AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो बेफी आम्ही तर पैसे न भरताच विनोद पाहिले, ऐकले, हसलो नाहि हसलो, सगळं झालं

Proud

या चर्चेत अधूनमधून अभिरुची हा शब्द उगाच येतोय. अभिरुची व्यक्तीसापेक्ष असेलही, नव्हे असते. पण इथे मुद्दा मुळात अभिरुचीचा नाहीच आहे, हे लक्षात घ्या!

अश्लीलता व्यक्तीसापेक्ष नसते. सभ्यतेचे निकष समाज मिळून ठरवतो.
अर्थात उद्या जाऊन आपल्या समाजातील/देशातील बहुतांश लोकांना यात काहीही गैर वाटू लागले नाही तर आपसूकच त्याला समाजमान्यता मिळणारच आहे.

तर, मी कोणाला चूक नाही ठरवत आहे, तर सावध करतोय ... असेही समजू शकता! Happy

..

<<<<<<<
बाकी, इथे मी एका आयडीचे मत वाचलेले विनोद बीबीवर, कोणाच्या व्यंगावर(जाडी, टक्कल वगैरे) जोक असु नये. जाडे असतील तर ते त्यांच्या घरचे खातात वगैरे. आणि आज ह्याच जोकवर त्या आयडीने हसावे?

>>>>>>>

आपण नक्की कोणत्या आयडीचा उल्लेख केला याची कल्पना नाही, पण साधारणपणे बहुतांश लोकांचे असेच मत असते की शारीरीक व्यंगावरून केलेला विनोद खालच्या पातळीचा.
अर्थात या शो मध्ये ज्यांच्यावर विनोद झाला त्यांची काही हरकत नाही तर तुम्हाला काय.... असा युक्तीवाद होऊ शकतोच.
पण तरी जगभरात ते सामाईक व्यंग असणारे हा कार्यक्रम बघत असतीलच, त्यांच्या मनाला ठेच लागायची शक्यता आहेच.... पण असो, त्यांच्यावरही हा कार्यक्रम बघायची जबरदस्ती कुठेय Happy

जाताजाता....
मुंबईमध्ये कुठल्यावेळी मुली जनरल डब्यामधून ग्रुप मधून प्रवास करतात?
>>>>
हि माहिती का हवी आहे हे समजू शकेल Wink

जोक्स-ए-पार्ट, मुंबईत महिलांचा फर्स्टक्लास डब्बा खूपच छोटा असतो, फक्त एकच कप्पा. आणि सध्या स्त्री-पुरुष समानतेचे वारे पाहता कॉलेजसाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडणार्‍या मुलींचे, महिलांचे प्रमाण इतके कमी मुळीच नाही, त्यामुळे त्या डब्यात दाटीवाटीने उभे राहण्यापेक्षा त्या जनरल डब्यात बसून प्रवास करायला मिळत असेल तर त्याला पहिली पसंती देतात. तसेच कॉलेजचा मुलामुलींचा कॉमन ग्रूप असल्यास किंवा त्यात प्रेमी युगुल असल्यास जनरललाच पहिली पसंती देतात.
आणखी एक माहिती घ्या - फर्स्टक्लासच्या जनरल डब्यात कितीही गर्दी झाली तरी एका सीटवर तीनच जण बसतात, त्यामुळे त्या मुलींना दाटीवाटीने बसायला लागत नाही. याउपर लेडीज फर्स्टक्लासमध्ये असे केले तर फक्त १३ मुलीच बसू शकतील म्हणून त्या बिनधास्त ४-४ बसत हा आकडा १७ वर नेतात.
हे मला कसे समजले तर माझ्या ग’फ्रेंडने सांगितले असे समजू शकता, वा मी मधल्या पार्टीशनमधील खिडकीतून इथून तिथे पाहिले असे समजू शकता.. तरीही शंका असल्यास, आणि आणखी सविस्तर जाणून घ्यायचे असल्यास `माझे "लोकल" अनुभव' म्हणून मालिका सुरू करतो एखादी......... तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज ! Happy

>>>अश्लीलता व्यक्तीसापेक्ष नसते. सभ्यतेचे निकष समाज मिळून ठरवतो.<<<

ऑलमोस्ट प्रॉपरली वर्डेड स्टेटमेन्ट, एक्सेप्ट...... अ‍ॅन इम्पॉर्टन्ट पॉईंट!

'अश्लीलतेचे' निकष समाज मिळून ठरवतो

(असे माझे मत)

सभ्यतेचे निकष समाज मिळून ठरवतो.>>>.. बरोबर. आणि म्हणूनच हा कार्यक्रम त्यांनी तिकिट लावून, इनफ वॉर्निंग देऊन ४ भिंतींच्या आत केला.

अर्थात उद्या जाऊन आपल्या समाजातील/देशातील बहुतांश लोकांना यात काहीही गैर वाटू लागले नाही तर आपसूकच त्याला समाजमान्यता मिळणारच आहे.>>>>> ये भी सही. बहुतांश लोकं म्हणजे, तू आणि मी हे सगळे मिळून बहुतांश होतात. तर कुठलीही गोष्ट नवीन वाटली (चांगली/वाईट म्हणणार नाही) तर विचार न करता ती कशी चांगली/वाईट ठरवून काहीच हशील नाहीये. आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतातल्या तरुण पिढीच्या मोबाईल्/कंप्युटरवर कुठल्या प्रकारचं साहित्य असतं ते आणि ते किती धोकादायक ठरु शकतं/ठरतय. त्याला न कोणी रोकथांब करु शकत ना कोणाची त्याबद्दल काही ठोस कामगिरी करायची इच्छा आहे.
वर कोणीतरी लिहिलय ते एकदम खरय, सेक्शुअ‍ॅलिटी संबंधात जितक्या गोष्टींवर तुम्ही पडदा घालाल तितक्या त्या उफाळून बाहेर येतात कारण त्याचं आपल्या आयुष्यात महत्वच इतकं आहे! ते डिसरिगार्ड करुन चालणार नाही. हा शो नाही बघितला तर फार कोणाचं काही जाईल का? आजिबातच नाही.
हा काही कॉमेडी genre मध्ये क्रांती घडवणारा वगैरे शो आजिबात नाहीये पण माझ्या दृष्टिनी भारतात सुद्धा नव्या दमाची आणि सर्वात मह्तवाचे म्हणजे प्रचंड सेल्फ कॉन्फिडन्स असलेली पिढी तयार झालीये ह्याची साक्षच आहे जणू.

'अश्लीलतेचे' निकष समाज मिळून ठरवतो >> कुठला समाज?
साऊथ बॉम्बेचा की ठाण्याचा, दादरचा की बॅन्ड्राचा, सदाशिव पेठेतला की बुधवार पेठेतला?
धारावीतला की बंजारा हिल्स्चा? बॉलिवुड मध्ये काम करणारा की खाप पंचायतीचा.
नुमवि ला मुलं शिकायला पाठवणारा की सिडनेहॅमला? पीवीजीच्या वस्तिगृहात राहून खानावळीत जेवणारा की डून च्या वसतिगृहातला. कोथरूडच्या भुसारी कॉलनीमधला मधला की दिल्ली/गुडगावच्या डिफेन्स कॉलनी मधला.

ज्या गोष्टी आपल्याला पटल्या नाहीत, आवडल्या नाहीत त्या ऊरलेल्या लोकसंख्येला हानिकारक कश्या आहेत हे (नुसताच की बोर्ड बडवून, कारण ह्यापेक्षा जास्त काही करण्याचे धारिष्ट्य नाहीये हा प्रचंड आत्मविश्वास आहेच) त्या लोकसंखेच्या गळी ऊतरवण्यापेक्षा आपण स्वतः आस्था चॅनलवरचे सत्संग किंवा गुरुदत्तचे सिनेमे बघणे ईतके अवघड का असावे हे अनाकलनीय आहे.

वाटत असेल कुणला गुलझार पांचट आणि गुरूदत्त दारूडा म्हणून काय ? शेक्स्पियर फॅन्सच्या जगात एडवर्ड अ‍ॅलन पो चे फॅन्स असले म्हणजे सगळे जग वल्गर आणि सेडिस्ट झाले की काय... काहीही.....आवरा!!

ला हॉरर फिल्म्स आवडत असतील तर मी घरादाराला घाबरवत फिरू का?>>> Rofl जिज्ञासा तुला दहा गावं इनाम! काय पर्फेक्ट अनॉलॉजी आहे..

फारेंडच्या पोस्टला सहमत.

मला शोमधील काही जोक्स आवडले. त्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट वेगळा आहे. तो ओपननेस आवडला. पहिली १०च मिनिटं बघितली तेव्हा अगदी एन्जॉय केला शो. (बेसिकली यु वेअर प्लेयिंग बोनी कपूरला खोखो हसले.. :फिदी:)
मात्र नंतर पूर्ण शो बघितला तेव्हा काही काही जोक्स बळंच मारले होते तेही कळत होते. काही ठिकाणी शिव्यांचा अवास्तव भडीमारही जाणवला. सो तेव्हढा विटी जोक नसेल तर तो फॉर्मॅट बोअर झाला. परंतू त्याने माझ्या संस्क्रुतीला धोका पोहोचतोय वगैरे मुळीच वाटले नाही.

- विनोद तावडे यांचे उत्तर हे आवडले. अतिशय संतुलित उत्तर.
- साती यांचे मत माझ्या मताशी जुळते.

- काही लोक प्रसिद्धी, पैसा आणि पॉवर साठी काहीही करतात
- खूप लोक मनोरंजन म्हणून काहीही पहातात. काही लोक मनोरंजन म्हणून काहीही ऐकतात (यो यो..)
- जर विनोदामधे नातेवाईकानाही (आईबाबा) आणले असेल तर त्यांचीही मान्यता हवी आहे नाहीतर तेही अब्रूनुकसानीचा दावा करू शकतात.

- मुलाना वाढवणे आणि संस्कारित करणे हे फक्त पालकांची जबाबदारी आहे असे मत वाचून पुढील अफ्रिकन म्हण आठवली - it takes a village to grow a child.

मला शोमधील काही जोक्स आवडले. त्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट वेगळा आहे. तो ओपननेस आवडला. पहिली १०च मिनिटं बघितली तेव्हा अगदी एन्जॉय केला शो. (बेसिकली यु वेअर प्लेयिंग बोनी कपूरला खोखो हसले.. फिदीफिदी)
मात्र नंतर पूर्ण शो बघितला तेव्हा काही काही जोक्स बळंच मारले होते तेही कळत होते. काही ठिकाणी शिव्यांचा अवास्तव भडीमारही जाणवला. सो तेव्हढा विटी जोक नसेल तर तो फॉर्मॅट बोअर झाला. परंतू त्याने माझ्या संस्क्रुतीला धोका पोहोचतोय वगैरे मुळीच वाटले नाही.>>Bsk, मला जे वाटले ते परफेक्ट शब्दांत मांडले आहेस! बरेचदा मूडवर पण अवलंबून असतं अशा गोष्टी आवडणं! ह्या शोबद्दल मी बऱ्यापैकी mentally prepared होते. कदाचित माझ्या सिरीयस मूडमध्ये मला हा show आजिबात आवडला नसता पण तो माझ्या मूडचा परिणाम आहे आणि त्यात show करणाऱ्या कलाकारांचा दोष नाही असंच वाटलं असतं! उदा. रणवीर सिंग मला आधीही आवडत नव्हता आताही आवडत नाही!

मायबोलीवर आपल्या ह्या त्या धाग्यावर रोस्टींग चालते तेव्हा असले प्रश्ण पडत नाहीत कोणाला?
स्वतःवरच विनोद करून ती मंडळी तेवढेच हसु शकतात का?(बहुधा नसेलच येत हसता कारण 'हे' नसेल, ....) >>
करातात, हसतात.. रोजच दिसतं ते, जर तो तोच धागा असेल तर. मज्जा येते.

आज ऑफीसमधे बरेच जण मोबाईलवर हा व्हीडीओ शेअर करत होते. मी पण घेतला, यूट्यूबवर आधीच पाहून एंजॉय केला म्हणून. मग हळहळ वाटली कशाला उगाच नेट पॅक खर्च केला असा फूकट मिळणार असताना Happy
मग मी पण बर्याच जणाना फॉरवर्ड केला ज्यांनी मागितला किंवा ज्यांनी "अर्रे यार, माझ्याकडे नाहीय" असे म्हटले त्यांना.

बरेचसे पंचेस आवडले. काही रद्दड होते, एकदम फालतू. पण ओव्हरऑल मज्जा आली बघायला.

चिनूक्स,

>> कोणी कशाप्रकारे व्यक्त व्हावं, हे ज्याचं त्याने ठरवावं.

तुम्ही रोस्टला कला म्हणता, मात्र हा कार्यक्रम अजिबात उत्स्फूर्त वाटला नाही. यात गलिच्छ पैसा बोलतो आहे, कोणी कलाकार नव्हे.

सगळे लोकं आपापल्या घरी अनेक कृत्ये करतात. ती सगळी चर्चेत आणावी का? कुठेतरी धरबंद हवा ना?

आ.न.,
-गा.पै.

ऋन्मेऽऽष,
या धाग्याचे शिर्षक अगदी बरोबर आहे.
किती तो फालतूपणा!!! रस्त्यावरच्या ४ लोकांनी केला काय किंवा celebrities ने केला काय...चार भिंतीत करा किंवा उघड्यावर.....फालतूपणाच तो. तरीपण लोकांना तो आवडू शकतो याचाच खेद वाटतो.

यात गलिच्छ पैसा बोलतो आहे, कोणी कलाकार नव्हे.>>>>>> बघून बोला. त्या शो चे ४० लाख रुपये चॅरिटीला गेले आहेत. पैशाच्या इथे काहीही संबंध नाही. ह्याउपर तिथे बोलणार्‍या सगळ्या लोकांकडे आधीच भरपूर पैसा आहे आणि ह्या शो चे पैसे द्यायला मला नाही वाटत ए आय बी कडे इतके पैसे तरी आहेत. जाहिरातींचाही प्रश्न नाही कारण कुठल्याच चॅनलवर ह्याचं प्रक्षेपण झालं नाही.

पुर्ण वाचला हा धागा आत्ता.
पाहिला नाही म्हणुन कोणी मत प्रदर्शित करू नये असा काही नियम आहे की काय ?
सर्वच गोष्टींचा अनुभव घेणे शक्य आहे का जगात ? विषाच्या परिक्षेसारखा Happy

जिज्ञासा - ते घरादाराला घाबरवत फिरू का जबरी होते Lol

काही काही जोक्स बळंच मारले होते तेही कळत होते. काही ठिकाणी शिव्यांचा अवास्तव भडीमारही जाणवला. सो तेव्हढा विटी जोक नसेल तर तो फॉर्मॅट बोअर झाला. परंतू त्याने माझ्या संस्क्रुतीला धोका पोहोचतोय वगैरे मुळीच वाटले नाही. >>> मलाही 'कोट्स' वाचून साधारण असेच वाटले.

गापै - ही कला नव्हे हे तुमचे व अनेकांचे मत असेल. पण तो एक विनोदाचा प्रकार आहे. भंकस असेल, कीव करण्याजोगा असेल, कसाही असेल पण सादरकर्त्यांना ते लोकांना आवडेल (पैसे देउन बघण्याएवढे) असे वाटले, त्यांनी सादर केला. तो जर कायद्याच्या कक्षेत असेल तर घरबंध हवा म्हणजे नक्की काय? कायद्याबाहेरच्या कोणत्याही शक्तीला, संघटनेला हे ठरवू देण्यापेक्षा तो सादर होउ देणेच बरोबर आहे, जोपर्यंत बेकायदेशीर काही नाही.

प्रश्न हा आहे की कायदेशीर असलेली एखादी गोष्ट समाजाला घातक आहे हे काही लोकांनी ठरवून "हे होऊ देणार नाही, बंद पाडू" वगैरे करणे. एकदा त्याला समाजमान्यता दिली की ती कशाविरोधीही वापरली जाऊ शकते.

मला हा प्रकार आवडला नाही. (काही मिनिटांपलीकडे पाहू शकलो नाही). पण तो असायला माझी काही हरकत नाही. (मला कोणी विचारणार असो वा नसो). पूर्वसुचना दिली असतांना ज्यांना आवडणार नाही अशांनी पाहिला तर त्याला कोण काय करणार?

वरती अनेकांनी हा आवडला नसल्याचे नमूद केले आहे. मलाही आवडला नाही. पण मला आवडला नाही म्हणून आमची संस्कृती बुडाली, आम्ही बंद पाडू हे कुठे नेऊन ठेवेल?

आता तर आव्हाड साहेबांनीही रस्त्यावर येऊन हा कार्यक्रम बंद पाडायची धमकी दिली आहे. चळीस लाख जमवून चॅरिटीला देणार्‍याचे कार्यक्रम बंद पाडणार कोण तर सैनिकांच्या विधवेचे फ्लॅट बळकावणारे!

यावरून एक जोक आठवला. एकदा एक महिला पोलीसात तक्रार करते की माझ्या शेजारच्या इमारतीतला माणूस घरात विवस्त्र वावरतो आणी ती मला हॅरॅसमेंट वाटते. पोलीस तिच्या घरी पहाणी करायला जातात. ते म्हणतात "तुमच्या खिडकीतून तर काहीच दिसत नाही" ती म्हंणते "त्या टेबलावर स्टूल ठेवा, त्यावर चढून बघा मग दिसेल"

मुद्दाम वेळ काढून तो व्हिडिओ बघणे अणी मग "भावना दुखवल्या" म्हणून ओरडा करणे असेच आहे.

रात्री ९ नंतर काहींची प्रतिक्रिया देण्याची सोय थांबवावी. बरेच प्रश्न सुटतील.

पाहिला तो शो. हा पहिलाच होता का? विशेष हसु आले नाही. २-३ जागी हसु आले किंवा मलाच विनोद समजले नसतील. कदाचित पहिलाच शो असल्याने जोक्सचा दर्जा बरा नसेल. काही ठिकाणी शिव्यांचा भडीमार झाला याला अनुमोदन. मला दोन्ही बाजुचे काहीकाही मुद्दे पटले.

Selective freedom of expression साठी आर्ग्युमेंट्स चालू आहेत. भारतीय संविधानात म्हटले आहेच....

All citizens shall have the right—
(a) to freedom of speech and expression;(whenever it does not offend everyone else)........

>>>> म्हणजे उद्या रस्त्यावर एखादा मुलांचा ग्रूप शिवीगाळ करताना दिसला तर तितकासा धक्का बसत नाही, पण मुलींचा ग्रूप रस्त्याने शिवीगाळ करत चालला आहे तर धक्का बसतोच <<<<

ऋन्मेष, माझ्या पिढीतल्या सदाशिवपेठी लोकान्ना तर मुलांच्या तोडी असलेल्या आईमाईबाईवरच्या व इतर सर्व शिव्याही धक्कादायकच वाटतात. मुलिंची गोष्टच लाम्ब. कारण आमच्या वेळेस "साल्या" "च्यायला" वगैरे सारखे शब्दही तोंडून उच्चारने निषिद्ध होते, शिवी तोंडात बसूच द्यायची नाही असा नियम असायचा, एकदा सांगुन ऐकले तर ठीक, नाहीतर जिथे असेल तिथे जागेवर कानाखाली जाळ निघायचा.

अर्थात बाळ ऋन्मेष, हे झाले पेठी ब्राह्मणी संस्कार. अन ते "ब्राह्मणी" आहेत म्हणून जे जे ब्राह्मणी संस्कार आहेत ते ते मोडूनच काढायचेच हा चंग बांधलेले संख्येने जास्त. तेव्हा वरील गोष्टी घडल्या म्हणून इतके मनाला लावून घेऊ नकोस. (आता या नंतर किती "शिवराळ"कोब्रा काय नि कशा शिव्या द्यायचे/देतात याची उदाहरणे देण्याची अहमहमिका लागली तर नवल वाटणार नाही, पण ते अपवादच ठरत आले आहेत हे ही सांगतो, निदान ब्राह्मणी समाजात तरी शिवराळ ब्राह्मणाची "छीऽऽथुऽऽ" च केली जाते. असो )

व्यक्तिस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य व व्यक्तहोण्याचे स्वातंत्र्य या सबबीखाली भाषिक गटारी गूऽऽघाण चिखलात लोळायचेच असे कुणी ठरविले असेल तर तुझ्यामाझ्या सांगण्याचा काय उपयोग? ज्यांना लोळायचे ते लोळतील त्यात अन त्यांच्या पुढच्या सात पिढ्या तोच चिखल वागवतील... (हे "ज्यांना बघायचे ते बघतील, नाही ते नाही बघणार" या चालीवर वाचावे Proud )
तेव्हा तू फार व्यथित वगैरे होऊ नकोस.

ते ज्यांची संस्कृती बुडते आहे वगैरे त्यांनी प्लीज होळीचा सण सर्वात आधी बंद करावा. त्यामध्ये तर "शिव्या देणे" ही एक विधीची गोष्ट सांगितले आहे. होळीत अश्लील का बोलावे असा एक टणाटण प्रभातमध्ये लेखदेखील आहे. कुणीतरी त्याची इथं लिंक द्याल का प्लीज?

संस्कृती वाचवायला निघालेत!!!! कु ठ ली संस्कृती वाचवतात तेतरी माहित आहे का? यांच्या देवीच्या मूर्तींची प्रतिमा काय आहे ते यांना माहित आहे का? देवीला "भगवती" हा म्हणतात हे माहित आहे का? शंकराची पूजा याच संस्कृतीत करतात ना? होळीला आईबहिणीवरून शिव्या देत बोंब मारणारे हेच संस्कृतीरक्षक आहेत ना? स्वतःचं लग्न लावून घेत असताना भटजी काय मंत्र उच्चारतो त्याचा अर्थ यांना माहित आहे का? यांच्या देवाचे अर्थ यांना माहित आहेत का? निघालेत संस्कृती वाचवायला. दांभिक!!!!

Pages