AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा! म्हणजे बघणार्‍यांनी चार हजार दिले तर आपण बंद खोलीत एखाद्यासमोर त्याच्या आईच्या अब्रूचे शाब्दिक धिंडवडे काढायला मोकळे होतो का? व्वा!>>

बेफी! तुम्ही आधी व्हिडियो बघा, यासाठी म्हणतिये की बघितल्यावर कळेल की ज्याना रोस्ट केले जात होते ते तिथे बसुन य्थेच्छ एन्जोय करत होते.त्यामुळे अस नव्हत की ४००० रुप्ये मोजुन कुणि कुणाचा त्याच्या मनाविरुद्ध अपमान करत होत... बाकी हा प्रकार चान्गला कि वाईट हे बघण्यावर आहे( त्याचीही कुणाला सक्ति नाहिचे!!)

बन्द स्टेडियमत्मधे तिकिट मोजुन लोकानी बघितला याचा अर्थ एवढाच की प्रेक्षकाना पुर्ण माहित होते की
what are they going फॉर!

आपण चारचौघांमध्ये जसे वागत / बोलत नाही तसे कोणी इतरांच्या मनोरंजनाच्या हेतूने स्वतःचा अपमान करून घेण्याच्या किंमतीवर पुरेपूर पैसे घेऊन वागत / बोलत आहे हे बघायला लोकांना मजा येईलच हे कशावरून?

(म्हणूनच वैवकुंच्या प्रतिसादाशी सहमत!)

आणि काही अल्पसंख्यांकांना मजा आली तरी अशी मजा त्या अल्पसंख्यांकांना घेऊ द्यावी की घेऊ देऊ नये हे ठरवणार्‍यांचा निर्णय मोठा सूज्ञ निर्णयच आहे हे कशावरून?

फूलनदेवी चित्रपटातील शिव्या त्या काळात सेन्सॉरने मंजूर केल्या आणि त्यानंतर त्या थेट गंगाजलमध्ये ऐकायला मिळाल्या. (चित्रपटांबद्दलचे अल्प ज्ञान, क्षमा असावी). अधेमधे आलेल्या चित्रपटांनी शिव्यांचा वापर न करता गल्ला कसा कमवला?

वाक्यावाक्याला 'फक' शब्द वापरणार्‍यांकडून तेवढेच का उचलले जात आहे? Proud

त्याच्या आईच्या अब्रूचे >>> नाही बेफी, त्याच्या स्वतःच्या.. मी हा शो पाहिला नाही पण हा लेख वाचल्यावर करण जोहर वर काय काय जोक्स केले, ते स्टेटमेन्ट्स काही लेखांमध्ये दिसले.. अतिशय हीन भाषेत त्याच्यावर केलेले विनोद आहेत पण तो स्वतः बसून त्यावर हसतोय आणि त्याला काहीही ऑफेन्डिंग वाटत नाहीये, हे तिथे दिलेल्या चित्रांवरुन आणि युट्युबवरच्या ट्रेलर्स वरुन दिसतेय.. एकंदरीत हा प्रकार आ बैल मुझे मार आणि हे मारत असतांना बघणारा आणि मार खाणारा दोन्ही एन्जॉयच करतायत असा प्रकार आहे.

पण जाॅनर वगैरे सर्व मान्य केल तरी अश्लील भाषेला पर्याय नाहीच का? चांगल्या, सकस विनोदातुन आनंद घेता येत नाहीच का?>>> आभा, ह्याला ज्याची त्याची आवड इतकंच उत्तर आहे...

एक्झ्याक्त्ली. सगळं रिलेटिव्ह आहे, ज्याची त्याची आवड वर सोडून दिलं तर काहीच हरकत नाही. टीका करायला तर त्याहून हरकत नाही.
पण संस्कृती पोलीस बनून आणि आम्ही म्हणतो म्हणून (कायद्याच्या विरुद्ध असेल तरी) ऐकलं पाहिजे याला विरोध आहे.

बेफी तुम्ही पाहिला नाही आणि लगेच आई वर घसरलात.

हा व्यक्तीगत अपमान होता कोणाची ही आई काढण्यात आली नव्हती.

बेफी! तुम्ही आधी व्हिडियो बघा,<<<

ह्याबाबत आधीच लिहिलेले आहे. Happy

यासाठी म्हणतिये की बघितल्यावर कळेल की ज्याना रोस्ट केले जात होते ते तिथे बसुन य्थेच्छ एन्जोय करत होते.<<<

'लाखो रुपये मिळण्याच्या मोबदल्यात माझ्या आईची अब्रू चव्हाट्यावर येणे मला चालते' असे लोक तिथे असतील. (बाय द वे, इतरत्र वाचले की आईवरून अश्लील बोलले गेले, किंबहुना एका चॅनेलवर पाहिले)

त्यामुळे अस नव्हत की ४००० रुप्ये मोजुन कुणि कुणाचा त्याच्या मनाविरुद्ध अपमान करत होत... <<<

यू मिस्ड द होल पॉईंट! अपमानाची किंमत असते हे तत्त्व 'आयातच' का करायचे असे माझे म्हणणे आहे. अपमानाची किंमत नसतेच, अपमानाचा फक्त बदलाच घ्यायचा असतो. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की उद्या एखादा आपली प्राईस ४००० वरून वाढवून ४०००० करेल. मी त्याबद्दल बोलत नाही आहे. Happy

बाकी हा प्रकार चान्गला कि वाईट हे बघण्यावर आहे( त्याचीही कुणाला सक्ति नाहिचे!!)<<< सक्ती आहे. एक शो होतो, तो कायद्याने मंजूर झालेला असतो, ज्यांना परवडते ते जातात, ज्यांना नाही ते नाही. नंतर कळते की असे असे झाले. हे 'असे असे झाले' हे कळण्याची सक्ती आहे. आणि त्यावर मतप्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य आहे. Happy

बन्द स्टेडियमत्मधे तिकिट मोजुन लोकानी बघितला याचा अर्थ एवढाच की प्रेक्षकाना पुर्ण माहित होते की
what are they going फॉर!<<<

ओह इझ इट? डान्स बार उगीच बंद झाले मग!

>>>ही व्यक्तीगत अपमान होता कोणाची ही आई काढण्यात आली नव्हती.<<<

एका दूरदर्शन वाहिनीवर दाखवण्यात आले आहे की आईला उद्देशून बेअब्रू केली गेली.

अमितव +१

बे फी तुम्ही मूळ विषयाला डान्स बार आणून फाटे फोडू नका.

डान्स बार मध्ये पैसे उधळून अनेकांचे संसार तुटले. अनेक बार बालांची अवैध खरेदी विक्री झाली. तो वेगळा विषय आहे.

एका दूरदर्शन वाहिनीवर दाखवण्यात आले आहे की आईला उद्देशून बेअब्रू केली गेली.>>>>> फरिदा जलालला कोणी आई समान मानत असेल तर मग केली गेली आहे बेअब्रु.
Proud

फाटे फोडत नाही आहे. नीट वाचले तर लॉजिक लक्षात यावे.

आपण पैसे देऊन काहीतरी 'अनहर्ड ऑफ' बघायला जात आहोत हे माहीत असणे!

मला आवडले नाही हे ठासून सांगा, एक नव्हे शंभर धागे काढा, सेन्सॉर बोर्डाला वर्तमानपत्रात जाहीर पत्रं लिहून तुमची निराशा कळवा, मला मानसिक त्रास झाला म्हणून केस करा फक्त त्यात भारतीय संस्कृतीला धक्का , सार्वजनिक स्वास्थ्य, आजची तरूण पिढी, मराठी मुली असले काही फालतू बरळू नका,
बरळलात तरी कीबोर्ड बडवण्यापलिकडे संस्कृतीचा कळवळा नाही हे ऊघड आहे.

चिनूक्स >> +१

दूरदर्शन वाहिनीवर तर सोनाक्षी तिथे होती असे पण दाखवत आहेत. प्रत्यक्षात ती तिथे नव्हती. आता दूरदर्शन च्या ब्रेकिंग न्युज साठी टी व्ही एफ चा विडिओ पहा

>>> फरिदा जलालला कोणी आई समान मानत असेल तर मग केली गेली आहे बेअब्रु.
फिदीफिदी<<<

अत्यंत अभिरुचीहीन विधान! निषेध!

>>>असले काही फालतू बरळू नका,
बरळलात तरी कीबोर्ड बडवण्यापलिकडे संस्कृतीचा कळवळा नाही हे ऊघड आहे.<<<

का बुवा?

केवळ बोलायला आणि गाजवून घ्यायला हे वाक्य सोप्पे आहे म्हणून का?

कोणत्या स्त्रीला आईसमान मानावे आणि कोणत्या स्त्रीला मानू नये हे आता वैद्यबुवांकडून शिकावे लोकांनी!

Sad

चमन, ये मारा सिक्स! +१

ओ तुम्ही जरा लाईट घ्या हो बेफिकिर. मी पण फरिदा जलालला आई समानच मानतो. फक्त त्यावरुन रणवीरसिंगची अब्रु वेशीवर टांगली गेली असं म्हणत होतो, बाकी काही नाही. Lol

>>>ओ तुम्ही जरा लाईट घ्या हो बेफिकिर. मी पण फरिदा जलालला आई समानच मानतो. फक्त त्यावरुन रणवीरसिंगची अब्रु वेशीवर टांगली गेली असं म्हणत होतो, बाकी काही नाही. हाहा<<<

वैद्यबुवा,

रंग बदलण्याचा वेग जरा वाढवायचे बघा. अंगावर आले की हॅहॅ करत जाऊ नका.

तसेही, तुम्ही कोणाला काय मानता ह्याच्यावर जगात काहीच ठरत नाही अ‍ॅन्ड इट इज सेम विथ एव्हरीवन!

सानी, अमितव, रीलेटिव्ह आहेच, पण जी भाषा मी बोलणार नाही अथवा माझ्या मुलांनी बोललेली मला चालणार नाही, त्या भाषेतला विनोद मी प्रौढ म्हणुन ऐकेनही, कदाचीत २/४ विनोदांवर हसेनही, पण त्याला ग्लॅमर नको अस मला ठामपणे वाटते. आणि समाजातले हिरो लोक (सर्व प्रकारचे) जेंव्हा त्याची भलावण करतातत तेंव्हा अपरीपक्व मुलांना, मनांना चुकीचाच संदेश दिला जातो.

मला वाटलं जाई वरच्या पोष्टीत बेरीज करतेय की काय ? Lol
आभा आधी त्या कार्यक्रमाला ग्लॅमर नव्हतं पण त्याला नको तितकी प्रसिद्धी देऊन / चर्चा करुन ग्लॅमर दिलं गेलयं.

>>>सानी, अमितव, रीलेटिव्ह आहेच, पण जी भाषा मी बोलणार नाही अथवा माझ्या मुलांनी बोललेली मला चालणार नाही, त्या भाषेतला विनोद मी प्रौढ म्हणुन ऐकेनही, कदाचीत २/४ विनोदांवर हसेनही, पण त्याला ग्लॅमर नको अस मला ठामपणे वाटते. आणि समाजातले हिरो लोक (सर्व प्रकारचे) जेंव्हा त्याची भलावण करतातत तेंव्हा अपरीपक्व मुलांना, मनांना चुकीचाच संदेश दिला जातो.<<<

+१

(खवखवले) Proud Light 1

बाकी हा प्रकार चान्गला कि वाईट हे बघण्यावर आहे( त्याचीही कुणाला सक्ति नाहिचे!!)<<< सक्ती आहे. एक शो होतो, तो कायद्याने मंजूर झालेला असतो, ज्यांना परवडते ते जातात, ज्यांना नाही ते नाही. नंतर कळते की असे असे झाले. हे 'असे असे झाले' हे कळण्याची सक्ती आहे. आणि त्यावर मतप्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्मित

बन्द स्टेडियमत्मधे तिकिट मोजुन लोकानी बघितला याचा अर्थ एवढाच की प्रेक्षकाना पुर्ण माहित होते की
what are they going फॉर!<<<

ओह इझ इट? डान्स बार उगीच बंद झाले मग!

>>>
I rest my case!

Pages