AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूनटून्या, प्रचंड अनुमोदन
तुम्ही म्ह्णता तसले कार्यक्रमही आपल्याच संस्कृतीचा भाग आहेत, पण ते मान्य करणे अवघड जाते अनेकांना.

संस्कृती
हा आता फ़क्त एक शब्द राहिलाय
जिथ पैशासाठी हीन पातळी वरचे विनोद केले जातात ,ज्यांच्यावर केले जातात ते सुद्धा एन्जॉय करतात
जिथ आई बहिणीविषयी स्टेजवरून हिणकस भाषेत बोलल जात ,यात कुणाला काही खटकत नाही
उलट अशा हीन पातळीला जाऊन बोलण म्हणजे हिम्मत अस समजल जात
आणि प्रेक्षक सुद्धा हा सगळा अश्लीलतेचा बाजार यु ट्यूबवर पाहुन कार्यक्रम आवडला म्हणतात
अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली ह्या सगळ्या प्रकाराच समर्थन केल जातय
उलट ह्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना गप्प बसवल जातय
तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही बघु नका
बाकी ज्यांना पाहायचा आहे त्यांनी पाहावा. ज्यांना नको आहे त्यांनी दुर्लक्ष करा.
एवढ बोलल की झाल
जिथे लोकांना हे माहितीये की भावी पीढ़ी आता इतकी पुढारलीये की असे कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने विशेष नाहीत
तिथे खरच संस्कृती शिल्लक आहे का ?

सुनटुन्या, सहमत!
झजबेरा, सुस्पष्ट विचार मांडलेले आवडले.
इथे १८+ आणि समज , मॅच्युरीटीचा मुद्दा आला म्हणून लिहित आहे. पालकांना संधी असते ना १८ वर्ष संस्कार करायची. एकीकडे समज, मॅच्यरीटी बद्दल शंका उपस्थित करायची पण भारतात लग्नासाठी मुलीचे वय १८ आहे(बरेचदा जबरदस्तीने त्या आधीही लग्न केले जाते) . भारतात मतदानासाठी १८ हे वय आहे. भारतीय सैन्यात जाण्यासाठी १८ वय चालते. तरुण मुलांना आता लोकशाहीच्या माध्यमातून देशाचे भवितव्य ठरवायचे अधिकार आहेत, देशाच्या सुरक्षिततेसाठी लढायला गेलेले चालते मग कार्यक्रम बघितला म्हणून धक्का वगैरे का बसावा?

मनरंग आपले प्रतिसाद आवडले असे मीच आपल्याला लिहिणार होतो... प्रामाणिक आणि कळकळीने आल्याचे जाणवतेय.

तरुण मुलांना आता लोकशाहीच्या माध्यमातून देशाचे भवितव्य ठरवायचे अधिकार आहेत,
देशाच्या सुरक्षिततेसाठी लढायला गेलेले चालते
मग कार्यक्रम बघितला म्हणून धक्का वगैरे का बसावा?

>>>>

तुलना ईंटरेस्टींग वाटली.

१२ वर्षाच्या मुलाचे बसमध्ये पुर्ण तिकीट घेतात तर त्याला बीअर प्यायला दिली तर काय हरकत आहे... असे काहीसे Happy

इतक्या साध्या कार्यक्रमांनी बुडण्या इतकी संस्कृती तकलादू आहे का ?
अशी विधान केली जात आहेत
पण जर इतक्या हीन दर्जाचा कार्यक्रम म्हणजे साधी बाब समजली जात असेल तर ,तिथे संस्कृति नक्कीच शिल्लक नाहिये

१२ वर्षाच्या मुलाचे बसमध्ये पुर्ण तिकीट घेतात तर त्याला बीअर प्यायला दिली तर काय हरकत आहे... असे काहीसे >> Lol

बस मधे बसायला/उभारायला जागा (स्पेस) लागती की मॅच्युरिटी (कायद्याने काही अभ्यासानंतर मान्य केलेले वय)?

इथे अनेक जण अश्या कार्यक्रमांच्या विरोधात आहेत हे पाहून सुखद वाटले.

तुलना ईंटरेस्टींग वाटली.

>>१२ वर्षाच्या मुलाचे बसमध्ये पुर्ण तिकीट घेतात तर त्याला बीअर प्यायला दिली तर काय हरकत आहे... असे काहीसे >>
नाही. ते बीयर पिण्याचे लिगल वय कायद्याने ठरवले आहे त्याप्रमाणेच अपेक्षित आहे. माझा मुद्दा एखादी गोष्ट कायद्याला धरुन आहे की नाही एवढाच. जनहित याचिका दाखल करुन कायद्यात दुरुस्ती करुन घेण्याचा मार्ग लोकशाहीत उपलब्ध आहेच. मात्र दडपशाहीला, संस्कृतीच्या नावाखाली झुंडशाहीला माझा कायमच विरोध राहील.
१८ वर्षाच्या मुलांना काय समज असणार असा विचार करण्यापेक्षा माझे मुल १८ वर्षे पूर्ण करुन बाहेरच्या जगात पाऊल टाकेल तेव्हा योग्य तेच स्विकारेल हा विश्वास पालकांना हवा. प्रलोभने असणारच आहेत. नेहमीच होती. त्यावर मात करुन पुढे जायचे बळ घरच्यांनी दिले तर मैत्रीखातर, कुल दिसावे म्हणून वगैरे कुबड्या पुढे करायची गरज तरुण पिढीला भासणार नाही.

फारएण्ड , अश्चिग +१
मी कार्यक्रम/किंवा ए आय बी चा तमाशा म्हणता येइल पूर्ण पाहू शकले नाही.

पण अर्थातच त्यावर संस्कृती बुडेल वगैरे म्हणून बंदी आणावी असं अजिबात वाटत नाही.
आता मला समजलं आहे की तो कार्यक्रम काय आहे त्यामुळे यापुढे तो बघण्याचा प्रश्न येत नाही.

रोस्ट बद्दल बोलायचं झालं तर,
इट टेक्स समथिंग टू बी लिस्ट टॅलेण्टेड इन द फॅमिली व्हीच हॅज संजय अँड सोनम !!!!!
हा जोक/इंसल्ट आवडला. आवडलेले जोक्स फारच कमी होते पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके.

अश्लील,ओंगळ, हिडीस, न बोलता, आयाबहिणींवरून शिव्या न देता पण अपमान करता येतोच की..

जौदे...त्या एक्प्लेनेशन मध्ये त्यांनी म्हण्ल्याप्रमाणे जुवेनाइल प्रकार होता तो.
करण जोहरच्या से. ओरिएंटेशनवरून होणारे जोक्स तर फार बोर होतात. डन टु डेथ.

मला अजिबात आवडला नाही पण होता है, चलता है, दुनिया है...

सर्व वाचकांना एक प्रश्न :

रोस्ट सारख्या कार्यक्रमांमुळे पुरुषाच्या स्त्रियांकडे पहायच्या दृष्टीकोनावर (अॅटिट्यूड) काय परिणाम होईल? सुधरेल, बिघडेल, अढळ राहील?

घनघोर चर्चा अपेक्षित.

आ.न.,
-गा.पै.

अश्लील,ओंगळ, हिडीस, न बोलता, आयाबहिणींवरून शिव्या न देता विनोद पण करता येतोच कि.....
का विनोदाचि एवढि पातळि घसरली......

गा पै

तुम्ही जो पर्यंत मोकळेपणाने व्यक्त होण्याचे माध्यम देत नाही तो पर्यंत तुम्हाला समाजात चाललेले गैर प्रकार वाढताना दिसतील. कारण एकदा व्यक्त होता आले की मनावरचे ओझे दूर होते या उलट जर ते डोक्यात ठेवले गेले तर वाईट मार्गाने बाहेर पडण्याचे धोके वाढतात !

होऊन जौ द्या!

नंदिनी ताई, एक genuine प्रश्न आहे. उत्तर दिलेत तर बरं वाटेल, नाही दिलत, तरी तुमच्या निर्णयाचा आदर आहे.

video media विषयी काही criticism आल्यावर तुम्ही ते इतक्या हिरिरीनं defend का करता? मग ते रांझणा मधल्या धनुष च्या दिसण्याविषयतेअसो किंवा ह्या AIB विषयी. तुमचा पहिला प्रतिसाद अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असातो आणी नंतरचे वार 'हे चालतं, तर ते का नाही' स्वरूपाचे असतात (उदा. होळी, लग्नातले मंत्र ई. उदाहरणं).

हा प्रश्न विचारण्यामागे तुमची भुमिका समजावून घेण्याचा उद्देश आहे आणी बाकी काही नाही. प्रश्न offensive वाटल्यास, क्षमस्व, आणी कृपया ignore करावा.

मला कळत नाहिये की ह्या कार्यक्रमाला विरोध केला म्हणजे दांभिक हा निष्कर्ष कशावरून काढला गेलाय
आणि ह्या चर्चेमधे कुणीही अस म्हटल नाहिये की होळी मधे आई बहिणींच्या नावाने शिव्या देणे म्हणजे फार चांगली गोष्ट आहे
माझा होळीला शिव्या देणे ,किंवा एखाद्या साध्वीने कुणाला किती मूल व्हावीत ?या विषयी सल्ले देण
ह्या गोष्टींना सुद्धा विरोध आहे आणि ह्या कार्यक्रमाला सुद्धा विरोधच आहे

आणि जस होळीला शिव्या देत असताना AIB ला विरोध करण हा दांभिकपणा आहे
तसाच होळीच्या शिव्या देण म्हणजे वाईट म्हणून संताप पण त्याच वेळी AIB च्या कार्यक्रमाच मात्र समर्थन
हाही एक प्रकारचा दांभिकपणाच....................

अहो विरोध अवश्य करा. मुस्कटदाबी करू नका आणि संस्कृतीने गळे काढू नका. धनि +१
वर स्वाती२ म्हणतायत तसं योग्य मार्गाने कायदा बदलासाठी प्रयत्न करा, पण तो पर्यंत धीर धरा.

पुरुषाच्या स्त्रियांकडे पहायच्या दृष्टीकोनावर >>>> या कार्यक्रमात स्त्री-पुरुष असे जेंडरला टार्गेट केलेले जोक नव्हते. तिथे उपस्थित असलेल्यांना टार्गेट केलेले जोक्स (किंवा रोस्टिंग) होते. कार्यक्रम बघितला, त्यातले काही विनोद आवडले काही नाही. जे आवडले नाहीत ते ऑफेन्सिव वाटण्यापेक्षा ग्रोस वाटले. पण तरी कार्यक्रम बघितल्यावर आमचा (म्हणजे स्त्रियांचा) कुणा स्त्री-पुरुषांकडे पहायचा दृष्टीकोण तीळभरानं बदललेला नाही त्यामुळे पुरुषांचा पण इतर पुरुषांकडे किंवा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असेल असं अजिबात वाटत नाही.

असे कार्यक्रम बघून लोकांचे दृष्टीकोन बदलत असते तर सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमांनंतर चाइल्ड अ‍ॅबयुज पूर्णपणे थांबले असते.

मायबोलीवर धागा काढणे हा नक्कीच बेकायदेशीर मार्ग नाही >>> ऋन्मेष, म्हणूनच त्याला काहीच विरोध नाही (किंबहुना तुझ्या कोणत्याच धाग्याला माझा कधीच विरोध, धागे काढण्याबद्दल टीका कधीच नव्हते). तसा मी विरोध करत आहे असे का ध्वनित करतोय तू?

इथे अनेक संघटना हे प्रकार बंद पाडू वगैरे म्हणत आहेत त्याच्या रोखाने ते लिहीले होते मी.

अहो विरोध अवश्य करा. मुस्कटदाबी करू नका आणि संस्कृतीने गळे काढू नका. धनि +१
वर स्वाती२ म्हणतायत तसं योग्य मार्गाने कायदा बदलासाठी प्रयत्न करा, पण तो पर्यंत धीर धरा. >>> सहमत.

>>>तुम्ही जो पर्यंत मोकळेपणाने व्यक्त होण्याचे माध्यम देत नाही तो पर्यंत तुम्हाला समाजात चाललेले गैर प्रकार वाढताना दिसतील. कारण एकदा व्यक्त होता आले की मनावरचे ओझे दूर होते या उलट जर ते डोक्यात ठेवले गेले तर वाईट मार्गाने बाहेर पडण्याचे धोके वाढतात ! <<<

व्वा व्वा!

हे लॉजिक कोणकोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात लागू करायचे ह्याबाबत काही मार्गदर्शन व्हावे कृपया.

संस्कृतीच्या नावाने लोकं फक्त 'गळेच काढतात' असा भ्रम का झालेला आहे? संस्कृतीच्या नावाने चार दोन वाक्ये सहज लिहिली जाऊ शकतात की? वर अनेकांनी सांगितले आहे की होळीला शिव्या देणेही आवडत नाही आणि कार्यक्रमही आवडत नाही. संस्कृतीच्या बाजूने बोलले की गळा काढला आणि कार्यक्रमाच्या बाजूने बोलले की विचारपूर्वक मतप्रदर्शन केले हे कसे ठरले?

आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजुचे आहोत. आम्ही कोणत्याही साहीत्यात फरक करत नाही. जो पर्यंत कोणाची शारिरीक हानी होत नाही. किंवा मानसीक धक्का ( कोणाला उपचार घेण्याची वेळ येत) नाही तो पर्यंत काही हरकत नाही.

तुम्ही कितीही तोंडाची वाफ किंवा पेनाची शाई दवडवा. हात पाय चालवण्यावर मात्र बंधने हवीत.

गा पै घाबरले का .. की व्यायाम करायला गेले

>>तुम्ही जो पर्यंत मोकळेपणाने व्यक्त होण्याचे माध्यम देत नाही तो पर्यंत तुम्हाला समाजात चाललेले गैर प्रकार वाढताना दिसतील. कारण एकदा व्यक्त होता आले की मनावरचे ओझे दूर होते या उलट जर ते डोक्यात ठेवले गेले तर वाईट मार्गाने बाहेर पडण्याचे धोके वाढतात ! <<

स्टेजवरून अश्लील भाषेत बोलणे
आणि वरुन त्याचे वीडियो यु ट्यूब वर टाकणे हा व्यक्त होण्याचा योग्य आणि सनदशीर मार्ग नक्कीच नाहिये

धनि, पहिला नाही, पण आपल्या आवडत्या साईटवर वाचून आपल्याला हवं तसं इंटरपोलेट/ एक्स्ट्रापोलेट करून ते तसं पहिल्या पोस्टमध्ये जाहीर लिहून सुद्धा तू त्यांच्यावर आक्षेप कसाकाय घेऊ शकतोस? अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही आहे की नाही???

Pages