AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> तुम्हाला मी हे बीबी साठी विषय दिलेत असे समजलात तर तो तुमचा प्रश्ण/आवड आहे असे मी समजेन. आमचं काय , येवुच खरडंवायला <<<< Lol झंपी... (विशिष्ट आधुनिक पाश्चात्य/अमेरिकन फुटपट्टीचा दांभिकपणा, अगोचर/उरफाटेपणा) "तोडलास" अगदी त्या उदाहरणातून...

मला पडलेला प्रश्न आहे की इथे कळत न कळत आपण शिव्या देण्याच ग्लोरिफिकेशन तर करत नाहीये ना ?
मी माझ्या आयुष्यात एकही , कसलीही शिवी दिलेली नाही अन जिथवर शक्य असेल तिथवर सहनही केली नाही .
रोडीज वगैरेच्या वाटेला न जायच तेही एक कारण आहे.
मे बी इथे अनेक लोक असतील की ज्याना शिव्यांच काहीच वाटत नसेल पण असाही एक वर्ग आहे ज्याला वाटत त्याच काहीच नाही का ?
की असेही बसमधे वगैरे कानावर आदळतात म्हणून इथेही चालेल अस म्हणायच ?
कथेची गरज म्हणून शिव्या वगैरे मलाही समजत , पन उगाच अक्खीच्या अक्खी वाक्य शिव्या भरून किंवा एखाद्या लैंगिक अवयवाच वर्णन करण खरच गरजेच आहे ?

मी पुन्हा एकदा लिहितोय की झुंडशाहीने बंदी आणा वगैरे चुकीच आहे . पण जर ह्याला कायदा काही करत नसेल तर खरच कठीण आहे ?
असा व्हिडीओ एज रेटींग शिवाय असण चुकीच नाही का ? आणी हे त्याना माहित नसेल ?

लिंबूभाऊ,

गेले अडीच दिवस मी इथे इतर कोणी नसताना वैचारीक झुंज देत आहे. Proud

मलाही अनुमोदन द्यायला बोटे गारठतात का तुमची? Proud

केदार,

हाच मुद्दा मांडायचा आहे.

शिव्या देण्यात अभिमान वाटत असल्यासारखे लोक का बोलत आहेत? पुन्हा माझ्या कथांचा उल्लेख निघेल, तरी लिहितो की कथेतील पात्र शिवराळ बोलते म्हणून मीही तसाच बोलतो हा आडाखा मजेशीर आहे. मी माझ्या आयुष्यात शिवी देतच नाही. गरजच पडत नाही. पण शिव्या बालपणापासून माहीत आहेत.

इथे म्हणजे 'चला रे आणखी गचाळ वागून मोठे प्रतिष्ठित ठरू' सारखी चढाओढच वाटत आहे.

करण जोहर च्या आईने पहिल्या रांगेत बसुन हा शो पाहिला आणि ती हे सर्व ऐन्जाॅय करत होती .......खरच धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र.

>>>> मलाही अनुमोदन द्यायला बोटे गारठतात का तुमची? <<<<
अरे सॉरी सॉरी बेफिकीर... अहो तुम्हाला तुम्ही नेहेमीच आमच्या खान्द्याला खान्दा लावुन उभे असता म्हणुन गृहित धरले गेले हो.
तुम्हालाही अनुमोदन, लगे रहो. हो अन तुमच्या बरोबर गामान्नाही. Happy

माझ्या मनात एक रिकामटेकडा, वरकरणी मुर्ख असा वाटणारा प्रश्न बर्‍याच वर्षापासुन घोळतोय.

ह्या शोचे सगळे पैसे समाजसेवी संस्थाना दान केले गेले म्हणे. पण मग ह्या लोकाना समाजाची इतकीच सेवा करायचीच आहे तर मग हे करोडोचे धनी, आपल्या खिशातुन चार चार हजार रुपये का काढत नाहीत म्हणे? लोकांच्या खिशाला चाटा मारुन हे समाजसेवेचे फुटकळ ढोंग कशाला आणतात?

तरी आजकाल यांचे ते पाचकळ चाळे बंद जरा बंद पडलेत. नाहीतर कुठेही पूर आला, कुठेही भुकंप झाला की लगेच हे उघड्या गाड्या, ट्रकातुन लोकांकडे भिका मागत फिरणार. अरे स्वत:च्या खिशातुन काढा की येड..... नो. ( ही शिवी कशी वाटली? सॉरी शिव्यांचा इतकाच उदो उदो चाललाय ना म्हणून लोकांकडुन ऐकलेली इथे देऊन/ लिहुन बघीतली)

समाजसेवा करायची तर जरा डॉ. बाबा आमटे, कैलाश सत्यार्थींसारखी करुन बघा.

तुमचा आयडॉल सचीन तेंडुलकर सुद्धा स्वत: लोकाना मदत करतो, ते असल्या शिव्यांच्या कार्यक्रमात जाऊन नाही ढोंग आणत.

.

ऋन्मेष, सस्मित, मनरंग, साती, झंपी, लिंबूदा, गामा, बेफी अनुमोदन तुम्हाला. Happy
आणि या आयडी(या)ज च्या बाजूने लिहिणार्‍या सर्वांनाच जोरदार अनुमोदन.

आम्ही कसे वेगळे आहोत आणि हे वेगळेपणच कसे स्वतंत्र आणि भारी आहे, हे दाखवायची नव्हे त्याला प्रतिष्ठा मिळवून घेण्याची केवढी हौस. Sad

शिवीमुक्त शाळा (की असेच काहीसे) अभियाना बद्दल मागे वाचले होते. कोणाला माहिती आहे का ?

लोकहो, त्या कार्यक्रमात निव्वळ शिव्याच अश्या नव्हत्या,

तर त्यात जे अश्लील हावभाव होते त्याच्या १० टक्के जरी कोणी महिलांसमोर केले तर ते सेक्शुअल हॅरासमेंट म्हणून गणले जाते.

पुन्हा एकदा विचार करा नक्की तुम्ही कशाचे आणि का समर्थन करत आहात!

मला तरी वाटत की हे असले प्रकार आता थांबवन अशक्य दिसते कारण काय काय थांबवणार काल परवाच शमिताभ चा ट्रेलर टिव्हीवर पाहिला त्यात धनुष हा अक्षरा हाशन चा किस घेतो तो ते कुठे घेतो हे सांगण्या पेक्षा पहा .....

तरी बरं अजून भारतीय मनोरंजन विश्व अश्लीलतेच्या बाबतीत फारच बाल्यावस्थेत आहे. तुम्हाला एआयबी मुळे धक्का बसलाय तर मग भारतात "अ शॉट अ‍ॅट लव्ह" सारख्या मालिका येतील तेव्हा तर २५००० व्होल्टस नी तुमचा पार कोळसाच होईल की.>>

सगळेच जन सगळ्याच गोष्टी करत असतात . पण त्या कुठे , कधी , कश्या कराव्यात ह्याचे काही नियम असतात . कारण माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे समाजाचे काही नियम पाळावे लागतात. ते न पाळणारे विकृत gategory मध्ये येवू शकतात . "अ शॉट अ‍ॅट लव्ह" सारख्या मालिका पुरुष आणि स्त्रिया सारख्याच लेवल ला एन्जोय करतात . त्यांची मानसिकता , culture हे आपल्यापेक्षा फार वेगळंआहे . पण आपल्याकडे तसं नाही न. आता हेच बघा एका मराठी मुलीने एन्जॉय केलं म्हणून काही लोकांना किती धक्का बसलाय . भारतीय लोक modern आहेत ते फक्त ड्रेस , hair style पुरतेच . समाजाची मानसिकताच वेगळीच आहे . त्यात असले कार्यक्रम आगीत तेल ओतण्याच काम करतात . आणि परदेशात अनेक चांगल्या गोष्टीही अनुकरण करण्यासारख्या असताना असल्या गोष्टींच अनुकरण केल्यावर आपण modern वगेरे होवून हि स्वताची खोटी समजूत करवून घेण्यासारखं आहे
ह्या शो मध्ये ज्यांच्यावर जोक्स मारले जात होते ते नाईलाजाने सहन करत होते असं वाटतंय . इथे विरोध केलं तर आपल्याला वेड्यात काढतील म्हणून . किवा 'लाखो रुपये मिळण्याच्या मोबदल्यात माझ्या आईची अब्रू चव्हाट्यावर येणे मला चालते' असे लोक तिथे असतील.

इथले वाचुन हा शो पाहिला आज. अतिशय अश्लिल आणि थिल्लर वाटला.एखाद्याची खिल्ली उडवणे आणि खेळाडू वृत्तीने त्याला सामोरे जाणे असे वाटले होते मला रोस्टींग म्हणजे. पण यातले जोक्स, भाषा, हावभाव खरचं अश्लिल, थिल्लर आणि एकाच एक गोष्टी बद्दल भाष्य करणारे होते. एखाद्या गोष्टीबद्द्ल सभ्य भाषेत मोकळेपणाने बोलणे आणि अश्लिल शिव्या देत बोलणे, खरचं फरक आहे. Sad
रसल पिटर्सच्या शो नक्कीच असे नसतात.

>>>> आणि परदेशात अनेक चांगल्या गोष्टीही अनुकरण करण्यासारख्या असताना असल्या गोष्टींच अनुकरण केल्यावर आपण modern वगेरे होवून हि स्वताची खोटी समजूत करवून घेण्यासारखं आहे
ह्या शो मध्ये ज्यांच्यावर जोक्स मारले जात होते ते नाईलाजाने सहन करत होते असं वाटतंय . इथे विरोध केलं तर आपल्याला वेड्यात काढतील म्हणून . किवा 'लाखो रुपये मिळण्याच्या मोबदल्यात माझ्या आईची अब्रू चव्हाट्यावर येणे मला चालते' असे लोक तिथे असतील <<<

प्रचंड अनुमोदन सारिका३३३. Happy अचूक मर्म सापडलय तुम्हाला.

असाच एक प्रश्ण पडलाय?

२१ वर्षाचा मुलगा आपल्या आईसमोर दुसर्‍या कोणा मुलीला चिडवायला, फ* दॅट बि* म्हणत असेल का?
आईच्या व त्याच्या नात्यात मोकळेपणा आहे म्हणून?

धाग्याचा विषय तिकडं काय आहे याच्याशी घेणं देणं नाही. या शो बद्दल पठडीतल्या लोकांच्या प्रतिक्रीया आल्या त्याच्याशी पण घेणं देणं नाही. ते कसले रक्षक का काय त्यांच्य्शी पण घेणं देणं नाही.
नेटवर हल्ली बायकांच्या प्रतिक्रीया फारच इरीटेटींग होत चालल्या आहेत. बायकांनी एक काय तरी भूमिका घ्यावी.
१. सभ्य कि असभ्य याबद्दल तुमची भूमिका काय आहे ? ठरवा एकदा.
२. एआयबी सारखे विनोद गल्लीबोळात, मायबोलीवर चालवून घ्याल का ? विचार करा.

जे पुरूष आपल्या इथल्या आयाबहीणींना आवडणार नाही असे विनोद सार्वजनिक रित्या झाल्याने अस्वस्थ होतात त्यांची मापं काढ्ण्याचं कारण काय ? हे सगळे ते तसले रक्षकच असतात हे कुणी सांगितलं ?

मोठ्या लोकांनी असे विनोद केले, इंग्लीशमधे शिव्या दिल्या की आपण धन्य झाल्यासारखं वाटून घ्यायचं. संस्कृतमधे शिवीसमान सुभाषित ओवी समजून घ्यायचं आणि एखाद्याने आपल्या भावनांना फुल्यांफुल्यांच्या भाषेत वाट करून दिली की मग चिखल दगड सिद्धांत सांगत बसायचं. त्या केजो बद्दल तो गे असल्याचे विनोद अनेक दिवसांपासून आहेत. यांचं लाईफ एकदम वेग्ळं आहे. ते जसे कपडे घालतात तसे कपडे घालून आपण बाजारात फिरू शकतो का ? दीपिका कदमपो ने आम्ही कलाकार आहोत, आम्हाला निर्वस्त्र होऊन कॅमे-यापुढे यावं लागतं ते आमच्या व्यवसायाचा भाग म्हणून, म्हणून आमच्या खाजगी जीवनावर अतिक्रमण नको असं सांगितलं होतं. याबद्दल सहमत. पण मग या थोर मंडळींनी पण इतरांच्या सार्वजनिक / खाजगी जीवनात अतिक्रमण नकोय करायला. एखाद्या बंदीस्त हॉलमधे फक्त निमंत्रितांसाठी हे शोज असावेत. त्याची क्लिप यू ट्यूबवर टाकली की तुम्ही तो कार्यक्रम सार्वजनिक करता हे लक्षात राहू द्या. त्याबद्दल मीडीयात छापून येणार नाही याचीही दक्षता घ्यावी. थोडक्यात ओवेसीला जी आचारसंहीता पोलीस देतात ती अशा कार्यक्रमांना पण द्यायला हवी. नाहीतर मग ओवेसीला पण जाहीर सभा घेऊ द्या की !

काल परवा ओवेसीचाच्ब विषय मीही आणणार होतो ह्या धाग्यावर, पण मग लगेच 'ह्यांनी राजकीय विषय काढला' असा एक कांगावा झाला असता.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि झाकले की अधिक करावेसे वाटते ह्या दोन्ही मुद्यांवर मी ओवेसीचेच उदाहरण देणार होतो.

अमा आणि धनि ह्यांना उद्देशून!

अमा ह्यांना उद्देशून एक लहान यादीही केलेली दिसेल आधीच्या प्रतिसादात!

अ सो च

रसल पिटर्सच्या शो नक्कीच असे नसतात.>> अगदी बरोबर पेरू.. ह्याच कारणाने मी मागच्या पानावर त्याच्या शोज चं उदहारण दिलं होतं.. त्याचे शोज म्हणजे निखळ करमणूक असते.. कोणत्याही देशातल्या लोकांची खिल्ली उडवतांना त्या लोकांनाही त्यातून हसूच येईल असं त्याच्या विनोदांचं स्वरूप असतं.. हा शो सुद्धा तसाच असेल, असं वाटलं होतं.. पण ह्याच्यात फारच ओढून-ताणून विनोद केले आहेत..

ऋन्मेष, तुझ्या हेडरमध्ये 'सोशल कन्सर्न' जास्त जाणवला म्हणून फक्त :-
'शिव्यां'बद्दल तुझा दृष्टीकोन (स्वतःच) तपासून बघण्यासाठी लवकरच येऊ घातलेला 'ख्वाडा' हा 'मराठी' सिनेमा बघ, अशी विनंती करतो. (हा सिनेमा म्हणजे आता लगेच आठवलेलं उदाहरण. यासारख्या अनेक कलाकृतींची उदाहरणं देता येतील) धागे आणि पोल्स काढणे हे मार्ग स्वतःची विचारधारा तपासून बघण्यासाठी, तिचं धारदारपण आणि अस्सलपण जोखण्यासाठी आणि ती 'टू द पॉईंट' करण्यासाठी उपयोगी पडत असतील हे मान्य आहे, मात्र यासाठी त्यापलीकडेही काही उपाय आवश्यक असावेत.. कारण आपण नक्की कुठच्या समाजवर्गाचं प्रतिनिधित्व करतो- या गोष्टीवर बरंच काही अवलंबून असेल असं वाटतं. (आणखी संदर्भः चमनची 'कुठचा समाज' या अर्थाची पोस्ट). तुमची थॉट प्रोसेस तुमच्या आजूबाजूच्या बहुतांश लोकांना किंवा बर्‍याचशा 'पॉकेट्स'ना / गटांना कुचकामी वाटू शकते. पण तरीही तिचं तुमच्या स्वतःसाठी खास असं एक महत्त्व आहेच. मात्र तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर तुमच्या त्या विचारधारेला जास्त बळकट आधार शोधावे लागण्याची जबाबदारी तुमच्यावर आपोआप येऊन पडते. हे सारं 'स्वतःसाठी' करायचं. नाहीतर वरती वैद्यबुवा म्हणतात तसं 'उच्चासनावर बसून समाजकारण' अशा निरर्थक आणि 'स्वतः:ला' उपयोगी नसणार्‍या गोष्टी सुरू होतात.

ते असो. 'ख्वाडा' हा मराठी सिनेमा कदाचित 'काल्पनिक' असेल, आणि एआयबी वास्तवात घडलेला / रिअ‍ॅलिटी शो आहे. एआयबी तू बघितला आहेसच. आता ख्वाडाही बघितल्यानंतर तुला खालील प्रश्न पडतील. ते तू तुझ्या प्रकृतीप्रमाणे धागे / पोल काढून / इतर मार्ग वापरून सोडव. (तुला जाहीर उत्तरं लिहायची तर लिहीच. मी मागितलेली नाहीत.)

१) कुठच्या शिव्यांनी मनाला / डोक्याला हृदयाला जास्त त्रास झाला? एआयबीच्या की ख्वाडाच्या?
२) कुठच्या शिव्या निरूपद्रवी आहेत? एआयबीच्या की ख्वाडाच्या? या दोघांपैकी कुठचं सोशल पॉकेट तुझ्या जवळचं वाटतं? आणि कुठचं संबंध नसलेलं वाटतं?
३) कुठच्या शिव्यांच्या संदर्भातली 'देहबोली'ही तुला महत्वाची वाटली? एआयबीच्या की ख्वाडाच्या? कुठच्यात्ल्या शिव्यांपेक्षाही त्या देतानाची 'देहबोली' जास्त भयानक / आक्रमक / अंगावर येणारी वाटली?
४) कुठच्या शिव्यांनी करमणुक झाली? एआयबीच्या की ख्वाडाच्या?
५) कुठच्यातल्या काही शिव्या तुला 'समजल्या नाहीत'? एआयबीच्या की ख्वाडाच्या?
६) कुठच्या शिव्यांना 'संस्कृती' किंवा 'अस्मिते'चे 'सो-कॉल्ड' नियम लागू करता येतील? एआयबीच्या की ख्वाडाच्या?
७) कुठच्या शिव्या काही शतके / दशके जुन्या आहेत? एआयबीच्या की ख्वाडाच्या?
८) कुठचा 'शो' सार्वजनिक होण्यात जास्त धोके / सामाजिक फायदे आहेत? एआयबी की ख्वाडा?
९) कुठच्या शिव्यांनी अंतर्मुख केलं? एआयबीच्या की ख्वाडाच्या?
१०) कुठचा शो तुला जास्त अस्सल / वास्तव वाटला? ख्वाडा नावाचा काल्पनिक शो, कि एआयबी नावाचा 'रिअ‍ॅलिटी' शो?

संस्कृती ही एक व्यवस्था असावी, आणि गरजेप्रमाणे ती सतत बदलत असावी. तिला चांगलं किंवा वाईट म्हणणं कितपत संयुक्तिक आहे, हे माहिती नाही. पण ती नेहमी 'लखलखत' वगैरे राहावी, आणि 'शिव्यां'सारख्या अभद्र गोष्टींचा तिला स्पर्शही होऊ नये, नाहीतरी ती 'बुडेल' असे प्रवाह सुरू झाले, की हसावं की रडावं ते कळत नाही. 'शिव्या लहाणपणापासून माहिती आहेत, पण कधी दिल्या नाहीत'- हेही त्यातलंच एक. तुमची 'देहबोली' किंवा 'चेहरा' किंवा 'वर्तन' अनंत वेळा शाब्दिक शिव्यांपेक्षाही अभद्र, बीभत्स, अश्लील इ. इ. जेव्हा होतं, तेव्हा तुमच्या शिव्या देण्या न देण्याला काहीही अर्थ उरत नाही.

हे एआयबी प्रकरण पाहिलं नाहिये. पण इतक्या प्रतिसादांनंतर अंदाज येतोच त्यामुळे बघणार नाही कारण ते एन्जॉय करायचा पिंड नाही.

साजिरा,
तुमची 'देहबोली' किंवा 'चेहरा' किंवा 'वर्तन' अनंत वेळा शाब्दिक शिव्यांपेक्षाही अभद्र, बीभत्स, अश्लील इ. इ. जेव्हा होतं, तेव्हा तुमच्या शिव्या देण्या न देण्याला काहीही अर्थ उरत नाही.>>> +१

Parineeti Chopra is not here tonight because we said she'd get f****d by 10 dudes in front of 4000 people. Karan Johar is here tonight because we told him he'd get f****d by 10 dudes in front of 4000 people.”>>>>>>>>>> ???????????? हॉरीबल! हा जोक आहे???

तुमची 'देहबोली' किंवा 'चेहरा' किंवा 'वर्तन' अनंत वेळा शाब्दिक शिव्यांपेक्षाही अभद्र, बीभत्स, अश्लील इ. इ. जेव्हा होतं, तेव्हा तुमच्या शिव्या देण्या न देण्याला काहीही अर्थ उरत नाही.
>>>>
याला अनुमोदन साजिरा.

आपण एआयबी शो पाहिला आहे का?
आपली वरची पुर्ण पोस्ट शिव्यांवरच आधारीत होती. पण माझा आक्षेप शिव्यांना नाहीच आहे. किंवा निव्वळ शिव्यांना नाहीच आहे. त्या का दिल्या जात आहेत हे महत्वाचे आहेच. आपण सारे प्रतिसाद (भरमसाठ संख्या असल्याने) वाचले नसावेत. पण एके ठिकाणी मी स्वता काय किती शिवी देतो हे नमूद केले आहे. तसेच वर आपण हा शो पाहिला आहे का अशी विचारणा केली कारण त्यात शिव्यांपलीकडेही बरेच काही होते.

ख्वाडा! येस्स, जमल्यास बघेन नक्की Happy

सस्मित, तुम्हा आम्हाला असे जोक्स कसे कळणार, इथे काही महनीय व्यक्ती आहेत त्यांना कळतात बरं असले विनोद आय मिन जोक्स.
तरी सुध्द्दा तो शब्द इथे लिहीताना त्यात ते फुल्या फुल्या का वापरतात ते मात्र मला कळत नाही. जो शब्द लिहितानाही आपण पुर्ण लिहू शकत नाही तो शब्द एका शो दरम्यान उच्चारला जातोय तेही एका स्त्री संदर्भात आणि त्या वाक्याचा पुर्ण अर्थ पण कळतोय तरीही चालेल कारण आहे अभिव्यक्तीस्वातंत्र्य.

हो पाहिला तो शो. त्याबद्दल म्हणण्यासारखं काही नाही. असतं तर इतर प्रतिसादांनाही कदाचित प्रतिप्रतिसाद दिले असते.

>>>संस्कृती ही एक व्यवस्था असावी, आणि गरजेप्रमाणे ती सतत बदलत असावी. तिला चांगलं किंवा वाईट म्हणणं कितपत संयुक्तिक आहे, हे माहिती नाही. पण ती नेहमी 'लखलखत' वगैरे राहावी, आणि 'शिव्यां'सारख्या अभद्र गोष्टींचा तिला स्पर्शही होऊ नये, नाहीतरी ती 'बुडेल' असे प्रवाह सुरू झाले, की हसावं की रडावं ते कळत नाही<<<

गरजेप्रमाणे ह्या शब्दाबद्दल व ए आय बी (हा धागा ए आय बी बाबत आहे म्हणून) एकत्रीतरीत्या लिहीत आहे. बाकी विधाने 'जनरल' स्वरुपाची असल्याने ते विषयांतर होईल.

१. ए आय बी सारख्या शो ची गरज कोणाला असते?

२. मनोरंजनाचा हा एक पर्याय आहे हे पहिला शो होण्याआधीसुद्धा प्रेक्षकांना माहीत असते की ते मार्केटिंग, जाहिराती, वॉर्निंग्ज ह्यातून आधीच पढवून ठेवले जाते आणि मुद्दाम मानसिकता अश्या शो साठी पात्र बनवली जाते?

३. ए आय बी सारखे शो झाले नाहीत तर काय अडेल? (तमाशा बंद झाला तर काय अडेल असा प्रतिप्रश्न येणार नाही अशी कल्पना आहे. एक आधीच अस्तित्त्वात असलेली गोष्ट आणि एक नव्याने सुरू करण्यात येणारी गोष्ट ह्यात नव्याने सुरू करण्यात येणार्‍या गोष्टीला उद्देशून प्रश्न अधिक विचारले जाणार हे नैसर्गीक)

४. रश्मी म्हणतात तसे चॅरिटी करण्यासाठी असा'च' कार्यक्रम करण्याची गरज काय?

५. ह्याहीपेक्षा व्हल्गर गोष्टी समाजात आधीच आहेत हे आणखीन एक निंद्य गोष्ट निर्माण करण्यासाठीचे स्पष्टीकरण म्हणून वापरले जाणे ह्यापलीकडे कोणता उदात्त हेतू ह्यातून साध्य झाला? (प्रत्येक गोष्टीतून काही उदात्तच व्हावे असे नाही असे म्हणणे असेल तर इतकी मोठी उलाढाल काय निव्वळ काही टुकार विनोद प्रत्यक्ष ऐकता यावेत म्हणून केली गेली का असे विचारण्याचे मनात आहे)

>>>> तुमची 'देहबोली' किंवा 'चेहरा' किंवा 'वर्तन' अनंत वेळा शाब्दिक शिव्यांपेक्षाही अभद्र, बीभत्स, अश्लील इ. इ. जेव्हा होतं, तेव्हा तुमच्या शिव्या देण्या न देण्याला काहीही अर्थ उरत नाही. <<<
येत्या ववि मधे याचे सोदाहरण प्रात्यक्षिक बघायला आवडेल मला Proud

याबरोबर असहमत कारण देहबोली/चेहरा/वर्तन शिव्यांपेक्षाही अभद्र/बिभत्स/अश्लिल होते, तर ते ही शिव्यांइतकेच किंबहूना जास्तच निषिद्ध मानले जाते हे तुम्ही कसे काय विसरता?
एखाद्या स्त्रीकडे साधे एकटक बघितले, व तशी तक्रार आली तरी तो गुन्हा मानला जातो हे माहित नाही काय? अन मग "अर्थ" उरत नाही हा नि:ष्कर्ष कशावरुन का काढताय? देहबोली वगैरे बाबी आक्षेपार्ह मानल्या जातातच, पण म्हणुन मग शिव्या द्या/वा नका देऊ ही पळवाट कशाला?

हल्ली बर्‍याच हिंदी गाण्यात भलेभले हिरो कमरेच्या खालील भाग पुढेमागे हलवून दाखवित असतात तसे तुम्ही दाखवता का सर्रास उघडपणे? तसे दाखवावेच इतक्या भावना कधी उद्दीपीत होतात का? जर नसतील होत, तरी दाखवित असतील, तर त्यामागिल कारण समोरच्यापर्यंत त्या हालचालीमधून विशिष्ट कृतीचा संदेश पोहोचविणे वा समोरच्या व्यक्तिला "लाज" वाटायला लावणे असे उद्देश असू शकत नाहीत का? आता दोन बुलबुल वा डिस्कव्हरि वर दाखविल्या जाणार्‍या पंक्ष्याच्या कुठल्या जोडीतील नर मादीला आकर्षित करण्यासाठी जे नाचतो, अंगविक्षेप करतो, त्याचेशी तुलना करून हे असे कमरेखालचे अंग कचाकचा पुढेमागे हलवीत दाखविण्याच्या कृतीचे समर्थन कृपयाच करूच नका.
इतके विश्लेषण द्यायचे कारण तुमचे वरील व्याक्यातील गृहितकच चूकलेले आहे. कारण अशा कोणत्याही जाहीर प्रदर्शनातील कृतीचे समर्थन आम्ही करीत नाही. तो हक्क फक्त मानवेतर पशू/पक्षी/प्राण्यांना आहे. होप सो की पशु/पक्षी/प्राण्यांची उदाहरणे नाव/प्रसंगानिशी द्यायला तुम्ही भाग पाडणार नाहीत.

बेफिकीर, तुमच्या वरील अन एकंदरीतच आधीच्या सर्व पोस्ट्स साठि अनुमोदन.
मला इतके मुद्देसूद लिहीता येत नाहीये.

त्या प्रश्नांची उत्तरं मला दोन प्रकारे देता येतील, आणि त्यानुसार कदाचित उत्तरंही बदलतील.
१) 'मी, मला, माझ्यासाठी' हे केंद्रस्थानी ठेऊन.
२) मी राहत असलेल्या समाजाच्या, माझ्या आजूबाजूच्या वातावरणाच्या दृष्टीने.

त्यातला पहिला पर्याय निवडला, तर पहिल्याच प्रश्नाचं उत्तर 'मला त्याची गरज भासत नाही. करमणुकीसारखा काही हेतू मनात ठेऊन मी तो पाहिला, तरी मला त्यातून काही मिळालं नाही.' असं येतं. त्यामुळे पुढच्या प्रश्नांकडे वळण्याची गरज भासत नाही.

दुसर्‍या पर्यायातून सार्‍या प्रश्नांची उत्तरं देता येतील. मात्र माझ्या आजूबाजूच्या समाजाची, त्याच्या प्राधान्यक्रमाची आणि त्याच्या गरजांची जाण मला १००% आहे- असं मला जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत मी स्व्तः ती देणार नाही. कारण मग 'उच्चासनावर बसून समाजकारण आणि सामाजिक आरोग्याची आणि प्रगल्भतेची काळजी करणं' असे आरोप कुणीतरी माझ्यावर करू शकतील. तशी 'सो-कॉल्ड' काळजी करणं ही 'माझी वैयक्तिक' गरजही नाही, किंवा प्राधान्यक्रमावर नाही.

Pages