आये तो बाप बन जाए.... हां बाप बन जाए...असंच आहे न ते?>>>
नै नै ते तस नाहिये "बात' बन जाये"असं आहे ते

"ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना" लहानपणी ऐकायचो. आमच्या वर्गात भिकाजी नावाचा एक खिडमिडीत पोरगा होता. त्याला सगळे "भिक्या" म्हणायचे. गाणे ऐकून वाटायचे भिक्या शेंबडा असला तरी ग्रेट आहे. गाण्यात नाव आहे त्याचे...
"तेरे बिना भिक्या जीना" Biggrin Biggrin

मिशन कश्मिर मधले 'आया हू मै प्यार का नगमा सूनाने" या गाण्याच्या आधी
Rind posh maal gindane graaye lo lo असे आहे

ते काहीच झेपत ही नाही आणि नेहमी चूकीचेच ऐकू येते मला ते
'झिंदको तू मार निंदमे झायलो लो " असेच ऐकू यायचे

आप जैसा कोइ मेरी जिंदगी मे आये तो बाप बन जाए.... हां बाप बन जाए...>>>> वाचुन खुर्चीवरून पडायचा बाकी राहिलो. Lol

भिक्या !!!
Rind posh maal gindane graaye lo lo अस आहे काय? thanks
मला कधिच समजलं नव्हतं

छीन गये नैना.... छीन गये नैना.... अ ओ, आता काय करायचं

खरंतर ते छील गये नैना... अस आहे. नविन चित्रपट nh 10 मधल.
>>छील गये पण नसावं, फार हिंस्त्र वाटत आहे, 'छल गये' असाव.. छलचा अर्थ महाभारत मधला (आठवा: "मित्र भीम तुम मेरे साथ छल कर रहे हो" असं काहीतरी वाक्य Wink )

नाही ..ते ' छिल गये नैना..असच असाव...कारण पुढची ओळ
काच की नींद आयी..पथर के ख्वाब लायी... अशी आहे.
जाऊ देत... ' डोळे सोलवटले ' असा सरळ मराठी अर्थ घेते. Proud

जेव्हा तुझी नि माझी चोरुन भेट झाली.. या गाण्यातील 'झाडे भरात आली ' ही ओळ मझ्या एका मित्राला 'झाडे घरात आली,,अशी ऐकू यायचि.

छिल गये नैना..>> अ ओ, आता काय करायचं
काय काय गाणी ऐकावी लागतील आता. >>>> कळलं नाही .

काच की नींद आयी..पथर के ख्वाब लायी ,छिल गये नैना.

गाणं फार हिंस्त्र वाटत असलं तरीही , टाकाउ नक्किच नाही .

कम्बख्त ईश्क , ईश्क कमीना वगैरे गाणयांपेक्शा शाब्दिक मुल्य नक्किच जास्त आहे यात .

अर्थातच , हेमवैम आणि शेवटी आवड आपली आपली .

Pages