AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>त्यांची मर्जी. त्यांना मिळालेल्या पैशाशी, त्यांच्या अपमानाशी मला देणंघेणं नाही. मला न बघण्याचा आणि आवडून न घेण्याचा, आवडलं नाही हे सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे. <<<

हां! हे मान्य आहे. Happy

>>>त्यांची मर्जी. 'हा' मार्ग मला काही वाईट वाटलेला नाही, ही वेगळी गोष्ट.<<<

हेही बरोबर आहे.

पण मग,

इकडेच यायला पाहिजे का?

Proud

आभा, साती, तुमच्या पोस्ट्स आवडल्या कारण तुम्ही नाही आवडले आणि का नाही आवडले हे आणि एवढेच लिहिले आहे! आणि त्याचा संपूर्णतः आदर झाला पाहिजे.
आभा, होय हा शो किंवा ह्यातला कोणताही content लहान मुलांच्या कानावर पडण्याच्या योग्यतेचा नाही आणि त्याबद्दल मी सहमत आहे. पण आता वयाची मर्यादा १८ असावी की नाही ह्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. अर्थात प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे बौद्धिक/मानसिक/शारीरिक वय लक्षात घेऊन त्यांच्याबाबतीत निर्णय घ्यावेत! पण माझी मुलं लहान आहेत म्हणून असे शोज होऊच नयेत हे म्हणणे किती योग्य आहे?
कमाल या गोष्टीची वाटते की ह्या देशात मला किती मुलं व्हावीत ह्या अत्यंत खाजगी निर्णयावर जाहीरपणे मत देणाऱ्या व्यक्तीला साध्वीची पदवी देऊन ग्लोरिफाय करण्यात येतं आणि ते कोणाला खटकत नाही! पण एका अडल्ट शो मुळे लगेच भारतीय संस्कृती धोक्यात वै. येते! हा दांभिकपणा जेव्हा बंद होईल तो सुदिन!

कोणाला किती मुले व्हावीत हे सांगणारीला साध्वी ही पदवी मिळालेली नाही. एका साध्वीने ती मुक्ताफळे उधळलेली आहेत.

असे शोज होऊ नयेत की व्हावेत ह्यावर जर चर्चा चाललेली असेल तर माझे मत इतकेच आहे की:

करण्यासारखे खूप काही असताना इतक्या थिल्लर पातळीला पोचण्याची घाई होणे हे इन्सिक्युरिटी प्रदर्शीत करते.

जी नांवे ह्यात इन्व्हॉल्व्ह्ड आहेत त्यांनी अजून गुरुदत्त, राज कपूर, दिलीप कुमार, अमिताभ, नसिर उद्दिन वगैरेही व्हायचे आहे.

इतक्यात नका आम्हाला इतक्या फालतू अभिरुचीला आणू राव!

Lol

करण्यासारखे खूप काही असताना इतक्या थिल्लर पातळीला पोचण्याची घाई होणे हे इन्सिक्युरिटी प्रदर्शीत करते.>>>>>>> Lol हेच विधान तुमच्या लेखनालाही लागू पडेल की मग.

त्यात एवढा मोठा आ करून काय हसताय बुवा? ते तर मान्यच आहे की? सांगा डिलीट करायला ते सगळे लेख!

Lol

>>जी नांवे ह्यात इन्व्हॉल्व्ह्ड आहेत त्यांनी अजून गुरुदत्त, राज कपूर, दिलीप कुमार, अमिताभ, नसिर उद्दिन वगैरेही व्हायचे आहे. >><<

इतकं प्रेशर नको हो टाकू त्याम्च्यावर. आधी त्यांना व्हायचे तरी आहे का गुरुदत्त ते विचारा ना?

---------------------------------------------------------

माझा एकच प्रश्न मराठी मुलं टपरीवर उभे राहून एकमेकांच्या आई बहिणींवरून पातळी सोडून एकमेकांना हसत शिव्या हाणतात त्यात आणि यात फरक काय होता ??

Lol झंपी

अहो मुळ धाग्यात काही मुद्देच नाहीयेत Proud
LOl , आणि तुमच्या लेखनाबद्दल उदाहरण दिलं कि ते लगेच वैयक्तिक ?
जे पब्लिक वेबसाइट वर प्रदर्शित केलय ते पब्लिक , just comparing between 2 adult materials , obviously you are okay with one and not with other , that's double standards !
If you don't like it , it's not for you , those who are getting roasted are fine with it , rather enjoying it and majority audience too , उगीच संकृति रक्षण - अपरिपक्व मन अशी नावं देउ नका, just because you don't like it !

डिलिट करु नका हो. अगदी दररोज त्यांना हार लावा, उतबत्या फिरवा. काही म्हणणं नाही. फक्त इतर गोष्टींमध्ये अश्लिलता आली असं तुम्हाला वाटलं तर कमीत कमी त्याचा बॅकग्राऊंड, काँटेक्स्ट काय होता हे समजून न घेता लगेच दोन पेग मारून इंच इंच लढवायला बसू नका असं म्हणत होतो. Happy

झंपी Proud

>>>त्यात आणि यात फरक काय होता ??<<<

ते ऐकायचे कोणी पैसे दिले नव्हते, कोणी पैसे कमवले नव्हते आणि ते 'बन्द' (बंद नव्हे) स्टेडियममध्ये नव्हते.

बेफि, होय पण त्या विधानासाठी साध्वी बाईंना माफी वै. मागावी लागली नाहीये उलट मी ४० नाही ४च म्हणत्येय असं वर तोंड करून बोलू शकत आहेत त्या! आणि इकडे हा कार्यक्रम युट्युब वरून काढून टाकावा लागला आहे. शिवाय कलाकारांनी माफी मागावी/त्यांच्या इतर चित्रपटांवर बंदी वै. च्या मागण्या केल्या जात आहेत! हा दांभिकपणा, ढोंगीपणा आहे.

दीपांजली आणि वैद्यबुवा Proud

जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा माणूस कसा होतो हे कळले.

ते ऐकायचे कोणी पैसे दिले नव्हते, कोणी पैसे कमवले नव्हते आणि ते 'बन्द' (बंद नव्हे) स्टेडियममध्ये नव्हते.>>>>> Lol हा तुमचा प्राबलेम आहे? देवा!!!! उठाले रे बाबा! उठाले!.... मेरेको नै!

गुड नाईट Proud

जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा माणूस कसा होतो हे कळले.>>>> हे तुमच्या स्वतःबद्दल म्हणत आहात का? +१ मग! आत्मपरिक्षण सुरु केलत ते एकदम छान आहे! कीप इट अप!
Proud

मला शो आवडला! इतकं पोलिटिकली / सोशली/ रिलीजीयसली इनकरेक्ट असायला सॉलिड दम लागतो हे नक्की! Hats off to the participants and organizers!

10959624_10153095880574446_901003324708496211_n.jpg

हा शो/व्हिडीओ पाहिलेला नाही. पण त्यातील 'कोट्स' काही साईट्स वर पाहिले.
- काही एकदम स्मार्ट विनोद आहेत
- काही कमालीचे भंकस व ओंगळ विनोद्/व त्यावरच्या अ‍ॅक्शन्स आहेत
- काही चीड आणण्याइतके poor taste मधे आहेत.

थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत विनोद करायलाच पाहिजे असे प्रेशर असलेले अमेरिकन कॉमेडियन्स चे शोज असतात, साधारण तसाच वाटला हा शो.

त्यामुळे हा जर कोणाला आवडला नसेल तर त्याच्याशी सहमत आहे. असे शोज वा किमान असे विनोद करू नयेत असे जर कोणाला वाटले असेल तर त्याच्याशीही सहमत आहे.

पण त्याचबरोबर, जर यात कोणी कायदा तोडत नसेल तर आपले मत आपण दुसर्‍यावर लादू शकत नाही.

>>माझा एकच प्रश्न मराठी मुलं टपरीवर उभे राहून एकमेकांच्या आई बहिणींवरून पातळी सोडून एकमेकांना हसत शिव्या हाणतात त्यात आणि यात फरक काय होता ?? <<
गुड पॉइंट. इनफॅक्ट, शोमध्ये कोणितरी म्हणालं कि पुर्वि अशा गोष्टी प्रायवेट पार्टीज मध्ये व्हायच्या आता शोज मध्ये होतात. थोड्या दिवसांनी आपापल्या दिवाणखान्यात सुद्धा होतील. दॅट्स सो एल.ए. यु नो... Happy

शो बघितल्यावर मला पडलेले दोन प्रश्नः
१. करण जोहर (अन)ऑफिशियली क्लोजेटच्या बाहेर आला का?
२. प्रिझुमेब्ली ऑल प्रेझेंट्स वर पार्टी टु द जोक्स, वॉट अबाउट दोज हु वर नॉट? शो पुर्वि तिची परवानगी घेतली गेली असेल का?

जाणकारांकडुन उत्तराची अपेक्षा...

The definitions of in things change very rapidly and no matter how much a parent tries, temptations are always there. ( My experience as a student councillor) It's very difficult to keep oneself away from these temptations. > Abha, precisely roast is just an example and there will always be ever-changing dynamics about what is morally acceptable or not. Educating kids to stay away from temptation is never ending parenting job. As a parent one rather use these things as opportunities to educate kids about deciding what to accept and more importantly when - as per one's moral compass (There is no gurantee that kids and parents will have same compass, but that's matter of another discussion).

१. करण जोहर (अन)ऑफिशियली क्लोजेटच्या बाहेर आला का? > >नसणार म्हणूनच तर ते जोक्स झाले. (जे झाले ते इथे सरळ सरळ होमोफोबिया मधे खपले असते)

>>>काही एकदम स्मार्ट विनोद आहेत
- काही कमालीचे भंकस व ओंगळ विनोद्/व त्यावरच्या अ‍ॅक्शन्स आहेत
- काही चीड आणण्याइतके poor taste मधे आहेत.

थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत विनोद करायलाच पाहिजे असे प्रेशर असलेले अमेरिकन कॉमेडियन्स चे शोज असतात, साधारण तसाच वाटला हा शो>>><<

फक्त ह्या पॅराशी सहमत आहे.

अगदी असेच वाटले शो पाहून, काही विनोद डेस्पेरेट कॅटागरीतले वाटले त्यांमुळे तो एकदम बकवास शो वाटला.
बाकी, इतर गोष्टींवर तुलना करण्यासारखे काही नाहीये ह्या शो मध्ये हेच खरे. इटस जस्ट अनदर बोरींग शो वन्स अगेन. Happy

जेंव्हा मुद्दे नसतात तेंव्हा माणुस कसा 'गुड नाइट' म्हणून पळून जातो हे आम्हाला मात्रं नवीन नाही, आधी पासून ठाउक आहे Proud
मुळात प्रोग्रॅम न पहाताच किती वेळ शेवटी तारे तोडत भरार्या मारणार विमान Wink

As a parent one rather use these things as opportunities to educate kids about deciding what to accept and more importantly when as per one's moral compass (There is no gurantee that kids and parents will have same compass, but that's matter of another discussion).>>>>>>> टाळ्या!!!!! Happy

थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत विनोद करायलाच पाहिजे असे प्रेशर असलेले अमेरिकन कॉमेडियन्स चे शोज असतात, साधारण तसाच वाटला हा शो.>>>>>>>> फा, मला तुझी पोस्ट बघून आश्चर्य वाटत आहे. माझं मत आहे तू नक्की कार्यक्रम पाहावा आधी. इथले अमेरिकेतले आणि एआयबी हे दोन्ही रोस्ट्स बघ.
रोस्टचा मुख्या गाभाच मुळी समोरच्याची फुल्ल टू हेटाळणी करणे हाच असतो. त्यामुळे विनोद करायलाच पाहिजे ह्याचं प्रेशर असं काही नाहीये ह्यात. होतं काय की काही विनोद "फ्लॅट" जातात, थोडक्यात प्रेक्षकांना ते फनी वाटत नाहीत आणि तो त्या रोस्टरचा प्रॉबलेम असतो. Happy

मायबोलीवर आपल्या ह्या त्या धाग्यावर रोस्टींग चालते तेव्हा असले प्रश्ण पडत नाहीत कोणाला? Wink

जसे की संस्कृती, लीगली राईट्स अश्या सारखे वगैरे किंवा पब्लिक फोरमवर ज्याची चेष्टा करतात त्याची परवानगी घेतली का? टारगेट समोरच चेष्टा करत का नाही? मागेच का करतात? त्यासाठी धागा कशाला काढला?
स्वतःवरच विनोद करून ती मंडळी तेवढेच हसु शकतात का?(बहुधा नसेलच येत हसता कारण 'हे' नसेल, ....) Wink

Proud

पु ल एकदा सायकल वरून जाताना समोरून येणार्‍या घोळक्यात सायकल सह शिरले. दुर्दैवाने (त्यांच्या) ती एक प्रेतयात्रा होती आणि सायकलच्या आत शिरण्याने शव खाली पडलं. लोक खूप आरडा ओरडा करायला लागले. पु ल म्हणाले जो पडलाय तो काहिच बोलत नाही बाकिचेच बोलत सुटलेत.
इथे एक्झॅक्टली तेच सुरू आहे. विनोद ज्यांनी केले,ज्यांच्यावर केले, ते ओके आहेत. बाकिच्यांनीच टिमकी वाजवली आहे.

नाही दक्षिणा,

विनोद ऐकून हसू(च) यावे म्हणून ज्यांनी ४००० भरलेत ते सोडून बाकीचे म्हणताहेत की विनोद लय भारी होता.

Proud

त्या दीपांजली बघा, त्यांना हसू येते आहे, कसले माहितीय का? त्यांना हसू येऊ शकले ह्याचे Lol

Pages