झाडाला आग लागली... पळा! पळा!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

१.

२.

३.

४.

५.

शब्दखुणा: 

मस्त फोटो . शीर्षक वाचून वाटले होते काहीतरी लहान मुलांचा गेम बद्दल लेख असेल. Happy कुठे भेटले हे झाड?

rmd, होय पळसच आहे.

अमा, आमच्या गावाला वाटेवर भेटला. नुसता धगधगत होता. Happy

स्वाती, सही. पूर्वी आमच्या गावतली काही कुटुंबं हातखर्चाचे साधन / जोड-लघु-उद्योग म्हणून पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या-द्रोण वळायचे. त्यासाठी रिकामी पोती घेऊन ते उन्हातान्हात पळसाची पाने गोळा करत रानोमाळ फिरत आणि मग गवताच्या चोयांनी ती पाने टाचून पत्रावळ्या-द्रोण वळायचे. त्यांचे शेकड्याचे गठ्ठे करून ठेवायचे. गावात काही मोठे कार्य असेल (लग्न, जावळ, बारसे, बाराव्याचे जेवण, मुंज,इ.) तर या पत्रावळ्या-द्रोण शेकड्याच्या दराने विकल्या जात. या कुटुंबांतली मुलं ही आमची वर्गमित्र-मैत्रिणी त्यामुळे हे सगळं अगदी परिचयाचं. म्हणून हा पळस लहानपणापासून जवळचा वाटतो.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

गजानन,
बरोबर !पळसाच्या पत्रावळी! मी पण शिकले होते पत्रावळ लावायला. आता नुसत्या आठवणी उरल्यात!

मस्त गजाभाऊ! Happy म्हणजे पत्रावळी, द्रोण ह्या अशा ब्राईट कलरचे का? कसले दिसत असतील? मस्त! अगदी कालच एक कविता वाचली तेव्हा परत ह्या झाडाचीच आठवण झाली. भारतात अमेरिकेत असतो तसा ठळक असा फॉल/ऑटम सिजन नसतो त्यामुळे भारतात पानांना असे गडद रंग बघायची सवय नाही. Happy

Like the way a garden burns
in a hundred shades of orange in the fall,
a Lover's heart shrivels for a sense of Beloved's touch.
Now the face of that charred garden
is my field of flowers.

------- Rumi

Happy

>> पत्रावळी, द्रोण ह्या अशा ब्राईट कलरचे का? >>
नाही. पत्रावळी पानाच्या. ती लाल रंगाची आहेत ती फुले!

सुपर्ब.

माहेरी कोकणात घराजवळच पळसाचे झाड होतं. डोंगरावर फिरायला जाताना पळसाची पाने आणि चिवडा किंवा दडपे पोहे घेऊन जायचो आणि झरा असेल आणि सपाट जागा असेल बसायला अशा ठिकाणी मस्त पळसाच्या पानावर ते पोहे किंवा चिवडा खायचो. मस्त आठवणी आहेत.

सुंदर!

कसारा घाटात दिसतात का पळसाची झाडं? मी फार जवळून असा बघितलाच नाहीये पळस. प्रवासात असताना कुठे तरी दूर लालभडक फुलं लागलेलं झाड दिसलं की ते पळसाचंच असणार अशी माझी समजूत Happy

रच्याकने, पळस म्हटलं की मला 'जब जब मेरे घर आना तुम, फुल पलाश के ले आना तुम' हे गाणं आठवतं Happy

मीपण हे गाणं लिहू कि नको विचार करत होते. मला अगदी पळस म्हटलं कि हे गाणं आणि ती सिरीयलपण आठवते.

Happy

अरे काय हे पळस देखील ओळखता येत नाही. धन्य!!!! इथे मायबोलिवर निसर्गप्रेमी नावाचा एक उपक्रम आहे तिथे आठ्वड्यातून एक जरी फेरफटका मारला तर झाडांची ओळख होईल.

हा पळस आहे. पांगीरा हा काळसर लाल असतो आणि त्याच्या पाकळ्या तलवारीच्या पात्यासारख्या असतात.

गजानना, सुंदर फोटो! निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभुमीवर कुठल्याही झाडाचे सौंदर्य उठून दिसते.

सु्ंदर! मला नेहमी पळस पाहिला की त्या आगीच्या रंगाची साडी नेसून नजर खिळवून ठेवणारी सौंदर्यवती गावाला पागल करून पुढे जात आहे असं वाटतं.

सुंदर!
शान्ता शेळकेंच्या ओळी:
गगनास गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला

Pages