AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी काहीच म्हणणं नाही. पण

>> ज्याना ज्याना अजिबात आक्षेप नाहीयेत त्यांम्नी आपापल्या बयका / नवरे ,मुलाबाळांसमोर /त्यांच्याशी तश्या भाषेतले संभाषणे करावीत तसे शब्द उच्चारावेत मग समोरून काय प्रतिक्रिया /प्रतिसाद दिले ते इथे सविस्तर सांगावे
म्हणजे आणखी जास्त टाईमपास होईल सगळ्यांचाच मग बघू काय हिम्मत आहे कुणाच्यात वगैरे

भारतातल्या प्रत्येक गावाशहरात डान्सबार्स अस्तात , मटका जुगाराचे आणि दारूचे अड्डे असतात किंवा इतरही अशा अनेक गोष्टी असतात. याबद्दल तुम्ही जोरदार आक्शेप नोंदवलात का कुठं? आणि नसेल तर बायकापोरांसमोर आपण या सगळ्या ठि़काणी जाणार असं ठणकावून सांगितलं असेलच.

हे टिवीवर दाखवलं नाहीय. तिकिट काढून कसले कसले प्रोग्रॅम्स होतात आणी किती लोकप्रिय अस्तात आणि कोणकोणत्या स्तरातले लोक तो बघतात हे पण माहीत नाही असं म्हणायचं आहे का ऋन्मेष तुम्हाला? आक्शेप कशाला आहे?

>>कोणाचे मानवी हक्क पा.तु. गेलेत?>>
जर का शोला रीतसर लायसन्स असेल आणि तरी तो शो सो कॉल्ड संस्कृती रक्षकांनी बंद पाडायची धमकी दिली, शो होऊ दिला नाही तर ती एक प्रकारची दडपशाहीच! अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा नाही का येत?
माझ्या दृष्टीने एक तर कायद्याच्या आधारे शोला लायसन्स देवू नका किंवा कायद्याचा आधार घेवून लायसन्स दिले असेल तर दमदाट्या करु नका. लायसन्स शिवाय शो झाला असेल तर योग्य ती कारवाई करता येइलच! पण उठ सूठ संस्कृतीचा ठेका घेवून झुंडशाही नको.

ला हॉरर फिल्म्स आवडत असतील तर मी घरादाराला घाबरवत फिरू का?>>> Rofl Rofl जिज्ञासा, परफेक्ट! मला तरी शो त्यातल्या जोक्सपेक्षाही बोल्डनेस साठी जास्त आवडला. पण काही जोक्स तुफान होते.

अमितव +१
आगाऊ +१

गापै, ज्यांना रोस्ट करताहात त्यांची परवानगी असल्यस बिंदास करा. इथे जे सामील झाले होते, त्यांची परवानगी होती स्वतःवर असे विनोद करवून घ्ययला.

वैवकु, प्रवासात असल्याने सविस्तर प्रतिसाद देता येत नाही. तुम्ही बरोबर मुद्दा मांडला आहे.

आगाऊ,

>> जरुर करा, कायद्याच्या चौकटीत असेल तर कोण परवानगी नाकारणार?

अगदी बरोबर. पण जर त्या नेत्याचं असं रोस्टिंग केलं तर श्रोत्यांचं लक्ष महत्त्वाच्या राजकीय मुद्यांवरून दुसरीकडे विचलित होईल. मटेरियल उपलब्ध असलं तरी रोस्टिंग करावं का नाही याचा सारासार विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे.

उपरोक्त एआयबीमध्ये तसा घेतलेला वाटंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

तुनळीवर हल्ली लहान मुलांनाही सहज सर्व काही उपलब्ध असते. 18+ असे लिहील्याने हे व्हिडीओ लहान मुले पाहु शकणार नाहीत हा विचार बालिश आहे.
पण सनी लिओनिला डोक्यावर घेणार्या लोकांना तर ते ultramodern आणि stylish वाटेल.

अनलिमिटेड अ‍ॅक्सेस असणारं युट्युब जर पालकांनी वापरू दिलं तर लहान मुलांना सगळं जग उपलब्ध असेल. हा त्या पालकांचा मुर्खपणा आहे.

>>अनलिमिटेड अ‍ॅक्सेस असणारं युट्युब जर पालकांनी वापरू दिलं तर लहान मुलांना सगळं जग उपलब्ध असेल. हा त्या पालकांचा मुर्खपणा आहे.>> +१

ऋन्मेष तु अगदी मन लावुन कार्यक्रम पाहिलास आणि इथे मात्र टीका करतोयस. ये अच्छी बात नही.
आता ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांची उत्सुकता तु उगीचच चाळवतोयस . Proud

>>AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता.

दुसरी कामे नाहीत वाटतं आम्हाला!.

हा कार्यक्रम ज्यांनी चार हजार रुपये देऊन पाहिला त्यांना या कार्यक्रमाचे स्वरूप माहित होते. तरीही आधीच करन जोहर ने सांगितलेही होते. यु ट्यूब वर पाहून ज्यांच्या भावना दुखविल्या त्यांना मी आज एक टॉप सिक्रेट कॉम्प्युटर ट्रिक सांगणार आहे. माझा मित्र मायक्रोसॉफ्ट मध्ये मॅनेजर आहे त्याने सांगितलेली. यु ट्यूब पहाताना त्याच खिडकीवर उजव्या बाजूला वर कोपर्‍यात एक छोटेसे बटन असते ज्यावर X असे चिन्ह असते. ते बटन दाबताच ती खिडकी बंद होते आणी आपल्या भावना सुरक्षित रहातात.

आता या शोमध्ये काय काय प्रकार झाले आहेत ते ऐकून आणि पाहुनच प्रतिसाद द्यावा असे वाटते.

अमितव +१.

अनलिमिटेड अ‍ॅक्सेस असणारं युट्युब जर पालकांनी वापरू दिलं तर लहान मुलांना सगळं जग उपलब्ध असेल. हा त्या पालकांचा मुर्खपणा आहे. >> +१. youtube वर पण rating प्रमाणे access block करता येतो. तुम्ही जर रितसर login करून बघितलेत तर लक्षात येईल. फार फार तर AIB roast वाल्यांनी youtube वर rated content अस register करायला हवे होतटाम्हणजे आपोआप filters लागले असते असा आक्षेप टाकता येईल.

AIB Roast च्या पेजवर नि शो च्या सुरूवातीला content बद्दल स्पष्ट शब्दांमधे सूचना दिलेली आहे. ह्याउप्पर बघून वर बोंबाबोंब करणे हा निव्वळ सो चुहे खाके सारखा प्रकार आहे.

ना ज्याना अजिबात आक्षेप नाहीयेत त्यांम्नी आपापल्या बयका / नवरे ,मुलाबाळांसमोर /त्यांच्याशी तश्या भाषेतले संभाषणे करावीत तसे शब्द उच्चारावेत मग समोरून काय प्रतिक्रिया /प्रतिसाद दिले ते इथे सविस्तर सांगावे>> हा विनोदाचा क्षीण प्रयत्न होता का ? Happy

आता या शोमध्ये काय काय प्रकार झाले आहेत ते ऐकून आणि पाहुनच प्रतिसाद द्यावा असे वाटते. >> म्हणजे इतकावेळ शो बघितलाच न्हवता ???

मी ऋन्मेषच्या विचारांशी सहमत आहे.
म्हणजे 'मराठी/मुलगी' इ. इ. सोडून हो.
खरं आहे. हा धागा वाचूनच नक्की काय आहे ब्वा ही भानगड म्हणून चक्कं ते व्हिडिओज मिळवून पाहिले.
ईक्स आहेत.
कॉलेजच्या पोरांनी व्हॉटसअ‍ॅपवर किंवा हॉस्टेलच्या रूमवर बसून केलेले जोक्स असतात तसे आहेत.
पाचकळ!
हा कार्यक्रम लाईव्ह एंजॉय करायची हिंमत माझ्याततरी कधी येणार नाही.
आणि टिव्हीवर, वॉटसअ‍ॅपवर यापुढे पुन्हा बघणे होणार नाही.
कितीही जुनाट, दांभिक किंवा इतर काही शिव्या द्या , मला हा कार्यक्रम जाहिररित्या होणं (भले चारहजार रुपडे मोजून फक्तं प्रौढांसाठी असला तरी) आवडलेलं नाही.
मग कुणी म्हणाल एवढी शाणपट्टी असेल तर मूळात बघितलसच का? तर नेमकं 'चर्चामें क्या है?' ते समजायला.

ज्यांना ज्यांना ऋन्मेष ला धागेरीया झालाय त्यांनी पण त्याचे धागे इग्नोर करावेत. मारे त्याचे धागे वाचायचे खालचे प्रतिसाद वाचुन मनोरंजन करुन घ्यायच आणि परत येऊन टिमकी वाजवायची की तुला काय काम धाम नाही का , तुला धागेरीया झालाय का वगैरे वगैरे....
धागाकर्ता ऋन्मेष वाचलकी उघडायचच नाही आणि पहिल्या पानावर सतत याचे धागे असतात म्हनुन ओरडयच पण नाही गुपचुप आतल्या पानांवर आपल्याला हव ते शोधत फिरायच.
ऋन्मेष आम्ही वाचु तुझे धागे डोण्ट वरी.....
Proud

ऋन्मेष जर करण जोहरच्या जागी शाखा असता आणि आलियाच्या जागी सई असती तर तुम्ही त्यांचे पंखे राहीले असता का?

मी शो / यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहिलेले नाहीत. त्यामुळे मत लिहिण्यास मी अपात्र आहे असे कोणाचे म्हणणे असेल तर हा प्रतिसाद मागे घेतो. जी चर्चा वर झालेली आहे तेवढी वाचून मत देण्यासाठी हरकत नसली तर पुढे लिहिलेले अवश्य वाचावेत, अन्यथा नाही वाचले तरी मी पामर काय म्हणणार?

१. परदेशात इन्सल्ट कॉमेडी प्रख्यात आहे म्हणून येथील लोकांनी ती स्वीकारायला हरकत नाही हा तर्क समजला नाही.

२. सार्वजनिक ठिकाणी काय लिहिले/बोलले/ऐकले जावे ह्याचे 'अलिखित' निकष आपल्याकडे पाळले जातात हे पटत नाही का? कायदा काही गोष्टी मंजूर करत असेल तर त्या शंभर टक्के वेळा योग्यच असतील हे का गृहीत धरले जाते? आणि मग एल जी बी टी बाबत झालेला कायदा चुकीचा आहे हे म्हणतानाचे लॉजिक येथे लागू होत नाही का? (विषय अजिबात भरकटवायचा नाही, निव्वळ सिमिलर उदाहरण दिले)

आणखी एक ह्या धाग्यापुरता प्रतिसादः

१. ऋन्मेषचा धागा आहे म्हणून कीबोर्डचे चोचले पुरवणे ह्याला काही मर्यादा आहे का? Proud

२. उत्तर भारतातल्या मुलींच्या तुलनेत (ज्या आता पुणे/मुंबई येथे सर्रास आढळतात) मराठी मुली जरा अधिक सज्जन समजल्या जातात (निदान काहींच्यामते) ह्यातून आलेले ते 'ती मुलगी मराठी होती' हे विधान एकदम अ‍ॅटॅक करण्यासारखे आहे का? (बाकी हे सज्जन समजणे हेच कंडिशनिंग, हीच पुरुषप्रधान संस्कृती वगैरे विषय आगामी विषय म्हणून ऋन्मेषच्या पुढच्या धाग्यात बहुधा येतीलच). Proud

सार्वजनिक ठिकाणी काय लिहिले/बोलले/ऐकले जावे ह्याचे 'अलिखित' निकष आपल्याकडे पाळले जातात हे पटत नाही का?

हा कार्यक्रम सार्वजनीक ठिकाणी नव्हता. तब्बल चार हजार रुपये तिकिट लावून बंद स्टेडियम वर झाला. शिवाय युट्यूब वरही इशारा होताच. मला यापेक्षा सार्वजनिक गणपतीसमोर मोठ्या आवाजाल 'मुन्नि बदनाम हुइ' सारखी गाणी जी अबाल वृद्ध, आजारी, परिक्षार्थी सर्वांना नाईलाजाने ऐकावीच लागतात ते जास्त आक्षेपार्ह वाटते.

मला यापेक्षा सार्वजनिक गणपतीसमोर मोठ्या आवाजाल 'मुन्नि बदनाम हुइ' सारखी गाणी जी अबाल वृद्ध, आजारी, परिक्षार्थी सर्वांना नाईलाजाने ऐकावीच लागतात ते जास्त आक्षेपार्ह वाटते. >>> +१

अगदी बरोबर

सेन्सॉर शिप ची गम्मत म्हणजे तुम्ही जेन्व्हा एखाद्या गोष्टीची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न करता तितके तिच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण होते . पीके ला विरोध झाला त्याने ३०० करोड चा धंदा केला . प्रेषिताचे चित्र काढले म्हणून अतिरेक्यांनी हल्ला केला तर चार्ली हेब्दो ने पुन्हा ते चित्र काढलेच वर सोशल नेट्वर्किंग वर अनेक लोकांनी ते चित्र शेयर केले . आता पण A I B च्या विडिओ ला लाखो likes आणि शेयर मिळाले . बहुतेक वेळा सेन्सॉर शिप/ कलाकृतीला विरोध boomerang ठरू शकतो . त्यामुळे जे आवडत / पटत नाही त्याला इग्नोर करण जास्त योग्य असे वाटते .

>>>हा कार्यक्रम सार्वजनीक ठिकाणी नव्हता. तब्बल चार हजार रुपये तिकिट लावून बंद स्टेडियम वर झाला<<<

अच्छा! म्हणजे बघणार्‍यांनी चार हजार दिले तर आपण बंद खोलीत एखाद्यासमोर त्याच्या आईच्या अब्रूचे शाब्दिक धिंडवडे काढायला मोकळे होतो का? व्वा!

तो व्हिडीओ बघुन टिका केली तर चालत नाही तर हा धागा वा़चुन तरी का टिका करायची?
ज्याचे त्याचे विचार आणि आवड. मी व्हिडीओ बघीतला नाही कारण तो व्हिडीओ आता यु ट्युब वर उपलब्ध नाही. पण जाॅनर वगैरे सर्व मान्य केल तरी अश्लील भाषेला पर्याय नाहीच का? चांगल्या, सकस विनोदातुन आनंद घेता येत नाहीच का? जगाचे टक्केटोणपे, थपडा जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत माणुस सुजाण होत नाही. सो १८+ वय वगैरे ............ निदान भारतात तरी.
असो परत एकदा ज्याचे त्याचे विचार आणि आवड.

Pages