मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०००+ पोस्टी झाल्याने पुढील चर्चेसाठी नवीन बाफ....

आपल्याला शंका असलेल्या गाण्यांची चौकशी करण्यापूर्वी आधीचे बाफ वाचल्यास उत्तम.

'जिहाले मस्ती' आणि त्यातल्या हिजर्‍याची चौकशी हे याचे उत्तम उदाहरण आहे.. http://www.maayboli.com/node/2660?page=10

मी शाळेत असताना 'झूट बोले कौवा... ' खूपच प्रसिध्द होते. बरं गावात रेडियोवर ऐकलेली गाणी. ती परत वाजवायची सोयही नसायची. शब्द जसे ऐकू येतील ते.. गॅदरिंग वगैरेला नाच असला तर कुणीतरी मागे उभे राहून पेटी/तबल्याबरोबर गायचे...

त्यात...

तू मैके चली जायेगी, मै दुजा प्याहर चाहुंगा'

बरीच वर्षे हे 'दुजा प्याहर चाहुंगा' काय आहे ते कळले नव्हते. ते 'दुजा ब्याह रचाऊंगा' आहे, हे नंतर कळले...

आमच्या वाडीतल्या अंताक्षरी स्पर्धेत एकाने संजय दत्तचे गाणे गायले होते.....
"शर्माना छोड डाल आख मेरी फोड डाल"
सगळ्यानी हसून लोळण घेतलेली तेव्हा.:D

Lol मला पण दोन मिनिटं मूळ शब्द आठवेनात गाण्याचे!
सुमेधाव्ही, शर्माना छोड डाल, राज दिल का खोल डाल!

मुळ गाणे आहे.

शर्माना छोड डाल, राज दिलका खोल डाल,
आजुबाजू मत देख, आय लव्ह यु बोल डाल|

आंख मेरी फोड डाल Lol Lol Lol

मागच्या भागात : इक दिन बिक जायेगा माटी के मोल" मधे
फिर दुनियासे बोल किंवा डोल नसुन ते " फिर दुनियासे गोल" असे आहे.

इक दिन बिक जायेगा, माटी के मोल
जग में रह जायेंगे, प्यारे तेरे बोल

दूजे के होंठों को, देकर अपने गीत
कोई निशानी छोड़, फिर दुनियाँ से गोल
इक दिन बिक जायेगा ...

अनहोनी पथ में काँटें लाख बिछाये
होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाये
ये बिरहा ये दूरी, दो पल की मजबूरी
फिर कोई दिलवाला काहे को घबराये
धारा, तो बहती हैं, मिल के रहती हैं
बहती धारा बन जा, फिर दुनियाँ से गोल
एक दिन ...

परदे के पीछे बैठी साँवल गोरी
थाम के तेरे मेरे मन की डोरी
ये डोरी ना छूटे, ये बंधन ना टूटे
भोर होने वाली हैं अब रैना हैं थोड़ी
सर को झुकाये तू, बैठा क्या हैं यार
गोरी से नैना जोड़, फिर दुनियाँ से गोल
एक दिन .

बत्तमीज दिल (ये जवानी है दिवानी)

पानमे पुदीना देखा नाक का नगीना देखा
चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा
चांदने cheater हो के cheat किया तो सारे तारे बोले गिली गिली अक्खा

बत्तमीज दिल बत्तमीज दिल बत्तमीज दिल बत्तमीज दिल माने ना माने ना..

मझ्या कानांनी ऐकलेलं....

पानमे पुदीना देखा नाक मे नगीना देखा
चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा
सामने से चिडीयाने cheat किया तो साला सारे बोले गिली गिली अक्खा

फक्त मी च मी, फक्त मी च मी,फक्त मी च मी माने ना माने ना..

दोन तीन वेळ ऐकावं लागलं समजून घ्यायला.. कि ते "बत्तमीज दिल" आहे

पण माझं all time favourite - थम्सप तुपाने भरला Lol ( थम्ब्सप तुफानी ठंडा)

एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्ह्यापरी..

ती देवी आहे ना? तिची नजर "कोल्ह्या सारखी" का आहे? कोल्ह्यासारखी तिक्ष्ण..?

ती देवी आहे ना? तिची नजर "कोल्ह्या सारखी" का आहे? कोल्ह्यासारखी तिक्ष्ण..?
>>
कोल्यावरी आहे ते Wink

एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्ह्यापरी.. << यावर ही आधी चर्चा झालेली आहे..
कोल्यावरी = कोळ्यावरी = मासे पकडणारा तो कोळी..

>>आजुबाजू मत देख, आय लव्ह यु बोल डाल|<<<
आयला ते आजुबाजू मत देख आहे होय....मी इतके वर्ष आजुबाजु मध्ये ऐकायचो ते Lol

तरीच तरीच मला वाटायचे की एकदुम उपटसुंभा सारखा मराठी शब्द कसा काय आलाय गाण्यात Happy Lol

पानमे पुदीना देखा नाक का नगीना देखा
चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा...>> हे सगळं ऐकू आलं प्रज्ञासा?? तुस्सी ग्रेट हो... मी कद्धीच नीट ऐकायच्या फंदात पडले नाही... कित्ती फास्ट बीट्स आहेत त्या...

सियाराम चं मला पण कन्फ्युजन होतं... Lol कमिंग होम टू सियाराम असावं असं वाटतंय

Pages