AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या माबोवर "मुली शिव्या का देतात?" असा एक बीबी होता. त्याची लिंक कुणी देईल का?

(तो बाफ कुणाच्या पोस्ट्समुळे चालू झाला होता ते आठवतंय का Wink )

तो कार्यक्रम तिकीट लावुन होता आणि प्रवेशासाठी वयाची अट पण होती.

तुम्हाला काय हरकत आहे र्‍ऋन्मेश साहेब. तुम्ही कशाला गेला होतात यु ट्युब वर?

तुमचे म्हणजे "मी नाही त्यातली... " ह्या म्हणी प्रमाणे आहे.

यावरुन लक बाय चान्स मधला रिशि कपुरचा डायलॉग आठवला "ये ईडिया है! यहा की पब्लिक( प्रेक्षक या अर्थी ) अलग है,"

तुमचे म्हणजे "मी नाही त्यातली... " ह्या म्हणी प्रमाणे आहे.
???
कुठली म्हण, अर्धवट नको पुर्ण लिहा Happy

पण ते एक असते ना, म्हणजे उद्या रस्त्यावर एखादा मुलांचा ग्रूप शिवीगाळ करताना दिसला तर तितकासा धक्का बसत नाही, पण मुलींचा ग्रूप रस्त्याने शिवीगाळ करत चालला आहे तर धक्का बसतोच. निदान मला तरी.
>>>>>>

यावरुन मला अभिषेकचा (तुमचा अभिषेक या आयडीचा) "सिगारेट ओढणारी मुलगी" हा लेख आठवला Wink
अवांतर बद्दल क्षमस्व.

आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. >>>>> बाप रे, मराठीपणाचा आणि त्या video चा काय संबंध?

ज्या दिवशी तो video रिलीज झाला त्याच दिवशी तो पाहिला. नक्कीच तो पाहून शॉक बसला (पण positively). रोस्ट हा प्रकार already वेस्टर्न कंट्रीज मध्ये लोकप्रिय आहेच, त्याचाच एक प्रयत्न भारतात केला गेला. आणि मला असे वाटते की, नक्कीच अशा प्रकारच्या openness आणि acceptance ची आज गरज आहे. of course एका ठराविक वयात प्रत्येकानेच सो-कॉल्ड समाजमान्य नसलेली पुस्तके अथवा videos पाहिलेले आहेत. मग काही लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे विनोद स्वतःवर करऊन घेतले तर काय बिघडले? तो त्यांचा प्रश्न आहे. आणि आजही समाजात शिव्यांची जी चौफेर उधळण चाललेली असते त्याच काय?

आणि ते विनोद होते कशावर? physical appearance, orientation, and personal nature. या अशा गोष्टी आहेत की, ज्यांच्याबद्दल समाजामध्ये अजूनही acceptance आलेला नाही ( उदा. सावळ्या अथवा जाड मुला-मुलींकडे लग्नाच्या बाजारात समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन). मग काही लोक स्वतःला accept करून जराही न्यूनगंड न बाळगता समाजापुढे येत असतील तर काय चूक आहे? सोसायटी लिबरल असेल तरच सर्वांना जगता येइल. भारतीय संस्कृती च्या उदो- उदोपणा मुळेच आत्महत्त्या, रेप किंवा तत्सम गोष्टींचे प्रमाण वाढत आहे.

आणि मुळात हा video टीव्ही वर दाखवला गेला न्हवता, त्यामुळे स्वतः ला अशा गोष्टी बघायची खाज असल्यामुळेच लोकांनी तो पहिला. ऋन्मेऽऽष, करण जोहरने डेस्क्लेमर दिला होता तेव्हाच तू तो बंद का केला नाहीस? किंवा करण जेव्हा म्हणाला, "Let the filth begin तेव्हातरी बंद करायचा होतास.

प्रशू, भारतीय संस्कृती आत्महत्येस प्रोत्साहन देते असे म्हणायचे का तुम्हाला.

कशाला इतका आरडाओरडा या विषयावर? ऋन्मेष तुला धागेरिया झालाय. काय घडलं की काढ धागा, काय घडलं की काढ धागा. बाकी ऑफिसात उद्योग नाही का काही? का तु स्वतःला माबोवर जगप्रसिद्ध करू ईच्छितोयस म्हणून हा अट्टहास? इतकं मन लावून काम हापिसात केलंस तर चुकून प्रमोशन वगैरे मिळेल. इतर लोकांनी काय बघावं काय बघू नये याची चिंता तुला कशाला? तु काय करतोस त्यावर लक्ष केंद्रित कर फक्त.

बाकी ए आय बी चा एपिसोड मी पाहिला काल. मला तरी अज्जिबातच त्यात अति अश्लिल किंवा सामाजिक पातळी खाली जाईल असं काही आहे असं वाटलं नाही. तिथल्या तिथे आलेल्या लोकांनी तिथल्याच किंवा त्या फिल्डशी रिलेटेड लोकांवर केलेले विनोद होते. असे विनोद जे नॉर्मल माणसं सुद्धा त्या व्यक्तिच्या मागे करतील, तेच या लोकांनी हजारो लोकां च्या समोर केले. त्यात इतकं बोंबा मारण्याजोगं काही नाही.
मिडिया प्रसिद्धी, बंदी हा सगळा उथळ पाण्याचा खळखळाट. इथे बाहेर बंदी घालून घरी जाऊन याच लोकानी तो व्हिडिओ गुपचुप पाहिला असेल.
इतका बाऊ करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. या शोत उच्चारलेले बरेचसे शब्द सध्या अत्यंत कमी लोकांत किंवा एकांतात उच्चारले जातात. फार कॉमन होतील तेव्हा त्याचे काहीही वाटणार नाही.
साध्या साध्या गोष्टींनी संस्कृती लयाला जाण्याची भिती व्यक्त केली जाते. अरे संस्कृती आहे का विहिरित बुडणारी घागर? Uhoh

>>>तुम्हाला पटत नाही तिकीट विकत घेऊ नका, तुम्हाला बघवत नाही. युट्युबवर व्हीडीओ प्ले करू नका. सिंपल.
>>>तो कार्यक्रम तिकीट लावुन होता आणि प्रवेशासाठी वयाची अट पण होती.

आपला समाज इतका रिस्पॉन्सिबल वाटतो तुम्हाला कि तिकीट लावलं कि झालं?
या बॉलिवूडवाल्यांचा समाजावर प्रचंड पगडा आहे. बॉलीवूडवाल्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तुतारी वाजवण्यापे़क्षा संवेदनशीलता दाखवायला हवी. याचतरसाठी सेन्सॉर बोर्ड आहे. सेन्सॉरवर कितीही हरकत घ्या पण त्याला पर्याय नाही. पुढे जाऊन अजुन काही काळाने त्याची कितपत गरज आहे याचा पडताळा घेता येईल.
अर्थात हा व्हिडीओ पाहिलेला नाहिये पण वर उल्लेख केलेल्या वाक्यांची नोंद घ्यावीशी वाटली.

आणि मी जर असं म्हणलं की करण जोहर, अर्जुन किंवा इतर जे कोणी तिथे आले होते त्यांच्या बद्दल मला आदर वाटू लागला आहे तर तुला धक्का बसेल का ऋन्म्या?

आदर वाटू शकतोच, कारण स्वतःवरचे असे विनोद पब्लिकमध्ये ओपनली ऐकून घ्यायला .... मध्ये सॉलिड दम लागतो.

दक्षिणा,

>> आदर वाटू शकतोच, कारण स्वतःवरचे असे विनोद पब्लिकमध्ये ओपनली ऐकून घ्यायला .... मध्ये
>> सॉलिड दम लागतो.

असहमत.

स्वत:ची चूक कबूल करून गरज पडल्यास संबंधितांची माफी मागणे यासाठी सॉलिड दम लागतो. उपरोक्त लोकं निलाजरे आहेत. त्यांना पैसे मिळाले की स्वत:वर कसलेही विनोद (वा आरोप) चिकटवून घ्यायला आनंदाने तयार होतील.

आ.न.,
-गा.पै.

भारतीय संस्कृती च्या उदो- उदोपणा मुळेच आत्महत्त्या, रेप किंवा तत्सम गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. >>>>>>>>> Uhoh

दंडवत......अगदी कोपरापासून

फन्नी आहे हा धागा...हाहाहा ... मराठी मुलगी, पालकांची परवानगी ,सेन्सर बोर्ड, सो कॉल्ड संस्कृति रक्षण आणि या शोला मायबोलीवर ऋन्मेष ने दिलेली प्रसिध्दी Biggrin
असो,
ए आय बी रोस्ट झेपत नसेल तर इट्स नॉट फॉर यु , केजो नी आधीच सांगितलं होतं शो सुरु होण्यापूर्वी !
मला आवडला पूर्ण शो आणि ए आय बी चे इतरही व्हिडीओज, बोलवा तुमची संस्कृति ब्रिगेड Proud
ऋन्मेष ची त.टि लिहिताना चूक झालीये बहुदा , योग्य त.टि खालील प्रमाणे
त.टि : जर तुम्हाला रणवीर- करण जोहर- आलीया-दीपिका- अर्जुन आवडत नसतील तर या शो मुळे आवडायला लागु शकतात !

आगाऊ, नंदिनी, दक्षिणा, मंजूडी आणि वरील अनेकांशी सहमत.
हा विनोदाचा प्रकार आवडत नाही इतपर्यंत बोलणं ठीक आहे, भारतीय संस्कृती आणि नीचतम हे अजिबातच पटलं नाही. मी हा शो बघून प्रचंड हसलो काही विनोद ओढूनताणून होते काही शिव्याही मुद्दाम द्यायच्या म्हणून होत्या, काही विनोद उपस्थितांना समजले की नाही ही शंका पण होती, पण हगाल्यापादल्या भावना दुखवायच्या काळात हाच शो माझ्या भारतात निर्माण झाला याचा मलातरी अभिमान वाटला. वर दक्षिणाने म्हटलंय तसचं, आलिया, करण, अर्जुन हे चक्क आवडू लागलेत. स्वतःवरच्या विनोदांना मस्त हन्डल करत होते सगळे जण. शिवसेना/ मनसेनी याला विरोध करण्यासारखा मोठा विनोद नाही. :p

स्वतःवरचे असे विनोद पब्लिकमध्ये ओपनली ऐकून घ्यायला .... मध्ये सॉलिड दम लागतो.

आक्षेप विनोदावर आहे का भाषेवर ?

रच्याकने..... सगळ्यांना तेच अवयव असताना. ईथे काय शब्द असेल हे माहित असताना चारचौघात त्याचा उल्लेख न करणे आणि.... देणे याला थोडाफार सभ्यपणा म्हणतात. तो या कार्यक्रमामधे नसावा असे चर्चेवरुन दिसते.

अमितव +१.

अरे, ऋन्मेष, चील बाबा चील!!! प्रत्येकाचा कॉमेडीचा जॉनर वेगवेगळा असतो.. हा प्रकारही एन्जॉय करणारं पब्लिक आहे जगात.. तुझ्यासाठी नवीन असेल हे, पण अमेरीकेत, युरोपात वगैरे असे शोज सर्‍हास चालतात. आपलाच एक भारतीय (अँग्लो इंडियन) अमेरिकेत ह्या प्रकारचे शोज करण्याबाबतीत फार प्रसिद्ध आहे. Russell Peters त्याचे नाव.. तो तर प्रेक्षकांनाच बळीचा बकरा बनवतो.. त्यांच्या नॅशनॅलिटी वरुन, धर्मावरुन अगदी कशाही वरुन विनोद करतो.. मुख्य म्हणजे त्याची हिंमत तर पहा, ज्या देशात जातो, त्या देशातल्या लोकांवर तो विनोद करतो आणि तेही लोक ते सगळं चक्क एन्जॉय करतात!! इतरवेळी ज्या कॉमेन्ट्स रेशिअल म्हणून ऑफेन्सिव्ह असतील, त्याच तो विनोदातून करुन लोकांना चक्क हसवतो.. तो स्वतःवरही विनोद करुन घ्यायला मागे पुढे अजिबात पहात नाही.. त्याचे शोज युट्युबवर आहेत. मी पहिल्यांदा पाहिले, तेंव्हा मला धक्क्यावर धक्के बसले होते, अगदी तुझ्याचसारखे.. पण सवय झाली, त्या मागची गंमत समजली की आपण हे शोज नक्कीच एन्जॉय करु शकतो.. काहीही पर्सनली न घेता बघता मात्र यायला हवेत!!! Happy

हा एक उदाहरणार्थ पहा: Russell Peters Red white Brown - Live Stand Up Comedy Full Show

AIB च्या शो मध्ये काहीही super offensive वाटले नाही. मी खूप हसले Lol ज्यांना असे कार्यक्रम पाहून कसेतरी होते त्यांनी हा कार्यक्रम पाहू नये सिंपल!

>>आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. >>>>>
बोलणारी व्यक्ती मराठी असण्याशी काय संबंध? मुलगी १८+ असेल तर ठीक आहे ना. मग तर पालकांचाही प्रश्न येत नाही.
‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.
तेव्हा वाट पहाणे योग्य!
घटनेच्या चौकटीत राहून कायद्यानुसार एखादी गोष्ट योग्य असेल तरी तथाकथीत संस्कृती रक्षक आरडाओरडा, गळे काढणे, दमटाटी करणे वगैरे नौटंकी करुन जी लोकशाहीची चेष्टा करतात , मानवी हक्क पायदळी तुडवतात त्याबद्दल खरे तर काळजी वाटायला हवी.

ज्याना ज्याना अजिबात आक्षेप नाहीयेत त्यांम्नी आपापल्या बयका / नवरे ,मुलाबाळांसमोर /त्यांच्याशी तश्या भाषेतले संभाषणे करावीत तसे शब्द उच्चारावेत मग समोरून काय प्रतिक्रिया /प्रतिसाद दिले ते इथे सविस्तर सांगावे
म्हणजे आणखी जास्त टाईमपास होईल सगळ्यांचाच मग बघू काय हिम्मत आहे कुणाच्यात वगैरे

स्वाती२,

>> घटनेच्या चौकटीत राहून कायद्यानुसार एखादी गोष्ट योग्य असेल तरी तथाकथीत संस्कृती रक्षक आरडाओरडा,
>> गळे काढणे, दमटाटी करणे वगैरे नौटंकी करुन जी लोकशाहीची चेष्टा करतात , मानवी हक्क पायदळी तुडवतात
>> त्याबद्दल खरे तर काळजी वाटायला हवी.

कोणाचे मानवी हक्क पा.तु. गेलेत?

असो.

एक विशिष्ट नेता आणि त्याचे विशिष्ट प्रयोग यावर माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे. मी करू का त्याला रोस्ट? हेही घ.चौ.मध्येच मोडते ना?

आ.न.,
-गा.पै.

>>ज्याना ज्याना अजिबात आक्षेप नाहीयेत त्यांम्नी आपापल्या बयका / नवरे ,मुलाबाळांसमोर /त्यांच्याशी तश्या भाषेतले संभाषणे करावीत तसे शब्द उच्चारावेत मग मुलांनी काय प्रतिक्रिया /प्रतिसाद दिले ते इथे सांगावे
म्हणजे माझाही आणखी जास्त होईल सगळ्यांचाच मग बघू काय हिम्मत आहे कुणाच्यात वगैरे>>
करमणूकीसाठी वयाची अट ठेवून, तिकीट लावून केलेला शो आणि घरच्यांशी केलेले संभाषण याची तुलना करणे चुकीचे. यात हिमतीचा काय संबंध?

एक विशिष्ट नेता आणि त्याचे विशिष्ट प्रयोग यावर माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे. मी करू का त्याला रोस्ट?>> जरुर करा, कायद्याच्या चौकटीत असेल तर कोण परवानगी नाकारणार?
बायदवे, असे मटेरिअल सगळ्यांकडेच आहे, नेते फक्त वेगळे असतील!!!

रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी >> म्हणजे त्याचे ते कार्टे आणि तुमचा तो शाहरूख.

अरे बाळ सगळी कडे जी भाषा वापरली जाते तीच त्यांनी स्टेज वर वापरली. आता हाताची ५ ही बोटे सारखी नसतात तसेच कोणी शिवराळ असते आणि कोणी नुसतेच विनोदात अपमान करून जाते. तू मला सांग तुझ्या एखाद्या ग्रूप मध्ये कुठला मांसाहारी विनोद आला तर लगेच तू लोकांचे काय विचार आहेत हे जाणून घेणार आहेस का. असे बोलतो आहेस की मराठी माणूस असे बोलतच नाही. कधी शिमगा ऐकला नाहीस का रे.

एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. >> अगदी उत्तम आहे. कायद्यात काय बसते ते पाहू. कायदे पण बदलता येतात तसेही.

असहमत.

स्वत:ची चूक कबूल करून गरज पडल्यास संबंधितांची माफी मागणे यासाठी सॉलिड दम लागतो. >> अहो गा पै मी कुठे नकार दिलाय पण? Uhoh
मी जे बोललेय त्यासाठी पण दम लागतो.

ना ज्याना अजिबात आक्षेप नाहीयेत त्यांम्नी आपापल्या बयका / नवरे ,मुलाबाळांसमोर /त्यांच्याशी तश्या भाषेतले संभाषणे करावीत तसे शब्द उच्चारावेत मग समोरून काय प्रतिक्रिया /प्रतिसाद दिले ते इथे सविस्तर सांगावे>> हे म्हणजे अति झालं आणि हसू आलं यातला प्रकार झाला.
वरिल प्रकारचं वाक्य फक्त अशाच व्यक्तिने करावं किंवा त्याला च अधिकार असावा ज्याने आयुष्यात कधीही कुणाला तोंडावर अथवा माघारी शिवी दिलेली नाही. अश्लिल बोललेलं नाही इ. सांगा छाति ठोक पणे.

वैवकु, logic कळले नाही! म्हणजे मला हॉरर फिल्म्स आवडत असतील तर मी घरादाराला घाबरवत फिरू का? प्रत्येक गोष्टीची काळवेळ आणि audience असतो. हा एक अडल्ट शो होता आणि तो अडल्ट्स पर्यंत मर्यादित कसा राहीलं ही आणि एवढिच खबरदारी घेतली पाहिजे.

Pages