AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच की!

माझे सर्व शब्द मागे घेतो. मी व्हिडिओ पाहिला नाही, मी त्याच्याबाजूने बोलणार नाही. Proud

जे प्रतिसादांनी दुखावले गेले असतील त्यांनी मोठ्या मनाने माफ करावे, शुद्ध मुद्दे मांडत राहीन.

मला वाटतं ह्यांनी कार्यक्रमातले त्यांना शिवराळ वाटलेले इंग्लिश शद्ब आणि बाकीचं बोलणं जश्याचं तसं मराठीत भाषांतर केल्याने 'आई बहिणीवरून शिव्या' दिल्या असे हे म्हणत आहेत. Uhoh

>>आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजुचे आहोत. <<
अ‍ॅट वॉट कॉस्ट? तुमच्या सभोवतालच्या समाजाचं संतुलन ढासळण्या इतपत?

रोस्ट कॉमेडि अमेरिकेत काहि प्रमाणात चालते कारण इथल्या लोकांचा टॉलरंस लेवल जास्त आहे, झोंबरी टीका इग्नोर करण्यासाठी लागणारी मॅच्युरीटी त्यांच्याकडे आहे. भारतात तशी परिस्थिती आहे का? अजुन पर्यंत खळ्ळ्-खटॅक कसं झालं नाहि याचंच मला आश्चर्य वाटतय.

एआयबीला त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एव्हढी काळजी असेल तर त्यांनी युट्युब वरचा विडियो काढायला लावणार्‍या सलमान खानशी लढा द्यावा (पंगा घेतलेला आहेच). करु शकतील का?

सलमान खानने व्हिडिओ काढायला लावला असेल, असं वाटत नाही, कारण कार्यक्रमातून मिळालेले काही पैसे त्याच्याच संस्थेकडे गेले आहेत आणि व्हिडिओमध्ये त्याच्या कुटुंबातील कोणाचाही उल्लेख नाही.

तसा मी विरोध करत आहे असे का ध्वनित करतोय तू?
>>>>
अरे बाबा मी स्माईली टाकलीय त्यापुढे, आणि मला तसे ध्वनित करायचे नसून माझा मुद्दा हा होता की कायदा हातात घेऊ नका वगैरे मुद्दे इथे एआयबीला विरोध करणार्‍यांच्या तोंडी बळेच मारले जात आहेत. त्यानुसार मी म्हणालो की इथे कोणी कायदा हातात घेतलाय किंवा जे त्याविरोधात घेणार आहेत त्यांना समर्थन करत आहेत. किंवा कोण असे म्हणतेय की पकडून चोप द्या एकेकाला. आपन फक्त इथे धागा काढून चर्चाच करतोय.
अर्थात उद्यापरवा तसे कोणत्या राजकीय वा सामाजिक संघटनेने केले तरी कायदा हातात घ्यायचा की नाही हा सर्वस्वी वेगळा विषय झाला. किंबहुना या प्रकाराला विरोध करायचा तर तो कोणत्या मार्गाने करायच्या या सदराखाली ते आले. इथे माझ्यामते तरी चर्चेचा मुद्दा एवढाच असावा की हे जे आहे ते चूक की बरोबर, त्याला विरोध झाला पाहिजे की नाही? कसा ते नंतर सर्व समविचारी मिळून ठरवूयाच की Happy

अहो कोणी कार्यक्रम पाहिलेले आहे का इथे!
>>>>> अहो धनि, धागाकर्ता स्वत: आहे की Happy

इथे जे त्या कार्यक्रमाची बाजू घेत आहेत त्यांनाही खरे तर कबूल आहे की तो कार्यक्रम गलिच्छपणाचा कळस आहे.
त्यामुळे त्यातील कंटेन्टवर चर्चायचे सोडून ते खालीलप्रमाणे साइडमुद्दे घेत आहेत.

१) कायद्याने मान्यता आहे तर हरकत काय.
२) खाजगी हॉलमध्ये केला, कोणाला बघण्याची सक्ती नव्हती.
३) असे कार्यक्रम बघून कोणी बिघडत नाहीत. आताची पिढी समजूतदार आहे.
४) होळीच्या शिव्या चालतात मग हे का नको. तमाशा बरे तुम्हाला चालतात आणि बॉलीवूड कलाकारांनी केले की तेवढे नाक मुरडायचे.
५) हे कार्यक्रम नसतानाही बलात्कार होताहेतच ना.
५) वगैरे वगैरे
६) वगैरे वगैरे

हे वरील मुद्दे अनुक्रमे खालील प्रमाणे आहेत.

१) (कायद्याची) पळवाट
२) सारवासारव
३) डिफेन्सिव्ह
४) जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ.
५) गंडलेले लॉजिक
५) अवांतर
६) अवांतर

टाळ्या

अहो कोणी कार्यक्रम पाहिलेले आहे का इथे!>>> हो, आजच पाहिला पूर्ण कार्यक्रम.. इथेच वर महेशकुमार यांनी दिलेल्या लिंकमुळे पूर्ण कार्यक्रम पाहू शकले. आधी फक्त ट्रेलर्स आणि बातम्या वाचूनच कार्यक्रमाच्या स्वरुपाची कल्पना आलेली होती. त्यानुसार मत बनवले होते. आता पाहिल्यावर मत देणेही आवश्यक वाटले, म्हणून देतेय.

(कार्यक्रमाला दिलेल्या डिस्क्लेमर्समुळे तो अश्लिल विनोदांनी, अब्युजिव्ह शब्दांनी ठासून भरलेला असेल, याची कल्पना होतीच, त्यामुळे त्याबाबतीत काहीच म्हणणं नाही.. थोडक्यात, ऋन्मेषला ज्यावर आक्षेप आहे आणि जो धाग्याचा मुख्य विषय आहे, त्यावर लिहित नाहीये.)

कोणाच्याही आई-बहिणीवरुन विनोद वगैरे केल्याचे आढळले नाही.. मात्र विनोदांमध्ये फार तोचतोचपणा जाणवला. एका काळ्या माणसावर प्रत्येक रोस्टरने फक्त रंगावरुनच विनोद केले. एकाच्या टकलावर विनोद करतांना त्याचे कोणीतरी किमो केलेल्याशी साम्य जाणवते, असा विनोद केला, जो वाईट होता. तिथे एक मुलगी पण त्यांच्यात होती, तिच्यावर विशेष विनोद झाले नाहीत, हे ठीकच.. एकजण ख्रिश्चन-त्याच्यावर प्रत्येकाने त्याच्या वर्जिनीटीवरच विनोद केले. करण जोहरवरचेही बहुतांश विनोद त्याच्या ओरिएन्टेशनवरुनच केले गेले.. तिथे उपस्थित नसलेल्या फरिदा जलाल आणि परिणीती चोप्रावर विनोद करणे योग्य वाटले नाही..

एकूण, ज्यांच्यावर विनोद केले जात होते, ते ही दुखावले न जाता एन्जॉय करणार, म्हटल्यावर आणि चांगल्या भाषेची अपेक्षा न ठेवता कार्यक्रम पाहणार म्हटल्यावर निखळ मनोरंजन होईल, अशी अपेक्षा होती, जी पूर्ण झाली नाही. कार्यक्रम फारच कंटाळवाणा वाटला. अजून भरपूर सुधारणेला वाव आहे. ज्या लोकांवर विनोद होत होते, त्यांच्यावर मासिके, वर्तमानपत्रे, सोशल साईटस इ. मध्ये ज्यावर ते केले गेले, त्याचे मन दुखावणार्‍या गॉसिपच्या स्वरुपात येत होतेच.. तेच इथे त्यांच्यासमोर केले गेले, त्यामुळे हा अ‍ॅप्रोच हेल्दी वाटला. आलिया भटलाही तिच्यावरचे विनोद ऐकून हसू आले. तिच्या एका व्हिडिओत तिने म्हटले आहे, की तिला तिच्यावरचे विनोद वाचून रडू यायचे. सगळ्यांसमोर खुलेपणाने तेच विनोद इथे केल्यामुळे त्यांची धार नक्कीच कमी झाली. ही एकच सकारात्मक गोष्ट वाटली.

सानी,
परिणिती अगोदर या रोस्टचा भाग असणार होती. तिने ऐनवेळी नकार दिला. तिला या कार्यक्रमाची पूर्ण कल्पना असावी कारण तिने एआयबीच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.

ऋणम्या, लेका बालिस्टर का नाहि झालास???

अजुन एक अ‍ॅड कर. अमेरिकेची फुटपट्टी भारताला लावायची खोड आम्हाला आहे... Happy

एकदा दोन भिक्षू परिक्रमा करत होते. वाटेत त्यांना एक नदी लागली. त्या नदीकाठी एक तरुणी उभी होती. तिला नदी पार करून पलीकडे जायचे होते. तिने त्या दोन भिक्षूंना मदत मागितली. एका भिक्षूने तिला आपल्या खाद्यांवर घेतले आणि ते तिघे नदी ओलांडून पलीकडे गेले. रात्री मुक्कामाला थांबल्यावर दुसऱ्या भिक्षूने विचारले, "बंधू, आज तुझ्या हातून फार मोठे पातक घडले आहे! आपल्याला स्त्री स्पर्श वर्ज्य आहे. आणि असे असताना तु त्या तरुणीला आपल्या खांद्यावरून पलीकडे नेलेस! तुला प्रायश्चित घ्यायला हवे!" दुसरा भिक्षू हसून म्हणाला, "अरे, मी तर तिला कधीच खांद्यावरून उतरवले! तु मात्र दिवसभर तिचे विचार मनातून काढू शकला नाहीयेस!"

परिणीती वर ती का आली नाही इतकंच आठवतंय, तो जोक करण वरच होता पण.>>>

“Parineeti Chopra is not here tonight because we said she'd get f****d by 10 dudes in front of 4000 people. Karan Johar is here tonight because we told him he'd get f****d by 10 dudes in front of 4000 people.”

अमितव, मला वाटतं, हा विनोद दोघांवर आहे.

असो.
कुठल्याही बोधकथेचा व्यत्यासही लिहिता येतो.
मला वाटतं 'त्या स्त्रीची मदत करणे' ही त्यावेळी अपरिहार्यता होती.
या एआयबीच्या कार्यक्रमात अश्लील बोलूनही नंतर आमची आणि समाजाची मने गंगेवाणी निर्मळ आहेत हे सांगण्याची कोणतीही अपरिहार्यता नव्हती. चॅरिटीच्या नावाने सवंग गोंधळ.
पुन्हा एकदा असोच!

Moral of the story काय आहे आणि काय घेतले गेले Uhoh
असो! बाकी ऋन्मेऽऽष | 5 February, 2015 - 10:25 ची ही पोस्ट आहे त्यावर त्याने दुसऱ्या बाजूने अशीच पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न करून बघावा!
झरबेरा, तुझी पोस्ट आवडली!
माझ्यापुरता हा विषय संपला!

साती+१

जि +१

ऋन्मेऽऽष >> हा कार्यक्रम हे समाजात जे बोलतात तेच बोललेले आहेत. एखाद्या घरात नसतील बोलत पण मुंबईत लोकल मध्ये नक्कीच ही भाषा ऐकायला येते त्यामुळे फक्त गलिच्छपणाचा कळस आहे हे मी मान्य करत नाही.

बाकी काही म्हणा पण वर रिशी ने (धागाकर्त्त्याचे नाव लिहायला अवघड असल्याने त्याच्या सदस्यत्वातले नाव वापरणार आहे) जी ५ कारणे व त्याची जोडी कारणे दिली आहे ती भारी आहे.

सानीचा प्रतिसाद आवडला.

हा कार्यक्रम आता आहे त्याच दर्जाचा राहिला तर प्लॉप जाईल. विनोद अजुन 'स्मार्ट अपमान'वाले हवेत, शिव्या कमी हव्या. विनोदात शिव्या असायलाच हव्या असे मला वैयक्तिक वाटत नाही पण याचे स्वरुपच असे आहे म्हटल्यावर, या शिव्या अशा जागी पेरायला हव्या की चक्क हसु यायला हवे जे इथे सध्या तरी नाहिये. पब्लिक नंतरनंतर तर हसत पण नव्हते शिव्या आल्यावर. (अयुष्यात पहिल्यांदाच शिव्या हा शब्द इतक्यावेला एकाचवेळी लिहिला हे आत्ता जाणवले).

>>>“Parineeti Chopra is not here tonight because we said she'd get f****d by 10 dudes in front of 4000 people. Karan Johar is here tonight because we told him he'd get f****d by 10 dudes in front of 4000 people.<<<

ह्यातील तो विशिष्ट शब्द सर्व थरांंमध्ये सर्रास वापरला जातो ह्याच्याशी सहमत! पण खासगी चर्चेत वापरला जातो. सार्वजनीक ठिकाणी कोणत्याही कारणासाठी (सहसा) वापरला जात नाही व वापरला जाऊ नये असे समजलेही जाते. (काल दुसर्‍या एका धाग्यावर मोदींनी बाजारू शब्द सभेत उच्चारल्याचा अगदी 'खास' उल्लेख करण्यात आला आहे, ह्याचा अर्थ असा की सार्वजनिक ठिकाणी कसे बोलावे ह्याचे काही अलिखित नियम असतात). तो शब्द सार्वजनिक ठिकाणी वापरला जाईल ह्याची गॅरंटी व वॉर्निंग देऊन आणि पैसे घेऊन तो शब्द ऐकवून विनोद काय निर्माण होतो देव जाणे! त्या शब्दातून जी क्रिया अभिप्रेत आहे ती योग्य ठिकाण, काळ वेळ असल्यास सर्वात सुंदर क्रिया व अयोग्य ठिकाण, काळ वेळ असल्यास सर्वात अश्लील / गलिच्छ क्रिया समजली जाते. आणि वरील विधाने ज्य अप्रकारे उच्चारली गेलेली दिसत आहेत त्यातून त्यातील अयोग्य संदर्भ अपेक्षित होता इतके समजून येत आहे.

एखाद्या घरात नसतील बोलत पण मुंबईत लोकल मध्ये नक्कीच ही भाषा ऐकायला येते त्यामुळे फक्त गलिच्छपणाचा कळस आहे हे मी मान्य करत नाही.
>>>>>>>
थोडी सुधारणा, एखाद्याच घरात बोलत असतील... याचा अर्थ गलिच्छ आहे हे तरी कबूल, आता कळस आहे की नाही यावर चर्चा करूया. Happy

मुंबई लोकलमध्ये .. अंह, फार क्वचित.. आणि ते देखील माहौल बघून.. म्हणजे डब्यात महिला वा कोणी फॅमिली आसपास बसली असेल तर ताळतंत्र पाळले जाते.
पण तरी कॉलेजग्रूपची मुले मात्र बरेचदा मुलामुलींचा मिक्स ग्रूप असून बहकलेली वाटतात, आणि याला जबाबदार खरे तर या अश्या कार्यक्रमांमुळे रुजणारी संस्कृती आहे.

म्हणजे गंमत बघा हा.
आधी तरुणांसमोर चुकीचे आदर्श ठेवायचे जेणे करून एखादी पिढी त्याचे अनुकरण करत बिघडणार,
मग त्यानंतर वल्गरीटीची लेव्हल वाढवायची, ते हा दावा करत की असाही समाज बिघडलाच तर आहे... आणि त्यांना आणखी बिघडवायचे..
एकदा का ते देखील त्यांनी आत्मसात केले की आपण आणखी एक पायरी.. पुढे तरी कसे म्हणू.. आणखी एक पायरी खाली घसरायला मोकळे Happy
(आपण म्हणजे वरच्या कार्यक्रमाला तडीस नेणारे सो कॉलड सेलिब्रेटीज!)

बाय द वे सानी, त्या विधानांंमध्ये जो काय हास्यास्पद विनोद आहे तो फक्त करणवरच आहे असे माझेही मत आहे.

त्या शब्दातून जी क्रिया अभिप्रेत आहे ती योग्य ठिकाण, काळ वेळ असल्यास सर्वात सुंदर क्रिया व अयोग्य ठिकाण, काळ वेळ असल्यास सर्वात अश्लील / गलिच्छ क्रिया समजली जाते.>>>>> पारायण सुरु! Lol

त्यात काय हसण्यासारखे आहे?

ती क्रिया अश्लील / गलिच्छ समजली जाते म्हणूनच तो उल्लेख खासगी चर्चेत सर्रास करणारे खूपजण असतात.

ऋन्मेऽऽष >> म्हणजे ही तुझी hypocrisy आहे. स्वता मान्य करायचे "मी खूप बॅड बॉय" आहे आणि दुसर्यानी केले तर गळे काढायचे.

साध्याबोलण्यात काय गलिच्छ आहे रे

ती क्रिया अश्लील / गलिच्छ समजली जाते म्हणूनच तो उल्लेख खासगी चर्चेत सर्रास करणारे खूपजण असतात.>>>>>>>> ते कसं आहे, ते आपल्या वरती असतं. म्हणजे बघा, एखाद्याला ह्या क्रियेबद्दल आणि त्याच्याशी संलग्न असलेले शब्द ह्या बाबत चवीनी चर्चा करायची असेल तर ती व्यक्ती कधी त्या क्रियेला सुंदर आणि कधी त्या क्रियेला गलिच्छ असं म्हणत "चर्चा" मात्र सुरु ठेवते.
तुम्हाला ऑडियन्स मिळालं तर तुम्ही इथेही सर्रास तसं लेखन कराल ह्याची मला ग्यारंटी आहे. इतर कोणी ह्या रोस्टला विरोध केला तर एक वेळ समजू शकतो पण तुमच्या इतका अट्टल बीभत्स रस आनंदाने वाटप करणारा जेव्हा बोंब ठोकायला लागतो ना, तेव्हा फार हसायला येतं.
Lol

>>>तुम्हाला ऑडियन्स मिळालं तर तुम्ही इथेही सर्रास तसं लेखन कराल ह्याची मला ग्यारंटी आहे. इतर कोणी ह्या रोस्टला विरोध केला तर एक वेळ समजू शकतो पण तुमच्या इतका अट्टल बीभत्स रस आनंदाने वाटप करणारा जेव्हा बोंब ठोकायला लागतो ना, तेव्हा फार हसायला येतं.<<<

ओके. Happy

Pages