दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन

पुणे- ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आज (शुक्रवार) निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

गोवारीकर यांचे हवामान संशोधनात मोठे योगदान होते. अवकाश व लोकसंख्या क्षेत्रात संशोधनात्मक अभ्यास होता. गोवारीकर यांना विविध पुरस्कार मिळाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते. शिवाय, विविध पुस्तके व निबंध त्यांच्या नावार आहेत. सन 1991 ते 93 मध्ये ते पंतप्रधानांचे सल्लागार होते.

अरेरे! खुपच वाईट बातमी Sad
त्यांना मनःपुर्वक श्रद्धांजली.

खुप ऋजू व्यक्तिमत्व. कर्तृत्ववान संशोधक होते तसेच ते एक उत्तम माणूसही होते. मिसेस गोवारीकरांनी त्यांच्या सहजीवनाबद्दल लिहिलेल्या एका लेखातून त्यांच्या इतर गुणांबद्दलही वाचायला मिळालं होतं.

काय लिहणार, वर्षाच्या सुरुवातिलाच इत्की वाइट बातमी.श्रद्धांजली

पद्मजा फाटक यांना श्रद्धांजली.
बाराला दहा कमी बद्दल सेम हिअर !

सरीता पद्की गेल्या !!!

पद्मजा फाटक.. ' गर्भश्रीमंतीचं झाड' मुळे त्यांच्या संपन्न व्यक्तित्वाची पहिली ओळख झाली होती तर सरिता पदकी -गेल्या पिढीतील एक व्युत्पन्न संस्कृत प्राध्यापिका/ कवयित्री म्हणून माहिती होत्या.त्यांचे कवी-पुत्र डॉ. मिलिंद पदकी इंग्लिश कविता लिहितात - दोघींनाही विनम्र श्रद्धांजली ..

http://timesofindia.indiatimes.com/world/europe/11-dead-10-wounded-in-sh...

PARIS: Masked gunmen stormed the offices of a French satirical newspaper on Wednesday, killing 11 people before escaping, police and a witness said. The weekly has previously drawn condemnation from Muslims.

या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि मृतांना श्रद्धांजली.

कोकणस्थ,

>> या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि मृतांना श्रद्धांजली.

यात भेकड हा शब्द राहिला.

मृतांना श्रद्धांजली. Sad

आ.न.,
-गा.पै.

हल्ल्याचा निषेध! अत्यंत दुर्दैवी घटना! माणूसकीला लाजवणारी!

दहशतवाद अनिर्बंधपणे फोफावत आहे आणि सगळे सूज्ञ देश आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबाव मनावर घेऊन नुसते निषेध व्यक्त करत आहेत. अतिरेकी विचारसरणीला मारण्यासाठीही अतिरेकी विचारसरणीच आवश्यक आहे की काय असे वाटायला लागेल अशी अवस्था!

भय वाटत आहे की एक दिवस असा येईल जेव्हा ह्या जगावर अतिरेक्यांचे राज्य असेल आणि ह्या अश्या घटना सहजपणे घडताना दिसतील.

विषारी व अनिर्बंध साप हा पिंजर्‍यात डांबण्याच्या औकादीचा प्राणी नसून ठेचण्याच्या औकादीचा प्राणी आहे.

Pages