ढोल

Submitted by मिल्या on 13 January, 2015 - 07:54

सांग माझे ढोल मी बडवू कशाला?
सूर्य मी आहेच तर मिरवू कशाला?

स्पर्श कर्जाऊ तिने काही दिलेले
रेशमी देणे असे चुकवू कशाला?

आत्मशोधाची कथा सांगून जाती
चेहर्‍यावरचे चरे लपवू कशाला?

जी कधीही माणसे घडवीत नाही
मी तरी मूर्ती अशी घडवू कशाला

मी तुझ्या डोळ्यांमधे आकंठ बुडतो
दु:ख मग दारूमधे बुडवू कशाला?

ठिकठिकाणी फाटले नाते जरी हे
वीण आहे घट्ट तर उसवू कशाला?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!

जी कधीही माणसे घडवीत नाही
मी तरी मूर्ती अशी घडवू कशाला<<< मस्त शेर!

एकुण गझल सहजसुंदर झाली आहे.

मी तुझ्या डोळ्यांमधे आकंठ बुडतो
दु:ख मग दारूमधे बुडवू कशाला?

व्वा. एक माझा शेर लिहायचा मोह होत आहे:

विस्मरून पाहू आपण
दोन पेग ढकलू आपण

धन्यवाद.

सांग माझे ढोल मी बडवू कशाला?
सूर्य मी आहेच तर मिरवू कशाला?

जी कधीही माणसे घडवीत नाही
मी तरी मूर्ती अशी घडवू कशाला

वा वा !